Submitted by harish_dangat on 21 November, 2010 - 21:43
वाटेत भेटली | ओंडक्यांची वस्ती |
कुर्हाडींची गस्ती | भोवताली ||
कोण म्हणे आम्हा | जीवा नसे घोर |
कोणताही चोर | येणे नाही ||
कुर्हाडींच्या कधी | लवलवे जीभा |
एखाद्यास उभा | खाती भावे ||
ओंडक्या पुसले | सांगा मज कथा |
तुमची ही व्यथा | कशी झाली ||
एक सांगे मज | नशीबाचा भोग |
दुफळीचा रोग | आम्हालागी ||
बहु झाली येथे | आमची कुभांडे |
आमचेच दांडे | कुर्हाडीला ||
-हरीश दांगट
गुलमोहर:
शेअर करा
“दुफळीचा रोग | आम्हालागी
“दुफळीचा रोग | आम्हालागी ||
बहु झाली येथे | आमची कुभांडे |
आमचेच दांडे | कुर्हाडीला ||”
…..छान
छान फ्लो आलाय, अभिनंदन आणि
छान फ्लो आलाय, अभिनंदन आणि शुभेच्छा!!
हरीश, मुख्यमंत्रीवरची कॉमेंट
हरीश, मुख्यमंत्रीवरची कॉमेंट मागे घ्यावी लागेल. सॉरी, ही कविता पाहीली नव्हती. सुंदर आहे.
छान आहे !
छान आहे !:)
खूपच छान कविता . आवडली !!
खूपच छान कविता .
आवडली !!
मस्त
मस्त
बहु झाली येथे | आमची कुभांडे
बहु झाली येथे | आमची कुभांडे |
आमचेच दांडे | कुर्हाडीला ||
क्या बात है. मस्त शब्दांकन.
क्या बात है! मस्त
क्या बात है! मस्त