Submitted by आनंद गोवंडे on 18 November, 2010 - 00:13
(या कवितेतील एकेरी अवतरण चिन्हातील शब्द 'विशिष्ट' संदर्भात वाचावेत...
इथे राजरोस चोरांचे थैमान
शिपाईच (राज्यकर्ते) सारे इथे बेईमान
कुणी आपल्या 'शिला'स विकतो
'राजा' आपल्या देशास लुटतो
कुणाचा 'आदर्श' वा कुणाची 'माडी'
(तरी) सार्यांच्याच दारी लाल दिव्याची गाडी
'आम आदमी'... चा सदा जप चालू
जप करणार प्रत्येक, नंबर एक 'चालू'
यांच्याच तोंडी भरे सर्व 'साखर'
गरिबाच्या थाळीत कोंड्याची भाकर
साखर खाऊन तोंड फाटलेले
पैशानेच आहे सर्व झाकलेले
गरिबांस आता हरएक लुटतो
भाकर उरे ती 'युवराज' खातो
सर्वांस 'मडम' दावितात 'हात'
म्हणे - सर्व बसा असेच खात
बोंबलेल जनता मरो बोंबलू दे
चिडेल जनता कितीही चिडू दे
जनतेस जेव्हा मिळवीन हात
जनता म्हणेल - "व्वा काय मडमची बात!"
देशात आता हेच चालायचे
आपुले थडगे आपण खोदायचे ..... (यांना परत परत निवडून देऊन)
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
यांच्याच तोंडी भरे सर्व
यांच्याच तोंडी भरे सर्व 'साखर'
गरिबाच्या थाळीत कोंड्याची भाकर
साखर खाऊन तोंड फाटलेले
पैशानेच आहे सर्व झाकलेले
गरिबांस आता हरएक लुटतो
भाकर उरे ती 'युवराज' खातो
मित्रां मन लावून लिहिलीय कविता .
असा नाराज होऊ नकोस. आपण सर्व एकाच बोटीतले प्रवासी आहोत...!!
छान लिहिली आहे. आणि पटली
छान लिहिली आहे. आणि पटली सुद्धा.
पुलेशु
प्रकाश, शुभांगी धन्यवाद....
प्रकाश, शुभांगी
धन्यवाद.... पण खरच परिस्थीती गंभीर आहे.... आता घोटाळे लाखो-कोटींचे होतात
शिला=दगड शील=चारित्र्य. नक्की
शिला=दगड
शील=चारित्र्य.
नक्की काय विकतंय कोण? विकत घेणार्याला तेच हवे असेल तर जरकत नाही.
'' चिन्हामधले शब्द विशिष्ट
'' चिन्हामधले शब्द विशिष्ट व्यक्ती किंवा घोटाळ्यांच्या संदर्भात आहेत...
'शिला' - शिला दिक्षित
आता हे सांगीतल्यावर बाकी सांगावी लागणार नाहीत ...
हो पण त्यांचे नाव शिला आहे की
हो पण त्यांचे नाव शिला आहे की शीला आहे? शिला नाव असते का?
अवतरणचिन्हे असल्यावर वाचकाने पुन्हा त्याचे संदर्भ आठवावे असे सांगायची गरज काय?
'शीला' असल पहिजे... चूक झाली
'शीला' असल पहिजे... चूक झाली आणि ती लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद
आनंदराव भारी कविता !
आनंदराव

भारी कविता !
मस्त हाणले.
मस्त हाणले.
अनिल, गंगाधर - धन्यवाद या
अनिल, गंगाधर - धन्यवाद
या लोकांना खरोखरचे कधी हाणायला मिळेल याची सगळेच वाट पहातायत...