Submitted by विशाल कुलकर्णी on 19 November, 2010 - 01:04
मज कोडे आयुष्याचे आकळाया लागले
हलकेच माझे.., तारुण्य ढळाया लागले !
बघ ओघळले गालावरी थेंब दोन आता
मला आसवांचे अस्तित्व कळाया लागले !
संपले होते मागे मार्ग कधीच परतीचे
अन पुन्हा डोळे.., हे मागे वळाया लागले !
बघतो वळुन मी छाटलेले बंध आठवांचे
क्षण आता वार्याच्या वेगे पळाया लागले !
जगायचे गेले राहुन धुंदीत धावण्याच्या
नुरला वेळ पश्चातापा मन जळाया लागले !
विशाल.
गुलमोहर:
शेअर करा
संपले होते मागे मार्ग कधीच
संपले होते मागे मार्ग कधीच परतीचे
अन पुन्हा डोळे.., हे मागे वळाया लागले ! >>>
सहीच रे, विशल्या. आवडली कविता.
मज कोडे आयुष्याचे आकळाया
मज कोडे आयुष्याचे आकळाया लागले
हलकेच माझे.., तारुण्य ढळाया लागले !
लई वाईट झाले राव... मला हे चार वर्षांपुर्वी अचानक कळाले आणि तेव्हा बसलेला धक्का अजुनही ओसरला नाही
गजल्/कविता जे काही आहे ते छान आहे.
जगायचे गेले राहुन धुंदीत
जगायचे गेले राहुन धुंदीत धावण्याच्या
नुरला वेळ पश्चातापा मन जळाया लागले !
अरे खूप दिवसांनी. वाचून छान वाटले.!!
विशाल्भौ..... फार छान
विशाल्भौ..... फार छान कविता... तू हीची गझल लीलया बनवू शकशील...
कैलासदादा, कशाला नाही त्या
कैलासदादा, कशाला नाही त्या फंदात पाडताय, डोक्यावरचे उरले सुरलेही उडून जातील माझ्या
हा आता तुम्ही मदत करणार असाल तर आपली त्याला पण तयारी आहे.
आभार
विशाल हे घे
विशाल हे घे
http://www.maayboli.com/node/21325
वर्षे, धन्य आहेस
वर्षे, धन्य आहेस
वा! अप्रतिम!
वा! अप्रतिम!
व्वा!!! विशलदा... व्वा!!!
व्वा!!! विशलदा... व्वा!!!
विशाल कविता अप्रतिम मज कोडे
विशाल कविता अप्रतिम
मज कोडे आयुष्याचे आकळाया लागले
हलकेच माझे.., तारुण्य ढळाया लागले !
एवढ्या लवकर जाणीव झाली
दिल तो बच्चा है जी...........
निखिल
निखिल
सुंदर कविता विशाल.. मला गझल च
सुंदर कविता विशाल.. मला गझल च वाटली वाचताना.. बाकी टेक्निकल फरक नाही कळत त्यातला.
जिंदगीचे गूढ जेव्हा आकळाया
जिंदगीचे गूढ जेव्हा आकळाया लागले
जाणले तारुण्य माझे ही ढळाया लागले
थेंब ओघळले जसे मम दोन, ह्या गालावरी
अश्रु म्हणजे काय्?हे आता कळाया लागले
कापले गेलेत माझे मार्ग परतीचे तरी
नेत्र हे आता पुन्हा मागे वळाया लागले
आठवांचे छाटलेले बंध मी बघता वळुन
क्षण बनूनी वात वेगाने पळाया लागले
धावलो धुंदीत इतुका,की कधी जगलोच ना
वेळ ना उरली अता मन मम जळाया लागले.
विशालभाउ,आपल्या कवितेची गझल बनविली आहे...... आशय सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.गोड मानुन घ्या.
मस्त रे, विशाल. आम्हालाही
मस्त रे, विशाल.
आम्हालाही तुझे 'अंतरंग' आता कळाया लागले.
जगायचे गेले राहुन धुंदीत धावण्याच्या>>>>>
आता जगून घे मित्रा! मनमुराद.
बघ ओघळले गालावरी थेंब दोन
बघ ओघळले गालावरी थेंब दोन आता
मला आसवांचे अस्तित्व कळाया लागले !विशाल मस्त
कैलासदादा, मुजरा घ्यावा
कैलासदादा, मुजरा घ्यावा
अतीशय सुंदर! -हरीश
अतीशय सुंदर!
-हरीश
“जगायचे गेले राहुन धुंदीत
“जगायचे गेले राहुन धुंदीत धावण्याच्या”
…..छान
कविता मस्त आणि कैलासरावांनी
कविता मस्त आणि कैलासरावांनी बनवलेली गझलही मस्त!!
शुभेच्छा!!
>>संपले होते मागे मार्ग कधीच
>>संपले होते मागे मार्ग कधीच परतीचे
अन पुन्हा डोळे.., हे मागे वळाया लागले!<< भारीच, मस्त लिहिलयस विशाल.
मन:पूर्वक धन्यवाद
मन:पूर्वक धन्यवाद