एरंड

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

याच्या दोन जाती आहेत रंगावरुन. एक आहे वर दिसतेय ती हिरवी. तिला पांढरी जात म्हणतात आणि दुसरी असते लाल. कारण याच्या बोंडांवर लाल झाक असते. हिइ जात खास करुन नगर जिल्ह्यात मी बघितली. वरच्या फोटोत नीट निरखुन बघितले तर पिवळी फुलेहई दिसतील. पण याची लाल फुले येणारी जातहि आहे.

erandaachee_laal_fule.jpg

तसेच याची मळे आणि जिरायती अश्याही जाती आहेत. फुले क्वचित दिसली तरी झाडावर काटेरी बोंडे मात्र सदोदित दिसतात.
बोंडावरचे काटे मात्र मऊ असतात. याच्या आत पांढर्‍या दोन तीन बिया असतात. या बिया चवीला काजुसारख्याच लागतात पण खाल्ल्यावर मात्र पोटात प्रचंड दुखते. बियात रिसीन नावाचे एक विषारी द्रव्य असते. हा त्रास होतो तो त्यामुळेच. याची बोंडे काढणार्‍या कामगाराना पण याचा त्रास होतो.
याच बियांपासुन तेल काढतात. या प्रक्रियेत मात्र बियांचा विखार जातो.
माझ्या वाचनात असे आले कि चीनमधे या बिया तेलात परतुन, वाटुन काहि पदार्थात घालतात. त्यांच्या मते या बियांचा विखार काहि काळाने आपोआप निघुन जातो. पण आकाशातले विमान सोडुन काहिही, जमिनीवरचा माणुस सोडुन काहिही आणि पाण्यातली बोट सोडुन काहिही खाणार्‍या चिन्याना. काहिही पचवण्याचे सामर्थ्य असणारच ना.

आपल्याकडे पुर्वापार सारक म्हणून एरंडेल वापरलं जातंच आहे पण त्याचा स्वाद मात्र भयानक असतो. पुर्वी लहान मुलाना चहामधुन तो द्यायची रित होती. कॉड लिव्हर ऑईलच्या जश्या कॅप्सूल्स मिळतात तश्या याच्या मिळाल्या तर छान होईल.

अपुर्ण

विषय: 
प्रकार: 

मोहरीचे तेल एकपट , एरंडीचे तेल दुप्पट आणि खोबरयाचे तेल तिप्पट घेऊन , एका स्वच्छ काचेच्या बाटलीत भरुन ठेवावे . हे मिश्रण चांगले ढवळून रोज रात्री ओठांवर लावावे. त्यामुळे ओठ मुलायम राहतील

बाकी लेख चांगला आहे .