सप्तसूर

Submitted by अलका_काटदरे on 1 December, 2008 - 09:45

एवढा मोठा हिंदुस्तान, सगळं होतं आलबेल
छाती फुगून येत होती गोरवाने
इतकी की छिद्रे पडू लागली नंतर भाराने

आधी भांडलो आपल्यातल्याच पाकिस्तानशी
मग बांगला काय, चीन काय
भांडणे आपलीच, मदत मात्र तिसर्‍याची
वरून सहानुभूति जगाची

भुगोलावरून भांडून झाले
राज्ये एकमेकाला भिडली
धर्माधर्मातील भांडण मात्र
इतिहासजमा नाही झाले

जातींनी आपापली जात दाखविली
भाषांनी तर्‍हेतर्‍हेनी आपला प्रचार केला
मोकळी मॅदाने युध्दभूमी झाली
नातीगोती एक दुसर्‍याशी दूर होत गेली

मोकळ्या धमन्या आखडत चालल्या
सुरूवात कोणी, कोठे, केव्हा केली
ह्याचे धडेच्या धडे बालके अजूनही गिरवताहेत
पण शेवट करण्यासाठी ..
सप्तसूरांची वात तर आपल्याच हाती आहे...

गुलमोहर: 

मोकळं मॅदान ...

खरंय .. कुणाला कुठे मोकळं मॅदान मिळेल काय सांगवत नाही ब्वा