Submitted by sumati_wankhede on 27 November, 2008 - 01:12
सारं जवळ असूनही सुख असतेच... असे नाही !
बघून डोळा अश्रू, कुठे कळ उठतेच... असे नाही !
मायेभरले छत अवचित बघता बघता उद्ध्वस्त होते
पायाखालची वाट हवी तशी वळतेच... असे नाही !
काळोखाच्या जाळीमधून एक कवडसा अलगद हसता
मोहरभरल्या पानांमधून फूल गळतेच... असे नाही !
'माझं... माझं' करता करता दूर जाती नाती-गोती
'नको-नको' म्हणतानाही मरण टळतेच... असे नाही !
हवे तसे उसवून घेतले; हवे तसे सजवून घेतले
सारे सारे दिले तरी मन कळतेच... असे नाही !
गुलमोहर:
शेअर करा
>>हवे तसे
>>हवे तसे उसवून घेतले; हवे तसे सजवून घेतले
सारे सारे दिले तरी मन कळतेच... असे नाही !
मायेभरले छत अवचित बघता बघता उद्ध्वस्त होते
अन पायाखालची वाट हवी तशी वळतेच... असे नाही !
खूप छान!
किती
किती सहज..किती साधे शब्द पण किती खोल....
अप्रतिम, सुमती....खुप छान !
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
सुदंर,
सुदंर, साध्या शब्दात मोठे तत्वज्ञान.
हरीश
>>हवे तसे
>>हवे तसे उसवून घेतले; हवे तसे सजवून घेतले
सारे सारे दिले तरी मन कळतेच... असे नाही !>>
बयो, ५ गावं इनाम तुला. मस्तच.
हवे तसे
हवे तसे उसवून घेतले; हवे तसे सजवून घेतले
सारे सारे दिले तरी मन कळतेच... असे नाही !
....... सुरेखच!
-----------------------------------------------------
दम लिया था न कयामत ने हनूज
फिर तेरा वक्त-ए सफर याद आया
खुप सुंदर
खुप सुंदर
क्या बात
क्या बात है. सुमतीजी, ही तुमच्या कोठल्या काव्यसंग्रहातील?
.............................................................................
मला हे माहित आहे की मला काहीच माहित नाही. पण त्यांना तर हे ही माहित नाही की त्यांना काहीच माहित नाही! (सॉक्रेटिस)