माशी / भिशी / फाशी / मिशी / कळशी

Submitted by वर्षा_म on 11 November, 2010 - 07:51

आमची प्रेरणा
http://www.maayboli.com/node/20756

============

माशी

दिवसभर साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या पाशी!
मग या दिवसाच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
नाक आणि हात या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत लढण्याचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी चपळ माशी!

============

भिशी

दिवसभर साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या पाशी!
मग या दिवसाच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
पाकिट आणि मैत्रिणींमधला
ती एक दुवा !
पाकिट रिकामे करण्याचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी टाइमपास भिशी!

============

फाशी

आयुष्यभर साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या पाशी!
मग या मरणाच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
जन्म आणि मरण यातला
ती एक दुवा !
माझा विचारही आता
आपण सोडुन घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी फाशी!

============

मिशी

दिवसभर साथीला नसताना कोणी
पिरगळायला असते माझ्या पाशी!
मग या मानाच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
नाक आणि ओठ या मधील
ती एक दुवा !
तीला धरुन पिरगळण्याचा
आनंद मी नेहमीच घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती तुझी लांब लांब मिशी!

============

कळशी

दिवसभर साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या पाशी!
मग या कंबरेवरच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
तहान आणि तृप्ती या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत रहाण्याचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी नाजुक कळशी!

गुलमोहर: 

वर्षे, माझे 'तिकडच्या' बाफवरचे सगळे झब्बू इकडे पण सेव्हतेय गं... Happy

राशी
====
आपत-समयी साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या प्राक्तनाशी !
मग या आयुष्याच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी
जीवन आणि दैव या मधील
ती एक दुवा !
तिच्या सोबत भविष्याचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती माझी वृषभ राशी !

देशी
====
एकांत-समयी साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या ओठाशी !
मग या धुंदीच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी
माणूस आणि हैवान या मधील
ती एक दुवा !
तिच्या सोबत झिंगण्याचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती माझी दारु देशी !

सुशी
=====
मंमं समयी साथीला नसतांना कोणी
ही राणी असते माझ्या टेबलाशी !
मग या सागरी राणीची
साथ सोडू तरी मी कशी !
बोटे आणि तोंड या मधील
ती एक दुवा
तिच्या सोबत खादाडीचा
आनन्द आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती माझी लिबलिबीत सुशी !

ऋषी
====
ध्याना समयी साथीला नसतांना कोणी
ही राणी असते माझ्या अंतरात्म्याशी !
मग या शांतीच्या राणीची
साथ सोडू तरी मी कशी !
मन आणि आत्मा या मधील
ती एक दुवा
तिच्या सोबत एकाग्रतेचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती माझी साध्वी ऋषी !

कुशी
====
निद्रे समयी साथीला नसतांना कोणी
ही राणी असते माझ्या अस्वस्थतेशी !
मग या चल-बिचलतेच्या राणीची
साथ सोडू तरी मी कशी !
शांत आणि अशांत झोप या मधील
ती एक दुवा
तिच्या सोबत अनिद्रेचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अं हं ती माझी बदलती कुशी !

Pages