Submitted by उमेश कोठीकर on 6 November, 2010 - 04:35
अजून आहे जरा बिलोरी
डोळ्यांमधला चंद्रगारवा
अजून आहे मिठीत ओठी
थरथरतो सलज्ज मारवा
अजून येते साद रेशमी
स्वप्नांमधल्या कणाकणांतून
अजून येते तीच विराणी
व्याकुळलेल्या तनामनातून
अजून वाटे मिठीत घ्यावे
दिवस कोवळे डोळ्यांमधले
अजून वाटे चुंबून घ्यावे
श्वास बोलण्या आतुरलेले
अजून वाहे स्पंदनगंगा
हृदयामध्ये तुझ्याचसाठी
अजून वाहे अवखळ वारा
तुझ्या मिठीच्या निवांत काठी
अजून मिटते शरीरपाकळी
चुंबून घेता हळूच प्रियकर
अजून उमले पुष्प शरीरी
तृप्त तृप्त अन तरीही नवथर
गुलमोहर:
शेअर करा
व्वा व्वा , फारच सुंदर कल्पना
व्वा व्वा ,
फारच सुंदर कल्पना व सुंदर मांडणी.
शशांक
उमेश, बर्याच दिवसांनी आलास
उमेश, बर्याच दिवसांनी आलास ते ही गुलाबी पान अन पानावरचे स्पर्श तसेच घेऊन आलास रे ..:डोमा:
मस्त कविता...
आवडलि
आवडलि
वा, वा फारच सुरेख ! >>>लज्ज
वा, वा फारच सुरेख !
>>>लज्ज मारवा<<< मस्त !
सह्हीए
सह्हीए
अजुन तुम्ही मोहुन
अजुन तुम्ही मोहुन घेता,
कवितेमधल्या भावांमधुनी
मस्त! welcome back
अप्रतिम!!!!!!!
अप्रतिम!!!!!!!
धन्यवाद मित्रांनो. कसे आभार
धन्यवाद मित्रांनो. कसे आभार मानू? खुप धन्यवाद.
सुरेख..
सुरेख..
उम्या.... किती बिजी होतास
उम्या.... किती बिजी होतास इतके दिवस ते यातून कळलं. चालू दे !!!
सुंदर कविता !!!! welcome back
सुंदर कविता !!!! welcome back उमेश !!!!
अजून येते साद रेशमी
स्वप्नांमधल्या कणाकणांतून
अजून येते तीच विराणी
व्याकुळलेल्या तनामनातून>>> खास !!
<< अजून आहे जरा
<< अजून आहे जरा बिलोरी
डोळ्यांमधला चंद्रगारवा
अजून आहे मिठीत ओठी
थरथरणारा लज्ज मारवा >>
व्वा ! सुरेख. खूप आवडली !
धन्यवाद कौतुक, ठकु, चेतना आणि
धन्यवाद कौतुक, ठकु, चेतना आणि रूणुझुणू.
निवड्क दहात......
निवड्क दहात......
वा....... सुरेख !! नाजुक
वा....... सुरेख !! नाजुक
सुरवातीपासून शेवटपर्यंत नजाकत
सुरवातीपासून शेवटपर्यंत
नजाकत छान जपलेय.
उमेश! हाऊ रोमॅन्टिक!!
उमेश! हाऊ रोमॅन्टिक!!
सुंदर..........!!!!
सुंदर..........!!!!
उमेशजी, भरपुर दिवसानंतर भेट
उमेशजी, भरपुर दिवसानंतर भेट झाली राव......
कविता नेहमी प्रमाणे एकदम झक्कास....
फोडतय.............!
मस्त... रोमँटीक !!! अजून वाहे
मस्त... रोमँटीक !!!
अजून वाहे अवखळ वारा
तव मिठीच्या निवांत काठी ---- हे फार फार आवडलं !!! जियो !!!
व्वा बढिया
व्वा बढिया
धन्यवाद मित्रांनो. खुप
धन्यवाद मित्रांनो. खुप धन्यवाद.