आंबोली

Submitted by सतिश.. on 15 September, 2008 - 05:26

जुलै महीन्यात आम्ही डिपार्टमेंटची वर्षा सहल आंबोली इथे नेली होती. अगोदर माळशेज ठरवीले होते, पण गाडि भाडे आणि १ दिवस मुक्कामासाठी प्रती व्यक्ती १२५० खर्च येणार होता. मुंबईच्या जवळ इतके पैसे भरुन जायला सगळ्यांच्या जीवावर आले. कारण वर्षभरात किमान ३-४ सहली असतात. त्यात १-२ कुटुंबासकट असतात. त्यामूळे या वर्षासहली साठी दुसरे ठिकाण शोधणे सुरु केले. माझ्या कोकण प्रेमाने उचल खाल्ली आणि आंबोलीसाठी मी गळ घातली. जुलै महीन्याच्या सुरुवातीला १-२ दिवस पाऊस पडुन झाल्यावर त्याने पुढिल ८-१० दिवस दडि मारली होती. आंबोली इथे भारतात चेरापुंजी नंतर दुसर्‍या क्रमांका इतका पाऊस पडतो. त्यामूळे हमखास पावसाची हमी दिल्याने सर्व जण तयार झाले. १२ व १३ जुलै रोजी शनिवार रवीवार मजा करुन सोमवारी office ला हजर राहण्याची हमी दिल्यावर बॉसने देखील परवानगी दिली. प्रती व्यक्ति १२५० काढुन आम्ही १५ जण लगेच तयारीला लागलो. जाण्या येण्याची कोकणकन्याची बुकींग केलि. तसेच हॉटेल बुकींग केले.
११ जुलै शुक्रवार रोजी रात्री ११:४५ ला कोकणकन्या पकडली. दुसर्‍या दिवशी सकाळी ठिक १०:०० वाजता आम्ही सावंतवाडी स्टेशनवर पोहोचलो. तिथुन ४०० रुपये देऊन थेट आंबोली साठी ६ सिटर रिक्शा केल्या. वाटेत सावंतवाडी शहरात थांबुन लाकडी खेळण्यांची खरेदी केली. (रवीवारी सावंतवाडी बाजार बंद असतो) सावंतवाडीत कडकडीत उन होते. चौकशी केल्यावर कळले की गेले २ आठवडे तिथे पाऊस पडलाच नाही. रेल्वे प्रवासात आम्हाला २-३ ठीकाणी पाऊस पडताना दिसला होता. पण तो कोकणचा फेमस कोसळणारा पाऊस नव्हता. पिकनिक चे planning चुकले की काय अशी शंका मनात आली. खरेदी करुन आंबोलीला कुच केले. रिक्शा दाणोलीला पोहोचल्या. (येथे साटम महाराजांचे निवासस्थान आहे) आणि वातावरणात वेगाने बदल होउ लागला. घाट सुरु झाला, गर्द झाडीतुन रस्ता जात होता. उन केव्हाच गायब होऊन सावलीतुन प्रवास सुरु झाला. जस जसे आम्ही घाट चढु लागलो. हवामान थंड होऊ लागले. मध्ये मध्ये पावसाची सर येत होती. थोड्याच वेळात वार्‍याच्या ठंड झुळुकी जागी गारठवणारा वारा उघड्या रिक्शातुन आत येऊ लागला. दुरवर असंख्य धबधबे आम्हाला खूणावत होते.
आम्ही पुर्वेचा वस येथे पोहोचलो. येथे आंबोलीचा मुख्य धबधबा आहे. मुंबईकर जसे लोणावळा, खंडाळा येथे weekend ला गर्दी करतात, तसे गोवेकर व बेळगावकर (बेळगावीकर लिहिले तर आपला त्यांचावरचा हक्क जाईल) आंबोलीला येतात. खुप गर्दी असल्याने रस्त्यावर वाहतुक मुरांबा झाला होता. आम्ही थेट हॉटेल गाठले. (हॉटेल ग्रीन पॅलेस) आमच्या रुम ताब्यात घेउन फ्रेश झालो. तोवर मालवण हुन ताजे मासे घेउन टेंपो आला. हॉटेल मालकाने काय खाणार म्हणुन विचारणा केली. सर्वांनी सुरमयी म्हणुन सांगीतले. हॉटेल मधील इतर अनेक ग्रुपच्या मागणी प्रमाणे मासे खरेदी होऊन त्यांची kitchen मध्ये रवानगी झाली. तास - दिड तासात मालवणी पद्धतीचे जेवण तयार झाले. सोबत सोलकढीचे पेले रिचवले गेले. तत्पुर्वी रुम मध्ये काही सहकार्‍यांचे अपेय पान झाले. सोबत मालवणी पद्धतीचे chicken होते.
100_3493.jpgरिक्शातून उतरताच हॉटेल बाहेर आम्हाला मालका अगोदर सामोरा आलेला स्थानिक जीव ....

आता थोडे आंबोली विषयी. समुद्र सपाटी पासुन तब्बल २५०० फुट उंचावर वसलेले हे ठिकाण इंग्रजांची त्या काळी उन्हाळी राजधानी होती. हिंदुस्थानात चेरापुंजी नंतर पाऊसाचे सर्वाधीक प्रमाण असणारे हे ठीकाण आहे. येथे तब्बल ५०० ईंच पाऊस पडतो sorry कोसळतो. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथुन बेळगाव किंवा कोल्हापुरला जाणार्‍या हमरस्त्यावर हे ठीकाण आहे. सावंतवाडी ते आंबोली हे अंतर ३० किमी तर बेळगाव ते आंबोली हे अंतर ६० किमी आहे. गोवा ४०-५० किमी दुर आहे. कोकणात सर्वत्र आढळणारे माड इथे दृष्टीस पडत नाहीत तर कोकणात कुठेही नजरेस न पडणारी ऊसाची शेते इथे आहेत. म्हणजेच हे ठिकाण भौगोलिक दृष्ट्या घाट माथ्यावर येते. कोकणातुन घाटावर नेणारा हा घाट रस्ता इंग्रजांनी बांधला. इथे सावंतवाडी संस्थानचे राज्य होते. आजही इथले स्थानिक लोक सावंतवाडी संस्थानशी संबंधीत आहेत. स्वातंत्र्य पुर्व काळात येथे गांधीनी ही वास्तव्य केल्याची नोंद आहे. येथे अस्णार्‍या चौकुळ यागावातील घरटी एक जण तरि सैन्यात आहे. आंबोली येथे माजी सैनिकांनी स्थापन केलेले. सैनिक school आहे. आंबोली विषयी एक आख्यायीका सांगीतली जाते. ती म्हणजे हा घाट रस्ता एका गुराख्याने इंग्रजांना दाखवीला होता. नंतर त्याला ईंग्रजांनी ठार केले. सावंतवाडी आंबोली रस्त्यावर त्याचा पुतळा पाहावयास मिळतो. आंबोलि धबधबा ही पर्यटकांसाठी मोठी पर्वणीच. धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ।। हा संपुर्ण महाराष्ट्रातील आकर्षित धबधबा आहे. इथे mtdc ने छान पैकी पायर्‍या केल्या आहेत. रस्त्या पासुन धबधब्या पर्यंत जाणार्‍या या पायर्‍यांवर पर्यटक बसतात. पाणी थेट खांद्यापर्यंत अडवतात. आणी मग अचानक उठुन पाण्याचा लोंढा खाली सोडतात. त्यामुळे पायर्‍यांवरुन वर येणार्‍या पर्यटकांची चांगलीच भंबेरी उडते. धबधब्याखाली उभे राहणे मात्र एक वेगळाच अनुभव देते. पाणि अक्षरशः ice cold असते. प्रवाहात बसल्यास पाठिला चांगलाच मसाज होतो. पण झोंबणार्‍या गार वार्‍याने कान अगदी दडे बसल्या सारखे होतात. आम्बोली धबधब्यातील गमती विषयी पुढे लिहीनच आता थोडे आंबोली गावा विषयी.
आंबोली हा बाजार पेठ एव्हढाच सिमीत असलेला गाव आहे. गावात राहाण्या खाण्याची चांगली सोय आहे. mtdc तसेच अनेक प्रायव्हेट हॉटेल्स आहेत. घरगुती सोय देखील होवु शकते. mtdc चे हॉटेल आता कामत ग्रुप चालवतो. या व्यतिरिक्त इंडीयन हॉटेल हिल रिसोर्ट, ग्रीन व्हॅली रिसोर्ट, व्हिस्लिंग वुडस, hotel JRD international , शिव मल्हार , ग्रीन पॅलेस अशी अनेक हॉटेल्स आहेत. लाड हाऊस प्रमाणे अनेक MTDC Bread & Breakfast Scheme वाली हॉटेल्स तसेच घरगुती खाणावळी आहेत. ज्यांना ढाबा चालतो अश्यांसाठी 'सैनिक धाबा' नावाचा धाबा देखिल आहे. येथील पोईंट दाखवीन्यासाठी गाईड सुविधा तसेच फिरण्यासाठी वाहन मिळु शकते. गावात पेट्रोल पंप आहे. माऊली देवी ही गावचे ग्राम दैवत आहे. गावात एक रेशीम केंद्र देखील आहे.
amb_0.jpgसंपुर्ण महाराष्ट्रातील आकर्षक धबधबा (गर्दीमुळे थोडा कुरुप दिसतोय .. )

दुपारी जेवण आटोपुन आम्ही घाटातील धबधब्याकडे निघालो. हा धबधबा आंबोली गावापासुन ३ कि.मी. अंतरावर आहे. वाटेत तसे अनेक धबधबे आहेत. हा हमरस्ता अस्ल्याने इथे वाहतुक मोठ्या प्रमाणावर चालते. महाराष्ट्र, कर्नाटक तसेच गोवा राज्य परिवहन मंडळाच्या असंख्य बसेस सारख्या ये - जा करत असतात. आम्ही अश्याच एका बसने धबधब्यावर पोहोचलो. भिजणे कंपलसरी असल्याने सोबत कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट नेले नव्हते. (मोबाइल, कॅमेरा, घड्याळ वै.) शनिवार असल्याने खुप गर्दी होती. वाहतुक मुरंबा होवु नये म्हणुन शनीवार व रवीवार येथे अवजड वाहनांना प्रवेश बंदी असते. केवळ खाजगी गाड्या आणि राज्य परिवहन मंडळाच्या बसेस चालु असतात. खाजगी वाहने ही घाट रस्त्यावरच पार्क केली जातात (माळशेज प्रमाणे). रस्त्या लगत गरमागरम चहा, बटाते वडे, मक्याचे कणीस, ऑम्लेट वै. बनवुन देणारी असंख्य दुकाने उभी राहिलेली असतात. गैर प्रकार घडु नये म्हणुन पोलीस बंदोबस्त देखील अस्तो. मात्र कपडे बदलण्यासाठि येथे सोय नाही. गाडीतच पडदे वै. लावुन change करावे लागते. संपुर्ण दिवसभर दाट धुके असते. धबधब्यात मजा करुन आम्ही आंबोलि पर्यंत छान rain walk केला. दाट धुके आणी रहदारी मुळे थोडे जपावे लागते.
road_0.jpgधुक्यात हरवलेला रस्ता (ए भाय जरा देखके चलो .... )

वाटेत असंख्य पॉईंटस असुन तेथे mtdc ने छान viewing gallery बनवील्या आहेत. पावसाळ्यात दाट धुक्या मुळे संध्याकाळी काहीच दिसत नव्हते. मजल दरमजल करित हॉटेल वर पोहोचलो. हॉटेलवर पोहोचताच गरम पाण्याचा शॉवर घेतल्यावर सगळ्यांच्या जीवात जीव आला. तरी सुद्धा बर्‍याच जणांचे कुडकुडणे चालुच होते. त्यातच एकाने अचानक खीडकी उघडली. त्या बरोबर आख्खा ढग रुममध्ये घुसल्याचा भास झाला. रात्री देखील खीडकी बाहेर ढग किंवा धुके यावर आमच्या सावल्या दिसत होत्या. (आमचा रुम दुसर्‍या मजल्यावर होता, त्यामुळे रुम मधील लाईटने आमची सावली बाहेर दिसावी अशी कोणतीच वास्तु किंवा वस्तु तेथे नव्हती) दुसर्‍या दिवशी अनेक पॉईंटस फिरायचे असल्याने एक टेंपो ट्रॅव्हलर ठरवीला. (पुर्ण दिवसाचे २ हजार रुपये भाडे) रात्री जेवणानंतर उशीरा पर्यंत मुकाभिनय करुन चित्रपट ओळखणे, पत्ते कुटने चालुच होते.
दुसर्‍या दिवशी भल्या पहाटे बरेच जण उठले. (पिकनिकला सकाळी ६ वाजता म्हणजे भल्या पहाटेच) सगळे जण morning walk ला निघाले. दाट धुक्यामुळे रस्त्यावरिल वाहनांचे हेडलाईट्स तेव्हढ्या दिसत होत्या. त्यामुळे रस्ता सोडुन गावातील आडरस्त्यांवर भटकंती सुरु केली. यारस्त्यांवर mtdc चे green valley resort, हेमंत ओगले यांचे whistling woods आहे. सैनिक शाळेकडे गेलो. पण तेथे प्रवेश दिला नाही. हॉटेल वर परतल्यावर Breakfast like king केला. रुमवर परतुन सर्वजण morning law उरकु लागले. नऊच्या ठोक्याला टेंपो ट्रॅव्हलर हजर झाला. हॉटेल मधुन ताबडतोब check out केले. गाडीत सामान भरले. आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात हिरण्यकेशी उगमाकडे निघालो.
0713_094329.jpg
हिरण्यकेशी उगम - आंबोली पासुन ४ किमी अंतरावर हे पवित्र तिर्थ क्षेत्र आहे. इथुन हिरण्यकेशी नदी उगम पावते. अतिशय रम्य अश्या वनराइने वेढलेल्या या परिसरात छोटेसे पार्वतीचे मंदीर आहे. तिच्यासाठी शंकराने ही जलगंगा (हिरण्यकेशी नदी) निर्माण केली. येथे मंदीरा समोर एक छान अशी बांधुन काढलेली तळी आहे. त्यात गोमुखातुन पाणि पडते. आम्ही पावसाळ्यात गेल्याने गोमुख अडिच फुट पाण्यात होते. येथे एक गुहा आहे. त्याबाबत अनेक कथा सांगतात. जसे की भुयार २ किमी आहे .... आत सात तळी आहेत .... एका पुणे base group ने त्याचा शोध घायचा प्रयत्न काही वर्षांपुर्वी केला होता.
हिरण्यकेशी उगमाकडुन आम्ही गेलो नांगरतास धबधब्याकडे (आंबोली पासुन चे अंतर ८ किमी).
DSC01151.jpg
खोल घळीत कोसळणारा हा धबधबा बघुन छातीत धडकी भरल्याशिवाय राहत नाही. इथे mtdc ने cantilever viewing gallery at two levels केली आहे. त्या गॅलरीत उभे राहुन पाण्याच्या तुषाराचा आनंद आपण घेउ शकतो. पाण्यात जाण्याचा विचार मात्र वेडेपणाचा नसुन जिवघेणा आहे (आम्ही गेलो होतो त्याच्या मागील आठवड्यात बेळगाव येथील एक डॉक्टर पाय घसरुन पाण्यात पडला आणि प्रवाहा बरोबर वाहुन गेला.)
नांगरतास धबधब्याकडुन आम्ही कुच केले कावळेशेत पॉईंटकडे - कावळेशेत पॉईंट (आंबोली पासुन चे अंतर १० किमी) - इथे जाताना रस्त्याच्या दुतर्फा ऊसाची शेते दिसतात. तसेच इथे मोठ्या प्र्माणावर झुडपांसारखी छोटि झाडे दिसतात. मात्र तिथे न गेलेलेच उत्तम कारण त्यात रक्त शोषुन घेणार्‍या जळवा असतात. कावळेशेत पॉईंट हा आंबोलीतील उत्कृष्ट पॉईंट आहे.
kav.jpg
अतिशय भयावह वाटणार्‍या दरीचे इथुन दर्शन होते. कावळेशेत पॉईंट हे नाव का पडले याचा निटसा उलगडा झाला नाहि तरी येथे दरीतुन येणार्‍या वार्‍यामुळे कावळे ऊडु शकत नाहीत असे स्थानीकांनी सांगितले. येथे दरीत भिरकावलेली कोणतीही वस्तु खाली न जाता परत वर येते. त्यामुळे येथे पर्यटक रिकाम्या मिनरल वॉटरच्या बाटल्या, टोपी दरीत फेकुन परत वर आल्यावर धावत जावुन झेलायचा खेळ खेळत होते. येथे mtdc ने भक्कम असे pipe railing बसवीले आहे. त्याच्या जवळ गेल्यावर मात्र ते घट्ट पकडुन ठेवावे लागते असा वारा इथे असतो.
DSC01159.jpg
या पॉईंटवरुन दरीत पडणारे पाणी खालुन पाण्याचा फवारा मारावे तसे वर उसळत अस्ते. धुके किंवा ढग आले असतिल तर मात्र दरी आणि त्यातील असंख्य धबधबे बघण्यासाठी ते जाइ पर्यंत वाट बघणे भाग पडते.
IMG_0262.jpg
कावळेशेत पॉईंट कडुन आम्ही महादेव गड पॉईंटला गेलो. महादेव गड पॉईंट - आंबोली बाजारातुन अवघ्या ३ किमी वर हा पॉईंट आहे. येथुन सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांचे विलोभनिय दृश्य दिसते. खाली असलेला पारपोली गाव हा मात्र clear sunny day लाच आपण पाहु शकतो. महादेव गड पॉईंटला अस्वले आढळतात. इथे असे सांगीतले जाते की जर अस्वल तुमच्या मागे लागले तर उतारावर पळायचे कारण अस्वलांना उतारावर पळता येत नाही. (खरे खोटे ते अस्वलांनाच माहीत)
एव्हाना दुपार झाली होती. आम्ही परतीच्या प्रवासाला निघायचे ठरविले. वाटेत आंबोलीच्या धबधब्याकडे थोडावेळ थांबलो. आदल्या दिवशी कुणी कॅमेरा नेला नसल्याने आता सर्वांनी ती हौस भागवलि. रविवार असल्याने आंबोली धबधब्याचा भुशी डॅम झाला होता. घाटात अनेक ठिकाणी माकडे होती त्यांना २ दिवसात उरलेला सगळा खाउ दिला. वाटेत आंबोलीचा घाटरस्ता ईंग्रजांना दाखवीणार्‍या धनगराचा पुतळा दिसतो. दुपारी ०२:३० च्या सुमारास सावंतवाडीस पोहोचलो. जिमखान्या समोरील भालेकर मेस मध्ये जेवणासाठी थांबलो. येथे अवघ्या ६०-७० रुपयांत स्वादिष्ट अशी चिकन, मटण, फिश थाळी मिळते. भालेकर खाणावळ भपकेबाज नाही. साध्या शेड मधे टेबल, खुर्च्या आहेत. पंख्याचीही सोय नाही. मात्र नेहमी दुपारि ०३:३० वाजता खाणावळ बंद होई पर्यंत बाहेर खाजगी गाड्यांचा ताफा असतो. जर तुम्ही मांसाहारी असाल तर भालेकर मेस मध्ये अवश्य जेवाच. तुम्हाला तुमचे स्टेटस इथे जपले जाणार नाहित असे वाटत असेल तर तुमच्यासाठी सावंतवाडित अनेक हॉटेल्स आहेत. जसे की कामत, mango, celebration वै. ज्यांना शाकाहाराची आवड आहे किंवा जे मांसाहार करत नाहीत अश्यांसाठी सावंतवाडीमधे जेवणासाठी best place साधले मेस. केवळ ३० रुपयांत इथे थाळी मिळते. इथली स्वच्छता आणी टापटीप पणा याला तुम्ही १०० पैकी १०० गुण द्याल. आताच तुमच्यासाठी बाजारातुन विकत आणली आहेत. अशी ताट वाटी समोर येते. जेवणही लज्जतदार. मे म्ध्ये सोबत आमरस वाटि हवी अस्ल्यास मिळू शकते. तृप्तीचा ढेकर येइ पर्यंत सोलकढी पिउन सर्व जण सावंतवाडी पर्यटणाला बाहेर पडले. रविवार असल्याने बाजार बंद होता. त्यामुळे चितार आळीत जाउन लाकडी खेळण्यांची खरेदी केली. चितार आळीत प्रत्येक घरी ही खेळणी बनवीली जातात आणी घरा बाहेर त्याची विक्री केली जाते. हल्ली खेळन्यां व्यतिरिक्त इतरही अनेक गोष्टी लाकडापासुन बनवील्या जातात. जसे की wall mounting, चष्मा फ्रेम स्टँड वै. बाजारात नार्वेकर मसाल्याचे दुकान तेव्हढे उघडे होते. त्याच्याकडे खरेदी केली. तसेच Expresso बेकरीचे फेमस बटर घेतले. शहराच्या मध्यभागी अस्लेल्या मोती तलावाभोवती फेरफटका मारला.
IMG_0328.jpgसुंदरवाडीतील (सावंतवाडीचे जुने नाव ..) मोती तलाव

इथे नगरपालीकेचे अतिशय सुंदर उद्यान आहे. (must see) काहीजण राजवाडा परिसरात भटकुन आले. आम्ही मग शिल्पग्रामला गेलो. तेव्हा ते बंद होते. इथे deccan odysy ने येणार्‍या पर्यटकांना कोकणातील संस्कृतीची ओळख करुन दिली जाते. राजवाड्यात गंजीफा म्हणुन खेळाचे पत्ते बनविणारे हस्त कारागिरांचे workshop आहे. दशावतारावर आधारित characters ची चित्रे या cards वर असतात. एव्हाना संध्याकाळचे ०५:३० वाजले होते. तलावा बाजुच्या भारतमाता हॉटेल मध्ये चहा घेतला. अक्षरशः अमृततुल्य चहा आणि किंमत केवळ ३ रुपये. वेळेअभावी सावंतवाडी दर्शनाला फाटा देउन रेल्वे स्टेशन गाठले. कोकणकन्या वेळेवर आली तिच्यात स्थानापन्न झालो. रात्री उशीरा पर्यंत दंगा केला . रात्री झोपेत नजरे समोर येत होते ते आंबोली तील धबधबे. सकाळी ०५:१५ वाजता ठाणे आले.
थोडक्यात खर्च मुंबई ते सावंतवाडी (return ticket II class sleeper with reservation) - ६०० /-
सावंतवाडी ते आंबोली (6 seater riksha) - ४०० /-
हॉटेल ग्रीन व्हॅली (3 beds room with 2 extra bed) - ६०० /-
टेंपो ट्रव्हलर (१ दिवसासाठी) - २००० /-
तळ टीप -- आम्ही आंबोलीला जाऊन आल्यावर आमच्या ग्रुप मधील एकाच्या मित्रांनी २ आठवड्यांनी आंबोलीला भेट दिली. तेव्हा महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस चांगलाच स्थिरावला होता. संपुर्ण घाटरस्त्यावरील झर्‍यांना छोट्या छोट्या धधब्यांचेच स्वरुप आले होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सतिश... वृतांत जबरदस्त अगदी खर्चासकट... Happy

सतिश भाऊ माझ्या गावी जाऊन आलात तर तुम्ही...... मला गणपतीला जायला नाही मिळाले यंदा.. Sad

मी मे मध्ये गेले होते, तेव्हा नांगरतास आणि घाटात दोन्ही धबधब्यांना पाणी होते, ते पाहूनच ऐन पावसाळ्यात काय दृश्य असेल त्याची कल्पना केली होती. (मार्चमध्ये भरपुर पाउस झाला होता त्यामुळे पाणी होते). तुम्ही लिहिले ते वाचुन पुर्ण गाव नजरेसमोर उभे राहिले... खुप छान वर्णन. आणि जाणा-यांना मार्गदर्शनही.

माझ्या आजोळी जाऊन आलात... आवडली का वाडी??

ओह आयटीगर्ल, वाडी तुझे आजोळ??? म्हणजे तु माझी गाववाली.. Happy वाडीत कुठे राहतात तुझे आजी आजोबा??

Happy

आता फक्त घर आहे गं... मोती तलावाच्या समोर आहे घर. बाकी आता मेलवर बोलू. Happy बोलतस काय मग तू कोकणी?? Happy

मागच्या वर्शी सप्टेम्बर मधे आम्ही दोघं आंबोली ला गेलो होतो.
पण तो पर्यंत सीझन संपला होता आणी कुठेही पर्यटक दिसत नव्हते.
आम्ही Hotel JRD International मधे उतरलो होतो. पुर्ण होटेल रिकामं होतं.
होटेल च्या corridor मधे फक्त दोन कुत्री होती.
सगळं वातावरण अगदी एखाद्या भयपटात शोभेल असंच होतं आणी होटेल पण अगदी eerie वाटत होतं.
खरं तर आम्ही मुक्काम करण्याच्या उद्देशानी गेलो होतो. पण होटेल आणी गावातली एकंदर सामसूम बघुन ४ तासात सगळं आंबोली हिंडलो आणी मुक्काम न करता लगेचच परत यायला निघालो.

सुरुची, आश्चर्यच आहे. मी सुद्धा सप्टेम्बर ०७ मध्ये गणपतीला ( १७-२२) गेलेले गावी. पण तेव्हाही ब-यापैकी गर्दी होती. पाउसही ब-यापैकी होता.

एनी वे, त्या अनुभवावरून परिक्षा करु नका. माझ्या ओळखीचे बरेच जण गेलेत आंबोलीला आणि सगळ्यांना आवडलीय आंबोली. मला तर कुठल्याही सिझनला आवडते. Happy

मी देखिल गेल्यावर्षी गणेश चतुर्थीसाठी गावी गेलो होतो. तेव्हा पाऊस होता. २३ सप्टेंबर (रविवार) रोजी परत येताना तर तुफानी पाऊस कोसळत होता. गर्दी शिवाय आंबोली enjoy करणे तर खुपच छान कारण गर्दी तर आपल्या पाचवीलाच पुजलेली असते.

आंबोली खूप बदललेले दिसतंय.
मी ९८ साली गेलो होतो तेव्हा फक्त जे.आर्.डी इन्टरनॅशनल, MTDC आणि लाड ह्यांचे घर हेच चांगल options होते.
आम्ही JRDमधे राहिलो होतो पण रोज दुपारी जेवायला सुहास - स्मिता लाड ह्यांच्या घरी ... हिरवीकंच दरी बघत ताजे मासे खायचे Happy
धन्स सतीश .. परत एकदा अंबोलीला जावून आलो... मनाने !

माहितीपूर्ण वर्णन. छान लिहिलय. फोटो पण मस्त!

अरेच्च्या गणेशोत्सवात हे वाचायचंच राहून गेलं ... मी बघितलच नाही हे..
फारच सुंदर लिहिलंय सतिश

कालच आम्ही देवगड हुन आलो. आंबोली खरंच खूप छान आहे.

जाताना प्रचंड धूके असल्याकारणाने फोटो काढ्ता आले नाहीत.. आणी येताना लव्करात लव्कर बंगलूर गाठायचे म्हणून... Sad

पण तुम्ही इथे सगळे फोटोज आणी वर्णन लिहिलेले वाचून खूप छान वाटलं. Happy
भर उन्हात दुपारी दोन अडिच वाजता सुद्धा धबधब्याचं पाणी अशक्य.... थंड होतं ... खेळून घेतलं ..
दर्‍यांमधल्या हिरवळीवर .. ते उन आणि सावल्यांचे चौकोन किती छान वाटतात..
तो ऊन सावलीचा खेळ्..जेवढा रम्य तेवढाच अगम्य...

हेय मस्त लिहिले आहे. फोतोस पन मस्त आहेत.

मित्र मि कोल्हपुरच आमच्या अगदि जवल आह आबोलि पण मला वेल मिलाला नाहि पिकत तिते विकत नाहि हेच करे चुकाबद्द्ल माफ करा मि नविन मायबोलिकर आहे अजुन कि बोर्ड वर हात नाहि बसलाय

मस्त वर्णन सतिश. छान वाटलं वाचून, पाहून!

मी आत्ताच बघीतल, वाचुन खूप बरं वाटल. खरंच अशा ठिकाणी गेल्याचा आनंद खूप वेगळाच असतो नाही.

वा वर्णन अतिशय सुरेख केलस. जाऊन यायलाच लागेल एकदा.

नमस्कार , मी कान्चन , नवीन मेम्बेर आहे माय बोलि ची , माझ गाव वेन्गुर्ला , सावन्त् वादी जवल आहे . आम्बोलिशी माज्या लहान पनीच्य आथावनि आहेत

अरे एकदम झकास....

या पावसाळ्यात आंबोली नक्की.....

आभारी आहे.... सुरे़ख वर्णन अगदी सुरेख.......

सुरेख आहे..
------------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

अरे व्वा खुप दिवसांनंतर सावंतवाडि दर्षन झाल. तुमच्या आजोळि नाहि गेलात?

सतीश, सुरेख लिहीलं आहे.

>>>>सतिश भाऊ माझ्या गावी जाऊन आलात तर तुम्ही...... <<<<
आंबोली माझेपन गाव आहे !!!

आंबोली घाट...
Amboli ghat01-1.jpg

त्या धबधब्यावर इथून जायचे
Image144-1.jpg

आंबोलीत आता बर्‍यापैकी पोलिस बंदोबस्त असतो. त्यामुळे थिल्लरपणा खुपच कमी झालाय. यंदा तर प्रत्येक गाडिची नोंद करुन कसुन तपासणी नंतरच आंबोलीत प्रवेश दिला जात आहे. हे वाचा स्वाईन फ्लु मुळे पुणेकरांना हॉटेल बुकींग नाकारले.
http://epaper.pudhari.com/epaperimages/1482009/1482009-md-sin-1/21415162...

>>>आम्बोली आणि मालशेजचे दारू>>><<<
रॉबिन तूम्ही व्यवस्थित सांगता का तूम्ही कोणाबद्दल बोलताय ते ?

सतिश, थिल्लरपणा बराच कमी झालाय पहिल्यापेक्षा.. तरी अजुनही बराच आहे. गेल्या आणि त्याच्या आदल्या शनिवारी २५ हजारावर लोक होते म्हणे. प्रचंड ट्रफिक जॅमचा त्रास. आणि चेकिंग केले तरी लोक दारू घेऊन धबधब्यांवर जातातच... त्यामुळे गावातल्या बायका अशा दिवशी बाजारात (मेन रोड गावातला) जाणे टाळतात.

जसे पंढरपूर म्हटले की वारकरी आठवतात. शिवाजी पार्क म्हटलं की शिवसैनिक आठवतात तसं माळशेज आणि आम्बोली म्हटलं की आपसूकच दारूडेच आठवतात. मग ते स्थानिक असोत वा बाहेरचे.

Pages