गुड मॉर्निंग मॅडम - क्रमशः - भाग ८

Submitted by बेफ़िकीर on 6 November, 2010 - 05:02

एक महिना!

अत्यंत तीव्र अप्स अ‍ॅन्ड डाऊन्स असलेला एक महिना!

हा महिना मागे टाकून मोनालिसा प्लेनमध्ये बसली होती. तिला खिडकीतील जागा मिळाली होती. शांतपणे बाहेर पाहात होती आणि टेक ऑफची वाट बघत बसलेली होती ती!

मोनालिसा गुप्ता! काय काय सोसता येईल एखाद्याला पंचविसाव्या वर्षी! किती धक्के? किती ताण? किती सुखे आणि किती दु:खे?

तो दिवस तिला आत्ता आठवला. सायरा बदलली आणि बंगल्यात राहायला लागली तेव्हापासून लोहियांना सायराकडून एकच कारण सांगण्यात आले...

"मॅम वॉन्टेड सम केअर टेकर, बट शी डिडन्ट गेट एनी, सो आय अ‍ॅम ट्रान्स्फर्ड अगेन..."

त्यावर लोहियांनी त्यांच्या पोझिशनला शोभेल अशा पद्धतीने माफकच आनंद फोनवर व्यक्त केला होता आणि सायराला पुढील सूचना दिलेल्या होत्या. मोना कोणाशी बोलते, काय काय बोलते, कुठे जाते, घरात कशी वागते, तिच्यावर ताण आहे की तिला काही समजतच नाही आहे वगैरे वगैरेचा अभ्यास करायचा आणि दररोज किमान दोन वेळा मला रिपोर्ट करायचा.

... आणि मुख्य म्हणजे, महिन्यातून किमान एकदा मुंबईचे काही ना काही काम काढून यायचे आणि सॉलोमन रेसिडेन्सी या जुहूमधील अत्यंत महागड्या हॉटेलमध्ये माझ्याबरोबर एक रात्र तरी घालवायचीच!

सायराने फोन ठेवून समोरच बसलेल्या मोनाकडे पाहून स्मितहास्य केले होते. मोनाने तिच्या पोझिशनला शोभेल असे हावभाव चेहर्‍यावर ठेवले होते.

आणि मग दररोज लोहियांना सायरा फोन करायची ते मोनासमोरच! मोना जे आणि जसे सांगेल तेवढेच सांगायची.

खरे तर लोहिया फार म्हणजे फारच आनंदात होते महिनाभर! कारण सायराकडून आलेले रिपोर्ट्स ऐकून त्यांना हसूच येत होते.

एकदा म्हणे मोना दिवसभस कंप्यूटरवर गेम्सच खेळत बसली. एकदा मैत्रिणीशी तिचे प्रचंड जोरदार भांडण झाले. एकदा कंपनीतून घरी आणलेल्या फाईल्स पाहून तिने भसीनला अनेक शंका विचारल्या आणि त्याच्यावर चिडून फोन आपटला. एक दिवस म्युझिक ऐकत ड्रिन्क घेत बसून राहिली. अर्थात, हे सर्व रिपोर्ट्स घरी आल्यानंतरचे होते. ऑफीसमध्ये मोना काय करते हे लोहियांना इतर कुणाकडून समजत नसले तरी खुद्द मोनाकडून समजायचेच!

अर्देशीरला उडवल्यानंतर लोहिया, जतीन आणि सुबोध मोनाला लाईटली घेऊ शकतच नव्हते. पण हळूहळू महिन्याभरात असे काहीतरी चित्र निर्माण झाले की मोनालिसा ही एक अपरिपक्व, भावनिक, रडक्या स्वभावाची आणि श्रीमंतीत लोळू इच्छिणारी कर्तृत्वशुन्य स्त्री आहे. आणि तिच्या रडक्या आणि भावनिक स्वभावामुळेच अर्देशीर उगाचच बिझिनेसमधून टप्पा खाऊन बाहेर पडलेले होते. वास्तविक मोनाचा तो हेतू नव्हताच! आणि हे मत बनवण्यात सायराने दिलेले रिपोर्ट्स आणि ऑफीसमधून मोनाने लोहियांना केलेले फोन कॉल्स कारणीभूत होते.

मोना उगाचच दिवसातून सात सात फोन करायची लोहियांना! स्वतःला फारसे काही समजत नाही आहे आणि हा डिसीजन मी घेऊ ना वगैरे प्रकारचे फोन असायचे ते! त्यात ती मुद्दामहून एक अधिकाराचा स्वरही जाणवत राहील याचेही भान ठेवायची. डॅनलाईनची चौकशी मात्र सतत करायची. असे दाखवायची जणू गुप्ता हेलिक्सपेक्षा तिला डॅनलाईनमध्येच अधिक इन्टरेस्ट आहे आणि गुप्ता हेलिक्स तर काय चाललेलेच आहे! हे सगळे करताना ऑपरेशन्सवर तिचे खरे तर फार बारीक लक्ष असायचे. पण अर्देशीर सरांच्या धक्यातून लोहिया आत्ताच सावरत असल्यामुळे लोहियांना आत्ता स्वतःची निष्ठा दाखवणे भाग होते. त्यामुळे हेलिक्सची ऑपरेशन्स व्यवस्थित चाललेली होती. जतीन आणि सुबोध आता डॅनलाईनवर अधिक लक्ष केंद्रीत करून होते. या महिन्याभरात अर्देशीर सरांनी काहीही हालचाल केली नसावी असे वाटत होते. कारण त्यांचा कुणाला फोनही नव्हता.

दरम्यान, मेहरांनी 'लीगल डिपार्टमेन्टच्या' मागे लागून जर्मन कंपनीवरचा दावा मागे घ्यायला लावला आणि चक्क शेव्हिन्ग मशीन्स कमिशनही झाली. आता प्रश्न काहीच नव्हता. डॅडचे एक स्वप्न तर पूर्ण केलेच होते मोनाने! पण बिझिनेसमधे ती अशा पातळीला होती जेथे 'ताण' ही एक सततची बाब होती! सततची!

कारण शेव्हिन्ग मशीन्स ऑपरेट करू शकतात हे समजल्याच्या दुसर्‍याच दिवशी फारुख ऑटोचे जडेजा मोनाच्या केबीनमध्ये बसलेले होते. आणि मेहरांना तेथे यायची इच्छा असूनही मोनाने त्यांना 'मी बघते' असे सांगीतलेले होते. जडेजा हा पन्नाशीचा माणूस भलताच अ‍ॅरोगंट वाटत होता नुसता पाहूनच! जणू काही मी माझ्याच केबीनमध्ये आहे आणि समोर बसलेली व्यक्ती मला भेटायला आली आहे असा मोनाकडे पाहात होता. अतिशय रिलॅक्स पोझिशनमध्ये बसलेला होता तो!

जडेजा! फारुख ऑटोचे डायरेक्टर! फारुख ऑटो ही नंबर दोनची कंपनी आहे हे 'सिवा'च्या रिपोर्टमध्ये मोनाने वाचलेले होते. स्वतः नंबर दोन, म्हणजे अर्देशीर तर घरीच बसलेले होते. मात्र हा डायरेक्टर उपटलेला होता. त्यातच जडेजा हा नंबर एकचा रिलेटेव्ह आहे हेही 'सिवा'ने लिहिलेले आहे हे मोनाला अतिशय व्यवस्थित माहीत होते. त्यामुळे जडेजाशी आपण काय बोलतो आणि 'कसे' बोलतो हे लोहियांपर्यंत दुसर्‍याच क्षणी पोचणार हे ती जाणून होती.

मोनाने तोंडभर हसून अर्धवट उभे राहात हस्तांदोलन केले. नाही म्हंटले तरी ती एम डी आहे हे माहीत असल्यामुळे जडेजा जरासे दबकून होतेच! मात्र आज 'स्वतःच्या कंपनीचे प्रचंड इम्प्रेशन पाडायचे' हे ते ठरवूनच आलेले होते.

मोना - टेल मी मिस्टर जडेजा...

जडेजा - व्हॉट टू से? सेम चेअर, सेम प्लेस... यूअर फादर युझ्ड टू बी हिअर... आय अ‍ॅम रिमेंबरिंग हिम... व्हेरी व्हेरी सॉरी... दॅट ही इज नॉट हिअर टू ब्लेस अस...

मोना - थॅन्क्स... यू आर राईट... आय फील हिज अ‍ॅब्सेन्स मोर दॅन एनीवन एल्स मिस्टर जडेजा...

जडेजा - .. शुअर.. बट आय मस्ट टेल यू.. दॅट.. यू हॅव बीन अ व्हेरी एफिशियंट लीडर ऑफ हेलिक्स...

मोना - ओह... जस्ट स्टार्टेड लर्निन्ग व्हेरियस थिन्ग्ज... यू ऑल आर ओल्ड पीपल.. यू ऑल नो एव्हरीथिन्ग अबाऊट धिस बिझिनेस... आय.. आय अ‍ॅम जस्ट अ बिगिनर...

जडेजा - नो इश्यूज... वुई आर ऑल देअर टू हेल्प यू....

मोना - थॅन्क्स अगेन... टेल मी मिस्टर जडेजा... व्होट कॅन हेलिक्स डू फॉर यू???

जडेजा आणि त्यांचे फारुख ऑटो हे जरी साईझने खुद्द हेलिक्सपेक्षा लहान असले तरी ते हेलिक्सचे कस्टमर होते.

जडेजा - मिस गुप्ता... तुम्हाला माहीत असेलच... टेल्को, बजाज ऑटो, टेम्पो, महिन्द्रा, एस्कॉर्ट्स, एच्.एम.टी., आयशर, न्यू हॉलंड... या सर्व ऑटो मॅन्युफॅक्चरर्सना आम्ही गिअर्स सप्लय करतो.. शेव्हन.. शेव्हन गिअर्स.. वुई मेक अराऊंड अ लॅख ऑफ गिअर्स अ मन्थ.. अ‍ॅन्ड.. वुई हॅव अबाऊट.. सेव्हन परसेन्ट शेअर ऑफ द बिझिनेस ऑन नॅशनल लेव्हल... विच आय थिन्क.. इज अल्मोस्ट.. थर्ड ऑर फोर्थ लार्जेस्ट शेअर ऑफ बिझिनेस.. आमची तीन युनिट्स आहेत... पुणे, बेळगाव आणि औरंगाबाद! औरंगाबादचे युनिट खास बजाजसाठी आहे.. आमची एकंदर इन्व्हेस्टमेंट ७९ कोटीची आहे...

मोना - ओके.... ग्रेट??

जडेजा - पण ... होतं असं... की... आमच्याकडे रिक्वायरमेन्ट खूप जास्त येते... आम्ही सगळी फुलफिल करू शकत नाही...

मोना - हंहं??

जडेजा - साधारण.. तीस हजार गिअर्सची ऑर्डर आम्हाला दर महिन्याला नाकारावी लागते.. ते गिअर्स इन्हाऊस बनवायचे असतील तराअम्हाला अधिक मशीन्स, अधिक जागा आणि अधिक एम्प्लॉयीज लागतील.. हे सगळे व्हायला वेळही खूप लागेल आणि भांडवलही.. करायला हरकतही नाही म्हणा... पण त्या कॉस्टच्या व्हिस अ व्हिस आम्ही जर बॉट आऊट गिअर्सची कॉस्ट कंपेअर केली तर असे जाणवते की उलट ते आम्हाला स्वस्तच पडेल...

मोना - ओह... फॅन्टॅस्टिक...

जडेजा - सो.. आय मीन आय हॅव अ प्रपोजल.. दॅट.. इफ यू कॅन सप्लाय अस अराऊंड थर्टी थाऊझंड गिअर्स अ मन्थ.. आय मीन.. शेव्हन गिअर्स... आम्ही तुम्हाला लाईफलॉन्ग बिझिनेस देऊ शकतो...

मोना - साधारण... काय रेंजमधले... ??

जडेजा - सी... साधारण एक गिअरबॉक्स.. म्हणजे अ‍ॅव्हरेज म्हणतोय हं मी?? ... साधारणपणे तेवीस हजाराला पडावी... जस्ट अ रफ आयडिया...

मोना - अच्छा... !

जडेजा - वुई कॅन एन्टर इन टू अ‍ॅन अ‍ॅग्रीमेन्ट फॉर धिस ..

मोना - वेल.. मिस्टर जडेजा... सकृतदर्शनी तर ही कल्पना फारच चांगली वाटत आहे.. फक्त काय आहे की.. एक म्हणजे आमच्याकडे दोनच मशीन्स आहेत.. त्यावर आम्ही अर्थातच आपली सगळी रिक्वायरमेन्ट फुलफिल करून आणखीन गिअर्स बनवू शकत असलो तरीही ती मशीन्स नवीन आहेत.. आणि दुसरे म्हणजे.. अजून... मीही नवीन असल्यामुळे... मला हे प्रपोजल आमच्या जॉईंट एम डींना म्हणजे लोहिया अंकलना ऐकवावे लागेल..

जडेजा - ओह ऑफ कोर्स... आय मीन.. आय नो लोहिया व्हेरी वेल.. ही अल्सो नोज मी.. इन फॅक्ट.. आपले वडील हयात असताना याच मशीन्सच्या उपलब्धतेवरून खरे तर एक छोटासा वाद झाला होता आमच्यात.. पण... आता ती मशीन्स उपलब्ध आहेत... तर.. वुई कॅन रिव्हिझिट द मॅटर...

मोना - शुअर... सो... कॅन आय... कॅन आय कम बॅक टू यू इन अ डे ऑर टू???

जडेजा - या या.. टेक यूअर टाईम...

जडेजा उठून निघून चाललेले असताना मोनाने त्यांना शेवटचा प्रश्न विचारला.

मोना - मिस्टर जडेजा.. या मशीन्सचे गिअर्स आता इंडस्ट्रीत फारसे चालणार नाही आहेत असे ऐकले... त्याबाबत तुम्हाला काय वाटते??

जडेजा परत बसले.

जडेजा - सी.. ते.. काही प्रमाणात खरे आहे.. पण लोक अजून पुरते शिफ्ट झालेले नाही आहेत... आणि.. अ‍ॅज इट इज... अ‍ॅज लॉन्ग अ‍ॅज वुई आर गिव्हिन्ग यू द अ‍ॅश्युअरन्स ऑफ द ऑफटेक... यू विल नॉट हॅव एनी प्रॉब्लेम्स...

मोना - शुअर... मला.. फक्त एकच विचारायचे होते...

जडेजा - ...??????

मोना - एखादा कस्टमर जर आमच्याकडे डायरेक्ट आला तर... देन दॅट अ‍ॅग्रीमेन्ट वुड नॉट हॅव एनी इम्पॅक्ट ऑन दॅट ना??

ती काय विचारते आहे ते जडेजांना व्यवस्थित समजलेले होते. त्यांचे आत्तापर्यंत बनलेले मत पूर्णपणे बदललेले होते आता तिच्याबद्दल! ती महिन्द्राबद्दल बोलत आहे हे समजले होते त्यांना! पण तसे दाखवणे प्रशस्त नव्हते.

जडेजा - वेल.. आय मीन.. ज्या कस्टमरला आम्ही तुमच्याकडून घेतलेले गिअर्स सप्लाय करतो आहोत.. त्यांच्याकडे तुमचा डायरेक्ट सप्लाय असणे हे ... आय मीन.. अ‍ॅक्सेप्टेबल नसेल...

मोना - ओह.. ओके?? राईट... आय शॅल टॉक टू अंकल अ‍ॅन्ड गेट बॅक टू यू... ओके??

जडेजा - राईट... बाय देन...

मोना - बाय...

ते गेल्या गेल्या मोनाने लोहियांना फोन लावला.

लोहिया - येस बेटा...

इतक्या पटकन लोहियांना जडेजाच्या मीटिंगमध्ये काय झाले ते समजणे शक्यच नव्हते.

मोना - अंकल.. जडेजा अंकल हॅड कम हिअर....

लोहिया - जडे.... ओह.. फारुख ऑटो??

मोना - यॅह...

लोहिया - व्हेरी गुड?? .. व्हॉट डिड ही से??

मोना - ही वॉन्ट्स टू एन्टर अ‍ॅन अ‍ॅग्रीमेन्ट विथ अस... फॉर शेव्हन गिअर्स..

लोहिया - ओह ग्रेट... सो?? डिड यू अ‍ॅक्सेप्ट द प्रपोजल??

मोना - मला काय कळणार त्यातले अंकल.. अशी थट्टा नका बाबा करत जाऊ..

लोहिया हासल्याचा आवाज फोनवर आला.

लोहिया - बेटा.. तुझी थट्टा करेन का मी कधी?? अं??

मोना - मी त्यांना म्हणाले तुमच्याशी बोलून सांगते...

लोहिया - नो नो.. साईन दॅट्..साईन दॅट अ‍ॅग्रीमेन्ट बेटा... इट्स अ वन्डरफुल अपॉर्च्युनिटी ...

मोना - राईट अंकल... फक्त... ते एक गोष्ट म्हणाले...

लोहिया - ... काय??

मोना - की.. ते आपले गिअर्स ज्यांना सप्लाय करतात त्यांना आपण कधीच डायरेक्ट सप्लाय करू शकत नाही...

लोहिया - मग?? मग प्रॉब्लेम काय आहे??

मोना - नाही नाही.. फक्त सांगीतले मी...

लोहिया - काही प्रॉब्लेम नाही.. दोन दिवसांनी मी पुण्यात आलो की त्यांना बोलाव... आपल्या लीगलकडून ड्राफ्ट करून घे अ‍ॅग्रीमेन्टचा तोपर्यंत... आपण परवाच्या दिवशी साईन करू अ‍ॅग्रीमेन्ट... अ‍ॅन्ड देन वुई विओल हॅव अ बिग सेलेब्रेशन अ‍ॅट यूअर प्लेस बेटा...

मोनाने खूप आनंदी झाल्यासारखे व तिच्या कामाची जणू लोहियांकडून शाबासकीच मिळाल्याचा आनंद झाल्यासारखे आवाज फोनवर काढून फोन बंद केला.

तिला जे पाहिजे ते झालेले होते. शेव्हिन्ग मशीन्सचे जाळे लावणार्‍यांना हे माहीतच नव्हते की मोनालिसाला ते जाळे आहे हे माहीत होते आणि.....

... आणि तिने त्या जाळे लावणार्‍यांनाच जाळ्यात अडकवण्याचा प्लॅन केलेला आहे हेही त्यांना माहीत नव्हते...

मात्र! मोनालिसाने गेल्या पंधरा दिवसात जी घोडचूक केलेली होती तिच्यामुळे ती स्वतःच अडकणार याची तिला कल्पनाच नव्हती. दासप्रकाश, चंद्रा आणि धीमन रे या तिघांनीही माना डोलावल्या होत्या आणि शासनाला होणारे सप्लाय एक महिनाभर करायचेच नाहीत असे धोरण मान्य केले होते. मात्र! बिझिनेस इज बिझिनेस...

चंद्रांच्या प्लॅन्टमधून तिसर्‍याच दिवशी सहा मोठ्या गिअरबॉक्सेस एन टी पी सीला सप्लाय झालेल्या होत्या. हे मोनालिसाला माहीतच नव्हते. त्याच एन टी पी सी ला गुप्ता हेलिक्समधूनही तशीच एक गिअरबॉक्स जायला हवी होती. ती मोनाने थांबवली होती. तोपर्यंत एलेकॉनकडून तीन विशाल गिअरबॉक्सेस नॉर्दन कोलफिल्ड्सला सप्लाय झाल्या. हे कळल्यामुळे सिम्प्लेक्सच्या धीमन रेंनी स्वतःवर असलेली सर्व नियंत्रणे झुगारून चार मध्यम आकाराच्या गिअरबॉक्सेस राऊरकेलाला सप्लाय केल्या होत्या.

आणि जडेजा भेटून गेल्याच्या दुसर्‍याच दिवशी...

... मोनालिसा गुप्तांच्या टेबलवर दोन पत्रे होती... एक एन टी पी सी कडून.... अकरा दिवसांच्या आत गिअरबॉक्स पोचली नाही तर टेन्डरमधल्या क्लॉजप्रमाणे अडीच लाखांची पेनल्टी बसणार होती... आणि दुसरे पत्र तर भलतेच होते... राऊरकेला स्टील प्लॅन्टने 'सेल' (स्टील ऑथोरिटी ऑफ ईन्डिया) ला कळवले होते की गुप्ता हेलिक्स वेळेवर सप्लाय करू शकत नाहीत. त्यामुळे गुप्ताचे ओव्हरऑल रॅन्कींगच खाली येणार होते.

... आणि याचे जबरदस्त पडसाद मंथली एस्.जी. एम मीटिंगमध्ये उमटले.

लोहियांनी बापाची भूमिका स्वतःकडे घेऊन मोनाला सगळ्यांसमोर खडसावले. हे कसे काय होऊ शकले हे मोनासकट कुणालाही समजले नाही. जतीन, सुबोध आणि कुणालाच! मोनालाच बोलले लोहियासाहेब?? असे कसे बोलले??

"हाऊ कॅन यू... आय मीन हाऊ कॅन वुई स्टॉप द सप्लाईज टू गव्हर्नमेन्ट??... कॉम्पीटिटर्स आर नॉट टू बी ट्रस्टेड मोना... जोशी.. तुम्ही गप्प कसे बसलात?? मला का नाही कळवलेत??? "

लोहिया मोनावर नीटसे तोंडसुख घेता येत नाही म्हणून जोशीला सोलत होते. तो बिचारा मोनाची इन्स्ट्रक्शन फोलो करत आला होता. स्लो डाऊन ऑन गव्हर्नमेन्ट ऑर्डर्स! असे केल्यामुळे एजिटेटर आणि क्रेनच्या छोट्या छोट्या गिअरबॉक्सेस अचानक वेळेवारी बनलेल्या होत्या आणि त्यांचे कस्टमर्स खुष झालेले होते. पण याची कॉस्ट होती गव्हर्नमेन्ट नाराज होणे ही! आणि गव्हर्नमेन्टचा सगळा बिझिनेस गुप्ता हेलिक्सला लोहियांमुळे मिळालेला होता. त्यामुळे लोहिया जोशीवर अक्षरशः बरसत होते आणि या सर्व शिव्या वास्तविक आपल्यासाठी आहेत हे मोना जाणून होती. कसे कुणास ठाऊक पण लोहियांना एलेकॉन, रॅडिकॉन आणि सिम्प्लेक्सने केलेल्या सर्व स्प्लायची डिटेल्स माहीत होती. आणि तीच ते सतत मीटिंगमध्ये जोशीच्या तोंडावर फेकत होते.

मोना त्या दिवशी नवा धडा शिकली. स्पर्धात्मक युगात आपल्याला आपल्या स्पर्धकांची संपूर्ण माहिती असणे अत्यावश्यक आहे. आपण चंद्रा आणि दासप्रकाशांना एका अक्षरानेही विचारू शकत नाही की तुम्ही कसा काय सप्लाय केलात? कारण ते स्वतंत्र आहेत. पण... आपण ती अट पाळल्यामुळे आज आपणच गोत्यात आलेलो आहोत आणि.. या क्षणी तरी लोहियांनी स्वस्थ बसणे किंवा सौम्य बोलणे हे समोर बसलेल्या ग्रूपच्या मनात असलेल्या लोहियांबद्दलच्या प्रतिमेला सुरुंग लावणारे ठरेल. त्यामुळे लोहिया वाट्टेल तसे भडकून बोलत आहेत. आणि ते बोलणे वरवर जोशीला उद्देशून असल्यासारखे दाखवत असले तरी ते खरे... आपल्यालाच बोलत आहेत.

परिणाम भलताच झाला. अत्यंत कोपिष्ट आविर्भावात लोहियांना सगळ्यांना उद्देशून सांगीतले. आजपासून ऑपरेशनच्या रिपोर्टिंगची एक कॉपी मला यायलाच हवी.

आणि 'असे चालेल ना बेटा' म्हणून सौम्य आवाजात त्यांनी मोनाला विचारलेल्या प्रश्नाचा 'आतला' अर्थ मोनाला व्यव्स्थित माहीत होता...

'मूर्ख मुली.. तू आता ऑपरेशन्स पाहू नकोस.. मलाच पाहूदेत...'

मोनाने मान डोलावली आणि तिसर्‍या तासाला हेलिक्सच्या सर्व ऑफीसेसमध्ये सर्क्यूलर इमेल झालेले होते. मोना आणि लोहियांकडे ऑपरेशन्सचे पॅरलल रिपोर्टिंग आले होते.

मोना अक्षरशः हतबुद्ध झालेली होती. कारण लोहिया असा अवतारही धारण करतात हे तिला माहीतच नव्हते. आणि 'नाही नाही, मी बघेन सगळे व्यवस्थित' असे बावळटासारखे ती मीटिंगमध्ये बोलू शकत नव्हती सर्वांसमोर! आपण नवीन आहोत हे अधोरेखित करण्यात आलेले आहे आणि आपली प्रतिमा प्रचंड डागाळण्यात आलेली आहे हे तिला समजले होते. सगळ्यांसमोर लोहियांना एकदम रागाच्या भरात बोलणे शक्यही नव्हते. कारण ती दिवसातून सात सात फोन त्यांना करायची! मुलीप्रमाणे बोलायची त्यांच्याशी! अंकल अकल म्हणायची! या सर्व पार्श्वभूमीतून एकदम 'हू आर यू टू टेक सच डिसीजन्स' स्वरुपाचे कोणतेही विधान करणे शक्यच नव्हते. आणि तेही सगळ्यांसमोर??? इम्पॉसिबल! काही झाले तरी अख्खा क्रॉस सेक्शन आज लोहियांना गुप्तांच्या जागी मानत होता... मोनालिसाला नाही.... !

आणि पाठोपाठ दुसर्‍या दिवशी फारुख ऑटोशी अ‍ॅग्रीमेन्ट साईनही झाले.

मोनालिसा महिन्द्रामधील जोहान्स साहेबांना प्रत्यक्ष भेटणार होती कालच्या दिवशी रात्री! एस जी एम झाल्यावर त्यांना मुंबईत जाऊन भेटायचे आणि दुसर्‍या दिवशी जडेजा यायच्या आत लोहिया अंकलना सांगायचे की महिन्द्रा या एका कंपनीच बिझिनेस मात्र आपण डायरेक्ट करायचा आहे व करू शकतोही!

पण आज दुपारी झालेल्या हॉट मीटिंगनंतर तिच्यात मानसिक ताकदच राहिली नव्हती कोणताही डिसीजन घेण्याची!

लक्षात घ्यायलाच पाहिजे की फक्त पंचविस वर्षांची होती ती! काहीशी भावनिक असणे, नवोदीत असल्यामुले चुका होणे व त्यातच एक मोठे वर्तुळ आपल्याला नष्ट करायला टपले आहे हे मनात असणे! या सर्वांचा व्हायचा तो परिणाम होणारच होता.

फारुख ऑटोशी करार करून गुप्ता हेलिक्स आणखीनच गोत्यात आली होती. फारुखच्या कोणत्यही कस्टमरला गुप्ता हेलिक्स शेव्हन गिअर्सचा डायरेक्ट सप्लाय करू शकणार नाही हा क्लॉज अपेक्षित होताच! पण लोहियांनी आणखीन एक क्लॉज साईन करून ठेवला होता. हा सरळ सरळ घात होता. गुप्ताची शेव्हिन्ग मशीन्स कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने एक्स्क्लुझिव्हली फारुख ऑटो याच कंपनीसाठी वापरली जातील व त्या अगेन्स्ट फारुख ऑटो गुप्ताची ही मशीन्स महिन्यातील तीस दिवस दोन शिफ्ट पूर्ण चालतीन एवढा बिझिनेस देईल असा तो क्लॉज होता. मोनाने क्रॉस क्व्हेश्चनिंग केलेच लोहियांना! त्यावर लोहियांनी दोन वर्षांमधील एक्स्पेक्टेड बिझिनेस व्हॉल्यूम्स व त्या द्वारे होऊ शकणारी कर्जाची परतफेड यांची आकडेवारी समोर ठेवली आणि तिचे तोंड बंद केले.

आणि त्यातून मोना आणखीन दोन गोष्टी शिकलेली होती.

.. एक म्हणजे.. अर्देशीर सर त्यांच्या अती महत्वाकांक्षी स्वभावाने बाहेर फेकले गेले... लोहिया तसे अजिबातच नाहीत... ते जळवेसारखे इथेच चिकटून रक्त शोषणार्‍या प्रकारातील आहेत आणि अत्यंत हुषार आहेत...

... आणि दुसरे म्हणजे... नामधारी लीडर व्हायचे नसेल तर... लोहियांची कोणतीतरी स्टेप अत्यंत चुकीची आहे हे लवकरात लवकर सिद्ध करायला हवे व त्यातूनच आपल्याबद्दलचा आदर वाढवायला हवा व अधिक पॉवर्स मिळवायला हव्यात.. निदान.. ज्या पॉवर्समध्ये आता भागीदारी करावी लागतीय त्या तरी पुन्हा मिळवायला हव्यातच!

'डॅड... आय अ‍ॅम सॉरी... आय थिन्क.. यूअर डॉटर इज.. नॉट स्मार्ट इनफ टू हॅन्डल दिज टेन्शन्स डॅड... आय अ‍ॅम रिअली सॉरी...'

त्या रात्री सायरा किचनमध्ये असताना मोना डॅडचा फोटो हातात धरून त्याच्याकडे बघत मनातल्या मनात म्हणत होती. ती आज डॅडच्या बेडरूममध्ये आली होती. खूप आठवण येत होती वडिलांची! खूप एकटे वाटत होते. किती मस्त दुनिया होती ती! डॅड वेळ देत नाहीत म्हणून त्यांच्यावर लटके लटके रागवायचे.. आणि राग गेला की त्यांच्या गळ्यात हात टाकून त्यांच्या गालांचा एक किस घ्यायचा आणि म्हणायचे....

'माय डॅड.. द बेस्ट डॅड इन द वर्ल्ड... फक्त.. ते मला भेटतच नाहीत...'

मग डॅडनी एक टप्पल मारायची आणि म्हणायचे...

'हॅव ब्लॅक लेबल मोनी... गिव्ह मी कंपनी.. लेट्स चॅट विथ इच अदर...'

मग वाट्टेल त्या विषयावरच्या गप्पा, वाईन, ब्लॅक लेबल, कोळंबी, टी.व्ही., हसणे, सायराने अधूनमधून येऊन सर्व्हीस देत राहणे आणि... एक मस्त.. कोणतीही जबाबदारी .. कोणताही ताण नसलेले आयुष्य जगणे..

केव्हाच गेले ते दिवस! आता ठरवलेले आहे आपणच... की हे आव्हान स्वीकारायचेच! मग आता मागे नाहीच पाहायचे... आता फक्त पुढे जायचे.. आत्ता.. या क्षणी लोहियांनी खेळलेल्या खेळीमुळे आपण मागे पडलेलो नाही आहोत... आपण फक्त.. थाबलेलो आहोत एका जागी..

मोनाचे लक्ष डॅडच्या वॉर्डरोबकडे गेले.. बरेच दिवस मनात होते.. एकदा सगळे काढून पाहावे.. काही विशेष तर ठेवलेले नाहीये ना त्यांनी तिथे???

सायरा अजून तासभर तरी वर येणार नाही हे मोनाला माहीत होते.. एखाद्या चोराने चोरी करताना काढावेत तसे तिने डॅडचे सगले सुट्स, शर्ट्स खाली ओढून काढले.. तिजोरीचे तीनही कप्पे खोलले.. त्यातील महागड्या वस्तू... अत्यंत महत्वाचे कागद.. सगळे खाली काढले.. मग तिला काय वाटले कुणास ठाऊक.. तिने सर्व ब्लेझर्स आणि ट्राऊझर्सचे खिसे तपासले.. एका ट्राऊझरमधे एक जुने विमानाचे तिकीट मिळाले ते सोडले तर काहीही नव्हते.. वॉर्डरोबला आणखीन काही गुप्त कप्पे वगैरे तर नाहीत ना ते तपासण्यात तिची सात आठ मिनिटे गेली... तेवढ्यात चाहुल लागली सायराची.. ती जिना चढत असावी.. मोना पटकन दारात आली आणी अल्मोस्ट जिना चढून वर आलेल्या सायराला म्हणाली...

"सायरा... तू खाली करतीयस??"

"मॅम... जेवण तयार आहे...

"ओके.. .. मग.. एक काम कर.. थोडा वेळ बस तू खालीच.. मी आले की वाढ..."

"राईट मॅम..."

सायरा जिना उतरून गेली आणि मोनाने पुन्हा मोर्चा वॉर्डरोबकडे वळवला. काहीही नव्हते. उलट वॉर्डरोबमध्ये आतही लाईट्स होते आणि त्यात सगळे लख्ख दिसत होते. काहीही विशेष, गुप्त वाटावे असे नव्हते. मोनाने पुन्हा कपडे कसेतरी उचलून आत ठेवायला सुरुवात केली. अक्षरशः कोंबत होती ती ते सगळे! एकदा शामाला उद्या परवा हे सगळे नीट लावून ठेवायला सांगीतले पाहिजे असा ती विचार करत होती. सगळे सामान आत कोंबून झाल्यावर ती चक्क खालीच कारपेटवर बसली. वैताग आला होता. खाली जाऊन जेवून घ्यावे असा विचार करून उठत असतानाच वॉर्डरोबच्या खाली असलेल्या शूजच्या कप्यांकडे तिचे लक्ष गेले. पटापटा तिने ते कप्पे खोलले आणि काहीच दिसत नाही म्हणून आणखीनच वैतागत पुन्हा बंद केले..

.... मात्र... एक कप्पा काही केल्या व्यवस्थित बंद होईना.. तिने दोन तीन वेळा जोर लावून पाहिला.. मग पुन्हा त्यातले शूज बाहेर काढले आणि नीट लावले आणि पुन्हा ढकलला.. पण तो कप्पा बंद झाला नाही.. म्हणून तिने वाकून पाहिले तर डायरीसारखे काहीतरी....

डायरी नव्हती ती! एक एन्व्हलप होते.

फोटो??? मोनाने घाईघाईने फोटो पाहिले... खूप सुंदर गाव होते ते.. ओह.. अरे?? हा तर.. हा तर हिमालय आहे... वॉव्ह... बर्फाच्छादीत शिखरे.... हा फोटो इथे कसा काय???

विचार करेपर्यंत दुसर्‍या फोटोत डॅड दिसले... किती तरुण दिसत होते... कधीचा असेल हा?? डॅड मस्ट बी अराऊंड थर्टी ऑर सो.. म्हणजे.. आपण नसणारच तेव्हा... हे कोण??? या दोन बायका.. हा मा.. हा मा...

.. हा माणूस अगदी ... डॅडसा....काका???? काका आहेत हे?? ओह... खरच काकाच आहेत... मग सुबोध कुठे आहे??? ... सिमला.. सिमल्याचे फोटो असणार हे... आणि ही... प्रेग्नंट बाई आपली आई आहे हे आपल्याला माहीतच आहे ... म्हणजे... आपण पोटात होतो तेव्हा... या काकू... फक्त... सुबोध मिसिंग आहे....

कार्बन कागद! पत्र...! डॅडनी भावाला लिहीलेल्या पत्राची प्रत..

"भैय्या,आप बडे हो,लेकिन.. कहनेमे शरम आ रही है के आप जैसे घिनौने इन्सानके घर मै भी पैदा हुवा..

आपने सिर्फ कहां होता मुझसे! ये सब हमाराही था दोनोंका...

अब जो कुछ है वो मोनीकाही है.. वो चाहे तो बिझिनेस संभाले.. चाहे तो सब छोडके दूर चली जाये मेरे बाद.. चाहे तो जो पसंद आयेगा उससे शादी करले.. लेकिन.. मै उसे कभीभी इन्सिस्ट नही करुंगा किसीभी बात के लिये.. क्युंकी वो मेरी बेटीही नही.. मेरा बेटाभी है वो.. अपना कर्तब वो खुदही दिखायेगी दुनियाको.. भैय्या.. क्युंकी आपको जुबान दी थी.. इसलिये सुबोधको मै अपने बिझिनेसमे लेलुंगा.. पर.. इतनाही.. आपके लिये मै एक फुटी कौडीभी नही रख्खुंगा.. आप.. उस लायक नही.. आप दोनोभी... पिताजी होते तो शायद... आपका जनम होनेसे पहले अगर उनको पता होता की आप कैसे इन्सान है... तो वे हमारी मांके साथ वही करते जो आप दोनोंने जयाके साथ किया... मै चाहू तो कंप्लेन्टभी लिखवासकता हूं.. पर.. आपकी और भाभीकी.. उतनीभी औकात नही है मेरे हिसाबसे.... चाहूं तो मै आप दोनोंको खतम भी करवासकता हूं.. लेकिन... क्युंकी मै एक अच्छा इन्सान हूं जो अपने पिताजीके दिखाये हुवे रास्तेपर चलरहा है.. इसलिये मै आपसे सिर्फ नाताही तोड रहा हूं...

ये मेरा आखरी खत... इसके बाद मुझसे नाता मत रख्खिये.. सुबोधको मै बॉम्बेहीसे बुलवालुंगा यहाँपर..

--- मोहन - जो कभी आपका था..'

आता धक्यांची सवय झाली होती मोनाला! या पत्राचा धक्का बसलेला असला तरीही तो संयमाने पचवण्याची क्षमता आलेली होती तिच्यात! पण खूप खूप वाईट वाटले तिला!

हे काय आहे? काय आहे काय हे? काय केले काकांनी आणि काकूने? सुबोध तेव्हा मुंबईला का होता? आपली आई, जया, हिचे काय झाले? डॅड काय काय सहन करत होते? आणि आपण किती वेड्यासारखे फुरंगटून बसायचो ते आपल्याला वेळ देत नाहीत म्हणून..

बधीर मनाने मोना जिना उतरून खाली आली. हेलिक्सवरचा ताबा कमी झालेला होता आता! जुने सगळेच लोक आता लोहियांना कॉपीज मार्क करणार होते. त्यांचे प्रामुख्याने ऐकणार होते. आपण फक्त नामधारी! डॅडना स्वतःची मुलगी कर्तृत्ववान असेल असे वाटत होते. मुलगा समजत होते ते आपल्याला! काय करायचे ते करेल असे मत होते त्यांचे आपल्याबद्दल! म्हणून त्यांनी कधीही आपल्याला कसलाही आग्रह केला नाही. जितके शिकायचे आहे तितके शिक! इतकीच का शिकलीस विचारणार नाही. दिवसभर काय करतेस, कसे पैसे उडवतेस, कुणाला भेटतेस?? काही काही नाही.. कधीच विचारले नाही.. फक्त... प्रेम आणि विश्वास... आणि आपण?? मूर्खासारखा डॅडच्या कंपनीतून गव्हर्नमेन्टला होणारा सप्लाय थांबवला.. डॅडनी बोकारोचा सप्लाय कधीकाळी थांबवला होता या अनुभवाच्या जीवावर.. ते दिवस आणि हे दिवस.. सगळे काय सारखेच आहे का?? सारखेच असणार आहे का?? तेव्हा डॅडच्या विरुद्ध होते अर्देशीर आणि अलोकतोडी! आत्ता आपल्या विरुद्ध घरातील माणसे नव्हती.. आपल्या विरुद्ध होते आपले खरेखुरे शत्रू.. एलेकॉन, रॅडिकॉन आणि सिम्प्लेक्स... आत्ता डॅड असेच वागले असते?? डॅड असे वागले असते तर ऑपरेशन्स लोहिया स्वतःच्या हातात घेऊ शकले असते??

मोनालिसा.. तू एक शुद्ध मूर्ख मुलगी आहेस... एखादा.... बर्‍यापैकी शोभणारा आणि श्रीमंत वगैरे मुलगा बघून संसार थाटण्याची तुझी पात्रता आहे... पुरुष ते पुरुषच! तेच कर्तृत्ववान असतात.. मुलींनी आपले घर बघावे.. नटणे मुरडणे बघावे.. दागदागिने, साड्या... हेअरस्टाईल.. यात इन्टरेस्ट ठेवावा.. गॉसिपिंग करावे... फन्क्शन्स अटेन्ड करावीत.. मुलांना जन्म द्यावा... आणि.. एक दिवस मरून जावे..

मेरी बेटीही नही है वो... वो मेरा बेटाभी है...

डॅडचे हे वाक्य खोटे ठरवण्यास तुझे काका किंवा सुबोध किवा लोहिया, अर्देशीर जबाबदार नाही आहेत.. तू जबाबदार आहेस तू... विसाव्या वर्षी शिक्षण संपल्यानंतर केवळ मैत्रिणींच्या लग्नाला जाणे आणि ऐष करणे या व्यतिरिक्त तू काय केलेस?? पाच वर्षे तुझे डॅड.. तेच अफाट कर्तृत्ववान डॅड तुझ्या डोळ्यांसमोर होते.. काय केलेस तू?? गिअरबॉक्स म्हणजे काय असेल हा प्रश्नही तुला कधी पडला नाही.. यू आर... यू आर अ ... फेल्युअर मोना.. जस्ट अ व्हेरी व्हेरी व्हेरी बिग फेल्युअर...

"नॉट फीलिंग वेल मॅम??"

डायनिंग टेबलवर बसून अन्न चिवडताना सायराचा हा प्रश्न ऐकून मोनालिसा दचकलीच! सायराकडे बघत 'काही नाही' अशा अर्थी मान हालवून पुन्हा तिने ताटाकडे पाहिले. जेवण जातच नव्हते. पुन्हा पाठमोर्‍या सायराकडे पाहिले. काय वाटले कुणास ठाऊक.. सायराची त्वचा गेले काही दिवस फारच खुलल्यासारखी वाटत होती... मोनाने हाक मारली तिला...

"सायरा...????"

थबकलेल्या सायराने मागे वळून पाहिले...

"डिड यू... गेट युअरसेल्फ चेक्ड???"

खटकन मान खाली घातली सायराने... पुटपुटून निघून गेली....

"शॅल डू इट टुमॉरो मॅम... "

मोनाने संतापाने ताटाकडे पाहिले...

बहुतेक.... मोहन गुप्तांच्या घरात लोहियांचा अंश वाढत असावा....

उबग! उबग येणे या गोष्टीचा अनुभव घेत होती मोना! अजून ती हारली नव्हतीच! कोणत्याच पातळीवर! लोहियांशी सरळ सरळ भांडण केले तर लोहिया जागेवर आलेच असते... पण... स्टाफ बिथरला असता.. अर्देशीर गेले.. लोहियाही गेले.. काही लोक सोडून लोहियांच्या नवीन सेट अप ला कदाचित जॉईनही झाले असते... मार्केटमध्ये आपली वैयक्तीक इमेज खराब झाली असती.. एकट्या मेहरांच्या जीवावर कंपनी चालवणे जमलेच असते असे नाही... आज लोहिया अख्खे मार्केट पाहात होते... आपण ऑपरेशन्स, एच आर आणि मार्केट या सर्व पातळ्यांवर लढण्याइतक्या महान झालेलो नाही आहोत याची मोनालिसाला पूर्ण जाणीव होती.

बेडमधे येऊन बसली ती! आज बावीस तारीख! या महिन्यातला सेल मार खाणारच आहे! आपल्या महान डिसीजन्समुळे! तो सेल नेमका किती मार खाणार आहे हे बघायला आपण इथे असता कामा नये! कारण तेव्हा सतत सगळ्यांचे फोन येत राहतील. मॅडम असे झाले आणि तसे झाले! आय नीड टू बी अलोन! अ‍ॅबसोल्युटली अलोन!

इन्टरकॉमवरून तिने सायराला वर बोलावले. रात्रीचे पावणे अकरा वाजले होते. सायरा वर आली. तिच्या डोळ्यांवरून ती खूप रडलेली आहे हे सरळ दिसत होते.

मोना - तुला.... तुला निश्चीतच माहीत असेल ना???

सायराने मान खाली घातली. खाली मान घालूनच मान होकारार्थी हालवली.

मोना - किती??

सायरा - ... तीन...

मोना - ... बेबी.. ठेवणार आहेस??

सायरा पुन्हा रडायला लागली. मोना बेडवरून उठून तिच्याजवळ गेली. जन्माला येणार्‍या बालकाचा दोष नव्हता!

सायराला मात्र मोनाची भयंकर भीती वाटत होती.

मोना - त्याला जन्म दे सायरा... आपल्या बंगल्यातच वाढू देत... मात्र.... लोहियांचा त्याच्याशी संबंध येता कामा नये...

कित्ती तरी वेळ समोर उभ्या असलेल्या मोनाच्या छातीवर डोके ठेवून सायरा रडत होती. आणि.. आश्चर्य म्हणजे... मोना चक्क सायराच्या केसांमधून हात फिरवत होती...

मोना - लग्न झालेले आहे की नाही हा प्रश्न तुला कुणीही कधीही विचारणार नाही याची खात्री तुला मोहन गुप्तांची मुलगी देत आहे... त्या प्रश्नाचे उत्तर द्यायची वेळच तुझ्यावर येऊ देणार नाही मी सायरा...

आता सायराने उभे राहून मोनाला मिठी मारली. कितीतरी उंच होती ती मोनापेक्षा!

काय झाले ते लक्षात येण्यासारखे नव्हते.. पण.. कुणाचाही.. इतका निकटचा स्पर्श फार म्हणजे फारच वर्षांनी झाला होता.. पटकन मोना बाजूला झाली..

मात्र एक झाले होते... या पुढील सायराचे सगळे आयुष्य हे मोनाच्या भल्यासाठीच असणार एवढे निश्चीत ठरलेले होते...

डॅड असते तर??

मोनाला गुप्ता हेलिक्सची एम डी झाल्यापासून दिवसरात्र छळणारा प्रश्न आत्ताही... सायरा खुदकन हासून खाली निघून गेल्यानंतरही... पुन्हा छळू लागला..

सायरा प्रेग्नंट आहे हे डॅडना कळले असते तर?? कळूच दिले नसते या लोकांनी... आणि कदाचित.. अरे हो की??? कदाचित काय.. नक्कीच.. लोहियांचे भांडे तिने फोडू नये... यासाठी सायराला त्यांनी... ओह माय गॉड... कदाचित नाही.. नक्कीच.. नक्कीच खलासही केले असते...

... आत्ताचे सायराचे रडणे मूल पाडावे लागते की काय यासाठी नसून मरणाच्या भीतीने होते की काय??

नाही.. आय वोन्ट अलाऊ देम टू डू धिस हॉरिफिक थिन्ग... नेव्हर... नेव्हर एव्हर..

तकिलाचा एक शॉट घेऊन लिंबू आणि मीठ जिभेवर चोळत बेडवर पडलेल्या मोनाला अचानक ते आठवले..

... सायराचे आपल्या छातीवर डोके घुसळून रडणे...

मोनाने हळूच आपले दोन्ही हात स्वतःच्या छातीवर ठेवले.. ... पाचगणीला असताना होस्टेलवर मैत्रिणी थट्टा करताना काय काय करायच्या.. रावीने आपण चेंज करत असताना मागून मारलेली ती मिठी... आणि ते पुरुषासारखे शब्द...

'आय लव्ह यू जानेमन... '

शी:! किती राग आला होता आपल्याला तेव्हा.. सगळ्या हासत होत्या... पण... आज ते का आठवते आहे?? सायरा... सायराचा स्पर्श.. काहीसा मायेचा.. काहीसा आदर ठेवून केलेला... काहीसा आवेगपूर्ण.. स्त्री.... स्त्री असली म्हणून काय झाले??? स्त्री आणि पुरुष हे समाजाने निर्माण केलेले नियम आहेत... निसर्गाने थोडीच??? रावीच्या त्या स्पर्शाला आपण 'हलकटपणा' म्हणालो होतो... याचा अर्थच असा की... रावीचा तो स्पर्श फक्त एका स्त्रीने एका स्त्रीला मैत्रीने केलेल्या स्पर्शासारखा मुळीच नव्हता... त्यात.. एका स्त्रीला त्या स्पर्शाचा राग यावा अशी भावना निश्चीतच होती... वासनेचा गंध असलेला स्पर्श होता तो... तिने जरी क्षणभरासाठीच पुरुषाचा अभिनय केलेला असला तरीही... ज्या आवेगाने तिने आपल्याला मिठी मारली होती... इझ इट पॉसिबल?? इझ इट पॉसिबल दॅट अ गर्ल लव्ह्ज अ गर्ल???

पुरुषांच्या या नालायक, सुडाग्नीने पेटलेल्या, अहंकारी आणि तिरस्करणीय जगात... त्यांच्यातल्याच एकावर प्रेम करण्याची अगतिकता का असावी??? का म्हणून आपण एका पुरुषावरच प्रेम करायला हवे??

आपण... आपण पुरुषांचा एवढा तिरस्कार कधी करायला लागलो पण?? पण... मुळात करतो आहोत का तिरस्कार?? की केवळ... केवळ सायराचा तो निकटचा स्पर्श आवडला म्हणून... अचानक.. एक समर्थन तयार असावे म्हणून आपण स्वत:चीच समजूत घालत आहोत.. की पुरुष तिरस्करणीयच असतात... ???

तसेच काही नसेल.. डॅड?? डॅड कुठे होते तसे?? पण... केवळ आपले डॅड होते म्हणून तर नाही आपल्याला त्यांच्याबद्दल प्रेम वाटत? अर्देशीर सर आणि लोहिया अंकलना कसे काय त्यांच्याबद्दल तेच वाटेल जे आपल्याला वाटते??

पण.. आपण एम डी झाल्यापासून बघत नाही आहोत का?? स्त्री असल्यामुळे एक विशिष्ट प्रकारची नजर... जी वाईट नसली तरीही 'तू स्त्री आहेस' हे सतत जाणवून देणारी... काही सिनियर्सचे एक विशिष्ट प्रकारचे छद्मी हास्य... आपण बोलायला तोंड उघडल्या उघडल्या 'बघू तरी आता ही काय बोलते' अशा प्रकारचे चेहरे... एखादा डिसीजन चुकीचा ठरला की स्वतःची श्रेष्ठता दाखवण्याचा उत्साह.. आपल्याऐवजी त्या दिवशी मुलगा असता तर लोहियांनी थट्टेने विचारले असते का?? जडेजांबरोबरचे अ‍ॅग्रीमेन्ट साईन केलेस का म्हणून?? मुलगा असता तर ते म्हणाले असते... 'प्लीज सेन्ड द ड्राफ्ट टू मी.. लेट मी हॅव अ लूक...' आणि त्यावर तोही 'राईट' म्हणाला असता... आपण मुलगी आहोत म्हणून ते म्हणाले.. छद्मीपणे... 'मग.. केलीस की नाही साईन????'

सायरा... कित्येक वर्षे इथे आहे... पण आज... किती मस्त वास येतो तिच्या केसांचा... शॅम्पू.. घाम आणि.. हेअर स्प्रे... आणि ते... तिचे ते रेशमासारखे शरीर... आपल्याला बिलगलेले... वॉव्ह... आणखीन बिलगावेसे वाटत होते आपल्याला बाजूला होताना... शी:... घाणेरड्या विचारांनी व्यापलेला मेंदू... मी... मी अजून एखादा तकिला शॉट घेऊन.. खरे तर झोपायला पाहिजे आता... आणि हो.. आय शुड नॉट बी हिअर व्हेन धिस मन्थ एन्ड्स.. बिझिनेसने मार खाल्ला म्हणून त्या नालायक पुरुषांच्या छद्मी नजरा झेलायला मी इथे थांबताच कामा नये... एकही बाई नाही कशी ऑर्गनायझेशनमध्ये?? सायरा आणि शर्वरी? आणि शिल्पा?? बास?? त्याही सगळ्या एम फाईव्ह लेव्हलच्या.. डिसीजन मेकिंगमध्ये फक्त आपणच एकट्या...

हिमाच्छादीत शिखरे... सिमला???????

येस्स... सिमला... उद्या... किंवा फार तर परवा... आणि गुप्तपणे.. पण.. ही गुप्तता मेन्टेन होणार कशी?? सायरा ठेवेल सगळे गुप्त... मैत्रिणिच्या लग्नाला बेंगलोरला चाललो आहोत असे तिला सांगायला सांगायचे...

.... पुरुषांना... पुरुषांना पुरुषांचा सहवास कधी तरी आवडत असेल का?? खरच की.. पाचगणीला असताना त्या जयकिशनला आपण सगळे गे नाही का म्हणायचो?? ... मग.. स्त्री.. स्त्रीचे काय??

मोनालिसा बेडवरून उठून उभी राहिली... तकिलाचा आणखीन एक शॉट भरून घेऊन त्या छोटेखानी ग्लासवर आपली बोटे ठेवत ती भिंतीवरच्या आरश्यासमोर उभी राहिली...

.. नेमक्या.. कशा दिसतो आपण?? इफ आय हॅव टू कंपेअर मायसेल्फ विथ द स्टॅन्डर्ड डेफिनिशन्स ऑफ ब्युटी... काय स्ट्रेन्थ्स आहेत आपल्यात आणि... काय कमतरता???

ओह... डोळ्याखालची ही वर्तुळे.... काळपट.. दे प्रूव्ह.. आय डोन्ट स्लीप ऑन टाईम अ‍ॅन्ड... आय डोन्ट स्लीप वेल...

बट.. द फेस इज नॉट दॅट बॅड मोनू??? तू.. सुंदर नसलीस तरीही... फीचर्स बरे आहेत तुझे... आणि..

मोनाने तकिला शॉट बाजूला ठेवला... अंगावरचा गाऊन बेडवर फेकून दिला...

हं... हा हा हा हा... नॉट अ‍ॅट ऑल.. थर्टी सिक्स ट्वेन्टी फोर थर्टी सिक्सपासून आपण लांब आहोत... पण... कोण असते परफेक्ट?? एफ टी.व्ही वरच्या त्या दोन कपड्यांपमधल्या बायका... त्यांचा उद्योगच तो असतो... तशी फिगर असल्याशिवाय त्यांना कोण घेणार तिथे??...

रंग?? आय अ‍ॅम फेअर... येस... फेअर.. पण.. याला काही अगदी 'गोरेपण' नाही म्हणता येणार म्हणा... उजळ आहोत आपण उजळ... शी... असे काय बघायचे स्वतःकडे...

कॅट वॉक केला तर कशा दिसू आपण??

मोनाने खुसखुसत आरश्यापासून लांब जाऊन आतल्या कपड्यांवरच कॅट वॉक करत आरश्यापर्यंत येऊन पाहिले..

मग बराच वेळ हासतच राहिली... असे आपण चाललो तर??? लोक म्हणतील गुप्ता हेलिक्सची एम डी...

... काय तो शब्द?? रावी नेहमी म्हणायची आपल्याला... काय बरं??

... हां... कंडा आहे.. कंडा... शी.. कंडा काय? ग्रामीण काहीतरी... रावीलाही काय एकेक सुचायचे...

मज्जा... एम डी च अशी असेल तर काय??

मोनाने स्वतःशीच हासत गाऊन घातला.. भरलेला तकिला शॉट एका घोटात संपवला... त्याची चव अनबेअरेबल झाल्यामुळे पटकन लिंबाची फोड मिठात फिरवून जिभेवर फिरवली...

... आणि... इन्टरकॉमवर ४१६ नंबर लावला.. बंगल्यातील १७ खोल्यांपैकी सोळावी सायराला दिलेली होती..

"सायरा...???"

"..येस???.... येस मॅम????'

"कम हिअर..."

"जस्ट अ सेकंद..."

सायरा! दारात सायराला पाहताना तकिलाने दिलेले धाडस मोनाच्या नजरेत तरळत होते.. उगाचच ती एखाद्या पुरुषाप्रमाणे सायराकडे पाहायचा बालिश प्रयत्न करत होती...

"येस मॅम...???"

"बॅन्गलोरची एअर टिकेट्स काढायची उद्याची.. एनी फ्लाईट.."

"राईट मॅम.. आणि.. स्टे कुठे बूक करायचा???"

"हा हा.. स्टे नाही बूक करायचा..."

सायरा गोंधळली..

"स्टे सिमल्याला बूक करायचा..."

"एक्स्क्युज मी मॅम... बॅंगलोर टिकेट्स म्हणालात ना??"

"हं... आणि सिमल्याची पण... "

"ओह..."

"सगळ्यांच्या दृष्टीने मी बॅन्गलोरला असेन... "

"समजलं मॅम... करते..."

"सायरा.... आय... आय अ‍ॅम फॉलिंग व्हेरी... लोनली सायरा..."

"मॅम.. ... शुड आय.. सेन्ड शामा??"

"शा..ओह.. दॅट ओल्ड लेडी..."

शामाचा असा उल्लेख झालेला सायराला मनातून खरे तर आवडला नाही. शामा म्हातारी होती, म्हातारी म्हणजे पोक्त होती हा काही तिचा दोष नव्हता.. उलट ती जमेल तितके काम करत होती.. पण मोनासमोर नापसंती दर्शवणे सायराला शक्यही नव्हते आणि आत्ता ती वेळही नव्हती...

"व्हाय ओन्ट यू... स्लीप हिअर टुनाईट सायरा???"

"शुअर मॅम.. आय विल बी जस्ट बॅक..."

पाचच मिनिटांनी स्वतःचे बेडिंग घेऊन आत आलेल्या सायराने मोनालिसा आणि आपण या दोघांमधील फरक लक्षात घेऊन सरळ कारपेटवर बेडिंग टाकले.. आता मात्र तकिलाची धुंदी चढलेल्या मोनाचे अधिक धाडस होईना... सायराकडे बघत बघत तिने निद्रादेवीला 'मी शरण आले आहे' हे शेवटी सांगून टाकले.. मात्र झोपताना तिच्या मनात आलेला शेवटचा विचार हाच होता... कितीही तिरस्करणीय असलं तरीही... ईफ आय एव्हर लव्ह एनीवन .. इत विल बी अ ... फिमेल...

आणि दुसर्‍याच दिवशी संध्याकाळी दिल्लीच्या फ्लाईटमध्ये बसल्यावर 'कधी एकदाचा टेक ऑफ घेतंय प्लेन' या विचारात असताना 'ऐल्स' मधून आवाज आला...

'हाय.. एक्स्क्युज मी.. आय थिन्क डी १४ इज माईन... "

मोनालिसाने वळून पाहिले आणि....

.. काल रात्री घेतलेला निर्णय एकदा पुन्हा तपासावा की काय असे वाटले तिला...

'रेजिनाल्डो डिसूझा' !

पावणे सहा फूट उंच... असेल तिशीचा.. गुलाबीपणाकडे झुकणारा गोरा रंग.. चेहर्‍यावर कोणत्याही प्रकारची उद्दामता नाही.. हसरे डोळे.. स्मितहास्य अगदी मैत्रीतले.. फीचर्स एखाद्या नाटकातील पात्रासारखी शार्प.. आणि... तो 'फॉर यू हनी' परफ्युमचा मॅनली सुवास....

नाव तिला माहीतच नव्हते... पण तो... एलेकॉन गिअर्सचा मार्केटिंग डायरेक्टर होता.. तिचा कट्टर शत्रू.. व्यवसायातील...

रोबोप्रमाणे यंत्रवत हालचाली करत मोनालिसा खिडकीतील जागा सोडून अलीकडच्या सीटवर येऊन बसली...

"इफ यू वॉन्ट विन्डो सीट .. हॅव इट.. नो प्रॉब्लेम..."

"नो नो.. इट्स ओके..."

" नो नो.. प्लीज.. बिकॉज वन्स वुई फ्लाय.. देअर इज नथिंग टू सी आऊटसाईड... अ‍ॅन्ड दे डोन्ट अलाऊ टू ओपन द विन्डो अ‍ॅज वेल"

खळखळून हासत मोनालिसा पुन्हा विन्डो सीटमध्ये बसली.

"हाय... आय अ‍ॅम रेजिना... रेजिनाल्डो रिकार्डो डिसूझा..."

"हाय... मोनालिसा..."

"यू डोन्ट नीड टू टेल यूअर नेम... पीपल कॅन गेस यू आर मोनालिसा... हा हा... जस्ट जोकिंग..."

'फॉर यू हनी'चा सुगंध आता रोमारोमात भरून राहिल्यासारखा वाटत होता. मोनालिसाला इरफान अब्दुल्लाहपेक्षाही ही काँप्लिमेन्ट अधिक आवडली. तिच्या चेहर्‍यावर एक लाजरे हसू आले होते.

"आय अ‍ॅम फ्रॉम एलेकॉन... अ कंपनी दॅट मेक्स गिअर्स..."

"ओह... ग्लॅड टू मीट यू.."

"सेम हिअर... यू ????"

"आय हेड गुप्ता हेलिक्स... अ कंपनी दॅट सेल्स गिअर्स... आफ्टर मेकिंग देम..."

मोनाच्या या वाक्चातुर्यावर बेहद्द खुष होऊन रेजिनाने खदखदून हासून दाद दिली.

"यू मीन... यू आर मिस्टर गुप्ताज डॉटर???"

"यॅह..."

"ओह.. ग्रेट... ही वॉज अ ग्रेट मॅन... सॉरी... वर्ल्ड लॉस्ट हिम..."

"थॅन्क्स... हाऊ डु यू नो हिम???"

"वुई हॅड मेट अ‍ॅट अ‍ॅन एक्झिबिशन अ‍ॅट स्वित्झर्लंड... "

"ओक्के... "

"बट ही नेव्हर टोल्ड मी...."

"व्हॉट???"

"दॅट ही इज अल्सो अ फादर ऑफ अ व्हेरी कॅपेबल लेडी??"

"ओह.... आय अ‍ॅम न्यू... इन गिअर्स..."

" सो वॉज आय .. वन्स... हे विमान उडेल की नाही माहीत नाही..."

"तुम्हाला मराठी येतं??"

"मला सोळा भाषा अस्खलीत येतात..."

"रिअली?? "

"रिअली.. महिन्द्रा आर्मडाच्या पाचव्या गिअरला टीथ नसतील इतक्या भाषा येतात मला..."

मोना पुन्हा हसायला लागली.

"विमान उडेल की नाही असे का म्हणताय??"

"दोन एकमेकांच कट्टर शत्रू एकाच विमानात न्यायला परवानगी नाही आहे..."

पुन्हा मोना हसायला लागली.

"डेल्ही??"

"डेल्ही.... यू??"

"आता विमान दिल्लीलाच जातंय म्हंटल्यावर चॉइस काय आहे माझ्याकडे...???"

मोना खळखळून हासत म्हणाली...

"नाही नाही.. तसं नाही.. म्हणजे दिल्लीहून पुढे कुठे की दिल्लीच??"

"ओह.. सिमला... "

मोठ्ठे मोठ्ठे डोळे करत मोना त्याच्याकडे बघू लागली...

"का??"

"का म्हणजे?? उगाच आपला चाललोय... सुट्टी घेतली... मला प्रवास फार आवडतो..."

"अच्छा... "

"तुम्ही??? दिल्लीच का??"

"नाही...सिमला..."

आता आश्चर्य वाटायची पाळी रेजिनाल्डोची होती.

"सिमला??? ... का???"

"मला प्रवास आवडतो की नाही हे मलाच माहीत नाही.. चेक करायला चाललीय..."

रेजिना हासला.

"मग?? सुरुवात कशी वाटली प्रवासाची???"

मोनाने रेजिनाकडे एकदा पाहिले आणि खिडकीतून बाहेर पाहात म्हणाली...

"बरी आहे... तशी..."

"तुमचे .. मिस्टर नाही आले???"

"नाही... "

"त्यांना नाही आवडत प्रवास??"

" ठरले नाही आहे..."

"मग घेऊन यायचेत ना? म्हणजे तुमच्याबरोबर त्यांचेही ठरले असते.. "

"अहो मिस्टरच अजून ठरले नाही आहेत... "

आता दोघेही हासले. तेवढ्यात बेल्ट फासन करायची सूचना झाली.

मोनाने विचारले.

"मिसेस डिसूझा???"

"आई???? "

"ई... मिसेस..."

"त्याही ठरायच्याच आहेत..."

टेक ऑफ!

खाणे पिणे... गप्पा....

... लॅन्डिन्ग....

बाहेर... शेअर टॅक्सी... व्हाया चंदीगढ... शिमला..

मोनाने स्वतःसाठी असलेली टॅक्सी चक्क रद्द केलेली होती...

दिल्ली चंदीगढ प्रवासात मोनाला समजले. एका मित्राच्या लग्नाच्या निमित्ताने सिमला बघून येण्यासाठी आणि एल टी ए कंन्झ्यूम करण्यासाठी रेजिना सिमल्याला चाललेला होता..

.... आणि कोणत्यातरी एका स्पॉटला दोघांमध्येही ठरले...

... जोपर्यंत प्रवासात आहोत तोपर्यंत... गिअर्स या विषयावर एक अक्षरही बोलायचे नाही....

फक्त पिंजोर क्रॉस करताना रेजिना स्वतःहूनच एकदा मोनाला म्हणाला..

"दॅट जतीन हू वर्क्स विथ यू इज फ्रॉम धिस प्लेस ना???"

ते सोडले तर दोघे खरे तर एकमेकांशी फार बोलतही नव्हते. कंटाळा आलेला होता. रात्र केव्हाच झालेली होती. सभ्यपणा म्हणून रेजिना ड्रायव्हरशेजारी बसलेला होता. मोनालिसा मागच्या सीटवर कशीबशी लवंडलेली होती.

पुढे बसलेला माणूस आपल्याकडे नोकरी करण्याच्या पात्रतेचा आहे हे माहीत असले तरीही आत्ता तिला रेजिनाच्या अत्यंत मैत्रीपूर्ण वागण्याने जिंकलेले होते.

कधीतरी दचकून जागी झाली ती! फार म्हणजे फारच गार हवा होती. गाडीबाहेर पडणे शक्यच होणार नाही असे वाटत होते. अंगावर???? हे काय?? ओह... रेजिनाने स्वतःचा ब्लेझर घातला वाटते आपल्या अंगावर... साडे पाच वाजले पहाटेचे?? बापरे... केवढे झोपलो आपण मूर्खासारखे.. हे परके दोघे असताना..

तोच पांघरून ती कशीबशी बाहेर आली...

...... ड्रायव्हर कोणाशीतरी बोलत होता.... रेजिना मोनाकडे पाठ करून रॉथमन्स पेटवत होता...

आणि लांबवर... खूप खूप लांब... ती रांग होती... हिमालयाची... अंधुक प्रकाशातही दिसू शकण्याचे कारण म्हणजे... त्यावर शुभ्र, सफेद बर्फ पसरलेले होते... आणि... त्याखालीच कुठेतरी.. खूप खूप दिवे असलेले एक अत्यंत सुंदर हॉटेल दिसत होते...

..... दी पर्ल ऑफ शिमला...

इतक्या रम्य आणि रोमॅन्टिक वातावरणात.. आपण एका कॉम्पीटिटरबरोबर यावे याचे तिला वैषम्य वाटत असतानाच...

.... त्या हॉटेलच्या गार्डनमधून खूप लांबवर तिला ते दिसत होते...

ते तिने परवाच रात्री फोटोमध्ये पाहिले होते... ते हॉटेल... गचाळ स्वरुपाचे... स्वस्तातले.. आता तर अगदीच ढेपाळल्यासारखे.. बहुधा चालूही नसावे..

सुबोध गुप्ता... त्याचा इतिहास बहुधा इथे समजणार होता मोनालिसाला...

=========================================

एका ठिकाणी मोनालिसाऐवजी सायरा असे लिहीले होते. ते बदलले आहे. सांगणार्‍यांचे मन:पुर्वक आभार!

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

झकास...

फारच सुंदर...मोनाला तडफदार दाखवतानाच ती सुपरवुमन नाही..तिच्याही चुका होतात आणि त्यातून ती कशी शिकत जाते हे दाखविल्यामुळे एकदमच जिंवत वाटतेय हे सगळे....
तिच्या भावना, विचार अगदी खरेखुरे...
कार्पोरेट वर्ल्ड किती निष्ठुर असु शकते याचाही प्रत्यय मिळाला...
केवळ लाजवाब...

मस्त ..नेहमी प्रमाणे...
फक्त एक...
'हाय.. एक्स्क्युज मी.. आय थिन्क डी १४ इज माईन... "
सायराने वळून पाहिले आणि....
.. काल रात्री घेतलेला निर्णय एकदा पुन्हा तपासावा की काय असे वाटले तिला...
>> ईथे सायरा नसुन मोनालिसा पाहिजे ना....

सायराने वळून पाहिले आणि...
हम्म्म्म्म गार्गी नेमका हाच पॉइन्ट लिहायला लॉगिन केले मी.

गार्गी व मोनालिप,

मनापासून आभारी आहे ती दुरुस्ती सुचवल्याबद्दल!

सर्वांचेच आभार या निमित्ताने!

-'बेफिकीर'!

तकीलाचे नाव एकुन मला ही तकीला घ्यायच मन करतय.
मनातल ओळखता तुम्ही बेफिकिर.
बाकि कांदबरी उत्तम चालु आहे........
पु.ले.शु.

कथेतील पात्रं जरा जास्तच दारू पितायत असं वाटतयं .... एकूणातच वारूणीचं जरा जास्तच उदात्तीकरण केलेलं वाटतयं ... आलं टेन्शन उचला ग्लास, आनंद झाला रिचवा पेग ...असं चाललयं.

Dear Befi,
I have gone through your wonderful work 'Good Morning Ma'am'. your simply great and no words, rather i have lost the words...

there is one great auther Sidney sheldon. one of his novel 'Bloodline' is almost the same story of your work.

yours the Mona and shidney's Elizabeth.
here's Rejina, in blood line there is Rhys Williams
Gupta had been killed by his own staff, same in bloodline with Mr. Rafee.
and the entire story run same way.

in other word i could say that you and mr. sheldon have worked on same theme and I wonder you have beat Mr. sheldo. may be some people would say this statement is kind of exaggeration but thats what i feel.

you are much much better than the sheldon. and 'GMM' is definately going to rock the world if you publish this book in english.

I would like you to read 'bloodline'. (and all those who didnt read that book) so you could rate yourself and find what a great author you are.

thanks,

कृपया आपण या कथेच्या सगळ्या भागाच्या लिंक्स देऊ शकाल काय ?? कारण सगळे भाग माबो वर शोधून वाचणे जरा अवगड वाटतात

Thanks befikir ji