विचित्र इतिहास होता सगळा! काही समजत नव्हते काय करावे? आपण बहुधा चुकीच्या ठिकाणी पद मागीतले किंवा जन्मालाच चुकीच्या ठिकाणी आलो की काय असे वाटावे असा इतिहास होता.
कंपनी कशी सुरू झाली किंवा नेमके घोळ काय झाले हे जरी इमेल्समध्ये विशेषकरून नोंदवले नसले तरी काही काही बाबी अगदी सहज समजत होत्या.
डॅडचे सगळ्यांशीच बिनसलेले होते. लोहिया, अर्देशीर, जतीन आणि सुबोध! इमेल्स खूपच रागारागात लिहिल्यासारख्या होत्या. आणि महत्वाचे म्हणजे, अशा स्वरुपाच्या इमेल्स गेल्या तीन वर्षांपासूनच होत्या. तोपर्यंतच्या इमेल्स, म्हणजे आधीच्या दोन वर्षांच्या इमेल्स अगदीच स्मूथ संभाषण असलेल्या होत्या. रेडिफचे हे अकाउंटच पाच वर्षांचे होते. म्हणजे आधीचे काही समजणे शक्य नव्हते. पण पाच वर्षांच्या इमेल्स मिळणे हे काही कमी नव्हते.
मुद्दा असा होता की डॅडनी कंपनीच्या इन्ट्रानेटवरील इमेल्स इकडे का ट्रान्सफर केल्या असाव्यात? स्वतः लिहिलेल्या प्रत्येक इमेलची कॉपी ते स्वतःच्या रेडिफ अकाउंटला बीसीसी म्हणून देत होते. त्यामुळे लोहिया किंवा इतरांनी लिहिलेल्या ओरिजिनल इमेल्स जरी बाबांच्या इनबॉक्समध्ये नसल्या तरी एकावर एक, एकावर एक असा जर संवाद झाला असला तर त्या लोकांनी काय लिहीले होते तेही समजत होते.
दोन वर्षे सगळे सुरळीत चालू होते. प्रत्येकाचे पोर्टफोलिओज व्यवस्थितपणे स्वतंत्र होते.
गुप्ता हेलिक्सचे संपूर्ण ऑपरेशन अर्देशीर सरांकडे होते. पुण्यातील प्लॅन्टमधील कामगारांचे सर्व इश्यूज, प्रॉडक्शन टारगेट्स, रॉ मटेरिअल पोझिशन, एच आर, डिझाईन, टूल रूम, मेन्टेनन्स आणि फायनान्स! सगळे जण अर्देशीरांना रिपोर्ट करत होते. अर्देशीर तेव्हाही ई.डी.च होते.
लोहिया तेव्हाही मुंबईलाच होते आणि जॉईंट एम.डी.च होते. त्यांच्याकडे ऑल इन्डिया आणि एक्स्पोर्ट मार्केट होते. एक्स्पोर्ट नगण्यच होता. पण जो काही होता तो! सगळी सेल्स टारगेट्स लोहियांकडे होती. सध्याचा सेल, या आर्थिक वर्षाचे टारगेट, पुढील पाच वर्षांचे टारगेट, नवी अॅग्रीमेन्ट्स, कस्टमर अकाउंट मॅनेजमेन्ट, सगळे सगळे!
लोहियांसारख्या प्रचंड क्षमता असलेल्या माणसाकडे फक्त सेल्सचेच फन्क्शन असण्याचे कारण असे होते की गुप्ता हेलिक्स ज्या प्रॉडक्ट्समध्ये ऑपरेट करत होती त्यातील स्पर्धा भयानक होती. येथे एकेका कस्टमरला अक्षरशः जिंकावे लागायचे. साम आणि दाम पद्धतीने! कस्टमरला दंड किंवा भेद करणे शक्यच नव्हते. लोहियांचे शासनदरबारी अनेक मित्र होते. त्यामुए पॉवर प्लॅन्ट्स, कोलफिल्ड्स येथील ऑर्डर्स मिळणे शक्य झले होते.
हे दोघे मोहन गुप्तांच्या बरोबर गेले तीस वर्षे होते. जेव्हा गुप्तांनी एक साधे हॉबिंग युनिट टाकले तेव्हा अर्देशीर प्रॉडक्शनला जॉईन झाले होते आणि लोहिया सेल्सला! मात्र, याची नोंद इमेल्समध्ये नव्हती. हे मोनाला डॅडच्या बोलण्यातूनच माहीत झालेले होते. तिला माहीत होते की हे दोघे खूप जुने आणि जवळपास डॅडचे मित्रच असले तरीही बेसिकली ते एम्प्लॉयीच आहेत! मात्र, तिच्या वागण्यातून तिने त्या दोघाहीजणांना कायम आपल्या सख्या काकांप्रमाणेच आदर दिलेला होता.
तर मुद्दा असा की दोन वर्षे सगळे सुरळीत होते. मोहन गुप्ता त्यावेळेस चेअरमन व एम्.डी. होते आणि त्यांनी स्वतःकडे धोरणात्मक निर्णयांची जबाबदारी ठेवलेली होती. जसे, कोलॅबोरेशन्स, नवीन प्लॅन्ट कमिशन करणे, नवीन अॅप्लिकेशन्स, नवीन प्रॉडक्ट्स वगैरे! तसेच, काही प्रशासकीय भाग त्यांच्या अखत्यारीत होता. जसे, एखादा संप वगैरे होण्याची शक्यता असली तर गुप्ता स्वतः लक्ष घालत होते. गुप्ता हेलिक्स व त्यातील इतर आर्म्सचे संपूर्ण ऑर्गनायझेश स्ट्रक्चर गुप्तांच्या अंडर होते. लोहिया आणि अर्देशीर यांच्यासकट कुणाहीकडून कार्यकारी पदाचा राजीनामा मागण्याचे अधिकार गुप्तांना अर्थातच होते.
सर्व काही स्मूथ चाललेले असतानाच जतीनचे महत्व अचानक वाढवले होते गुप्तांनी! आजवर तो मुंबई ऑफीसला लोहियांच्या हाताखाली एक सिनियर मॅनेजर म्हणून सेल्स बघायचा! मात्र गुप्तांनी या दोघांना काहीतरी कारणे दाखवून जतीनला अचानक दक्षिण व पश्चिम भारताचा सेल्स बघायला सांगीतले होते. त्याची खूपच मोठी बढती झाली होती. या सर्व प्रक्रियेत, त्याच्या हाताखाली काम करणारे जे होते ते नाराज झाले होते. कारण जतीन डॉमिनेटिंग प्रवृत्तीचा माणूस होता. एका नायर नावाच्या माणसाची इमेल तर लोहियांनी सरळ डॅडनाच पाठवलेली होती.
'इफ धिस मॅन इज गोइन्ग टू हेड द फन्क्शन, आय अॅम नॉट इन्टरेस्टेड इन कन्टिन्युइंग अॅज ही डझन्ट नो ए बी सी डी ऑफ गिअरबॉक्सेस अॅन्ड जस्ट डॉमिनेट्स'
गुप्तांनी लोहियांना नायरलाच दम भरायला सांगीतले होते. नायरने सरळ रिझाईन करून टाकलेले होते.
इथपर्यंतचा घटनाक्रम लक्षात आल्यावर मोना जरा मागे रेलून बसली.
डॅड जर असे वागले असतील तर अवघड आहे. केवळ भाचा आहे म्हणून त्याला एक्झिस्टिन्ग बिझिनेसमध्ये एवढे वर नेणे कितपत योग्य आहे? प्रेम म्हणून आणि सपोर्ट म्हणून हवे तर त्याला दुसरे काहीतरी काढून द्या किंवा काढायला मदत करा. पण एकदम आधीच्या लोकांना दुखवून इतके वर कसे काय चढवले?
पुढे वाचायला लागली मोना! पुढील अनेक इमेल्समध्ये लोहियांनी सेल्समध्ये झालेल्या काही कमी अॅचिव्हमेन्ट्सचा संबंध अप्रत्यक्ष रीतीने जतीनच्या क्षमतेशी जोडलेला होता. तो न समजायला गुप्ताच काय, मोनाही खुळी नव्हती. सरळ आहे. लोहियांना जर हा माणूस आधीपासूनच खुपत असेल तर ते शक्य आहे तिथे त्याचे दोष दाखवणारच! कधी सिम्प्सनची प्राईसच कमी आहे तर कधी एन टी पी सी मधला बिझिनेस शेअर १०० % वरून ५० % वर आला. अशा इमेल्सवर गुप्तांनी लोहियांना 'तूही अशा महत्वाच्या बाबींमध्ये स्वतः लक्ष घाल आणि जतीन तुलाच रिपोर्ट करतो आहे की' अशा स्वरुपाची विधाने केलेली होती उत्तराच्या स्वरुपात! त्यावरून काहीसे गढूळ वातावरण असावे असे लक्षात येत होते.
अशा इमेल्स साधारण महिना दोन महिने चाललेल्या होत्या. या मेल्समधील कशाचीच कॉपी अर्देशीरांना नव्हती. त्यांच्या इमेल्स स्वतंत्र होत्या व नॉर्मल होत्या. त्याच्यात फक्त टारगेट व्हर्सेस अॅचिव्हमेन्ट आणि इतर काही महत्वाच्या बाबी असेच उल्लेख होते.
अचानक हितेशचे नाव पुढे आले होते. लोहियांचा एकमेव मुलगा, जो आजवर बडोद्यालाच होता आणि अहमदाबादमधून व यवस्थापनाची डिग्री घेऊन आता गुप्ता हेलिक्सला जॉईन व्हायच्या योजनेत होता. हितेशने नॉर्थ आणि ईस्ट मार्केट सांभाळावे असे प्रपोझल लोहियांनी गुप्तांना दिलेले होते. गुप्तांनी पंधरा एक दिवस त्याबाबतच्या उत्तराची टाळाटाळ करून शेवटी कशीबशी मान्यता दिली होती.
हा हितेश पुर्वी मोनाला भेटलेला होता काही वेळा! तो खरे तर तिच्यापेक्षा लहान होता दोन वर्षांनी! त्याने येऊन एकदम हेड होण्याआधी त्याने काही काळ ट्रेनिंग वगैरे घ्यावे असा सल्ला डॅडनी दिलेला होता. मात्र लोहियांनी असे सुचवले होते की त्यांचाच मुलगा आहे म्हंअल्यावर ते त्याला सर्वत्र सल्ला देत राहतीलच! शेवटी उगाचच नाराजी नको म्हणून डॅडनी ते मान्य केलं होतं!
हितेश मुंबई ऑफीसला जॉईन झाल्याचेही मोनाच्या कानावर आले होते. पण त्यावेळेस तिचे सगळे लक्ष मैत्रिणी आणि इतर बाबींमध्ये असल्यामुळे तिला त्या गोष्टीशी काहीही घेणेदेणे नव्हते.
हितेश आणि जतीन दोघेही एकाच लेव्हलला असणे हा मुळातच एक विनोदी प्रकार होता कर्मचार्यांच्या मते! कारण त्यांच्यामते मुळात जतीनलाच काही समजत नव्हते. त्यात हितेश तर अगदीच नवखा! हळूहळू कर्मचारीच या दोघांना सल्ले देऊ लागले. अशी प्राईस कोट करा, अशी फिचर्स ऑफर करा वगैरे! जतीन आणि हितेश म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबाच्या नेमके उलटे झाले. नसून अडचण, कारण सह्या करायला तेच पाहिजेत आणि असून खोळंबा कारण कळत काहीच नाही.
परिणामतः, व्हायचे तेच झाले. गुप्तांनी झापल्यामुळे लोहियांना पुन्हा मार्केटिंगमध्ये जातीने लक्ष घालावे लागले. आता ते स्वतःच्या बरोबर हितेशला घेऊन जायचे. जतीन मात्र मुंबईतच राहायचा. हेही डॅडच्या लक्षात आले असावे कारण एका इमेलमध्ये ते म्हणाले होते की 'ट्रेन जतीन ऑल्सो'!
नेमका त्याचवेळेस पुण्याला नाना सावंतने संप पुकारला आणि गुप्ता हेलिक्स थंडच पडले. एक तर बंद असण्यामुळे झालेला लॉस आणि संपामुळे बदललेली इमेज या दोन्ही आघाड्यांवर लढताना अर्थातच डॅडचे अर्देशीरांशी जोरदार वाद झाले. डॅडचे म्हणणे होते की कामगारांच्या मनात कंपनीबद्दल जी प्रेमाची, आपुलकीची भावना होती ती नाना सावंतकडे वळण्यास अर्देशीर यांचे अपयशी संवादकौशल्य कारणीभूत आहे. डॅड आता जातीने शॉप फ्लोअरवर जाऊ लागले. प्रॉडक्शन हा उद्योगाचा आत्मा आहे हे त्यांना माहीत होते. बनवलेच नाही तर विकणार काय अन कमवणार काय? आजवर असे होत होते की विकलेच जाणार नसेल तर बनवायचे काय? पण एका संपाने दाखवून दिले की इक्वेशन नेमके उलटे असते.
कशाबशा मागण्या पुर्या करून पंचवीस दिवसात कंपनी चालू तर झाली, पण या सर्व प्रोसेसमध्ये अर्देशीर आणि लोहिया जे प्रॉडक्शन व सेल्सला असल्यामुळे आजवर एकमेकांचे बर्यापैकी शत्रू होते ते कट्टर मित्र झाले. आजवर प्रत्येक मीटिंगमध्ये लोहिया 'पेमेंट थकणे, बिझिनेश शेअर न वाढणे, ऑर्डर हातातून जाणे' अशा सर्व बाबींसाठी अर्देशीरांकडे बोट दाखवायचे. मग गुप्ता अर्देशीरांना बोलायचे. अर्देशीर नेमके 'सेल्स प्रोसेसमध्ये कशा अडचणी आल्या, ऑर्डरबाबत कसे उशीरा समजले' वगैरे बाबी एकदम पद्धतशीर पेश करायचे. त्यामुळे गुप्तांना दोघांनाही बोलायला लागायचे.
पण अर्देशीर आणि गुप्तांचे हे वाद मोठे वाद ठरले. फिरोज मॉड्युल हा अर्देशीरांच्या आयुष्यातील काळाकुट्ट एपिसोड लोहियांच्या मध्यस्थीमुळे विसरून गुप्तांनी त्यांना जवळ ठेवले होते. पण संपाचे खापर अर्देशीरांच्या डोक्यावर फुटल्यावर ते बिथरले.
अर्देशीर आणि लोहिया मित्र झाल्याचे सिद्ध करणारी एकही इमेल नसली तरीही अप्रत्यक्षरीत्या तसे जाणवून देणार्या अनेक इमेल्स होत्या. जसे, एखादी ऑर्डर गेली तर गुप्तांनी जर लोहियांना क्वेश्चनिंग केले तर लोहिया आता अर्देशीर यांचे नाव घेत नव्हते. अर्देशीरही लोहियांचे नाव घेत नव्हते. उलट, अनेक इमेल्समध्ये आता डॅडना फक्त सीसी होती आणि सेल्स एक्झिक्युशन प्रोसेस आता पूर्णपणे लोहिया आणि अर्देशीर स्वतंत्ररीत्या पाहू लागल्याचे पुरावे असणार्या इमेल्स होत्या. अशा इमेल्सवर जर गुप्तांनी काही कॉमेन्ट केली तर त्यावर दोघेही काहीही लिहीत नव्हते. हो नाही आणि नाही नाही!
एक इमेल मात्र फारच भयानक होती. त्यात डॅडनी ऑर्गनायझेशन रिस्ट्रक्चरिंग करताना अर्देशीर यांना होलटाईम ई.डी. या पदाऐवजी नुसतेच ई.डी. मेन्शन केले होते व लिहीले होते की वयानुसार कदाचित अर्देशीर रोज येऊ शकणार नाहीत. कंपनीतील इतरांना याच्याशी काहिच देणेघेणे नसले तरी काही जुन्यांना 'संपानंतर दोन महिन्यातच हा प्रकार होणे' याचा आतला अर्थ समजत होता. अर्देशीर यांनी एक रागीट इमेल करून स्वतःच्या भावना मांडलेल्या होत्या.
Dear Mohan,
It is surprising that such an important change was informed to me just through an e-mail, like any other employee of Gupta Helix.
I would rather like to be a silent observer of the operations than being treated as a part time director, when I have spent my entire professional life only for Gupta Helix.
I would also like mention, whether you like it or not, that your way of handling the things is pathetic! The strike is not my failure, it has happened because of the rigid policies that we have & also because of the stringent working conditions, the employees have.
Sorry, but I can't continue like this.
Ardesheer Engineer
पॅथेटिक! काय शब्द वापरला सरांनी डॅडबद्दल!
मोनाला ती मेल फारच धक्कादायक वाटली.
तिने फटाफट पुढच्या इमेल्स वाचल्या.
याही वेळेस लोहियांनीच प्रचंड मध्यस्थी केली. अर्देशीर शेवटी आठवड्यातून तीन वेळा यायला तयार झाले. त्यांचे फावलेच! काम कमी, मानधन तितकेच आणि उत्तरे द्यायची जबाबदारी घटणे! कारण...
..... त्याच वेळेस डॅडनी सुबोध या आपल्या पुतण्याला जी. एम. वर्क्स या पदावर थेट नमून घेतले.
हा आणखीन एक धक्का होता. अर्देशीर यांच्या केवळ मार्गदर्शनावर विसंबून सुबोध काय चमत्कार करणार होता कोण जाणे!
मोनाच्या दृष्टीने डॅडनी तीन चुका केलेल्या होत्या! एक म्हणजे जतीनला नेमणे, दुसरे म्हणजे अर्देशीर यांची जबाबदारी परस्पर बदलणे आणि तिसरे म्हणजे सुबोधला इकडे आणून सगळ्यांच्या डोक्यावर बसवणे!
आणि केवळ पंधरा दिवसात सुबोध मुंबईला निघून गेला होता. गुप्ता कन्स्ट्रक्शन या नवीन आर्मचा तो हेड झाला होता. आता हेलिक्सशी त्याचा संबंधच संपला होता.
ही स्टेप नेमकी का घेतली गेली याचा काहीही उल्लेख इमेल्समध्ये नव्हता. त्यामुळे प्रचंड बुचकळ्यात पडली होती मोना!
आणि पुढच्याच काही इमेल्समध्ये असे लक्षात आले की...
... सुबोधच्या शिवराळ भाषेमुळे आणि सौजन्याच्या पूर्ण अभाव असलेल्या वागणूकीमुळे कामगार परत बिथरले आहेत असे नाना सावंतने सांगीतले होते.
आता कोण??
....डॅडनी जतीनला इथे आणले. छानछोकीच्या आयुष्याची सवय झालेल्या जतीनला हे ऑईलचा वास येणारे आयुष्य नकोसे वाटणे साहजिक असणार होते. पण तो यायला रिलक्टंट होता असा उल्लेख कुठेही नव्हता.
पण! गुप्ता हेलिक्स ही कंपनी एकंदरच भानगडींनी पोखरली गेल्यासारखी वाटत होती मोनाला! कारण आल्याच्या तिसाव्या दिवशी जतीन पुन्हा पहिल्याच पोस्टवर जॉईन झाला. हितेशला लोहियांनी एक युनिट उघडून दिले होते. मुंबईमध्येच! जयंकर इंजीनीयर्स! त्यातही छोटे ऑटो गिअर्स बनवत होते. आता हितेश हा फॅक्टरच संपला होता.
पण! .. गुप्तांच्या आणि लोहिया - अर्देशीर जोडीच्या इमेल्स आता खूपच कमी झाल्या होत्या. गुप्तांना आता बर्याच प्रमाणात फक्त कॉपीजच येऊ लागल्या होत्या. कंपनी सुरळीत चालू होती.
आश्चर्याचा मोठाच धक्का म्हणजे आता जतीन, सुबोध, अर्देशीर आणि लोहिया हे चौघेही एक झाल्यासारख्या काही इमेल्स येत होत्या. कोअर बिझिनेसशी सुबोधचा संबंध नसला तरीही त्याला कॉपीज होत्या. आज इथली ऑर्डर मिळाली, उद्या तिथली गेली, इन्व्हेन्टरी कॉस्ट तेवीस टक्के वाढली आहे, उद्या आय एस ओ चे ऑडीट आहे वगैरे वगैरे! एकदा गुप्तांनी लिहीलेही! यू कॅन अॅव्हॉईड मार्किन्ग कॉपी टू सुबोध! आणि याची कॉपीही सुबोधला दिली त्यांनी! पण ते चालूच राहिले. हे चालू कसे काय राहिले याचा उल्लेख असणारी कोणतीही इमेल नव्हती त्यात!
मोनाला आठवले! त्या इमेल्स ज्या कालावधीतल्या होत्या त्याच कालावधीत डॅड किंचित त्रस्त दिसायचे! सायरावरही चिडायचे. परागवरही चिडायचे. एकदा तर परागला घालवलाही होता. पुन्हा घेतला होता. ते प्रकरण काय झाले त्यात मोना अजिबात पडली नव्हती. कारण तेव्व्हा तिच्याकडे तिची स्वतःची अशी एक एस्टीम होती आणि ती ती स्वतःच चालवायची! पण डॅड त्या कालावधीपासूनच शनिवारी आपल्याबरोबर जेवताना किंचित त्रस्त दिसायचे आणि बोलता बोलता बोलून जायचे! आय जस्ट वॉन्ट टू क्विट मोनू!
त्यानंतरच्या इमेल्समध्ये जर्मन मशीनचे सुतोवाच केले अर्देशीर यांनी! पहिल्याच इमेलला उत्तर देताना डॅडनी लिहीले की आपण सर्व प्रकारच्या मशीन्सचा सर्व्हे केला पाहिजे. जतीन मुंबईला निघून गेल्यनंतर मेहरांची नियुक्ती झालेली होती आणि आता तेच हेड होते. मात्र त्यांचे रिपोर्टिंग अर्देशीर यांना नसून लोहिया यांना होते कारण दरम्यानच्या काळात अर्देशीर यांनी स्वतःच कार्यकारी पोस्ट नाकारली होती. त्यामुळे संपूर्ण गुप्ता हेलिक्सची ऑपरेशन्स लोहियांकडे गेली होती.
जर्मन मशीन्सबाबत झालेल्या रणधुमाळीत बिंद्रा, लोहिया आणि अर्देशीर यांच्या प्रत्येकी दोन दोन ट्रीप्स जर्मनीला झाल्या होत्या. सर्व्हे रिपोर्ट्स वाचून डॅड अजूनही 'ही मशीन्स किफायतशीर तर ठरणारच नाहीत, पण कदाचित निरुपयोगीही ठरतील' असे निक्षून सांगत होते.
एका कंपनीचा चेअरमन असे सांगत असताना ही मशीन्स घेतलीच कशी गेली हे मोनाला समजत नव्हते.
तेही समजले!
पुढील काही इमेल्समध्ये फारुख ऑटो, जयंकर ऑटो अशा काही कंपन्यांकडून रायटिंगमध्ये ऑर्डर प्रोजेक्शन्स आली. येथे मेहरांनी कडकडून विरोध केल्याचे दिसत होते. पण डॅड फक्त नंबर्स बघत होते. केवळ संभाव्य ऑर्डर्सवर हवाला ठेवून डॅडनी क्लीअरन्स दिल्याची एक स्पष्ट इमेल होती. ती वाचूनच मोनाला जाणवले. आपले डॅड कमी पडत होते. त्यांचा संपूर्ण विश्वास केवळ अर्देशीर आणि लोहियांवर होता. आज ही मशीन्स निरुपयोगी ठरत आहेत. ती तशी ठरतील हे त्यांना माहीत असूनही केवळ दोन सुमार कंपन्यांच्या व्हॉल्युम्सवर विसंबून डॅडनी तयारी दाखवली.
मोनालिसा गुप्ता! रात्रीचे बारा वाजलेले असताना अत्यंत निराश झालेली होती. आपले डॅड? आपले डॅड असे? केवळ दोन कंपन्यांच्या खात्रीपत्रावर विसंबून एवढा मोठा निर्णय? आधी विरोध करून नंतर मान्यता? का ते शरण जात होते या दोघांना? का? का? कशासाठी?? असे काय होते की डॅडना या दोघांचे ऐकावे लागत होते??
मोनाने पुढच्या इमेल्स वाचायला घेतल्या. आपल्याला फाईलमध्ये मिळालेले पिवळ्या कागदांचे सहा तुकडे म्हणजे डॅडच्या सहा इमेल्स होत्या हे तिला समजले. या इमेल बॉक्समध्येही बरोब्बर सहाच इमेल्स अशा होत्या ज्यात मोहन गुप्तांनी ती मशीन्स घ्यायला विरोध केलेला होता. पण! नंतरच्या इमेल्समध्ये त्यांनी तयारी दाखवली होती.
हा विषय चालू असतानाच अचानक तोही विषय चालू झालेला दिसत होता! आय सी गिअर्स! सिंगापोर! इरफान अब्दुल्लाह भेटला डॅडना!
केवढा करस्पॉन्डन्स झाला दोघांच्यात! जो दाखवायला आज इरफान नकार देत होता तो सर्व करस्पॉन्डन्स या इमेल्समध्ये होता.
क्राऊन पिनिअन प्रकारचे गिअर्स बनवायला आय सी गिअर्सला भारतात एक मॅन्युफॅक्चरिंग बेस हवा होता. कारणे स्पष्ट होती. मॅनपॉवर स्वस्त, कॉस्ट कमी, दर्जा चांगला! दर्जाबाबत खूप इमेल्स होत्या. चाकणच्या आसपासची एक जागा बघितल्याच्याही इमेल्स होत्या. इरफान आणि डॅड किमान पाच वेळा भेटलेले असावेत असे दिसत होते. दोन वेळा तर डॅडही सिंगापोरला जाऊन आलेले दिसत होते.
आणि यातील कोणत्याही इमेलची कॉपी अर्देशीर किंवा लोहियांना नव्हती. फक्त स्वतःच्या रेडिफ अकाउंटला मात्र डॅडनी कॉपी मेन्शन केली होती.
आणि एक शेवटची इमेल! डॅडनी इरफानला लिहीलेली! त्याच्या कोणत्यातरी इमेलवर!
Irafan,
trust is the most important thing in business. And you have lost it. So, we can't go ahead with this project.
Mohan Guptaa
Chairman & Managing Director
Gupta Helix
India
इतकी थेट इमेल? इतकी सरळसोट? काय झाले काय?
मोनाला आठवले. कुठूनतरी डॅडना तो फोटो मिळालेला होता. ज्यात अर्देशीर, लोहिया आणि इरफान एकमेकांशी हसून गप्पा मारत कॉफी पीत होते.
अर्थातच, या इमेल्सशिवाय आणखीन काहीतरी असे होते, जे आपल्याला माहीतच नाही आहे. डॅडना ते कसे समजले? कुणाला हायर केले असेल त्यांनी? आपल्याला एकही नांव कसे आठवू शकत नाही.
पण... याचा अर्थ एकच! इरफान हा अर्देशीर आणि लोहियांनी प्लॉट केलेला माणूस आहे. त्याच्याबरोबर कोणतेही प्रोजेक्ट न करणेच आपल्या हिताचे आहे.
या सगळ्या इमेल्समध्ये मेहरांच्या नावाने एकही इमेल कशी नाही? त्यांना जर डॅडनी हस्ताक्षरात लिहीले की जपानला जा, तर इमेल का नसेल लिहीली?
मोनाने झोपेला झोपवून स्वतः जागे राहून एक जॅक डॅनियल आणखीन भरून घेतला. आता खुर्चीवर बसून ती निरुद्देशपणे त्याच त्याच इमेल्स वाचत बसली होती.
गॅप! प्रत्येक बाबतीक एक मोठी गॅप होती.
सुसूत्रपणे सगळे जोडणे सहज शक्य होते. पण मध्ये काय आहे ते समजल्याशिवाय मुळीच नाही. खालील ठळक टप्पे जाणवत होते. पण गॅप्स नव्हत्या जाणवत!
गुप्ता हेलिक्स आपल्या डॅडनी स्वतःच्या रक्तातून उभी केलेली अन वाढवलेली कंपनी आहे.
अर्देशीर आणि लोहिया हे आपले कर्मचारी होते व आहेत.
अर्देशीर यांनी १९८७ साली मोठा विश्वासघात केला. लोहियांच्या मध्यस्थीने पुन्हा सगळे 'ओके' झाले.
जतीनचा प्रवेश लोहियांना आवडण्यासारखा नव्हता.
हितेशचा प्रवेश डॅडना आवडलेला नव्हता.
नाना सावंतने उभारलेला संप अर्देशीर यांच्या अकार्यक्षमतेमुळे झाला असे डॅडना नक्की वाटत होते.
अर्देशीर यांना काहीही न सांगता डॅडनी त्यांचे 'होलटाईम' वाले पद काढले.
पुन्हा लोहियांनीच मध्यस्थी केली.
या दरम्यान सुबोध अचानक पुण्याला आला आणि हेड झाला.
ते न आवडल्यामुळे पुन्हा संप व्हायची चिन्हे दिसू लागली.
त्यामुळे सुबोधला कन्स्ट्रक्शनला टाकला आणि जतीन सेल्स सोडून इकडे आला.
तो महिन्यातच पुन्हा मुंबईला गेला.
तो जाताच हितेशने जयंकर गिअर्स चालू केली.
तो जाताच मेहरा पुण्याला जॉईन झाले.
अचानक जतीन, सुबोध, लोहिया आणि अर्देशीर मित्र झाले.
यात मेहरा नव्हते.
सुबोधला संबंध नसला तरीही इमेल्सच्या कॉपीज जात होत्या.
कडकडून विरोध करूनही डॅडना मशीन्स मागवावीच लागली.
इरफानशी खूप पत्रव्यवहार झाल्यावर तो खोटारडा आहे हे त्यांना समजले.
त्यानंतर महिन्याभरातच डॅड वारले.
या सर्वात असलेल्या गॅप्स, ज्या मोनाला जाणवल्या, त्या अशा...!
सुबोध, जतीन, लोहिया आणि अर्देशीर एक कशामुळे झाले?
डॅडच्या मनात नसूनही जर्मन मशीन्स कशी काय आली?
इरफानला प्लॉट करून अर्देशीर आणि लोहियांना नेमके काय करायचे होते??
हे समजत नसले तरीही दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी मोनाला समजत होत्याच!
हे चौघेही डॅडचे वेल विशर्स नक्कीच नव्हते.... आणि...
... ती आता त्या चौघांच्या दृष्टीने... सर्वात मोठी शत्रू होती...
भर ए.सी.च्या थंड हवेत घाम फुटला मोनाला!
कुठे आहोत आपण? काय करतोय? आपल्याला सगळं इतकं सोपं कसं वाटतं? आपल्याला जग इतके चांगले, सरळ का वाटते? या सगळ्यांना काय हवे असेल? करोडोंची इस्टेट? मग ती अशीच का हवी असेल? कमवायची धडाडी आणि अक्कल नाही म्हणून??
आपण का पडलो याच्यात? समजा आता बाहेर पडलो तर काय होईल? आपण एकटे आहोत का? कुणीही आपल्याबाबत सदिच्छा बाळगून नाही आहे का? मेहरांची पहुंच किती आहे?
क्लिक करता करता वेगवेगळ्या फोल्डर्सवर जात होती मोना!
आणि... ती गोष्ट घडली...
..... सिवा....
या नावाचा एक वेगळाच फोल्डर डॅडनी तयार केला होता...
सिवा?? सिवा काय सिवा??
मोनाने तो फोल्डर उघडला.
बापरे... हे... हे काय हे?? ..
मोनाने आधी दोन चार इमेल्स पाहिल्या... लक्षात आले... हा काय प्रकार आहे ते...
मन फ्रेश होणे आवश्यक होते... आता खूप काही कळणार होते... तिने बाथ घ्यायचे ठरवले..
... टबमधील अत्यंत उबदार पाण्यात... एक पूर्ण बाथ जेल उपडी करून... शेजारी ब्ल्यू रिबॅन्ड्चा एक फ्रेश पेग लिंबू पिळून घेऊन...
.... गुप्ता हेलिक्सची उद्याची सम्राज्ञी.... मनसोक्त बाथ घेता घेता गुणगुणत होती...
पुन्हा कंप्यूटरवर बसून बरेच काही खणून काढायचे होते...
... तब्बल पाऊण तासाने मोना पुन्हा पी.सी.वर बसली....
मोहन गुप्ता... डॅड मूर्ख नव्हते... ही वॉज द मोस्ट ब्रिलियंट मॅन शी हॅड एव्हर मेट... हर डॅड...
सिवा! अंधेरीला असलेल्या एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हचे नाव होते ते! सिवा सिक्युरिटीज या नावाने असलेले त्याचे ऑफीस अत्यंत बेसुमार पैसे मिळाल्यास डिटेक्टिव्हची कामेही करत होते. आणि ती कामे तो स्वतःच करायचा! त्यचे नांव होते शिवशंकर! पण तो स्वतःला आणि ... इतरही सगळे त्याला सिवाच म्हणायचे...
सिवा! इमेल्सवरही सुरक्षा पाळत होता. आणि डॅडही!
त्यांनी माणसांना नंबर्स दिले होते.
आज एक आणि चार भेटले. काल दोन आणि अकरा कॉफी पीत होते.
असल्या माहितीतून खरे तर काही विशेष वाटण्यासारखे निघतच नव्हते.
पण...
... तीन आणि चौदा दोघेही पिंजोरला एकाच शाळेत आणि कॉलेजला होते... यावरून समजले... जतीन म्हणजे तीन आणि चौदा म्हणजे सायरा...
एक आणि दोन यापैकी लोहिया आणि अर्देशीर कोणते ते लक्षात येत नव्हते.
पण चार आणि सोळा काल मालाडच्या राज इन मध्ये रात्रभर राहिलेले होते... म्हणजे सुबोध आणि शर्वरी..
एक, दोन आणि सोळा यांचा फोटो इन पर्सन पाठवला आहे..... हा फोटो कुठला ते मोनाच्या लक्षात आले...
सात आज पाच नंबरच्या मागे फिरत होता... पाच नंबर जीममधून बाहेर पडला आणि पार्लरमध्ये गेला..
सण्ण! शॉकच बसला मोनाला.. म्हणजे.. पाच नंबर... आपण तर नाही??? आणि.. मग सात नंबर म्हणजे कोण...
पुढे कुठेतरी लिहीले होते... सात नंबरने आज दोन नंबरला मालाडला सोडले...
पराग... पराग असणार सात नंबर...
पण.. या सगळ्या माहितीचा नेमका उपयोग काय? याने त्याला कॉफी पाजली अन त्याने त्याला चहा पाजला म्हणून काय झाले??
उपयोग समजला... काही आधीच्या इमेल्स वाचल्यावरच समजला...
डॅडची इमेल होती ती...
मशीन्स आर गोईंङ टू बी युझफुल व्हेन महिन्द्रा ब्रिन्ग्ज द न्यू व्हेइकल..... हेन्स आय अॅम गिव्हिन्ग क्लीअरन्स... डोन्ट वरी...
म्हणजे... सिवा.. सिवाला आपल्या बिझिनेसमधले सगळे काही अंतर्बाह्य माहीत होते??
आणि... ओह डॅड.. यू वेअर सिंपली ग्रेट... तुम्हाला आधीच माहीत होते महिन्द्राबाबत... जे.. मेहरांना फक्त काही दिवसांपुर्वी समजले ते... आणि.. बहुतेक.. अर्देशीरांनाही काही दिवसांपुर्वीच समजले...
आणखीन एका इमेलमध्ये म्हंटलेले होते... ती इमेल सिवाची होती...
.... फारुख बिलॉन्ग्ज टू दोन नंबर... जडेजा इज... रिलेटिव्ह ऑफ एक नंबर...
.... यूअर पेमेंट इज सेन्ट इन पर्सन.. इट्'स अ चेक...
..... थॅन्क्स... बट.. देअर इज अ ... रिअल बॅड न्यूज... दे आर... प्रॉबेबली... ट्रायिन्ग टू... किल यू...
शहारे! भीती... प्रेतासारखी अवस्था... मोनालिसा अक्षरश: मृतवत चेहर्याने त्या इमेलकडे आहात होती...
त्या इमेलनंतरही काही इमेल्स होत्या.... पण त्यात डॅडनी ती शक्यता स्वतःच फेटाळून लावली होती...
... इट वॉज अ .. हॉरिबल शॉक.. तो... तो नैसर्गीक वाटलेला मृत्यू... तो.. खून तर नव्हता???
... डिड दे रिअली किल डॅड???
अख्या बंगल्यात एकट्या असलेल्या मोनाला आता प्रचंड भीती वाटू लागली. स्वत:च्या श्वासांचा आवाजही घाबरवू लागला तिला...
.... व्हेअर आय अॅम?? व्हॉट द हेल अॅम आय डूईंग?? अॅम आय.... अॅम आय अल्सो टू बी किल्ड???
....
काय वाटले तिला काय माहीत? प्रचंड भीती! रडावेसेही वाटत नव्हते. असे वाटत होते की ... आपल्याला आत्ताही मारतील... कदाचित... कदाचित... डॅड.. या बंगल्यात अजून... ओह माय गॉड...
.... आय... आय कान्ट..... धिस इज... धिस इज... हॉरिबल...
... शामाSSSSSSSSS
खिडकीत येऊन पहाटे अडीच वाजता मोनालिसाने कर्कश्श किंकाळी मारली...
... दोन सर्व्हंट फॅमिलीजपैकी दोन्ही जाग्या झाल्या... आठच्या आठजण बाहेर आले दचकून...
"शामा.... तू इथे ये.... ताबडतोब..."
काय झाले आहे ते काहीही न कळल्यामुळे शामा नावाची एक पन्नास वर्षाची बाई लगबगीने बंगल्याच्या आत आली...
.... आणि नंतर बराच वेळ ती झोपलेल्या मोनालिसाच्या कपाळावर थोपटत बसली होती... सूर्यकिरणांपैकी पहिल्याने जेव्हा शामाच्या पापणीला स्पर्श केला.. तेव्हा गाढ झोपलेल्या मोनामॅडमना पाहून मग शामा तिथेच खाली कारपेटवर लवंडली...
सकाळी दहा वाजता उठलेल्या मोनालिसाने बंगल्यावरील प्रत्येक नोकराला सांगीतले...
"कोणताही फोन आला तरी मला आज बरे वाटत नाही आहे असेच सांगायचे..."
शामाला ती एक क्षणही स्वतःपासून दूर जाऊ देत नव्हती...
आणि मग तिने... पुन्हा मेल बॉक्स उघडली.... सकाळी अकरा वाजता...
.... आणि... मोहन गुप्तांच्याच नावाने एक मेल कंपोज केली....
'टू' कॉलममध्ये अर्थातच... सिवा होता....
तिने विशेष काहीच लिहीले नाही.... फक्त...
"हाय...."
केवळ पाचव्या मिनिटाला उत्तर आले...
"सो.... हाऊ डू यू फील आफ्टर डेथ नंबर झिरो???"
जागच्याजागी फुटून विखुरले जावे तशी झाली मोना...
... केवळ शामा आसपास होती या एकाच जाणीवेने कसाबसा धीर एकवटून तिने पुन्हा उत्तर लिहीले....
"डिड दे किल माय डॅड....???"
या मेलचे उत्तर मात्र अर्ध्याच मिनिटात आले...
"यू फूल... डिलीट युअर इमेल.. अॅन्ड डोन्ट राईट एनीथिन्ग लाईक धिस... यू आर नंबर फाईव्ह??"
"येस.."
"प्रूव्ह..."
"हाऊ???"
"नंबर झिरो हॅड टोल्ड मी... दॅट ओन्ली यू कॅन अॅन्सर वन क्वेश्चन..."
"व्हॉट क्वेश्चन???"
"व्हेअर वॉज लोलिता बरीड???"
आणखीन एक शहारा आला मोनाच्या अंगावर!
लोलिता! मोना खूप खूप लहान असताना एक पॉमेरियन कुत्री पाळलेली होती डॅडनी!
ती मेली. मोनाने रडून धिंगाणा घातला होता. मोहन गुप्तांनी त्या कुत्रीचे प्रेत पुरायची जागा निश्चीत केली...
... मात्र... मोनाने ती जागा बदलली... आणि चक्क एका कारमधून ते प्रेत पाचगणीला नेण्यात आलं... ही घटना इतकी क्षुल्लक होती की त्याची कुणी दखलही घेतली नसेल....
.. त्या कुत्रीला मोनाच्या शाळेच्या समोरच्या रस्त्याच्या पलीकडे असलेल्या एका खूप मोठ्या मोकळ्या जागेत पुरण्यात आलं... मोना रोज एकदा तिथे जाऊन नुसतीच बघून यायची... बघायला की तिथे काही झालेले तर नाही ना?? वर्षभराने ती सवय मोडली तिची... सुट्टीनंतर...
"सेन्ट डॅनियल स्कूल..."
"राईट... नाऊ.. वुई शूड फर्स्ट मीट... देन ओन्ली वुई कॅन सेन्ड मेल्स टू इच अदर... आय न्यू.. यू वुड वन्स फाईन्ड आऊट ऑल दिज इमेल्स ऑफ नंबर झिरो.. दॅट्स व्हाय आय अॅन्सर्ड.. एल्स.. आय वूड नॉट हॅव इव्हन अॅन्सर्ड युवर मेल.. अॅज अ बिझिनेस सिक्युरिटी... गुड डे... धिस वेनस्डे.. अॅट... सेम प्लेस... सेन्ट डॅनियल्स... पांचगनी..."
"... ओके... टाईम???"
"फाईव्ह थर्टी पी.एम... आय्'ल कम फ्रॉम मुंबई..."
"राईट..."
"नाऊ डिलीट ऑल दिज मेल्स अॅन्ड चेन्ज द पासवर्ड..."
"शुअर...सिवा..."
"अॅन्ड टिल आय गिव्ह क्लीअरन्स... नो बिझिनेस डिनर्स.. ऑर ब्रेकफास्ट मीटिंग्ज.. ओके??"
"........ शुअर..... शुअर..."
मूर्तीमंत भीती बनलेल्या मोनाने तिच्या अन सिवाच्या सगळ्या मेल्स डिलीट करायला सुरुवात केली तेव्हा मागून शामा सांगत होती...
"मॅडम... जतीन साहेबांचा फोन आहे..."
मोनाने फोन घेतला...
"हे मोनी.. हवार यू... समवन सेड यू आर नॉट वेल?? टेक केअर.. इन फॅक्ट... टूमोरो वुई हॅव अ डिनर ऑर्गनाईझ्ड फॉर ऑल द सिनियर मेंबर्स ऑफ द मॅनेजमेन्ट अॅट मुंबई... मेक शुअर यू अटेन्ड इट...अॅन्ड.. इट इज नॉट अॅट एनी हॉटेल.. इट इज अॅट सुबोध्'स प्लेस... अॅट सेव्हन पी.एम्....राईट...??"
"... राईट... शुअर... आय्'ल बी देअर...."
सिवाचा सल्ला डावलताना.. मोना खूप खूप वेगळाच विचार करत होती...
======================================================
घाईघाईत 'चेअरमन' या शब्दाचे स्पेलिंग बदलले होते, ते आता दुरुस्त करत आहे. 'संत्या' यांनी ते आवर्जुन सांगीतल्याबद्दल त्यांचे मन;पुर्वक आभार!
-'बेफिकीर'!
हे..... मस्त... सावरी
हे.....
मस्त...
सावरी
धन्यवाद..... सावरी
धन्यवाद.....
सावरी
Yyyyyyyeeeeeeeeeeeeeeee...
Yyyyyyyeeeeeeeeeeeeeeee... aaj me pahili
shiiiiiiiiiiiiiii... login
shiiiiiiiiiiiiiii... login kareparyantch wel gele watata
आज मी पहिली.
आज मी पहिली.
जबरी....
जबरी....
मस्त. अतिशय गुंगवून ठेवलंय
मस्त. अतिशय गुंगवून ठेवलंय बेफिकीर तुम्ही. लिहिण्याचा आवाका 'प्रचंड' आहे तुमचा. पुढचा भाग केव्हा वाचतोय असं झालंय.
भन्नाट
भन्नाट
Very Very interesting
Very Very interesting बेफिकिरजी,
पु. ले. शु.
मस्त......मति गुनगा झाली
मस्त......मति गुनगा झाली
खुपच छान.......
खुपच छान.......
काय लिहिता तुम्हि खुपच
काय लिहिता तुम्हि खुपच रोमांचकारि मस्तच पुलेशु
माझ्या आवडत्या ५ लेखकात
माझ्या आवडत्या ५ लेखकात तुम्हि आज आहात
पु.ल. देशपांडे
वि.स. खांडेकर
बेफिकिर्
मंगला गोड्बोले
व.पु.काळे
(No subject)
बेफिकीरजी...काय लिहू आता शब्द
बेफिकीरजी...काय लिहू आता शब्द नाहीत....
केवळ सॉलीड....इतका गुंगुन गेलोय या कथेत....एक संपूर्ण अनोखे विश्व आमच्या डोळ्यासमोर उभे करत आहात..तुमच्या लेखणीला सलाम...
बेफिकीर जी, छान...... पुढचा
बेफिकीर जी,
छान......
पुढचा भाग कधी वाचतेय असं झालंय.
छान ..
छान ..
बेफिकिरजी, काय बोलावे राव....
बेफिकिरजी, काय बोलावे राव.... खरच शब्द नाहित, किति तो वेग, सुटलायत तुम्हि.
मोना.... काय होईल तिच, रादर काय करणार नुम्हि तिच, ह्याचि खुप वाईट(वाईट म्हणजे पुणेरी वाईट) ऊस्तुकता लागलि आहे.
कादंबरि खुप छान वळणा वळणा ने चाललि आहे, अजुन एकदा एका वेगळ्या विश्वाचि ओळख करुण देताय ह्या बद्द्ल ध्न्यवाद.
खुब जियो दोस्त, तुम्हे, तुम्हारी लिखावट को किसि कि नजर ना लगे.:)
भाउ, प्रतिसाद टकायला विसरलो
भाउ, प्रतिसाद टकायला विसरलो म्हणून रागावू नका... पण ही कदम्बरी मागच्या पेक्शा फारच छान आहे.
हल्ली अर्देशीर , लोहीया ,
हल्ली अर्देशीर , लोहीया , मोना, ही पात्रे मनातुन जातच नाहीत, आमची ही परीस्थिती तर लेखकाचे काय होत असेल????
Keep it up.
बेफिकीरजी, खुप छान. मोनाच्या
बेफिकीरजी,
खुप छान. मोनाच्या व्यक्तिरेखेचे कंगोरे छान फुलविले आहेत.
माणुस हा समाजप्रिय माणुस आहे. एक आपण चहा घ्यायचा म्हटले तर त्यात आसामच्या मळेवाल्यापसुन, जोगिश्वरिच्या गोठेवाल्यापसुन, देशावरच्या साखरवाल्यापासुन, ट्रक आणि रस्ताबांधणी कामगार या सर्वांवर अवलंबुन असतो. स्त्री पुरुषांवर तेव्हढीच अवलंबुन आहे जेव्हडा पुरुष स्त्रीवर.
जतीनचे उद्गार अहंकाराचे आहेत निश्चित, पण मोनाने जाणीवपुर्वक पुरुषांची मदत टाळली तर यशस्वी होणे कठीन जाईल. याचा अर्थ तिने सुत्र संचालन सोडुन द्यावे असा अजिबात नाही.
हे just माझे विचार, कादंबरीत रहस्य फार सुन्दर ताणले आहे आणि क्रुत्रिम वाटत नाही.
जोरदार! पुढच्या भागाची वाट
जोरदार! पुढच्या भागाची वाट पहात आहे.
पुढच्या भागाची वाट पहात
पुढच्या भागाची वाट पहात आहे.
मस्त कथा आहे.....
छान !!!!!!!!!!!!!
छान !!!!!!!!!!!!!
सर्व वाचक व प्रतिसादक यांचे
सर्व वाचक व प्रतिसादक यांचे मनापासून आभार मानतो.
-'बेफिकीर'!
भाग ६ ची आतुरेतेने वाट पहातोय
भाग ६ ची आतुरेतेने वाट पहातोय बेफिकीर. येऊद्यात लवकर!
लवकर.....
लवकर..... येऊद्यात............
:आतुरतेने वाट पहाणारा बाहुला:
अप्रतिम.....भन्नाट वेग.
अप्रतिम.....भन्नाट वेग.
Still next episode not
Still next episode not published .....
We are egerly waiting for the same.....
Please do post it soon... this is not command .. but humble request....
dhanu
मी पुढील भाग जवळपास पुर्ण
मी पुढील भाग जवळपास पुर्ण केलेला आहे. लवकरच प्रकाशित करू शकेन.
सर्वांचे पुन्हा आभार!
-'बेफिकीर'!
Pages