मृदुला यांचे रंगीबेरंगी पान

इथली तिथली माणसं

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

आज दुपारी बाजारात गेले होते. बाथ गावात शनिवारचा बाजार असतो. तिथे आजुबाजूच्या खेड्यात पिकलेली भाजी, फळे झालंच तर सरबते, लोणची, मुरंबे, खारवलेले मांसाचे प्रकार मिळतात. उघड्यावर मंडई असते तसा प्रकार. तशी एक बंद मडईदेखील आहे. तीही मी आधी बघितली नव्हती. त्या इमारतीची नक्षीदार दारं आमच्या ऑफिसातून दिसतात त्यामुळे तिथे जायची उत्सुकता होती. शिवाय आज हवा मस्त होती. पंचविसापर्यंत तापमान, हलके हलके ढग त्यामुळे उन्हाचा तडाखा नाही आणि मंद वार्‍याच्या झुळका. अगदी आल्हाददायक. कधी नव्हे ते गरम जाकीट, कानटोपी वगैरे न घालता बाहेर पडण्याची संधी.

प्रकार: 

इट्स गॉट टु गो

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

घराबाहेर पाऊल टाकलं नि एक बस समोरून निघून गेली. जरा अर्धं मिनिट आधी निघायला काय होतं असं मनात म्हणत मी परत घरात शिरले. बाहेर थंडीत १२ मिनिटं उभं राहण्यापेक्षा उबेत घरात थांबलेलं बरं. आत आलेच आहे तर म्हणून मग तीन जिने चढून मघाशी विसरलेली टोपी घेतली. ही नवी टोपी एकदम मस्त आहे. कान झाकणारी. शिवाय तीन वेण्या, दोन बाजूला दोन आणि शेंडीसारखी आणखी एक. मेड इन नेपाळ! पुन्हा बस जायला नको म्हणून मग लगेच बाहेर पडले. बसस्टॉपवर एक आजी आधीपासून उभ्या होत्या. त्यांना गुड मॉर्निंग घालून मी बसच्या वाटेकडे डोळे लावले.

प्रकार: 
Subscribe to RSS - मृदुला यांचे रंगीबेरंगी पान