गम

स्वत:लाच पेरायचे कुठे कुठे

Submitted by सुधाकर .. on 6 October, 2012 - 14:30

स्वत:लाच पेरायचे कुठे कुठे
स्वत:लाच वेचायचे कुठे कुठे

उभा जन्म बांधायचा नको तिथे
स्वत:लाच गोवायचे कुठे कुठे

शकूनीच झाले कसे जिथे तिथे
युधीष्टीर शोधायचे कुठे कुठे?

दलालीच फोपावली पदोपदी
स्वत:लाच वाटायचे कुठे कुठे

अशी वाट दूरावते पुन्हा पुन्हा
दिशाहीन चालायचे कुठे कुठे

नको दोष देऊ असा पुन्हा मला
तडीपार हिंडायचे कुठे कुठे

नको वाद घालू नको रडारडी
पुन्हा खेळ मांडायचे कुठे कुठे

--

शब्दखुणा: 

फोटोशॉप हॅन्डवर्क सेकन्ड असाइन्मेन्ट.

Submitted by सुधाकर .. on 1 October, 2012 - 12:57

निळाईच्या वाटेवरचा प्रवास.....
MOON04.jpg

दुष्काळ
Unti.jpg

दुष्काळ-०२
g.jpg

Dont smok
Cigarate_0.jpg

शब्दखुणा: 

फोटोशॉप हॅन्डवर्क

Submitted by सुधाकर .. on 30 September, 2012 - 09:04

फोटोशॉप हॅन्डवर्क म्हणजे केवळ फोटोशॉपच्या सॉफ्ट्वेअर मध्येच उपलब्ध असणार्‍या (tools) साहीत्याच्या साह्याने रेखाटन केलेल्या चित्र- प्रतिमा, या मध्ये कोणतेही बाह्य tools, effect वा brushes वापरलेले नाहीत.

पाऊस.
d-1 copy.jpg

वादळ.
wind .jpg

जलाशय.
Sudhir02.jpg

शब्दखुणा: 

देवा....!

Submitted by सुधाकर .. on 20 September, 2012 - 10:18

देवा...!
तुझ्यापाठी माझा काहीच त्रागा नाही,
पण इथे माणसाला माणसात जागा नाही.

फुटपातवरही कोणी माणसच असतात
नि, काचबंगल्यातही माणसच असतात
जी एकाच नभाखाली एकाच जगात रहातात
पण एकत्र असूनही ती एकमेकात मिसळलेली का नसतात?

देवा...!
धरतीला जसा अगम्य रंग चढवलास
तसा इथे प्रत्येकालाच वेगळा घडवलास.

त्या अनुदिनी नक्की तुझ्या मनात काय होतं
जेंव्हा आदिमांच जिवाश्म जन्मास येत होतं?
तुझ्या दिव्य स्पर्शाचं इथे काय चिज होतं?
जेंव्हा आभाळाच्या काळजातूनच आपुलकीच बळ हारवतं.

शब्दखुणा: 

या जगाने मला नाडले कित्तेकदा

Submitted by सुधाकर .. on 19 September, 2012 - 08:03

या गर्दीत श्वास कोंडले कित्तेकदा
या जगाने मला नाडले कित्तेकदा

का कुणास मी कळलो नाही? जरी इथे,
प्रत्येकाने मला ताडले कित्तेकदा

तू हसून गेलीस जरा, सहज पुढे पण,
या बघ्यांनी मला छेडले कित्तेकदा

विकॄतीने माजलेल्या या जगाने
सुकॄतांचे गर्भ पाडले कित्तेकदा

सहप्रवासी बनून ठरले चालणे पण,
वाटांनीच अंग मोडले कित्तेकदा.

काय काय रचले मीच माझ्या मनाशी
मनाविरूध्दच तरी घडले कित्तेकदा

या जगात नालायकही असेन मी पण
लायकांनी हात झाडले कित्तेकदा

जगता जगता आयुष्याचे द्यूत झाले
नियतीचेच फासे पडले कित्तेकदा

का घडते नको ते? का नसते हवे ते?
या प्रश्नांनी मला पिडले कित्तेकदा

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - गम