नोकरी-व्यवसाय

Kamat khup chuka hot ahet. Laksh kas kendrit karata yeil

Submitted by अस्मि_ता on 20 December, 2019 - 01:47

Maza Navin job ahe ani thoda kichkat ahe. Khup concentration lagat. Pn gharache issues ani health issues mule mala laksh kendrit karata yet nahi ani tyamule Kamat chuka hot ahet. Kay karu jenekarun maz kamakade laksh lagel.

नोकरीच्या शोधात ..

Submitted by बुन्नु on 5 December, 2019 - 10:35

माझा एक मित्र आहे जे सध्या नोकरीच्या शोधात आहे. या मित्राचे शिक्षण कलेच्या क्षेत्रात झालेले आहे. त्यांनी आर्ट स्कूल मधून पदवी घेतलेली असून काही वर्ष चित्रकला, आर्ट अँड क्राफ्ट साठी चे मार्गदर्शन क्लासेस चालवले. त्याच बरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेत कला शिक्षक म्हणून काम केले. म्हणजे शिकवण्याचा अनुभव आहे.
गेले काही वर्ष त्यांनी स्वतः चा इंटेरियर डिझाईन चा व्यवसाय सुरू केला होता.

नोकरीच्या शोधात..

Submitted by बुन्नु on 30 November, 2019 - 09:42

माझा एक मित्र आहे जो सध्या नोकरीच्या शोधात आहे. या मित्राचे शिक्षण कलेच्या क्षेत्रात झालेले आहे. त्यांनी आर्ट स्कूल मधून पदवी घेतलेली असून काही वर्ष चित्रकला, आर्ट अँड क्राफ्ट साठी चे मार्गदर्शन क्लासेस चालवले. त्याच बरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेत कला शिक्षक म्हणून काम केले. म्हणजे शिकवण्याचा अनुभव आहे.
गेले काही वर्ष त्यांनी स्वतः चा इंटेरियर डिझाईन चा व्यवसाय सुरू केला होता.

वर्क फ्रॉम होम जाॅब बद्दल माहिती हवी आहे

Submitted by ओजस on 17 November, 2019 - 22:18

वर्क फ्रॉम होम जाॅब बद्दल माहिती हवी आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या साईट मध्ये कोणती साईट निवडावी.डेटा इंट्री,काॅपी पेस्ट फार्म फिलींग , किंवा अॅड पोस्टींग जाॅब याविषयी माहिती हवी आहे. कोणी या प्रकारे काम करत असल्यास कृपया मार्गदर्शन करावे. खूप साईट वर आधी पैसे भरावे लागतात.तर यात फसवणूक केली जाण्याची शक्यता वाटते.कोणी याविषयी सांगाल का?

अस्पर प्रॉडक्ट

Submitted by Dhangya on 7 November, 2019 - 13:38

मला कोणी अस्पर प्रोडक्ट बद्दल सांगू शकेल का?....... मला फक्त माहिती आहे की हे agriculture आहे, व त्याचा वापर खाद्यपदार्थ (दुधाची पावडर, चॉकलेट इ.)बनवण्यासाठी केला जातो. अस्पर हा मशरूम शेती सारखाच पिकवला जातो... त्यामुळे थोडा गोंधळ होतोय माझा की मशरूम आणि अस्पर दोन्ही एकच आहेत की काय? मला शेती करायची आहे अस्पर product..

कृपया मार्गदर्शन करावे....

व्हाईट काॅलर स्लेवरी..

Submitted by अजय चव्हाण on 6 November, 2019 - 06:32

नुकतीच एक बातमी वाचण्यात आली..MNC कंपनीचे ज्यादा कामाचे तास आणि खराब लिव्हस पाॅलीसीविरोधात हैदराबादमधील काही आयटी कर्मचार्यांनी Cognizant आणि Accenture सारख्या कंपनीविरोधात केस फाईल केली आहे...

तुम्हाला काय वाटतं? ह्या केसमुळे आमच्यासारख्या MNC कंपनी काम करणार्याचा फायदा होईल म्हणजे निकाल जर कर्मचार्यांच्या बाजूने लागला तर ज्यादा कामाचे तास कमी होतील? ज्या काही लिव्ह पाॅलिसीज आहेत त्यात सुधारणा होऊन लिव्हसचा पुरेपुर उपयोग करता येईल?

शब्दखुणा: 

कंपनीची दिवाळी भेट कि कर्मचाऱ्यांचा अपमान?

Submitted by Parichit on 30 October, 2019 - 12:04

हे बघा एका कंपनीचे कर्मचाऱ्याना आलेली दिवाळी गिफ्ट चे इमेल. अडीचशे रुपये घ्या आणि दिवाळी एन्जोय करा म्हणतात.image002.jpg

अशी "गिफ्ट" कुणा कुणाला मिळाली आहेत? इथे भडास काढा.

शब्दखुणा: 

आम्ही कॉफीविक्या!

Submitted by mi_anu on 22 October, 2019 - 07:52

"अरे मासे मिळालेत मासे!! मला घरी घेऊन येता येणार नाहीत एकटीने.तू ये कार घेऊन."
मी फोनवर कँटीन च्या गलक्यात कोपऱ्यात उभी राहून किंचाळत होते.समोरच्या फोन वरच्या प्राण्याला आपली शाकाहारी बायको ऑफिसातून मासे घेऊन घरी का येतेय हे कोडं उलगडत नव्हतं.अशी कोडी संदर्भासहित उलगडायला नवऱ्याना बायकांच्या आयुष्यातले अति सूक्ष्म अपडेट बारकाव्यासह लक्षात ठेवावे लागतात.
"मासे?आपण काय करणार त्याचं?"

गर्दीतून चालताना

Submitted by संयम.... on 28 September, 2019 - 06:46

जे लोक जॉब करत असतील त्यांना जाणवत असेल कि जॉब करण्याच्या नादात आपण जगणं विसरून गेलोय.
खूप काही करायचं पण तेवढा वेळ मिळत नाही त्यामुळे बऱ्याच गोष्टी सुटतायेत. आपण समाजासाठी काही करत नाही असे नाही पण कोणत्यातरी फौंडेशन द्वारा मदत करण्यापेक्षा स्वतःहून सहभाग घेऊन केलेली मदत वेगळीच..नाही का ?? ज्या लोकांना असा प्रश्न पडतो त्यांच्या मनात विचारांचे द्वंद्वा चालू होत असले पाहिजे. मग आपण छोट्या छोट्या गोष्टीत लोकांना मदत करून मिळणाऱ्या आनंदावर जगात राहतो.
हि ख़ुशी छोटी असली तरी चिरकाल टिकणारी आणि निरागस असते.

Pages

Subscribe to RSS - नोकरी-व्यवसाय