हा भारत माझा

'हा भारत माझा' - विविध शहरांतील खेळांचा तपशील

Submitted by माध्यम_प्रायोजक on 7 May, 2012 - 07:53

'हा भारत माझा' हा सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेला, आणि समीक्षकांनी व रसिकांनी गौरवलेला चित्रपट ४ मे, २०१२ रोजी प्रदर्शित झाला.

या चित्रपटाच्या खेळांचे तपशील पुढीलप्रमाणे -

१. प्रभात (पुणे) - सकाळी १०.४५

२. मंगला (पुणे) - सं. ७.३०

३. सिटीप्राइड कोथरुड (पुणे) - दु. १.३०

४. सिटीप्राइड, सातारा रोड (पुणे) - दु. १.३०

५. सिटीप्राइड अभिरुची (पुणे) - सं. ४.३०

६. विशाल इस्क्वेअर (पिंपरी) - सं. ६.३०

७. शाहु सिनेमॅक्स (कोल्हापूर) - स. १०.४५

विषय: 
शब्दखुणा: 

'हा भारत माझा' - डॉ. आनंद नाडकर्णी

Submitted by माध्यम_प्रायोजक on 3 May, 2012 - 06:10

'हा भारत माझा'ची निर्मिती प्रक्रिया अगदी सुरुवातीपासून मी पाहिली आहे. माझी भूमिका एका आस्वादक प्रेक्षकाची आहे या प्रक्रियेत. या दिग्दर्शकद्वयीनं नवीन काही लिहिलेलं वाचून दाखवताना मी तिथे असतो. 'हा भारत माझा'चं कथानक वाचून दाखवलं, तेव्हा ते आंदोलनाच्या विषयाशी अगदी घट्ट बांधलेलं होतं. चित्रपट प्रेक्षकांसमोर येईपर्यंत आंदोलनाचा जोर टिकेल का, असं मला वाटत होतं. पण तरीही कुठल्याही सर्जनशील माध्यमात काम करणार्‍याच्या दृष्टीनं ते सगळं वातावरण टिपणं, हेदेखील खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळे आंदोलनाशी निगडीत तरीही वैश्विक पातळीवरचं कथानक लिहिलं जायला हवं, असं मला वाटत होतं.

विषय: 

'हा भारत माझा'च्या शुभारंभाच्या खेळाची तिकिटं उपलब्ध आहेत

Submitted by माध्यम_प्रायोजक on 30 April, 2012 - 02:32

'हा भारत माझा' या चित्रपटाचा शुभारंभाचा खेळ गुरुवार दि. ४ मे, २०१२ रोजी पुण्याच्या सिटीकोथरुड,कोथरुड,, चित्रपटगृहात संध्याकाळी साडेसहा वाजता आयोजित केला आहे.

चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ व अनेक मान्यवर या खेळाला उपस्थित राहणार आहेत.

मायबोली.कॉम माध्यम प्रायोजक असलेल्या चित्रपटांच्या शुभारंभाच्या खेळांना मायबोलीकर उपस्थित असतात. त्याप्रमाणे 'हा भारत माझा'च्या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. या खेळाची तीन तिकिटं आपल्याकडे आहेत.

विषय: 
शब्दखुणा: 

'जब जाना आतमराम...' - डॉ. अनिल अवचट

Submitted by माध्यम_प्रायोजक on 30 April, 2012 - 00:13

सबबन तुलसी भयी
परबत सालिगराम ।
सब नदिये गंगा भयी
जब जाना आतमराम ॥

या कबीराच्या दोह्यानं 'हा भारत माझा' या चित्रपटाची सुरुवात होते. आपल्या अंतर्मनात डोकावयाला भाग पाडणार्‍या या चित्रपटाबद्दल सांगत आहेत डॉ. अनिल अवचट...

anilavchat.jpg

'हा भारत माझा' - डॉ. अभय बंग

Submitted by माध्यम_प्रायोजक on 24 April, 2012 - 23:34

'हा भारत माझा' हा चित्रपट ४ मे रोजी प्रदर्शित होतो आहे. अण्णा हजार्‍यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका कुटुंबाची कथा सांगणार्‍या या चित्रपटानं अण्णा हजारे, सुधा मूर्ती, अभय बंग, अनिल अवचट, आनंद नाडकर्णी, सुनीती. सु. र., विद्या बाळ अशा अनेक ज्येष्ठ समाजकारण्यांना भारावून टाकलं.

या चित्रपटाबद्दलचं डॉ. अभय बंग यांचं मनोगत...

dr-abhay-bang.jpeg
विषय: 

'हा भारत माझा' - दिग्दर्शकांचं पत्र

Submitted by माध्यम_प्रायोजक on 23 April, 2012 - 04:23

प्रिय मित्रांनो,

म्हटलं तर गोष्ट तशी साधी आहे...
इंद्र सुखात्मेचा बारावीचा निकाल लागला आहे, आणि त्याला इंजीनियरिंगला प्रवेश घ्यायचा आहे.

लहानपणापासूनचं त्याचं स्वप्न होतं, आपण इंजीनियर व्हायचं. पण त्याच्या अण्णांना, म्हणजे वडिलांना वाटतंय, मुलांनी आपल्याला मोठ्या खर्चात घालण्यापेक्षा थोडी वेगळी वाट घेऊन समाधानी व्हावं.

इंद्रला मार्क पडलेत ९०%. पण अ‍ॅडमिशन थांबली आहे ९१ टक्क्यांवर!
आईचं म्हणणं इतकंच, की मुलांच्या सुखातच तिचं सुख आहे.

आमच्या ’हा भारत माझा’ या नव्या चित्रपटाची ही गोष्ट इतकी साधी आहे - तुमच्या आमच्या घरातली.

हा भारत माझा - परीक्षण

Submitted by फारएण्ड on 3 January, 2012 - 06:04

'हा भारत माझा' हा चित्रपट प्रत्येकाने पाहावा असा आहे. अण्णा हजारेंच्या लढ्याला पाठिंबा देणारे लोक स्वतः जेथे तेथे नियम तोडण्यात पुढे असतात अशी टीका कायम केली जाते. या चित्रपटाचा विषय हाच आहे. सुमित्रा भाव्यांच्या मुलाखतीत हा चित्रपट कसा बनला याची आणखी माहिती आहे.

विषय: 

'हा भारत माझा' - सुमित्रा भावे

Submitted by माध्यम_प्रायोजक on 28 November, 2011 - 09:14

अण्णा हजार्‍यांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी 'जनलोकपाल विधेयक' संमत व्हावं, या मागणीसाठी आंदोलन छेडलं, आणि बघताबघता अख्खा देश या आंदोलनात सामील झाला. उपोषणं, मोर्चे, चर्चा, वादविवाद असं कायकाय घडू लागलं. या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणं अशक्य होऊन बसलं. या ऐतिहासिक परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयीनं या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 'हा भारत माझा' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गोव्यात भरलेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज या चित्रपटाचा प्रीमियर शो झाला. मायबोली या विचारप्रवर्तक चित्रपटाची माध्यम प्रायोजक आहे.

हा भारत माझा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 23 November, 2011 - 23:02

अण्णा सुखात्म्यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांची पत्नी, लग्न झालेली मुलगी वर्षा आणि राघव व इंद्र ही दोन मुलं. अण्णा हजार्‍यांच्या आंदोलनानं देश ढवळून निघाला, आणि नेमकं तेव्हाच अण्णा सुखात्म्यांच्या कुटुंबातही एक वादळ निर्माण झालं. राजकीय पक्षांशी बांधिलकी असणार्‍या, नसणार्‍या, तरुण, वृद्ध स्त्रीपुरुषांना अण्णा हजार्‍यांच्या आंदोलनानं विचारात पाडलं, नेमकं तेव्हाच अण्णा सुखात्म्यांच्या कुटुंबासमोर एक मोठाच पेच निर्माण झाला.

Subscribe to RSS - हा भारत माझा