रेषा

माय आर्ट इज डूडलींग (भाग ३)

Submitted by rar on 19 October, 2016 - 12:19

जितकी माझी बाहेर भटकंती चाललेली असते, त्याही पेक्षा जास्त मी मनात, अंतरंगात, विचारात भटकत असते असं माझं मलाच खूपदा जाणवतं. आजूबाजूला गोष्टी घडत असतात, त्यावर डोक्यात विचार चालू असतो. काही सांगायचं असतं. एक्प्रेस व्हायचं असतं. ती गरज असते, ओढ असते. सतत कसलातरी शोध चालू असतो, बाहेर पण त्याहीपेक्षा माझ्या आतच. काय शोधते माहित नाही. पण हल्ली असं वाटतं जे शोधतीये ते ह्या रेषांमधेच आहे कुठतरी. कोणतातरी फॉर्म व्यक्त होण्याचा.

रेषा

Submitted by विनायक उजळंबे on 26 June, 2012 - 06:17

माझ्या तळहातावर एक डाग आहे कसलासा ..
तो नेमका आयुष्य रेषेवर आहे म्हणे ..
आधी नव्हता असे आई म्हणाली ..
तिला कळतं त्यातलं !! ती वाचते हात !
अन त्या दिवशी तिच्या कपाळावरची आठी मी वाचली !!

तुझ्या ओठांवर ..त्या
खालच्या ओठाखाली डाव्या बाजूला ..
जिथे तू दात चावते नेहमी तिथे एक तीळ आहे ..!!
पहिल्या भेटीत दिसला ही नव्हता ..
पण तू जेव्हा लाजते अन ओठ चावते ..
तेव्हा अचानक उगवतो तो ..!

तुला आठवतं ?
आपल्या शेवटच्या भेटीत काही न बोलता
मी तुझा चेहरा किती वेळ ओंजळी मध्ये धरला होता ?
इतका वेळ, कि निघताना
माझ्या तळहाताची अंत:करण रेषा..ठसठशीत उमटली
तुझ्या गालावर !!

शब्दखुणा: 

अदॄश्य!

Submitted by नीधप on 29 April, 2011 - 23:17

जुनीच. 'आतल्यासहित माणूस' मधे होती
---------------------------------------
फुलांच्या पायघड्यांवरून
त्याचा हात धरुन ती जात असते.
त्याच्या वेगाशी जमवून घेताना ती बेभान होते.
पावले थिरकायला लागतात,
त्याच्या तालाशी जुळायला लागतात.
ती खूश होते त्याच्यावर, स्वत:वर. हसते
स्वत:च्या हसूची ओळख त्याच्या डोळ्यात शोधते.
कधी कधी तीही मिळाल्यासारखी वाटते
ती अजूनच खूश होते, हसते.
कुणी बघत तर नाहीना, ती हळूच बघते
हादरते, ती अदॄश्यच असते.

अचानक आलेलं अदॄश्यपण तिला खूप दुखवून जातं.
अगदी आत आत पर्यंत.
'कश्या पुसल्या गेल्या माझ्या रेषा?'
डोळ्यात प्रश्न घेऊन ती आकाशाकडे पहाते

गुलमोहर: 
Subscribe to RSS - रेषा