मंत्र तंत्र

द्वेष : एक भय गूढकथा, भाग १०

Submitted by प्रथमेश काटे on 6 March, 2024 - 12:48

हलकेच दरवाजा पुढे लोटून राजाभाऊंनी घरात प्रवेश केला. त्यांच्या मागून जरा दबकतच सोनाली व प्रिया आत आल्या. हॉलच्या मध्यभागी श्री मघाशी प्रमाणेच पद्मासन घालून डोळे मिटून बसला होता ; पण आता उलट्या बाजूने. मघाशी प्रवेशद्वाराच्या बाजूने पाठ करून बसलेला तो आता दरवाजाकडे, म्हणजे पूर्व दिशेला तोंड करून बसला होता. पुढे जमिनीवर मेणबत्ती मंदपणे, स्थिरपणे तेवत होती. तिच्या पलीकडे भस्माने बऱ्यापैकी मोठ्या आकाराचे रिंगण केले होते.
कुणी काही बोलण्याच्या आधी श्रीने स्वतःहूनच हळूवारपणे डोळे उघडले. प्रियाकडे नजर वळवून तो शांतपणे म्हणाला -

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मंत्र तंत्र