बाईपण भारी चित्रपटातल्या एका अभिनेत्रीने बायका उगीच बदनाम असतात, पुरूषच जास्त गॉसिप करतात असे म्हटले आहे.
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शिल्पा नवलकर हिने बाईपण भारी देवा या चित्रपटात केतकी हे पात्र साकारलं आहे. तिच्या पात्राचे सर्वत्र कौतुकही पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत शिल्पाने बायकांपेक्षा पुरुष जास्त गॉसिप करतात, असे म्हटले आहे.
फिल्मी गॉसिपिंग ही अनेकांची भावनिक गरज असते. अशांच्या भावनांना इथे वाट मोकळी करता येईल.
बॉलीवूडने विबासंची उज्ज्वल परंपरा सुरूही केली आणि तिला प्रतिष्ठा मिळवून दिली. ९०% गॉसिप्स विबासंवरच असतात. त्याला काही पुरावे बिरावे नसतात. पण ते कधीच लपून राहत नाही. मग चर्चा सुरू होतात. फिल्मी मॅगेझिन्स मधे छापून येतात. मग दोघेही असं काहीच नाही, "जस्ट फ्रेंड्स" " प्लेटोनिक लव्ह" असे खुलासे करतात. क्या एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते असे काळीज पिळवटून विचारले जाते.
इथे फक्त १००% प्युअर गॉसिपला स्थान आहे.
कालपासून व्हॉटसपवर करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलाचा फोटो फिरतोय. त्याचे त्यांनी मोठ्या आवडीने ठेवलेले नाव "तैमूर" हा थट्टेचा विषय बनतोय. काहींना त्यावरून विनोद सुचताहेत, तर काही सनातनी महाभाग मोठमोठाले मेसेज बनवून फिरवत आहेत. असे मेसेज बनवणार्याच्या हेतू बद्दल मला जराही शंका नाही. ते जोडे खाण्याच्या लायकीचेच असतात. पण आपल्यातलेच काही मित्र जेव्हा मुर्खासारखे ते मेसेज फिरवतात आणि त्यावर चर्चा करतात तेव्हा खरेच वाईट वाटते. त्या मुर्खांबद्दल नाही. तर त्या आईवडिलांबद्दल ज्यांनी एका सुंदर मुलाला या जगात आणले आहे.