उष्णता

आरोग्यविषयक सल्ला हवाय

Submitted by मंगेश.... on 18 February, 2018 - 13:09

गेले काही दिवस मी उष्णतेच्या आजाराने त्रस्त आहे. उष्णतेचा दाह फक्त तळपायांना जास्त जाणवतो. डॊक्टरना विचारले पण दरवेळी डॊकटर गोळ्या देऊन परत पाठवतात. पण त्याने तितका फरक नाही पडत. पायात दिवसभर शुज असतात. तळपायाची जळजळ होत असली की तात्पुरता हापिसाच्या पार्किंग मधे जाऊन पाय धुवुन येतो. असे दिवसातुन तीन चार वेळा तरी. रस्त्यातुन चालताना अचानक पायाची जळजळ चालु होते. आणि चालणे मुश्कील होते. कधीकधी अनवाणी पायांनी चालाव अस वाटत. इतका त्रास होतो. मध्यंतरी कोल्हापुरी चप्पल घेतलेली. पण हापिसात घालुन जाणं ऒकवर्ड वाटत.

पायाच्या तळव्यांची आग

Submitted by मामी on 2 January, 2016 - 05:10

एका वयस्क व्यक्तीच्या पायाच्या तळव्यांची अतिशय जळजळ होते. खूपच त्रास होत आहे. तोंडातही बरेचदा फोड येतात आणि काही खाता येणं अशक्य होतं. कदाचित बरीच औषधं वगैरे घेतल्यामुळे अंगात उष्णता निर्माण झाली आहे.

१. तळपायांची आग कशी कमी करता येईल? घरगुती उपचार हवे आहेत.

२. तोंडात येणार्‍या फोडांवर काही सोपे घरगुती उपाय आहेत काय?

विषय: 
Subscribe to RSS - उष्णता