ठसे वापरून शुभेच्छापत्र - विजयालक्ष्मी - मनिम्याऊ
मायबोली गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस. घाई झाली फारच.
ठसे वापरायचे होते.. काही सुचेना.. मग हाताचेच ठसे मारून मंडला मोर बनवले.
स्वतःलाच Happy birthday.. येतोय ना लवकरच..
मायबोली गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस. घाई झाली फारच.
ठसे वापरायचे होते.. काही सुचेना.. मग हाताचेच ठसे मारून मंडला मोर बनवले.
स्वतःलाच Happy birthday.. येतोय ना लवकरच..
जे आयुष्य मिळालं त्याबद्दल आता समाधानी आहे. खूप गोष्टी नाही मिळाल्या, पण आता त्याबद्दल आकर्षण नाही.
पण स्पर्धा आहे म्हटल्यावर सांगायला पाहीजे कि नको?
असं बरंच आहे कि!
अगदी लहानपणापासून आम्ही दोघे भाऊ एकत्रच फिरायचो, खेळायचो, पण नेहमी भावाची स्तुती सगळे करायचे. ते ही माझ्यासमोरच.
"तुमचा दोन नंबर काय दिसतो बाई, एकदम कृष्णच, कसला आहे" मग आई त्या बायका गेल्यावर तणतण करायची. नजर लावतात या बायका माझ्या मुलाला. आजी म्हणायची "ए नजर काढून टाक बाई त्याची"
खूप दिवसांनी इथे पोस्ट करतेय. खरं तर हे विणकाम गेली १२ वर्ष करतेय. सध्या याच्या एआय रिल्स खूप येताहेत. त्याखालचे प्रतिसाद 'हे अशक्य आहे' असे दिसतात 
नेमकी एक मोठी ऑर्डरही आली तर विणले. म्हणून इथे फोटो टाकतेय.
तुम्हाला असे काही पाहुणे माहिती आहेत का जे घरी आले कि सगळ्या सोहळ्याचा ताबा घेतात.
सगळे जमलेले नातेवाईक, पै पाहुणे त्यांच्या पुढे पुढे करतात. ते सेलेब्रिटी असतात. प्रत्येक जण आपल्या लेकरांना या पाहुण्यांना विविध कलादर्शन करायला सांगतो. त्यांनी शाबासकी दिली कि मूठभर मांस चढते.
हे जरा वरच्या वर्तुळात ऊठबस असलेले असतात. पण ते कधीही आपल्या उपयोगी पडत नाहीत. कधीच आपल्या मुलांच्या शैक्षणिक किंवा नोकरी व्यवसायासंबंधी करीयर मधे मदत करत नाहीत. पण नको त्या लोकांच्या उपयोगी पडतात.
गणपती बाप्पा मोरया

कुठेही नदीकिनारी , समुद्रकिनारी, डोंगरात असो वा जंगलात, भटकायला गेल्यावर तिथले दगड, खडे, वाळू, शंख - शिंपले गोळा करून आणणे हा माझा आणि आता माझ्या लेकीचा देखील एक छंद आहे.. घरी आणून छान स्वच्छ धुवून लेबल लावून ठेवायचं. अश्या ऐवजांनी भरलेल्या बऱ्याच लहान मोठ्या थैल्या, डब्ब्या आहेत घरात.
त्यापैकी काही सामान वापरून गणपती बाप्पा साकार झाला.
टेरेसवर लावलेल्या प्राजक्ताच्या झाडाला काही दिवस खूप फुलं येत होती. तेव्हा केलेला हा प्रयत्न - पावसामुळे फुलं ओली झालेली ते पाणी पडलयं कागदावर. सध्या बहर ओसरला आहे त्यामुळे पुन्हा जमेल न जमेल म्हणून तोच फोटो देत आहे.
सगळे त्या मीम्सच्याच धाग्यावर बागडत आहेत, ऑफ कोर्स मस्तच धमाल चालली आहे तिकडे. इथे अजून कोणीच श्रीगणेशा केला नाहीये म्हणून माझ्या कडून हा छोटासा प्रयत्न.
दहा बारा काजू गर आणि वेळ म्हंजे पाच मिनिटं एवढच लागलं हा गणपती करायला.

कसे आहात छोट्या दोस्तांनो?
गणपती बाप्पाचे आगमन झाले ना? मग झाला का प्रसाद खाऊन?
आता शाळेला सुट्टी असेलच, मग थोडा फार तरी अभ्यास करताय ना? काय म्हणता कंटाळा आलाय ?
मग तोच कंटाळा घालवायला आम्ही एक उपक्रम घेऊन आलो आहोत
तर, तुम्हाला बनवायचं आहे बाप्पासाठी एक सुंदर तोरण किंवा छान छान पताका. यासाठी तुमच्याकडे उपलब्ध असणारे वेगवेगळे कागद, पुठ्ठा किंवा कापड वापरू शकता. शक्यतो प्लास्टिकचा वापर टाळाच. तोरण/ पताका सजवण्यासाठी तुम्ही निरनिराळे रंग, टिकल्या, मणी अश्या इतर वस्तू वापरू शकता.