लेख

शुद्ध निरा (फोटोसकट)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 February, 2012 - 01:52

नारळाचे झाड म्हणजे कल्पतरूच. त्याच्या पात्या, खोड, नारळ, त्याचे साल, करवंटी अगदी सगळ्याचाच वापर करता येतो. नारळ पाणी म्हणजे तर अमृतासारखेच. नारळाची उंच ऐटदार झाडे कोकण किनार पट्टीवर दाटीवाटीने मिरवताना दिसतात त्यामुळे कोकण किनारपट्टीवर बर्‍याच लोकांचे नारळ व नारळाच्या झाडापासून मिळणार्‍या इतर उत्पन्नांवर उपजीवीका चालते. नारळाच्या झाडाच्या पात्यांतील काड्यांपासून झाडू तयार होतो. झावळ्यांपासून चटई प्रमाणे झाप तयार करतात, नारळाच्या खोडाचा पुलासाठी उपयोग होतो. ही सगळी माहीती आपण अभ्यासक्रमात शिकतच असतो. पण नारळाच्या झाडापासून अजुन एक उत्पन्न्/पेय निघते ते म्हणजे निरा.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

बालपणीच्या गमती-जमती-2

Submitted by मनस्वि on 31 January, 2012 - 06:14

मार्च महिना लागला कि सगळ्यांना वेध लागायचे ते सुट्ट्या कधी सुरू होतात त्याचे. सगळी भावंडे मग एकत्र जमायचो. बाहेरगावी असलेली चुलत भावंडे देखील यायची. रोज दुपारी वेगवेगळे खेळ रंगायचे. जोडीला आम्हा सगळ्याची स्थानिक मित्र-मंडळी देखील असायचीच. मोठी भावंडे क्रिकेट खेळायची तर छोट्यांना बैठे खेळ आवडायचे.

गुलमोहर: 

मा. प्रशासक यांस

Submitted by दामोदरसुत on 29 January, 2012 - 02:28

मा. प्रशासक यांस
माझा 'कि सांगा खराखुरा भ्रष्टाचारी बिन्चुकपणे कसा ओळखायचा?' हा लेख दोन वेळा प्रकाशित केला गेला होता. त्यातील ज्याला प्रतिसाद नाहीत तो लेख मी थोडा संक्षिप्त करून अप्रकाशित केला. पण तो काढून टाकता आला नाही. तो माझे 'लेखन' मध्ये तसाच आहे. तो अप्रकाशित केलेला लेख कृपया काढून टाकावा.
-दामोदरसुत

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वाढदिवसाच्या शुभेच्छा - देवकाका.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 28 January, 2012 - 07:57

मायबोलीचे एक ज्येष्ठ आदरणीय सदस्य श्री. प्रमोद देव्,आपल्या सगळ्यांचे देवकाका आज एक्सष्टाव्या वर्षात पदार्पण करत आहेत. देवकाकांना वाढदिवसाच्या मन्;पूर्वक शुभेच्छा. ...

devkaka_1.jpg

जालनीशी,जालवाणी,जालरंगी,देवकाका
लाजवी उत्साह तरुणांना प्रसंगी ,देवकाका

गीत संगीतातल्या असती लवंग्या शेकड्यांनी
मायबोलीचा फटाका हेच जंगी,देवकाका

--डॉ.कैलास गायकवाड

गुलमोहर: 

कि सांगा, खराखुरा भ्रष्टाचारी बिनचुकपणे कसा ओळखायचा?

Submitted by दामोदरसुत on 28 January, 2012 - 03:54

तुकोबाराय म्हणतात,
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले
तोची साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा !
देव कसा ओळखावा यासाठी सामान्यांसाठी किति सोपे, स्पष्ट आणि नेमके मार्गदर्शन आहे हे!
फ़क्त शासकीय कर्मचारी आणि निर्वाचित लोकप्रतिनिधी यांच्यातील भ्रष्टाचारी ज्या आधारे बिनचुकपणे शोधता येईल व ज्याचा शेवट ’भ्रष्टाचारी तेथेचि जाणावा’ असा असेल असा चार ते आठ ओळींचा अभंग लिहिण्याच्या तयारीला आम्ही लागलो.
असा प्रयत्न करण्याचे कारण घडले राळेगणसिद्धीत!

गुलमोहर: 

’जनगणमन ’,रविंद्रनाथ टागोर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर

Submitted by दामोदरसुत on 26 January, 2012 - 07:29

आज प्रजासत्ताक दिन! तो प्रजासत्ताक झाला स्वातंत्र्यप्राप्तीमुळे! स्वातंत्र्य मिळाले ते सशस्त्र क्रांतिकारक, जहाल, मवाळ, समाजसुधारक अशा सर्वांच्या प्रयत्नांमुळे! या प्रजासत्ताकाचे राष्ट्रगीत होण्याचे भाग्य ज्या काव्याच्या वाट्याला आले त्या ’जनगणमन ’ ची शताब्दी नुकतीच धूमधडाक्यात साजरी झाली. त्याचवेळी ’वंदेमातरम’ या गीताचीही आठवण झाली; आणि जाणवले की ’जनगणमन’ चे भाग्य त्याच्या रचनाकाराच्या भाग्याशी तर ’वंदेमातरम’चे विधिलिखित क्रांतिकारकांच्या विधिलिखिताशी जोडले गेले आहे.
आणी म्हणून आठवण झाली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले रविन्द्रनाथांचे अभिनंदन !

गुलमोहर: 

पुस्तक नशिबात असावं लागतं!!!

Submitted by शापित गंधर्व on 23 January, 2012 - 10:06

"पुस्तक नशिबात असावं लागतं" या शिर्षकाचा लेख नुकताच महाराष्ट्र टाईम्स वर वाचनात आला आणि माझ्या आठवणी जाग्या झाल्या.

गुलमोहर: 

फास्ट फूड नेशन

Submitted by सई केसकर on 20 January, 2012 - 11:29

अमेरिकेनी जगाला काय दिलं?
या प्रश्नाच्या उत्तरांची वर्गवारी करता येईल. आणि प्रत्येक उत्तराकडे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या दृष्टीकोनातून बघतील. पण आजच्या काळात बरेच लोक अमेरिकेनी जगाला नको त्या गोष्टी दिल्या या विचारलाच दुजोरा देतील. भारतात गेल्या दोन दशकांपासून चाललेल्या "सांस्कृतिक अध:पतनासाठी" बरेच लोक अमेरिकेला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतात. अर्थात, त्यात चूक काहीच नाही. अमेरिकेनी जगाला एक नवीन संस्कृती दिली. आणि सुसंस्कृत समाजानी या अतिक्रमणाचा वेळोवेळी निषेध केला.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अचानक सापडलेला संगीतकार..

Submitted by चिमण on 19 January, 2012 - 07:35

टिव्हीवर लागलेला क्लिंट ईस्टवूड आणि शर्ले मॅक्लेनचा 'टू म्युल्स फॉर सिस्टर सेरा' पहात असताना माझं लक्ष एका गोष्टीनं वेधून घेतलं. शर्लेनं नाही हो.. त्यातल्या टायटल म्युझिकनं!

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - लेख