वॅऩ गॉग

कातरवेळ १

Submitted by अमृतवल्ली on 4 September, 2013 - 07:29

दुपार जरा कलंडली आणि इतक्यावेळ उन्हाने गपगार पडलेली वळचणीची पाखरे किलबिलाट करू लागली. पलंगावर बसून भिंतीला टेकून बसल्याने पाठीला चांगलीच रग लागली होती. पाखरांच्या आवाजाने तिची तंद्री मोडली. दोन्ही पायाला घातलेले हाताचे विळखे तिने हळुवार सोडले आणि मान भीतीला टेकवून खिडकीकडे पहिले. हळूच खिडकीच्या उंबरा ओलांडून एक धिटुकल पाखरू आता आलं, मान वेळावून त्याने सगळीकडे पाहून घेतलं, चोचीने तिथलच काहीतरी उचललं, थोडावेळ खिडकीच्या गजाच्या आत-बाहेर केलं, तेवढ्यात वारयाने पडदा हलला. तेवढूश्या हालचालीने पाखरू केवढ्याने दचकले आणि भुर्क्कन खिडकीबाहेर उडून गेलं. त्याची ती लगबग बघून तिला हसू आल...वाटल..

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - वॅऩ गॉग