शेती

तडका - संप

Submitted by vishal maske on 3 October, 2015 - 09:19

संप

पशु-पक्षांच्या माना-पानाचं
रूढी-परंपरेत गूढ भासतं
पितृपाठाची सुरूवात होता
कावळ्यालाही महत्व आसतं

जर विचार करण्याची क्षमता
कावळ्यांनाही दिली असती
तर स्वत:ची किंमत कदाचित
त्यांनाही कळून आली असती

मागण्या कशा करायच्या हे
त्यांच्याही लक्षात आले असते
अन् वेग-वेगळ्या खाद्यासाठी
कावळ्यांनी संपही केले असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - डेली रूटींग

Submitted by vishal maske on 27 September, 2015 - 21:09

डेली रूटींग

त्याच-त्याच गोष्टी करून
कधी मनंही विटले जातात
रोज-रोजच्या गोष्टींपासुन
मुद्दामहून टर्न घेतले जातात

कोणी सांगण्याची गरज नाही
आपणंच समजुन घ्यावं लागतं
कितीही टर्न घेतले तरीही
डेली रूटींगवर यावं लागतं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

नका घेऊ गळफास

Submitted by अभय आर्वीकर on 26 September, 2015 - 09:01

नका घेऊ गळफास

किसानाची पोरं आम्ही धरू नवा ध्यास
बाबाजींना सांगू आम्ही
काकाजींना सांगू आम्ही
दादाजींना सांगू आम्ही
मामाजींना सांगू आम्ही
नका घेऊ देवा तुम्ही, गळ्यामध्ये फास ....!

जुने गेले, नवे आले, नुसते वेषांतर केले
नितिधोरण तेच आहे, रोज जरी तुम्ही मेले
डावे-उजवे, धर्म-पंथ, खुर्चीचेच दास ....!

छाती काढून म्होरं येऊ, हातामध्ये लाठी घेऊ
कोणाच्या ना बापा भिऊ, लुटारूंच्या पाठी ठेवू
पायाखाली तुडवत जाऊ, साऱ्या अडथळ्यांस ....!

हातामध्ये हात धरू, पोशिंद्याची एकी करू
लक्ष्यावरती चाल करू, एकेकाची कुच्ची भरू
’अभय’ जगा, आता ठेवा, आम्हावर विश्वास ....!

तडका - स्वागत पावसाचे

Submitted by vishal maske on 18 September, 2015 - 21:10

स्वागत पावसाचे

दुष्काळलेल्या धरणीवरती
तो जोमा-जोमाने बरसला
तो क्षणही सुखावला मग
जो त्यासाठी होता तरसला

पडल्या दमदार पावसामुळे
मनी आशा चुकचुकली आहे
पावसाचे स्वागत करण्याला
मानवजात उत्सुकली आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - पोळा,...

Submitted by vishal maske on 11 September, 2015 - 20:21

पोळा,...

दुष्काळानं होरपळलोय
ना पडला आहे पाऊस
चंगाळे,झूल,वारनेसची
कशी करावी हौस,...?

माझ्या परिस्थितीचा आढावा
बैलालाही कळला आहे
त्याच्यासह माझ्या मनाला
पोळा आज पोळला आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पत्रास कारण की,...

Submitted by vishal maske on 11 September, 2015 - 11:31

पत्रास कारण की,...

पोशिंदाही पिचलाय आज
आमच्या मनात सल आहे
का जीव होतोय नकोसा
का मरण्या इतपत मजल आहे

तुम्ही अश्रु पुसु शकतात
याबद्दल मुळीच दुमत नाही
पण पत्रास कारण की,
आता बोलायची हिंमत नाही

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - शिकताना

Submitted by vishal maske on 10 September, 2015 - 20:13

शिकताना

शिकण्यासाठी खुप आहे
शिकणाराने जाणले पाहिजे
सदैव शिकण्याचे ध्येय
नसा-नसात भिनले पाहिजे

कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी
कधीच कुठलेही भय नसते
कधीही काहीही शिकू शकतो
शिकण्याला ठराविक वय नसते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सल्ला महत्वाचा

Submitted by vishal maske on 9 September, 2015 - 21:55

सल्ला महत्वाचा

काळ्या काळ्या ढगांनी
मनी हर्ष दाटत आहेत
थेंब-थेंब पावसाचेही
जनी जल वाटत आहेत

दुष्काळंच दाटलाय अजुनही
भविष्यात पाणी टिकलं पाहिजे
थेंब-थेंब पाणी वाचवुन वाचवुन
पाणी जपायला शिकलं पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - कुंपण

Submitted by vishal maske on 8 September, 2015 - 22:15

कुंपण

शेताला कुंपण घातल्याने
शेताची चिंता मिटत नाही
वाढत्या नैतिक बदलांमुळे
आता सुरक्षित वाटत नाही

अनुभव येता समजेलंच
आम्ही अफवा वाटत नाही
सांगा कोण गँरंटी देईल
की कुंपण शेत लुटत नाही

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पाऊस वार्ता

Submitted by vishal maske on 8 September, 2015 - 09:25

पाऊस वार्ता

पडत्या थेंब-थेंब पावसाने
आता मनं सुखावत आहेत
मना-मनातील उत्स्फूर्तानंद
मना-मनात ना मावत आहेत

प्रसार माध्यमातुन प्रसारत
सुख वाटले जात आहेत
पाऊस नाही आला तरीही
पाऊस वार्ता येत आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - शेती