रिल्स रिपब्लिक

Submitted by Revati1980 on 10 February, 2024 - 07:37

" सनी लिओनीचा चेहरा तुमचा आदर्श असेल तर तुमच्या मुली फक्त सनी लिओनी बनण्याचेच स्वप्न बघतील " . : तस्लिमा नसरीन.

सनी लिओनीचा ज्या वर्षी बिग बॉस मध्ये प्रवेश झाला त्या वर्षी गुगल सर्चमध्ये तिचे स्थान पहिल्या क्रमांकावर होते. पॉर्न इंडस्ट्रीची पाळेमुळे त्यानंतरच भारतात रुजू लागली. घराघरातली तरुण मुलं आता सनी लिओनी पासून मिया खलिफा, अंजली कारा, माया बाझीन, शाझिया सहारी, गया पटल,
उर्फी जावेद इ. पर्यंत सगळे पॉर्न स्टार्स ओळखू लागली. राज कुंद्रा नावाचा भारतीय पॉर्न फिल्म डिरेक्टर पण उदयाला आला. सनी लिओनीच्या मागे, ती जिथे जाईल तिथे हजारोंच्या संख्येने मुलेच काय तर अगदी पन्नाशीचे लोकही गर्दी करायला लागले. त्याचा परिणाम म्हणजे आज टिकटॉक आणि रिल्सच्या नादी लागून शॉर्ट्स बनवणाऱ्या भरकटलेल्या मुली आणि मुले. टिकटॉक, शॉर्ट्स आणि रिल्स आता नॅशनल ऑब्सेशन झाले आहे. वडीलच त्यांच्या मुलींसोबत टिकटॉकमध्ये नाचतायत. रिॲलिटी शो सारख्या वाह्यात कार्यक्रमात पालकच त्यांच्या लहान मुलींना (४ -५ वर्षांच्या) शरीर हलवायला सांगून टाळ्या वाजवतात. इंस्टावर आल्यावर तर हे सगळे इतके चेकाळतात कि बेशरम रंगला पण एखादा नवा रंग शोधून द्यावा लागावा.

आपल्या तरुण पिढ्या वाचवणे दिवसेंदिवस कठीण होत असताना खोल गर्तेत जाणाऱ्या अशा नैतिकतेचे अधःपतन होत चाललेल्या समाजाकडे आपण कसे वाटचाल करत आहोत, हे दिसतच आहे. पाश्चिमात्य देशातली कुटुंबे उद्ध्वस्त, निराश, एकाकी होऊन मादक पदार्थांच्या आहारी गेलेले आहेत आणि त्यांनी स्वतःचे आयुष्य बरबाद करून घेतले आहे. आता तर ते फेंटानिलचे दिवाने झाले आहेत .

आजकाल मेट्रो, रस्ते, सिग्नल, पार्किंग एरिया अशा ठिकाणी मुली अर्ध विवस्त्र स्थितीत रील्स बनवतात. नग्नता हा प्रसिद्धी मिळवण्याचा आणि रातोरात पैसे कमवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे हे मुलींना समजले आहे. या कारणास्तव, इंस्टाग्राम सॉफ्ट -पॉर्नचा अड्डा बनला आहे. आपली मुलगी सेलिब्रिटी झाल्याचा आनंद पालकांना आहे. मुलं नग्न होऊ शकत नाहीत म्हणून त्यांचा शॉर्टकट माचो इमेज दाखवणे, शिवीगाळ करणे आणि अश्लीलता दाखवणे आहे. वेस्टर्न समाज जे करतोय ते कॉपी करायचे. तिथे निप्पल शो होत आहेत, नितंब दाखवण्याची स्पर्धा सुरू आहे, त्यामुळे येथेही लहान मुलांना खाऊ घालण्याच्या किंवा आंघोळीच्या बहाण्याने एखाद्याच्या शरीराच्या अवयवांचे व्हिडिओ दाखवले जात आहेत. गावातल्या मुली चुलीवर चपात्या बनवण्याच्या बहाण्याने आपली क्लीवेज दाखवत आहेत. थोडे अजून पुढे जाऊन काही जण किसिंग व्हिडिओ पोस्ट करत आहेत. एवढेच काय ओन्ली फॅन अँप्लिकेशन वर स्वतःचा समागम दाखवून पैशाची मागणी करत आहेत. इन्स्टाची मालकी असलेल्या फेसबुकने तर आता स्तनाग्रे किंवा नितंब दाखवण्याची परवानगी दिली आहे. तुमच्या आयडीवर अश्लीलता पसरवत असल्याची तक्रार देखील करता येणार नाही अशी सोय केली आहे. ऍनिमल चित्रपटाने सॉफ्ट पॉर्न बॉलीवूडची पायाभरणी केली.

तस्लिमा नसरीनने डाव्यांना अगदी जवळून पाहिले होते. समाजात डाव्या विचारसरणीचा शिरकाव कशा प्रकारे होतो होतो हे तिले ठाऊक होतं कारण डाव्या चळवळीशी ती संबंधित होती . क्रांतीच्या नावाखाली डावे कसे मुलींना MBMC चे बाळकडू पाजवून मुक्त सेक्सच्या नावाखाली सामुहिक बलात्कार करतात आणि कायद्याच्या दृष्टीने हा बलात्कार ठरत नाही कारण आता तू सज्ञान आहेस, माझे शरीर माझी मर्जी आहे, हे सांगून तिचे शोषण करतात. मग ती मुलगी एक प्रकारची वेश्या बनली की, समाज तिला तुच्छ लेखू नये, म्हणून सगळ्यांनीच एस्कॉर्ट सर्व्हिसचा बिजनेस करावा असं तिला वाटतं.

इन्स्टा अशा गेमचे सर्वात सोपे माध्यम तर इंटरनेट या CulturalCrusade चे सर्वात मोठे शस्त्र बनले आहे. तुम्ही त्यावर बंदी घातली तर VPN आहेच . टिकटॉक वर बंदी घातली तेव्हा इन्स्टा आला. इन्स्टा वर बंदी घातली तरी हे थांबवता येणार नाही. पॉर्नवर बंदी घालायला गेलात तर " हा आमच्या गोपनीयतेवर हल्ला आहे " अशा बोंबा मारतील.

आपल्या तरुण पिढ्या वाचवणे दिवसेंदिवस कठीण होत असताना खोल गर्तेत जाणाऱ्या अशा नैतिकतेचे अधःपतन होत चाललेल्या समाजाकडे आपण कसे वाटचाल करत आहोत, हे दिसतच आहे. पाश्चिमात्य देशातली कुटुंबे उद्ध्वस्त, निराश, एकाकी होऊन मादक पदार्थांच्या आहारी गेलेले आहेत आणि त्यांनी स्वतःचे आयुष्य बरबाद करून घेतले आहे. आता तर ते फेंटानिलचे दिवाने झाले आहेत. रिऍलिटी शो मधले पालकच अशी प्रसिद्धी मिळवायला हपापलेले असतील तर त्यांना रोखणारे कोण? भारत थोड्या दिवसांनी रिल्स रिपब्लिक ऑफ इंडिया या नावाने ओळखला गेला तर आश्चर्य वाटायला नको.

......

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>>>>>>पाश्चिमात्य देशातली कुटुंबे उद्ध्वस्त, निराश, एकाकी होऊन मादक पदार्थांच्या आहारी गेलेले आहेत आणि त्यांनी स्वतःचे आयुष्य बरबाद करून घेतले आहे. आता तर ते फेंटानिलचे दिवाने झाले आहेत .
आणि भारतात हत्ती, अजगर रस्त्यावरती बिनधास्त फिरतायत.

सनी लिओनी आली तेव्हा गहजब झालेला पण कुठे आली ती मेन स्ट्रीममध्ये?

>>>>>क्रांतीच्या नावाखाली डावे कसे मुलींना MBMC चे बाळकडू पाजवून मुक्त सेक्सच्या नावाखाली ........... सगळ्यांनीच एस्कॉर्ट सर्व्हिसचा बिजनेस करावा असं तिला वाटतं.
हे जरा अतिशयोक्तीचे वर्णन वाटते.

भारत थोड्या दिवसांनी रिल्स रिपब्लिक ऑफ इंडिया या नावाने ओळखला गेला तर आश्चर्य वाटायला नको. >> म्हणजे मोदी-शहा जे करत आहेत ते पाण्यातच गेलं म्हणायचं! हा हंत, हा हंत!

भरत Lol

या रेवतीताईंचा आयडी हॅक झालाय का?

पॉर्न इंडस्ट्रीची पाळेमुळे त्यानंतरच भारतात रुजू लागली. >>> जाणकारांनी भाष्य करावे.
टिकटॉक, शॉर्ट्स आणि रिल्स आता नॅशनल ऑब्सेशन झाले आहे>>>हे मात्र अगदी बरोबर.
भावना पोचल्या पण लेख अतिशयोक्ती वाटला.

>>> >>> पॉर्न इंडस्ट्रीची पाळेमुळे त्यानंतरच भारतात रुजू लागली. >>> जाणकारांनी भाष्य करावे.
मी आता मायबोलीवरचं कोण 'मी भारतातील पोर्न इन्डस्ट्रीबाबत जाणकार आहे' असं लिहितंय ते बघायला उत्सुक आहे. Lol

"मी आता मायबोलीवरचं कोण 'मी भारतातील पोर्न इन्डस्ट्रीबाबत जाणकार आहे' असं लिहितंय ते बघायला उत्सुक आहे. " - Lol

लेख एकांगी किंवा आतिशयोक्ती असा वाटला नाही.
पण सरसकटीकरण केले आहे असे म्हणू शकतो.

भारतभर हे चित्र नाही. पण आपल्या आजूबाजूला नाही म्हणून कुठेच नाही असेही नाही. फेसबूक वर छोट्या छोट्या व्हिडिओ क्लिप बघत असताना मलाही अचानक काही व्हिडिओ बघून धक्का बसतो की फेसबुकवर हे असे कधीपासून अलाऊड झाले??

त्यामुळे मुलांवर मुळातच योग्य ते संस्कार करणे आणि मुले काय करतात, फोनवर काय बघतात, कोणासोबत राहतात यावर लक्ष आणि गरज पडेल तिथे अंकुश ठेवणे गरजेचे आहेच.

"मी आता मायबोलीवरचं कोण 'मी भारतातील पोर्न इन्डस्ट्रीबाबत जाणकार आहे' असं लिहितंय ते बघायला उत्सुक आहे. "
>>>>>>>

जाणकार असण्याचे निकष माहीत नाहीत. पण रसिक प्रेक्षक बरेच असतीलच.. मग त्यातले कोणी अभ्यास करून माहिती घेऊन जाणकार बनत असेल तर ते कौतुकास्पदच आहे की..

रसिक ?????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????
बटबटीत ओंगळ पॉर्न करता रसिकता लागते?

मोदी शाहा आणि राममंदीर उल्लेख का येत आहेत या धाग्यावर? मी काही मिस केले का? की दुसऱ्या धागावरील चर्चेचा संदर्भ आहे?

बटबटीत ओंगळ पॉर्न करता रसिकता लागते?
>>>>

रसिक शब्द कुठलीही कलाकृती आवडीने बघणारे या अर्थाने वापरला होता. त्या कलाकृतीच्या दर्जाबद्दल भाष्य नव्हते.

बाकी सारेच काही बटबटीत ओंगळ नसते. मी शाहरूखचा चाहता आहे, असे काही बघणारही नाही. सवयीने दुसऱ्या सेकंदालाच समजते की आत काय आहे. स्किप करून पुढे जायचे..

तरी रसिक व पॉर्न हे शब्द एका दमात घेता येणार नाहीत.
अर्थात मी २० वर्षांपूर्वी अमेरीकेतील आर्टिस्टिक पॉर्न -अ‍ॅवॉर्डसचा एक कार्यक्रम टिव्हीवरती पाहीलेला होता. मुलगी लहान असल्याने चटकन बंद केला. तेव्हा अशी अ‍ॅवार्डस असतात.

“बाकी सारेच काही बटबटीत ओंगळ नसते. मी शाहरूखचा चाहता आहे, असे काही बघणारही नाही. सवयीने दुसऱ्या सेकंदालाच समजते की आत काय आहे. ” - Rofl दोन उलटे, एक सुलटा Happy

"मी आता मायबोलीवरचं कोण 'मी भारतातील पोर्न इन्डस्ट्रीबाबत जाणकार आहे' असं लिहितंय ते बघायला उत्सुक आहे. " >> Lol

स्वाती Biggrin
तसही भाष्य करायला जाणकार असायलाच पाहिजे असे नाही . कोणीही करू शकतं .

हा हा फेरफटका.. भले तो जोक होता.. पण ते खरे देखील आहे.. मी याबाबतीत सुद्धा ॲक्च्युअली शाहरूख फॅनच आहे... प्रेम रोमान्स प्रमाणे पोर्नमधील fantasy सुद्धा माझी साफसुधरीच असते. मला ते माझ्या विचारांवर पटले तरच मी ते एन्जॉय करू शकतो इतके सोपे गणित आहे.

असो, धाग्यांचा मूळ विषय वेगळाच आहे..

सारेच काही बटबटीत ओंगळ नसते. मी शाहरूखचा चाहता आहे, असे काही बघणारही नाही.>>> Rofl
न बघताच कळते बटबटीत आहे की नाही ते Wink जिथे तिथे शाखा घुसवणे सोड तेंव्हा कॉमेंट सीरियसली घेऊ..

लेखात मांडणी थोडी अतिशयोक्त असेल. पण लेख विचार करण्यास भाग पाडणारा आहे.

नुकताच संत व्हॅलेंटाईन यांच्या नावाने साजरा केला जाणारा शिमगा झाला.
या शिमग्याला म्हणजे राजरोसपणे, कसलीही भीडमुरवत न बाळगता खुलेआम प्रेमाचा बाजार मांडून जनता बसली होती. आणि गठ्ठ्यानं!
पण, भर लॉ कॉलेज रोडवर, तिथल्या हॉटेलांत दिवसाढवळ्या आजूबाजूला कोण आहे वा नाही, याची पर्वा न करता (क्षमस्व, ग्राम्य शब्द वापरतोय) चुम्माचाटी चालू असावी याचा मला खरोखरंच खेद वाटला.
मान्य आहे की भारताची बहुसंख्य जनता तरूण आहे. त्यांच्या तारूण्यसुलभ भावभावनांना वाट मिळाली पाहिजे, निचरा झाला पाहिजे. पण म्हणून रस्त्यांवर भावनांचा पूर येऊन त्याची गटारं का होऊ द्यायची?

मी स्वतः इंस्टाग्राम, टिकटॉक, स्नॅप वा तत्सम प्रकारांपासून दूर आहे. फेसबुक या परंपरागत समाज माध्यमाशी जेमतेम संबंध राखून आहे. त्यामुळे त्याविषयी तर काही मत मांडू शकत नाही.
पण विविक्षित व्हॉट्सॅप ग्रुपवर जितक्या सहजतेनं पॉर्न क्लिप्स शेअर केल्या जातात, त्यावरून हा प्रकार किती बोकाळला आहे याची कल्पना येते.
मी स्वतः पैज लावून तुम्हाला खुल्या इंटरनेटवर दहाव्या कीस्ट्रोकला पॉर्न क्लिप्स दाखवू शकतो. (तरीही मी या बाबतीत माबोवरचाही एक्स्पर्ट नसेन.)

थांबा हं, मला कालसुसंगत भान आहे. स्मरातुराणां न भयं न लज्जा हे कालातीत आहे.
मी शिमग्याचा उल्लेख मुद्दाम केला. या सणाची महती पूर्वापार अपार आहे. रंग मत डारो शाम पासून सुरवात होऊन ते थांबायचं कुठे हे विसरायला लावणारा तो दिवस आहे, अशी ख्याती आहे.
माझ्या बाल-तरूणपणी सारसबागेत डावीकडे असा एकांत शोधणाऱ्या जोडप्यांचा राबता कायम असायचा. त्यामुळे देवदर्शनाला येणारा वा मुलाबाळांना घेऊन खेळायला येणारा समुदाय ती दिशा टाळायचा.
माझ्या शालेय जीवनात ज्याला पिवळ्या पानांची पुस्तकं म्हटले जाई ती वाचली नाहीत असा कांगावा मी करणार नाही.

म्हणजेच हे नवीन नसलं तरी,... तरीही हा उद्रेक भीषण आहे. त्याची व्याप्ती, त्याची निव्वळ संख्या बघता समाजधुरिणांनी याचा योग्य तो परामर्ष घेणं आवश्यक आहे.

मी पुण्याच्या अशा भागात रहातो, जिथे एक टेकडी आहे, तुलनेने विरळ वस्ती आहे, दोन-तीन छोट्या बागा एखाद किलोमीटरच्या परिसरात आहेत. एखाद-दोन शाळा आणि कॉलेजेस आहेत. झाडांनी आच्छादलेले रस्ते आहेत. इथे वर्दळ कमी, संध्याकाळी वा रात्री थोडासा अंधार आणि शोधला तर पब्लिक प्लेसमध्ये एकांत आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा तरूण (आणि नॉट सो तरूण) युगुलं या आडोश्यांना बसलेली असतात.
त्यांच्या लीला बघू नये म्हटलं तरी दिसतात. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतं आहे.

या खेळात मियां-बिबी राजी असतील तर मला काय पडली आहे? ते जाणे, त्यांचं नशिब जाणे.
फक्त आडोश्यामागे करण्याच्या गोष्टी चव्हाट्यावर आणल्याचं, "काळ सोकावतो"-टाइप दुःख मात्र होणार.
पण... आणि हा पण फार महत्त्वाचा आहे. जर मामला जुलूम-जबरदस्तीचा असेल तर मात्र काळजी करण्याचं कारण आहे.
बऱ्याच वेळा ही मंडळी बघून वाटतं, की यात स्त्रीपात्राचा मनापासून सहभाग किती आणि बळजबरी किती? की इथं अन्याय घडतोय?
इथेच स्वत-च्या नेभळटपणाचा, षंढपणाचा राग येतो. त्यांना खडसावून विचारण्याची, मार्गी लावण्याची सोय उरली नाहीये इतकं ते समाजात रूढ झालंय.

मुद्दा या हतबतेचा आहे. समाजाची घडी बदलताना प्रश्न असणारचं.
पण त्यांना उत्तर शोधण्याची शक्ती, वृत्ती, कल्पकता, आणि वेळप्रसंगी कठोर, अप्रिय निर्णय घेउन ते राबविण्याची क्षमता आपल्या समाजात उरली आहे का?

Abuva +१

स्मोकिंग, ड्रिंकिंग, लेट नाईट पार्टी वगैरे ठीक आहे, पण पण चुम्माचाटी अजिबात आवडत नाही असे डाव्या सैयाजींना स्पष्टपणे सांगताना.

"मी आता मायबोलीवरचं कोण 'मी भारतातील पोर्न इन्डस्ट्रीबाबत जाणकार आहे' असं लिहितंय ते बघायला उत्सुक आहे. " >> Lol

असो, धाग्यांचा मूळ विषय वेगळाच आहे.. >> हे तू लिहावेस ? कालाय तस्मे नमः !!! Lol

Pages