जपानी/ कोरीअन पद्धतीचा स्वयंपाक कसा करावा? युक्त्या, पाककृती, घटक पदार्थ, अनुभव

Submitted by अश्विनीमामी on 4 December, 2023 - 06:18

सध्या कोरीअन बरोबरच जपानी पदार्थ बनवायचे डोक्यात फार आहे. जपानी सोबा नूडल रेस्टॉरंट चे खूप च व्हिडीओ बघितले, टुको ममा व कोरिअन बायकांचे सकाळी पाच ला उठून ब्रेफा व डबे, बेंतो बॉक्सेस बनवायचे व्हिडिओ बघित ले.

मुंबईत पा पा या व यौत्सा अश्या हाय एं ड जागांमध्ये जपानी जेवण जेवुन पण आले. पण जे तिथे अगदी घरगुती जेवण आहे. आईच्या हातचे टाइप
ते इथे फार हाय एंड अनुभव आहेत. मला स्वतःला घरी बनवायला शिकायचे आहे.

आज दुपारी वेळ होता तर अमॅझॉन वर बरेच काय काय घटक पदार्थ विश लिस्टीत घातले आहेत. सुशी मेकिन्ग किट, दाशी वासाबी, मिसो,
सोबा नुडल्स मिरिन साके सॉय सॉस हे सर्व यादीत आहे. अजुन काय घ्यावे? स्टिकी राइस पण एक किलो नोरी शीट्स, बोनिटो फ्लेक्स घेतले आहे. घरी तीळ आहेत.

सरावाने चॉपस्टिक्स पण नीट वापरायला येउ लागले आहे.

बीफ काही इथे मिळत नाही. पण पोर्क मिळते व रेड मीट काही मी इतके खात नाही. पण फिश व चिकन मिळून जाते. प्रॉन टेंपुरा फ्लोअर मिक्क्ष पण मागवले आहे. मला टेंपुरा फार आवडतो. प्लस सूप्स सलाड, मशरूम्स, स्प्रिन्ग अनिअन्स गाजर बटाटे स्वी ट पटॅ टो इथे मिळतेच.

नव्या वर्शात काही तरी नवे शिकायचे व करायचे म्हणून प्रयत्न करुन बघत आहे. मला त थाई स्वयंपाक येतो. पण साउथ कोरीअन व जपानी शिकायचे आहे. तुमचे अनुभव व माहिती लिहा. रेशिप्या टाका.

२५ तीस वर्शे भारतीय स्वयंपाक करुन कंटाळा आला आहे. पोळ्या बडवायचा पण. खाणे कमी आहे त्यामुळे थोडे थो डे जपानी फूड पोट भरीचे होते आहे.

आरिगातो गोझाईमास.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages