सिल्क्यारा बोगदा कोसळण्याची घटना

Submitted by उदय on 26 November, 2023 - 22:25

चार-धाम परियोजने ( Chara Dham Project - CDP) अंतर्गत सिल्क्यारा, उत्तराखंड, येथे ४.५ कि मी लांबीच्या बोगद्याचे काम सुरु आहे. १२ नोव्हेंबर २०२३ या दिवशी पहाटे ५:३० वाजता या बोगद्याचा काही भाग कोसळला . घटनेला दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ झाला आहे, आणि बोगद्याच्या आत मधे ४१ कामगार अडकले आहेत. CDP प्रकल्प ८९० किमी लांबीचा आहे आणि एकंदर प्रकल्पाचा खर्च १२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त अपेक्षित आहे. बोगद्याच्या बांधकामामुळे यात्रेकरुंचा प्रवासाचा मार्ग २५ किमी ने कमी होणार आहे. बोगद्याच्या बांधकामाचा कंत्राट ( नवयुगा इंजिनियरींग कंपनी लिमिटेड कडे होता.

कामगारांना बाहेर सुरक्षित पणे काढण्याचे कार्य सुरु आहे. किचकट आणि आव्हानात्मक काम आहे. या सर्व अडकलेल्या कामगारांना सुरक्षितपणे बाहेर पडता यावे यासाठी माझी प्रार्थना.

WhatsApp Image 2023-11-23 at 16.59.11.jpeg
एक छान माहितीपूर्ण व्हिडिओ.

https://www.youtube.com/watch?v=liIHfBZ7TvU

अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. एव्हढा मोठ्या प्रकल्पाचे बांधकाम हाती घेण्या अगोदर,
(१) Geological/ GeoTechnical/ GeoPhysical survey असे सर्वेक्षण/ अभ्यास झाला होता का?
(२) Environment Impact Assessment या बांधकामाचे पर्यावरणावर काय विपरीत परिणाम होतील याचा अभ्यास झाला होता का? पर्यावरणा बद्दल आस्था असणार्‍या लोकांचा सुरवातीपासूनच या प्रकल्पाला विरोध होता. अगदी सर्वोच्च न्यायालया पर्यंत दाद मागण्यात आली होती. ८९० किमी चा प्रकल्प लहान ५३ भागांत दाखवला गेला.
https://www.theindiaforum.in/article/char-dham-pariyojana-high-risk-engi...
(३) सिल्क्यारा geological fault line var आहे. तसे असेल तर बोगद्याच्या कामाला परवानगी मिळालीच कशी?

बांधकामाबद्दल
(१) बोगदा तयार करतांना कुठले तंत्रज्ञान वापरले गेले होते? कुठले तंत्रज्ञान वापरायचे हे तिथल्या लोकल Geology वर अवलंबून आहे.
Drill Blast Method DBM - ड्रिल करायचे, आतमधे डायनामाईट ठेवायचे, आणि उडवायचे पण यामधे तेव्हढे नियंत्रण नसते. ज्या भागांत हे काम सुरु होते त्या भागाचा अभ्यास केला असेल तर असे तंत्रज्ञान वापरणे योग्य नाही. तिथे Tunnel Boring Method TBM वापरायला हवे होते.
(२) ४.५ कि मी लांबीच्या बोगद्यासाठी आपत्कालीन बाहेर पडण्यासाठी ( Escape tunnel in case of emergency) कुठेही मार्ग नाही. आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग नसणे हा अक्षम्य हलगर्जीपणा आहे. सर्व प्रकारच्या सरकारी कागदपत्रात Escape tunnel चा उल्लेख असतांना ही प्रत्यक्षात तो नसणे हे काय दर्शवते?
(३) सिल्क्यारा च्या बाजूने असणार्‍या बोगद्याच्या तोंडा पासून २०० मिटर पर्यंत (मेटल जाळी +सिमेंट काँक्रिटचा ) छताला सपोर्ट आहे, पुढे नव्हता (किंवा आधी होता, नंतर पडला, पुढे काही डागडूजी करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचा विपरिणाम म्हणून हा अपघांत झाला ? ) आणि तिथेच ६० मीटरचा भाग कोसळला.
(४) डोंगर पोखरल्यावर, वरचा/ बाजूचा भाग कोसळू नये यासाठी जो काही structural सपोर्ट दिला गेला आहे, दिला जाणार होता तो वर असलेल्या भल्या मोठ्या मातीला / दगडाला सर्व काळांत रोखून धरण्यास पुरेसा होता का? यासाठीच वरिल सर्वेक्षणाचा अभ्यास महत्वाचा आहे.

सुरवातीला या पडलेला भागातून माती दूर करत, आतमधे १ मीटर व्यासाचा पाईप टाकणार होते. त्यात अनेक आव्हाने आहेत. आता जोडीला vertical drilling तसेच इतर बाजूनी काही तरी करण्याचे प्रयत्न होणार आहेत. जास्त खोलांत न जाता, कुठलिही कृती केली तरी आज जे structure (कोरलेला बोगदा + त्याला लावलेला सपोर्ट + डोंगर सर्व मिळून) आहे ते कमजोर होत रहाणार. बोगद्याचा इतर भाग आज नाही, पण कुठल्या क्षणाला कोसळेल हे सांगता येत नाही.

हा मार्ग चीन सिमेजवळ नेतो. शस्त्र आणि सैन्याची ने आण करण्यासाठी आणि म्हणून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा मार्ग बनत होता असे म्हटले जाते. पण गेल्या काही वर्षातच, या मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटनांत लक्षणीय वाढ झालेली आहे आणि अनेक वेळा मार्ग बंद ठेवावा लागला आहे. युद्धाच्या वेळी अशा बेभरवशाच्या मार्गावर विसंबून रहाणे परवडणारे नाही. CDP मुळे पर्यावरणास मोठी हानी पोहोचत आहे आणि ते जास्त चिंताजनक आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाला ( डोंगराला) आव्हान देणे विनाशाला आमंत्रण आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरनॉल्ड dix ह्याची बीबीसी नी घेतलेल्या मुलाखती ची लिंक रघु आचार्य जी ह्यांनी दिली हे अतिशय उत्तम काम केले.

भारतीय youtuber,स्वयंघोषित तज्ञ ,राजकीय पक्षांनी स्पॉन्सर केलेले तज्ञ हे सर्रास खोटे बोलतात.

त्यांच्यावर बिलकुल विश्वास नाही.
Dix ह्यांच्या मुळे खरी स्थिती सामान्य लोक आणि जगाला माहीत पडली

भारताने वर्ल्ड कप हरावा व भारतीय क्रिकेट चाहत्यांना दुःख व्हावे अशी आशा ठेवलेले, तसं झाल्यावर मायबोलीवर आनंद व्यक्त करणारे पुरोगामी. तेव्हा जसं भारताला अपयश आलं तसंच या लोकांना सुखरूप काढण्याच्या बाबतीत भारताला अपयश यावं अशी अपेक्षा काही मोदीविरोधक नक्कीच ठेवून होते. ४१ पैकी सगळे किंवा निदान थोडे तरी लोक मेले असते तर माजी गो चंदी म्हणत मोदींविरुद्ध शिमगा करण्याची एक आयतीच संधी समोर दिसत होती. सुदैवाने पुरोगाम्यांचे निगेटिव्ह vibes म्हणा, wishes म्हणा- प्रभावी ठरले नाहीत.
चंद्रयान मोहीम अयशस्वी झाल्याचा आनंदही असाच फार काळ टिकला नव्हता कारण चंद्रयान-२ वर्क झालं. आता फक्त न मिळालेल्या वर्ल्ड कपचाच काय तो आनंद आयुष्यात उरला असेल.

====≠===

भारताने वर्ल्डकप मधल्या फायनलच्या आधीच्या सगळ्या म्याचेस जिन्कल्या. वर्ल्डकप नंतर ओस्त्रेलिया ला सलग दोन मैच हरवले.
यातून एकच सिद्ध होतो की आपन फायनल फक्त प x x ती मुलंच हरलो.
बरं झालं बोगद्याजवल गेली नाही पxx ती.

लिब्ब्यांना नक्की काय सांगायचं आहे ते त्यांना तरी कळत का ?
एका धाग्यावर भाजप वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवत नाही , राफेल ला लिंबू मिरची बांधली , करोना काळात ताटल्या वाजवल्या म्हणून ओरडत असतात.
आणि दुसऱ्या धाग्यावर वर्ल्ड कप फायनल च्या दिवशी मोदी हजर होते म्हणून भारत मॅच हरल्याची बोंब मारतात.
मग मॅच हरल्याचे संबंध इंदिरा गांधी च्या जन्मापर्यंत जोडा की ......

कट्रर हिंद आहे. हिंदु असल्याचा गर्व नाहि तर माज आहे.
शकून अपशकून हिंदु धर्मात आहे.
२०२४ ला पांधर्या पायाची अपशकूनी पाल घालवनारच.

हो , पाहिले ना !
त्या बोगद्यात अडकलेल्या त्या बिचाऱ्या कामगारांबद्दल
लिंब्यांची किती तळमळ होती ते .
ते कामगार बोगद्यातून सुरक्षित बाहेर आले आणि लिब्ब्यांच्या
चार - धाम परियोजना च्या नावाखाली मोदी सरकार करत असलेल्या उधळ पट्टी बद्दल लिहून तयार असलेल्या अजून अनेक पोस्टिं अक्षरशः शेणात जाऊन पडल्या .
लीब्र्यांना नाचायला अजून एक कारण मिळून दिले नाही त्या बद्दल चार धाम परियोजना मधील सगळ्या देवांना साष्टांग दंडवत !!!!!

हा धागा पुरोगामी विरूद्ध रानटी , लिबरल्स विरूद्ध बुरसटलेले , रॅशनल्स विरूद्ध समर्थांनी लक्षणे सांगितलेले महालोक अशा बायनरीत नेण्याचे प्रयत्न इग्नोर केलेल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन !

Dix हे सुद्धा मंदिरमधील प्रार्थनेत सहभागी झाले होते.

आता dix हे विज्ञान वादी नाहीत तर अंधश्रद्धा असणारा व्यक्ती आहे असा निष्कर्ष पण भारतीय
पुरोगामी काढू शकतात.

सोनिया लग्न करून आल्यावर 1980 ते 1991 या 11 वर्षात संजय, इंदिरा, राजीव यांचे तिन्ही अनैसर्गिक मृत्यू झाले हे सर्वांना माहीत आहेच.
इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजे प्रियंका आणि रॉबर्ट वदराचं 1997 साली लग्न. त्यानंतर मिशेल वदरा-रॉबर्टच्या सख्ख्या बहिणीचा अपघाती मृत्यू 2001, रिचर्ड वदरा- सख्ख्या भावाची आत्महत्या 2003, सख्खे वडिल राजेंद्र वदरा 2009 मध्ये पंख्याला लटकलेले मृतावस्थेत आढळले. 12 वर्षात तीन अनैसर्गिक मृत्यू.
याकडे एक curious tragic series of coincidences म्हणून बघा. पनौती म्हणू नका.

उद्ध्वस्त घराण्याचे एक ही कॅरेक्टर धड नाही , काढायला गेलो तर कांद्या सारखे असंख्य पापुद्रे निघतात .
म्हणून विनाकारण भाजपच्या नेत्यांवर वैयक्तिक हल्ले करू नयेत ही समज गुलामांना कधी येणार कोणास ठाऊक ?

म्हणून विनाकारण भाजपच्या नेत्यांवर वैयक्तिक हल्ले करू नयेत
कुनी केले हमले ? कोनत्या नेतावर ? पनवति हा शब्द पना नाही बोलला. कुनाचं नाव पन नाहि घेतलं. तरि पन काहि जनांच्या बुडाला आग काआ लागलि ?

हो , पाहिले ना !
त्या बोगद्यात अडकलेल्या त्या बिचाऱ्या कामगारांबद्दल
लिंब्यांची किती तळमळ होती ते .

कामगर भोगद्यात अडकले तेव्हा लिंबे फायनला बगायला गेले होते , विमानात बसुन हवेत ढगांना टाटा करत होते.
विष्नू मंदीरात जाऊन देवाला झाकुन टाकुन फोटो काढत बसले होते.

चार धाम यात्रा हायवेचा पर्यावरणावर काय परिणाम होईल याबद्दल सरकारने नेमलेल्या समितीने दिलेले धोक्याचे इशारे मोदी सरकारने धुडकावून लावले , असं वाचलं.
जोशीमठ मध्ये भूस्खलनामुळे इमारती, रस्ते धोकादायक झाले होते. तिथून लोकांचं स्थलांतर करावं लागलं होतं, त्याबद्दलच्या बातम्या अचानक थांबल्या.

इथे बोगदा पडणे , त्यात कामातली ढिलाई, धोक्याच्या इशार्‍यांकडे दुर्लक्ष , याला जबाबदार असणारे लोक यांबद्दल चर्चा होऊ नये यासाठी आटापिटा चाललेला दिसतो आहे.

आणि पनवती हा शब्द तुम्ही जितका वापराल , तितका तो तुमच्यावरच उलटेल. मोदी = पनवती हे समीकरण तुम्हीच लोकांच्या मनात ठसवत आहात. अडकलेले मजूर बाहेर येऊ लागताच आज तक अँकर अंजना ओम कश्यपने तिच्या तिथल्या फील्ड रिपोर्टर मौशमीला म्हटलं की तुझं तिथे जाणं हा एक शुभशकून ठरला. मजुरांची सुटका होऊ लागली.
यावर मौशमी म्हणाली - हो. मी शुभ आहे , पनवती नाही हे सिद्ध झाले.
यावर अंजनालाही हसू आवरता आलं नाही.
आता हे चॅनेल आणि अँकर दोन्ही मोदी सरकारचे कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या डोक्यातही पनवती शब्द फिट बसला आहे.

मुद्दामून धागा भरकटवण्यात प्रयत्न होत आहे. त्याला प्रतिसाद मिळत नाही हे दिसून आल्याने हव्या तशा प्रतिक्रियांची "सोय" केली आहे का?

रूरकीचं अभियांत्रिकी कॉलेज हे ऑस्ट्रेलिया पेक्षा जुने आहे. आता ते आय आय टी म्हणून ओळखले जाते. इथे आरक्षण कोट्यातून प्रोफेसर नाहीत. तरीही आपल्याला ऑस्ट्रेलिया वरून प्रा. अर्नोल्ड डिक्स यांना पाचारण करावे लागते. रूरकी जास्त जवळ आहे घटनास्थळापासून. याचा अर्थ काय होतो?

रॅट मायनिंग टीमचा कॅप्टन मुन्ना कुरेशी होता ज्याच्या मुळे मजूर एक महिना आधीच बाहेर पडले.

मुन्ना कुरेशी आज नॅशनल हिरो असायला हवा होता.
प्रा. डिक्स यांनी इथल्या मेरीट वर प्रश्न लावायला हवे होते.

कारण दुर्घटना घडली कि त्याला आरक्षण जबाबदार असा धोशा लावला जातो. मायबोली सुद्धा अपवाद नाही. हा मुद्दा इथे आणण्याचे कारण या महिन्यात संबंध नसताना अनेक धाग्यावर हा प्रचार झालेला आहे.

खासगी क्षेत्रात गुणवत्ता असते असे एकांगी ढोल वाजवले गेलेत. ते ही गेल्या दोन तीन आठवड्यात.

बोगद्यात काम नवयुग इंजिनिअरिंग एंटरप्राइजेस या कंपनीला दिले होते. ही खासगी क्षेत्रातील कंपनी आहे. डिझाईन पासून भूगर्भातील रचना अहवाल ही सर्व जबाबदारी याच कंपनीची होती.

असे असताना दुर्घटना झाली.
खासगी क्षेत्रात गुणवत्ता असताना कसे काय झाले?
याच कंपनीला अन्य कामे मिळाली आहेत.

वरून क्रेन पडून मजूर दगावले ते कामही याच कःपनीकडे होते.
तेलंगाना आंध्र प्रदेश मधे कामात अनियमितता असल्याने कंपनीला कामे दिली नाहीत.

इथल्या हिंदुत्ववाद्यांना हे अजिबात आवडणार नाही.
Hindus, Muslims together saved 41 workers in tunnel, says chief of firm that pulled off Uttarakhand rescue
The tunnel rescuers – Hasan, Munna Qureshi, Naseem Malik, Monu Kumar, Saurabh, Jatin Kumar, Ankur, Nasir Khan, Devendra, Firoz Qureshi, Rashid Ansari and Irshad Ansari – are aged between 20 and 45.
Vaqeel Hasan, who owns Delhi-based Rockwell Enterprises, said: “In our team, there are both Hindus and Muslims, and people from both religions worked hard to save these 41 lives. None of them could have done this alone, and this is the message I want to give to everyone… We should all live in harmony and not spread the poison of hate. We all want to give our 100 per cent for the country… Please convey my message to everyone.”

लोल्स पुरोगाम्यांना दुःख लपवता येत नाहीये ४१ जण वाचले त्याचं.
आता दोनच मुद्दे तुमच्यासाठी . एक तो जितनी आबादी उतना आरक्षण आणि दुसरा मोदींना पनौती म्हणणं, शिव्या देणं. करत राहा ते.
४१ लोक मेले असते तर त्यांच्या जाती टाकल्या असत्या ना इथे. जशा पुलवामात तुम्ही याद्या बनवलेल्या जातनिहाय. पण सैनिकांच्या जाती काढणारे आणि जातीय द्वेषातून स्त्रियांचा अपमान करणारे यांचा थेट वरून न्याय होतो.

आपल्या मनातले विचार दुसर्‍याचे म्हणून लिहायची तुमची सवय फार जुनी आहे. तुम्ही तीच तीच विकृत वाक्य अनेकवार लिहूनही इथे हवे तसे प्रतिसाद येत नाहीत, म्हणून फ्रस्ट्रेशन येत असेल ना?

अशा जोखमीच्या कामात आरक्षण नसताना तथाकथित मेरीटधारी ते का करत नाहीत?
असो.
विषय पुन्हा त्याच त्या दळणावर जाणार आहे. गेल्या महिनाभरात असा अपप्रचार करूनही पोटं भरली नाहीत. आता सोदाहरण स्पष्टीकरण केल्यानंतरही तेच तेच तुणतुणे चालू आहे. याला जास्त हवा द्यायची नाही.
काही दिवस माबोसंन्यास.

नवं तुणतुणं वाजवा. ते ही घेऊन असेच एकदाच तोंडावर आपटण्याची पाळी येईल यात शंका नाही. किमान हे वर्ष सरेपर्यंत तरी तसे होऊ नये.

जोशीमठातल्या घरांना/ रस्त्यांना / इमारतींना तडे जात जाण्याच्या घटनेचा अभ्यास करण्यासाठी उत्तराखंड सरकारने एक तज्ञांची समिती नेमली होती. हा अहवाल वाचला नसेल तर जरुर वाचा. down load साठी थोडा वेळ लागतो. या प्रश्नाच्या मुळाशी जायचे असेल तर अभ्यास करण्याची अवशक्ता आहे.
https://drive.google.com/file/d/1ZHx0o4DbXnHkHQDHJQEElhDgOFsiypSx/view

आठ तज्ञांच्या समितीने तयार केलेला अहवाल सार्वजनिक करावा असे उत्तराखंड सरकारला वाटले नाही. हा अभ्यास अहवाल गुप्त ठेवण्याचे कारण नाही असे उत्तराखंड हायकोर्टाने सांगितल्यावरच अहवाल सर्वांना पहाता येतो, थोडे कष्ट पडतात.

https://timesofindia.indiatimes.com/city/dehradun/joshimath-sinking-no-r...

https://indianexpress.com/article/india/uttarakhand-hc-to-state-why-keep...

तज्ञ नी त्यांच्या अहवालात सरकार ल काय उपाय योजना करायला सांगितल्या आहेत त्याच्या शी सामान्य लोकांचा संबंध असतो.
.
असे तज्ञ लोकांचे अहवाल विविध शास्त्रीय गोष्टींवर अवलंबून असतात.
निष्कर्ष जे काढले जातात ते पण विविध किचकट तांत्रिक बाबी वर असतात.
त्या मुळे अहवाल काय आहे हे सामान्य लोकांस किती ही अहवाल तो वाचला तरी समजणे अशक्य आहे.

आता इथे काही दावा करतील आम्ही सर्व ज्ञानी आहे आम्हला सर्व विषयातील सर्व समजते .
अहवाल आम्हाला पूर्ण समजला आहे
तर असे म्हणणारा साफ खोटे बोलत आहे हे समजून घ्या.

कामगार न ची सुटका करण्यासाठी ज्या सरकारच्या विविध यंत्रणा काम करत होत्या,खासगी कंपन्यांची लोक काम करत होती,कामगार काम करत होते.
विदेशी तज्ञ काम करत होते.
सर्वांनी आप आपली जबाबदारी योग्य रित्या पूर्ण केली आहे.
प्रयत्न अगदी मनापासून केले आहे.
त्या सर्वांचे आभार.
ते सर्व ह्या महान देशाचे महान सुपुत्र आहेत.
त्यांच्या मध्ये भेद भाव फक्त कोत्या बुध्दीचाच व्यक्ती करू शकतो

उदय
सिल्क्यारा मुळे जोशी मठ गाजतेय ते पॉलिटिकल हेतू नी शुद्ध प्रामाणिक हेतू त्या मागे नाही.
भुयारी मेट्रो मुळे मुंबई ला पण धोका आहे असा अहवाल येईल .
तज्ञ समिती नेमकी तर.
देशातील सर्व हील स्टेशन स संकटाच्या छायेत आहेत.
बेसुमार वृक्ष तोड आणि बेकायदा खनन आणि बांधकाम ह्या मुळे.
देशातील सर्व मेट्रो शहर धोक्याच्या उंबरठ्यावर आहेत.
६ रिकष्टर स्कैल इतका भूकंप भारतातील मेट्रो शहरात झाला तर लाखो लोकांच्या जीवाला हानी पोहचेल.
मोकळ्या जागा च नाहीत आणि इमारती न चे बांधकाम कच्चे आहे
देशातील सर्व नद्या प्रदूषित झालेल्या आहेत.
शुद्ध पाण्याचे सोर्स कमी होत चालले आहेत
ह्या सर्व विषयाचा अभ्यास करून अहवाल देण्यास जागतिक ,आणि भारतीय तज्ञ लोकांना सांगितले तर.
अहवाल खूप भीतीदायक असेल.
देश किती मोठ्या संकटात आहे ह्याची जाणीव होईल.
जोशी मठ हे प्रकरण सध्या फक्त राजकीय हेतू नी प्रेरित होवून त्या विषयी लिहाले जात आहे.

<< जोशीमठातले तडे, सिल्क्यारा बोगदा कोसळण्याच्या घटना या केवळ wake up call आहेत. जागे व्हायची अजून एक संधी आहे
जागे व्हायचे म्हणजे काय करायचे.पिढ्यान् पिढ्या लोक तिथे राहत आहेत.
नवीन बांधकाम झाली असतील ती पाडली तरी धोका कायमच असणार आहे.
हिमालयाच्या पोटात घडामोडी होत आहेत ते माणूस थांबवू शकतं नाही.
कोणतेच आधुनिक तंत्र ते थांबवू शकत नाही.
जागा खाली करून सुरक्षित ठिकाणी जाणे हा एक मार्ग आहे
Submitted by Hemant 333 on 28 November, 2023 - 09:00. >>

------ जागे व्हायचे म्हणजे काय करायचे हा प्रश्न चांगला आहे.

सर्वात पहिले विकास कशाला म्हणायचे हे ठरवायला हवे. चांगला चकचकीत १२ मिटर रुंदीचा , ९०० कि मी लांबीचा दुपदरी रस्ता, हवे तसे/ तिथे डोंगराला पोखरुन बोगदा... हे कशासाठी तर धार्मिक पर्यटन, चार-धाम लाखो लोक भेटी देतील, पर्यटन वाढेल आणि त्याने अर्थव्यावस्थेला हातभार लागेल. आठ महिन्यापेक्षा बारा महिने यात्रा असेल तर मज्जाच मज्जा.

परिणाम काय होतो?
पर्यटन / पर्यटकांची संख्या वाढते, गाड्या/ वाहतूक वाढते, यांना सामावण्यासाठी हॉटेल/ रिसॉर्ट बांधावी लागतील. नदीच्या काठावर हॉटेल हे झाडे कापूनच होणार आहे. या सर्व बांधकामाचा भार सहन करण्यासाठी खालची जमिन/ पाया भक्कम आहे का. इमारती / रस्ते/बोगदे तयार होतांनाही soil disturbance/ soil erosion प्रक्रिया वेगाने होते. या पर्यटकांना/ हॉटेल व्यावसायाला मदत म्हणून कामगार लागणार, म्हणजे कायम स्वरुपी लोकसंख्या वाढणार... त्यांना रहाण्यासाठी घरे, सुविधा म्हणजे पुन्हा बांधकाम आलेच... हे चक्र आहे.

जंगलतोड Deforestation:
१० मिटर रस्ता रुंद करणे म्हणजे किती जंगलतोड असेल? अगोदरच Stable नसलेल्या जमिनीला/ मातीला किती disturb करत आहोत ? या रस्त्यांची रुंदी वाढविण्यासाठी झाडांची तोड करावी लागते. १ मिटरने पण रुंदी वाढवायची ते पण ९०० किमी रस्त्यासाठी, दोन्ही बाजूला अजून थोडी जास्त दोन - दोन मिटर जागा ठेवावी लागेल.
झाडे कापल्यावर तिथली माती आज आहे त्यापेक्षा unstable होणार.

जोशीमठातले तडे किंवा सिल्क्यारा बोगदा कोसळणे यातून आपण काही तरी शिकायला हवे. निसर्गाशी मिळून मिसळून राहिलो तरच विकास आहे अन्यथा विनाशाला आमंत्रण देत आहोत. समतोल राखायला हवा.

उदय.
ह्या मध्ये बोगद्याच्या आकार खूप मोठा होता त्या मुळे रिस्क पण मोठी होती असे तज्ञ लोकांचे मत आहे.
आणि ते योग्य आहे असे मला पण वाटते.
तेथील स्थिती नुसार लहान आकाराचे बोगदे च जास्त सुरक्षित असतील.

अरे वा !!!
भरत साहेबांनी रेस्कू टीम मध्ये जात धर्माचा चष्मा लाऊन लोकं शोधली !!!
अगोदर चार धाम वरून लिब्र्याना कुंथन आवरता येईना , आता वाचवणाऱ्यात मुस्लिम होते म्हणून ढोल वाजवला जातोय .
यांना मोहब्बत की दुकान ची फ्रेंचायाजी मिळाली वाटतं ....

फुरोगामी सर, तुमची तडफड मी समजू शकतो.
तुम्ही कधीच कुठे धर्म बघत नाही ना? यापुढे आपण दोघेही लक्षात ठेवू.

Pages