सिल्क्यारा बोगदा कोसळण्याची घटना

Submitted by उदय on 26 November, 2023 - 22:25

चार-धाम परियोजने ( Chara Dham Project - CDP) अंतर्गत सिल्क्यारा, उत्तराखंड, येथे ४.५ कि मी लांबीच्या बोगद्याचे काम सुरु आहे. १२ नोव्हेंबर २०२३ या दिवशी पहाटे ५:३० वाजता या बोगद्याचा काही भाग कोसळला . घटनेला दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ झाला आहे, आणि बोगद्याच्या आत मधे ४१ कामगार अडकले आहेत. CDP प्रकल्प ८९० किमी लांबीचा आहे आणि एकंदर प्रकल्पाचा खर्च १२,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त अपेक्षित आहे. बोगद्याच्या बांधकामामुळे यात्रेकरुंचा प्रवासाचा मार्ग २५ किमी ने कमी होणार आहे. बोगद्याच्या बांधकामाचा कंत्राट ( नवयुगा इंजिनियरींग कंपनी लिमिटेड कडे होता.

कामगारांना बाहेर सुरक्षित पणे काढण्याचे कार्य सुरु आहे. किचकट आणि आव्हानात्मक काम आहे. या सर्व अडकलेल्या कामगारांना सुरक्षितपणे बाहेर पडता यावे यासाठी माझी प्रार्थना.

WhatsApp Image 2023-11-23 at 16.59.11.jpeg
एक छान माहितीपूर्ण व्हिडिओ.

https://www.youtube.com/watch?v=liIHfBZ7TvU

अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. एव्हढा मोठ्या प्रकल्पाचे बांधकाम हाती घेण्या अगोदर,
(१) Geological/ GeoTechnical/ GeoPhysical survey असे सर्वेक्षण/ अभ्यास झाला होता का?
(२) Environment Impact Assessment या बांधकामाचे पर्यावरणावर काय विपरीत परिणाम होतील याचा अभ्यास झाला होता का? पर्यावरणा बद्दल आस्था असणार्‍या लोकांचा सुरवातीपासूनच या प्रकल्पाला विरोध होता. अगदी सर्वोच्च न्यायालया पर्यंत दाद मागण्यात आली होती. ८९० किमी चा प्रकल्प लहान ५३ भागांत दाखवला गेला.
https://www.theindiaforum.in/article/char-dham-pariyojana-high-risk-engi...
(३) सिल्क्यारा geological fault line var आहे. तसे असेल तर बोगद्याच्या कामाला परवानगी मिळालीच कशी?

बांधकामाबद्दल
(१) बोगदा तयार करतांना कुठले तंत्रज्ञान वापरले गेले होते? कुठले तंत्रज्ञान वापरायचे हे तिथल्या लोकल Geology वर अवलंबून आहे.
Drill Blast Method DBM - ड्रिल करायचे, आतमधे डायनामाईट ठेवायचे, आणि उडवायचे पण यामधे तेव्हढे नियंत्रण नसते. ज्या भागांत हे काम सुरु होते त्या भागाचा अभ्यास केला असेल तर असे तंत्रज्ञान वापरणे योग्य नाही. तिथे Tunnel Boring Method TBM वापरायला हवे होते.
(२) ४.५ कि मी लांबीच्या बोगद्यासाठी आपत्कालीन बाहेर पडण्यासाठी ( Escape tunnel in case of emergency) कुठेही मार्ग नाही. आपत्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग नसणे हा अक्षम्य हलगर्जीपणा आहे. सर्व प्रकारच्या सरकारी कागदपत्रात Escape tunnel चा उल्लेख असतांना ही प्रत्यक्षात तो नसणे हे काय दर्शवते?
(३) सिल्क्यारा च्या बाजूने असणार्‍या बोगद्याच्या तोंडा पासून २०० मिटर पर्यंत (मेटल जाळी +सिमेंट काँक्रिटचा ) छताला सपोर्ट आहे, पुढे नव्हता (किंवा आधी होता, नंतर पडला, पुढे काही डागडूजी करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचा विपरिणाम म्हणून हा अपघांत झाला ? ) आणि तिथेच ६० मीटरचा भाग कोसळला.
(४) डोंगर पोखरल्यावर, वरचा/ बाजूचा भाग कोसळू नये यासाठी जो काही structural सपोर्ट दिला गेला आहे, दिला जाणार होता तो वर असलेल्या भल्या मोठ्या मातीला / दगडाला सर्व काळांत रोखून धरण्यास पुरेसा होता का? यासाठीच वरिल सर्वेक्षणाचा अभ्यास महत्वाचा आहे.

सुरवातीला या पडलेला भागातून माती दूर करत, आतमधे १ मीटर व्यासाचा पाईप टाकणार होते. त्यात अनेक आव्हाने आहेत. आता जोडीला vertical drilling तसेच इतर बाजूनी काही तरी करण्याचे प्रयत्न होणार आहेत. जास्त खोलांत न जाता, कुठलिही कृती केली तरी आज जे structure (कोरलेला बोगदा + त्याला लावलेला सपोर्ट + डोंगर सर्व मिळून) आहे ते कमजोर होत रहाणार. बोगद्याचा इतर भाग आज नाही, पण कुठल्या क्षणाला कोसळेल हे सांगता येत नाही.

हा मार्ग चीन सिमेजवळ नेतो. शस्त्र आणि सैन्याची ने आण करण्यासाठी आणि म्हणून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही हा मार्ग बनत होता असे म्हटले जाते. पण गेल्या काही वर्षातच, या मार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटनांत लक्षणीय वाढ झालेली आहे आणि अनेक वेळा मार्ग बंद ठेवावा लागला आहे. युद्धाच्या वेळी अशा बेभरवशाच्या मार्गावर विसंबून रहाणे परवडणारे नाही. CDP मुळे पर्यावरणास मोठी हानी पोहोचत आहे आणि ते जास्त चिंताजनक आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गाला ( डोंगराला) आव्हान देणे विनाशाला आमंत्रण आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तराखंड च्या भोगलिक स्थिती विषयी मराठी लोक काय सांगणार.
खरी माहिती तेथील लोक च देवू शकतात.
सर्व्हे,अभ्यास हे आपल्या जागी आहे.

. नैसर्गिक घटनेचा अंदाज लागत नाही.सह्याद्री पर्वत रांगा काळ्या मजबूत दगडांनी बनलेल्या आहेत असा अभ्यास आहे.
पण तसे आहे का?
माझ्या गावा भोवती दोनतीन डोंगर आहेत सह्याद्री पर्वत रांगाचे च ते हिस्से आहेत.
पण अनेक ठिकाणी मध्ये मध्ये काळा मजबूत दगड नाही तर मुरूम आहे.
मुरूम म्हणजे भुसभुशीत दगड.
. हे मला माहीत आहे कारण मी स्थानिक आहे.
बाकी लोकांना सह्याद्री म्हणजे काळा मजबूत दगड इतकेच माहीत असते

इंग्रजांनी सन १८५३ साली मुंबई ते ठाणे रेल्वे पुण्यापर्यंत आणायचा बेत आखला होता. त्यासाठी इंग्रजांनी एका कमिटी स्थापना केली. ती कमिटी मार्ग कसा काढायचा याचा शोध घेत खंडाळ्याच्या घाटात आले. पण त्यांना काही ठोस उपाय सापडत नव्हता. ते रोज यायचे आणि इकडे तिकडे चाचपडत बसायचे. तिथे वरती घाटात मेंढरांना चरायला घेऊन येणारा शिंग्रोबा झाडाच्या आडोशाला बसून दररोज त्यांची मजा बघत बसायचा. शेवटी ते इंग्रज वैतागून काम अर्धवट सोडून जायच्या तयारीला लागले, तेव्हा शिंग्रोबाने त्यांना विचारले “म्या तुमाला या भागात रोज बघतुया, काय करायचा बेत हाय तुमचा या डोंगरात?” त्यावर इंग्रज म्हणाले – ”आम्हाला मुंबई-ठाणे ही रेल्वे पुण्यापर्यंत घेऊन जायची आहे. त्यासाठी आम्ही रेल्वे रूळ बसवायला जागा शोधतोय, पण काही केल्या योग्य मार्ग सापडत नाही, म्हणून आता हे काम अर्धवट सोडून परत जाण्याचा विचार आहे आमचा” हे ऐकताच शिंग्रोबा म्हणाला ”हात्तीच्या… Sss.. एवढंच हाय काय… या मी दाखिवतो रास्ता तुमाला… चला माझ्या मागनं…” यावर इंग्रजांना भलताच आश्चर्य आणि आनंद झाला. ते शिंग्रोबाच्या मागे चालू लागले आणि शिंग्रोबा मार्ग दाखवित पुढे चालू लागला. अशाप्रकारे शिंग्रोबाने इंग्रजांना घाटावर जायचा सोप्पा मार्ग दाखवला.

आणि घाटात एक पण मोठी नैसर्गिक आपत्ती आली नाही.

फक्त सर्व्हे न वर विश्वास न ठेवता तेथील स्थानिक लोकांची मत पण लक्षात घेतली पाहिजेत ह्याचे हे उदाहरण आहे.

लोकांच्या पिढ्या न पिढ्या गेलेल्या असतात लोकांना detail मध्ये त्या प्रदेशाचे ज्ञान असते.
आणि हे अनुभव नी आलेले ज्ञान च सर्व श्रेष्ठ असते

उत्तराखंड सरकारने नेमलेली समितीचे सदस्य या विषयातले तज्ञ आहेत. Geology, GeoHydrology, GeoEnvironmental चे अभ्यासकांना अशी माहिती काढणे सहज शक्य आहे. तिथे रहाणारे असायलाच हवे असे नाही.

Dr. Piyoosh Rautela, ED, USDMA, Dehradun
Dr. Shantanu Sarkar, Chief Scientist, CBRI, Roorkee
Dr. B. K. Maheshwari, Professor, Department of Earthquake
Engineering, IIT Roorkee
Shri Manoj Kaistha, Director, GSI, New Delhi
Dr. Swapnamita Choudhury Vaideswaran, Scientist, WIHG, Dehradun
Shri Sushil Khanduri, Geologist, USDMA, Dehradun
7. Shri Suvam Das, Research Scholar, CBRI, Roorkee

सिल्क्यारा मधे टनेल expert म्हणून Arnold Dix काम पहात आहे. तो कुठे उत्तराखंडाचा आहे? पण विषयाचा बेसिक अभ्यास झाला असेल, अनुभव असेल तर सहज पणे निसर्गा कडून माहिती मिळवू शकतो. Happy

नद्यांवरील पूल बांधण्यात उत्तर प्रदेशने विकसित केलेले सोपे तंत्रज्ञान आता सर्वजण वापरू लागले आहेत.

बद्रीनाथ ,जोशीमठ आणि माना या दरम्यान होणार्‍या दरड कोसळण्याच्या प्रकारांवर तसेच बद्रीनाथ मंदीराला होणारा धोका टाळण्यासाठी संरक्षण खात्याच्या शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञान विकसित केले होते. त्यामुळे बद्रीनाथचे मंदीर गेले कित्येक वर्षे सुरक्षित आहे तेच तंत्रज्ञान गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून रेल्वे वापरते. हे शास्त्रज्ञ स्थानिक नाहीत.

मृदा अभियांत्रिकी नावाचे शास्त्र असते. या शास्त्रात पी एच डी केलेल्या एका रिटायर्ड ब्रिगेडियरची पुस्तके आहेत. काही वर्षे हे ब्रिगेडिअर वाघोलीच्या एका अभियांत्रिकी कॉलेजमधे होते. याशिवाय अन्य काही शास्त्रज्ञांचे रिसर्च पेपर्स उपलब्ध आहेत. इंस्टीट्यूशन ऑफ इंजिनिअर्स तर्फे घेतलेल्या सेमिनार मधे त्यांनी हिमालयातल्या त्यांच्या अभ्यासाचे प्रेझेंटेशन दिले होते. इंस्टीट्यूशन ऑफ इंजिनिअर्स किंवा तत्सम संस्था नेहमी असे कार्यक्रम आयोजित करत असते.

डोंगरदऱ्यात जमिनी खाली बीळ, भुयार करून रहाणारे प्राणी यांना जास्त माहिती असते माणसांपेक्षा. त्यांचा सल्ला घ्यावा animal communicators मार्फत.

आम्हीं काही मत व्यक्त करतो म्हणजे ते हवेत व्यक्त करतो .
विज्ञान आम्हाला कळत नाही.
आम्ही अडाणी आहोत .
हा गैर समज सोडा.
तुमचा प्रतेक प्रतिसाद ठराविक विचाराने प्रेरित असतो.

.हे सर्व मानव साठी.
रघु आचार्य जी ,उदय ह्यांनी पण माझ्या मता विरुद्ध मत व्यक्त केले आहे पण त्या मध्ये लॉजिक आहे.
तुम्ही उंटावरून शेळ्या हकु नका

आता उदय आणि रघु आचार्य जी ह्यांना प्रश्न आहे.
सर्व संबंधित तज्ञ लोकांनी त्या बोगद्याच्या मार्ग अभ्यास करून सुचवला होता.
..अनेक तज्ञ लोकांच्या ,संस्थेच्या मार्ग दर्शना खाली बोगद्याच्या काम चालू होते.
मग बोगद्यात जमीन खचली कशी?.
आणि खूप मोठ्या प्रमाणात डोंगराचा हिस्सा कोसळला कसा.

म्हणजे ज्यांना तुम्ही तज्ञ म्हणता त्यांच्या अभ्यासात त्रुटी आहेत.
..

आता उदय आणि रघु आचार्य जी ह्यांना प्रश्न आहे.
सर्व संबंधित तज्ञ लोकांनी त्या बोगद्याच्या मार्ग अभ्यास करून सुचवला होता.
..अनेक तज्ञ लोकांच्या ,संस्थेच्या मार्ग दर्शना खाली बोगद्याच्या काम चालू होते.
मग बोगद्यात जमीन खचली कशी?.
आणि खूप मोठ्या प्रमाणात डोंगराचा हिस्सा कोसळला कसा.

म्हणजे ज्यांना तुम्ही तज्ञ म्हणता त्यांच्या अभ्यासात त्रुटी आहेत. >>> मी या कामावर हजर आहे हे तुम्हाला कुणी सांगितले ?
तसेच या मंडळींनी बोगदे बांधण्याचे तंत्रज्ञान सुचवलेय असे माझ्या प्रतिसादात कुठे दिसले ?

सर्व संबंधित तज्ञ लोकांनी त्या बोगद्याच्या मार्ग अभ्यास करून सुचवला होता. >>> याचे संदर्भ द्या.
अनेक तज्ञ लोकांच्या ,संस्थेच्या मार्ग दर्शना खाली बोगद्याच्या काम चालू होते. >>>याचेही संदर्भ द्या.
हे कोणते तज्ञ आहेत ? माझ्या प्रतिसादाचा इथे काय संबंध ? कृपया मला समजावून सांगा.
हा अभ्यास कुठे केला ?
मला तुमचे प्रतिसाद वाचवत नाहीत. ढगात गोळीबार असतो. कृपया अशा प्रतिसादात माझे नाव कोट करून वाटेल ते असंबद्ध प्रश्न विचारू नयेत. जो प्रश्न संबंधितांना विचारायला पाहीजे तो मला विचारताय आणि सुरूवातीलाच यावर बोलू नका बोगद्यात अडकलेल्या लोकांवर बोला म्हणताय.

उत्तराखंड च्या भोगलिक स्थिती विषयी मराठी लोक काय सांगणार.
खरी माहिती तेथील लोक च देवू शकतात.
सर्व्हे,अभ्यास हे आपल्या जागी आहे.>>>>>>>>>>
ऑ ?
काय समजता तुम्ही मराठी माणसाला ?
खुशाल मराठी माणसांचा भयंकर अपमान करताय !
इस्रायल - पॅलेस्टाइन असू द्या नाहीतर रशिया - युक्रेन चे युद्ध , उध्दव ची शिल्लक सेना असू द्या नाहीतर काकाची उरलेली राष्ट्रवादी .
प्रश्न कोणताही असू द्या मराठी माणूस स्वतःचे मत ठोकणारच , भले समोरच्याने विचारलेले नसू द्या !
मला तर वाटतं की न्हाई या राष्ट्रीय संस्थेने इथून पुढे कुठे कुठे बोगदे काढावेत हे फक्त मराठी माणसाला च विचारले पाहिजे .....

!
मला तर वाटतं की न्हाई या राष्ट्रीय संस्थेने इथून पुढे कुठे कुठे बोगदे काढावेत हे फक्त मराठी माणसाला च विचारले पाहिजे .....

कोणाला नाही विचारले तरी चालेल पण मायबोली वरील .
सर्व ज्ञानी व्यक्तींचा सल्ला हिमालयात कोणते ही काम करायचे असेल तर घेतला पाहिजे.

साधी बिल्डिंग बांधायची असेल तरी पन्नास परवानग्या घ्याव्या लागतात..विविध तज्ञ लोकांची सर्टिफिकेट घ्यावी लागतात.
सिलक्यारा साठी पण सरकारी नियमानुसार सर्व तज्ञ लोकांच्या परवानग्या सही शिक्या नुसार प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये असणार च आहेत.
पूर्ण प्रोसेस झाल्या शिवाय काम चालूच होवू शकत नाही.
Geological वाले आता अपघात झाल्यावर जागे झाले आहेत.
अगोदर झोपले होते.
कामगार बाहेर पण येतील आणि तो बोगदा वापरला पण जाईल .
शाब्दिक बाजू मांडण्या पेक्षा सरकार कृती नी विरोधक लोकांचे तोंड बंद करेल

<< मजुर सुखरूप बाहेर आले पाहिजेत, पण २५ किमी साठी १२००० कोटी म्हणजे फारच महागडा प्रकल्प ठरेल हा.
Submitted by वीरु on 28 November, 2023 - 05:45 >>>

------- चार-धाम प्रकल्प एकूण खर्च १२००० (ते १४००० ) कोटी रुपये अपेक्षित आहे.

अनेक छोट्या हिस्स्यांमधे हा प्रकल्प विभागला आहे पैकी धारसू- बारकोट -यमनोत्री या NH १३४ वरच्या भागाचे काम (८५३ कोटी रुपये) नवयूगा कडे दिले गेले होते. सिल्क्यारा बोगदा या भागांत आहे आणि या भागामुळे २५ किमी चा मार्ग कमी होणार आहे.

<< आता उदय आणि रघु आचार्य जी ह्यांना प्रश्न आहे.
सर्व संबंधित तज्ञ लोकांनी त्या बोगद्याच्या मार्ग अभ्यास करून सुचवला होता.
..अनेक तज्ञ लोकांच्या ,संस्थेच्या मार्ग दर्शना खाली बोगद्याच्या काम चालू होते.
मग बोगद्यात जमीन खचली कशी?.
आणि खूप मोठ्या प्रमाणात डोंगराचा हिस्सा कोसळला कसा.
म्हणजे ज्यांना तुम्ही तज्ञ म्हणता त्यांच्या अभ्यासात त्रुटी आहेत.
..
Submitted by Hemant 333 on 28 November, 2023 - 03:39 >>

--------- बोगद्याचा मार्ग अभ्यास करुन सुचविला आहे असे मी कुठेही म्हटलेले नाही.
सरकारने या प्रकल्पाचे ५३ छोट्या भागांत तुकडे केले जेणेकरुन EIA लागणार नाही.
बोगद्याचा भाग कोसळण्याच्या म्हणजे १२ नोव्हेंबर २०२३ च्या आधीपासूनच अनेक मंडळींचा या प्रकल्पाला विरोध आहे. रेडिफच्या दोन मुलाखतीच्या लिंक दिल्या आहेत त्या २०२१ च्या आहेत.

प्रकल्पाला परवानगी घेतांना सर्व नियम धाब्यावर बसविल्याचेच दिसत आहे.

जोशीमठातले तडे, सिल्क्यारा बोगदा कोसळण्याच्या घटना या केवळ wake up call आहेत. जागे व्हायची अजून एक संधी आहे.

उदय जी, तुमच्या धैर्याला सलाम !
दिलेला लेख पूर्ण न वाचता,व्हिडीओ न बघता असे चघळत बसण्याला तुम्ही न वैतागता उत्तर देऊ शकता म्हणजे तुम्ही आधुनिक बुद्ध आहात.

उदय जी तुमचे मत प्रामाणिक आहे आणि कथित माहिती नुसार योग्य पण आहे.
उत्तराखंड मधील माझे काही खास मित्र आहेत ते गावी जातात तेव्हा तेथील फोटो आवरजून मला दाखवतात.
आणि तेथील भौगोलिक स्थिती विषयी सविस्तर चर्चा पण करतात

सह्याद्री च्या पर्वत रांगा पण ठेंगण्या वाटाव्यात इतके उंच तेथील पर्वत आहेत.
त्या पर्वत रांगा मधुंन रस्ते निर्माण कारणे सोप नाही.

कसलाच धोका नाही असा शेरा कोणताच तज्ञ तेथील घाट रस्ता बद्धल कधीच देणार नाही.
धोका तर आहेच.
फक्त कमीत कमी धोका असणारा मार्ग फक्त निर्माण होवू शकतो.
धोका नेहमीच डोक्यावर असणार आहे

जगातील कोणी ही ,किती ही हुशार व्यक्ती नी अगदी सर्वोच्च तंत्र वापरून पण योजना आखून मुंबई मधील rail network तयार केले तरी जी प्रचंड गर्दी मुंबई लोकल ट्रेन मध्ये असते ती कधीच कमी होणार नाही
.
त्या प्रमाणे हिमालय न पर्वत रांगा मध्ये कोणताच धोका नसणारा रस्ता तयार होवू च शकत नाही.
त्या भागात हवाई वाहतूक पण सुरक्षित नाही.
तिथे रस्ता वाहतूक काय सुरक्षित असणार.
उगाच सरकार टीका करण्यात काही अर्थ नाही.

सह्याद्रीत कठीण काळा पत्थर आहे. भुयार,बोगदे ढासळण्याची शक्यता कमी. खोदायला कठीण पण भक्कम.
हिमालय रांगा भुसभुशीत मातीचे डोंगर. खोदत जाताना सहज पण एकेक भाग भक्कम करायला वेळ लागतो.
_________

जोशीमठातले तडे, सिल्क्यारा बोगदा कोसळण्याच्या घटना या केवळ wake up call आहेत. जागे व्हायची अजून एक संधी आहे

जागे व्हायचे म्हणजे काय करायचे.पिढ्यान् पिढ्या लोक तिथे राहत आहेत.
नवीन बांधकाम झाली असतील ती पाडली तरी धोका कायमच असणार आहे.
हिमालयाच्या पोटात घडामोडी होत आहेत ते माणूस थांबवू शकतं नाही.
कोणतेच आधुनिक तंत्र ते थांबवू शकत नाही.

जागा खाली करून सुरक्षित ठिकाणी जाणे हा एक मार्ग आहे

अशाप्रकारे शिंग्रोबाने इंग्रजांना घाटावर जायचा सोप्पा मार्ग दाखवला.

>>>> प्रत्येक घाटाच्या बाबतीत असा एक रस्ता दाखवणारा मेंढपाळ/ धनगर असतो.

Pages