Bird's Paradise - पक्ष्यांचे नंदनवन @ राणीबाग (फोटोंसह)

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 October, 2023 - 15:28

Bird's Paradise - पक्ष्यांचे नंदनवन @ राणीबाग

राणीच्या बागेवर हा माझा चौथा वगैरे धागा असेल. (लेखाच्या शेवटी लिंक चेक करू शकता) पण त्याला जबाबदार राणीबागच आहे.
काऱण,
मेरा देश बदल रहा है या नही याची कल्पना नाही, पण मेरा राणीबाग जरूर झपाट्याने बदल रहा है Happy

काही वर्षांपुर्वी पेंग्विन आणून त्यांचेच काय ते कौतुक चालू होते. पण गेले दिड-दोन वर्षात पाण्यात पोहणारा वाघ आला. बघता बघता एकाचे दोन झाले. दोनाचे तीन झाले. मागच्या वेळी गेलो तर तिघे छान पकडापकडी खेळत होते. आजूबाजुच्या पिंजर्‍यात भालू, चित्ता, बिबट्या, सोनेरी कोल्हा वगैरे मंडळी नांदू लागली. हरीण, काळवीटे, माकडे आंणि पाणघोडे आधीपासून होतेच. पण मोठ्या तलावात पोहणार्‍या मगरी आल्या. कासव आणि ईतर जलचरांना देखील नवीन घर मिळाले. पक्ष्यांच्या राज्यात मात्र जरा शुकशुकाटच होता. पण फायनली तिथेही रिडेव्हलपमेंट स्कीम आली आणि त्यांनाही हक्काने बागडायची मोठाली जागा मिळाली.

आजही राणीबागेत फिरताना एकाने दुसर्‍याला मगरी कुठे आहेत रे भाऊ विचारले की समोरून आश्चर्यचकित होत प्रतिप्रश्न येतो की राणीबागेत मगरी आहेत??
माझ्या ओळखीची पाळखीची लोकं तरी या अज्ञानात राहू नये म्हणून आधी जसे वाघ आणि मगरींचे धागे काढले तसाच हा धागा.
तर आता फार अघळपघळ न लिहिता पटपट फोटो टाकतो. कारण मला स्वत:ला चिमणी-पोपट वगळता पक्षी फारसे ओळखता येत नाहीत Happy

१) बाहेरून हे असे दिसते ...

01_0.jpg

२) आत शिरले की पक्ष्यांची छान शाळा भरलेली दिसेल Happy

02_0.jpg

३)
03_0.jpg

४)
04_0.jpg

५)
05_0.jpg

६)
06_0.jpg

७)
07_0.jpg

८)
08_1.jpg

९)
09_1.jpg

१०)
10_1.jpg

११)
11_1.jpg

१२)
12_1.jpg

१३)
13_1.jpg

१४)
14_0.jpg

१५)
15_0.jpg

१६)
16_0.jpg

१७)
17.jpg

१८)
18.jpg

१९)
19.jpg

२०)
20.jpg

खालील फोटो पाणपक्ष्यांचे आहेत. फार पूर्वी हे एका पिंजर्‍यात असायचे. लांबूनच बघून समाधान माना.
पण आता त्यांच्या भल्यामोठ्या पिंजर्‍यात आपल्यालाच प्रवेश मिळतो. छान फेरफटका मारत बघता येतात. त्यामुळे आम्ही ईथे जास्त रमतो.

२१)
21.jpg

२२)
22.jpg

२३)
23.jpg

२४)
24.jpg

२५)
25.jpg

२६)
26.jpg

२७)
27.jpg

२८)
28.jpg

आधीचे राणीबाग धागे ईथे बघू शकता.

राणीबागेतला पाणघोडा - विडिओसह

अंडर वॉटर क्रोकोडाईल पार्क @ राणीबाग - (विडिओसह)

राणीबागेचा राजा - (फोटो आणि विडिओसह)

-------------------

वाचा, प्रतिसाद द्या, आणि धागे वर काढा.
धन्यवाद,
आभारी आहे,
ऋन्मेष Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद मोद Happy

बोकलत कुठला पक्षी?

पोरे सोबत असल्याने जास्त एकाग्रतेने फोटो काढता येत नाहीत. अर्जुनासारखे फक्त पोपटाच्या डोळ्यावर लक्ष न ठेवता एका डोळा पोपटावर आणि एका पोरांवर ठेवावा लागतो. पुढच्या वेळी गेलो तर इथे जास्त काळ रेंगाळतो आणि सारे पक्षी चेक करतो.

Pterodactyl is a Dino bird. Lovely ending shot of Jurassic park movie. Mast article and photos.

आवडले फोटो.

रानपक्षी पाहायला आवडतात. पाणपक्ष्यांच्या आवार पिंजऱ्यात हल्ली जात नाही - वास भयानक असतो.

फोटो आवडले. ऋन्मेष पक्ष्यांविषयी असल्याने इथे कार्टुन टाकलेले आहे. न आवडल्यास सांगा. डिलीट करीन.
.
https://lh3.googleusercontent.com/pw/ADCreHewHpFcLhgqunbb5c1zwxnuO1gQPEwNBfIEyE6sCQOqHkJBa7jBTfp1OpZ16EJW6KWto13yGKtCL67woqF6oo4o-7DDjd454Yv0SJQkEcVwCaMhJj7HB8tCjaObIORCN1_f-yow_GdnrIHoJ7hLPCJhHg=w740-h232-s-no?authuser=0

अमा, srd धन्यवाद

@ srd, हो, तो वास बहुधा त्यांचे खाद्य मासे आणि पाण्यामुळे असावा.. पण सकाळी तितका नसतो. आमचे जाणे शक्यतो सकाळी उघडल्याउघडल्याच होते.

एकाच वेळी आपली पोस्ट आली सामो
कार्टून बघायच्या आधीच सांगतो की राहू द्या. तुम्ही नेहमी काहीतरी टाकता आणि संपादित करता.. एवढा विचार करू नका.. निदान माझ्या धाग्यावर तरी Happy

मस्त केलंय की आता. काही वर्षांपूर्वी लेकीबरोबर गेले होते. तिला शाळेच्या प्रोजेक्टकरता पक्ष्यांचे फोटो काढून मग चित्रं काढायची होती. तेव्हा फार वाईट परिस्थिती होती तिथे. एक की दोन पिंजरे होते, आत फार स्वच्छता नव्हती, बाहेरही अगदीच दुर्लक्षित, सुका परिसर वाटत होता. मात्र चांगले मोठे पाणपक्षी होते. छान फोटो आले आणि त्यावरून तिनं चित्रंही छान काढली होती.

हा नवा बदल आश्वासक वाटतोय. असंच छान वातावरण रहावं अशी आशा आणि परिसर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी सरकारइतकेच, किंबहुना थोडं जास्तच, भेट देणारे पर्यटकही जबाबदार आहेत याची जाणीव प्रत्येकानं ठेवली पाहिजे.

सरकारइतकेच, किंबहुना थोडं जास्तच, भेट देणारे पर्यटकही जबाबदार आहेत याची जाणीव प्रत्येकानं ठेवली पाहिजे.
>>>>>
हे महत्वाचे आणि एकमेकांशी निगडीत आहे. एकेकाळी मलाही सवय होती की रस्त्याकडेला कचर्‍याचा ढिगारा दिसला की तीच कचराकुंडी समजत तिथे कचरा टाका. जसे पैसा पैश्याला खेचतो म्हणतात तसे कचरा देखील कचर्‍याला खेचतो. पण नवी मुंबईत आलो तसे ईथे दर रस्त्यावर शंभर पावलांवर कचर्‍याचे डब्बे लटकवलेले दिसू लागले. त्यामुळे कचर्‍याची विल्हेवाट जिथल्या तिथे लावता आली. जिथे ते डबे नाही दिसले तिथेही कचरा कुठेही न टाकता बॅगेत जपून ठेवू लागलो. मुलांनाही ही चांगली सवय लावता आली. चुकून वार्‍याने जरी कचरा हातातून उडाला तरी आम्ही धावत जाउन तो उचलतो आणि त्याला कचर्‍याची टोपली दाखवतो. मुळात आजूबाजूचा परीसर सुंदर दिसला की आपसूक आपल्यालाही तो तसाच ठेवावासा वाटतो. जनाची मनाची लाज बाळगून तरी लोकं परीसर अस्वच्छ करत नाहीत Happy

यावरून आठवलं.
वागळे की दुनिया नावाचा कार्यक्रम होता डीडी नॅशनलवर. (आठवड्यात एकदा). वागळेला दोन मुलं असतात त्यांच्या गमतीजमती. मुलं एकदा मागे लागतात की सुटी लागली पण कुठे गेलो नाही. जाऊया. वागळेला काही सुचत नाही. सुटी,तिकिटं आणि बजेट जमण्यासारखं नसतं. ऑफिसातल्या सहकाऱ्याने सल्ला दिला की राणी बागेत ने. मुलांना सांगतो रविवारी राणीच्या बागेत जायचं. खट्टू होतात पण जातात. ( अलिबाग,माथेरान, महाबळेश्वर सोडून राणीबाग??) परतताना आनंद झालेला असतो.
___________________________
१९८५ पूर्वी रिझॉटवाले ससे,मोर,बदकं पाळायचे आणि बच्चे कंपनी खूष असायची. आता बंद.
खंडाळ्याला राजमाची पॉइंटजवळ एका बंगल्यात खूप आफ्रिकन पोपट व इतर पक्षी होते. ते बंद झाले. आता त्याच्याकडे माकडांना दुपारी साडेअकराला जेवण देतात. सगळी माकडे बरोबर त्या वेळी तिकडे हजर होतात. (दरवाजात दोन सिंहाचे पुतळे असलेला बंगला)
________________
Mysuru Karanji lake - bird aviary यूट्यूबवर शोधा. मैसुरू राणीबागेपेक्षा सुंदर आहे.

Mysuru Karanji lake - bird aviary
आमच्या पासून १०५५ किलोमीटर दूर आहे Happy

रविवारी राणीच्या बागेत जायचं. खट्टू होतात पण जातात. ( अलिबाग,माथेरान, महाबळेश्वर सोडून राणीबाग??) परतताना आनंद झालेला असतो.
>>>>>>>

माझे स्टेटसचे पोरांसोबत फोटो बघून मुलाच्या मैत्रिणीची आई मागे लागली की आम्हाला सुद्धा ने कधीतरी राणीबागेत.
मागच्या विकेंड ला घेऊन गेलो तर एवढी मजा आली त्यांना की ते आता पुन्हा पुढचा प्लान कधी विचारत आहेत.
मी त्यांना जसे सराईतपणे फिरवत होतो की मला विचारत होते तुझ्या मोबाईलवर राणीबागेचा प्लान आहे का Happy
राणीबाग कमी गर्दी आणि छान वातावरण बघून फिरले की मजा येतेच..

लहानपणी बाबांनी राणीच्या बागेत नेलेलं, छान वाटलेलं, पुसट आठवतं. नंतर त्या एरियात शेजारच्या मुलाच्या सा पु ला गेलेले, सावता माळी सभागृह नाव बहुतेक. तेव्हा राणीची बाग जाम आठवली. राणीच्या बागेपेक्षा बडोद्याच्या कमाठी बागेत जाणं जास्त व्हायचं, दरवर्षी सुट्टीत आजोळी जायचो त्यामुळे. एक चक्कर टाकायला हवी आता राणीच्या बागेत.

छान फोटो सगळे....
मी पाहिलेला राणीबाग खूप जुना...
एकेकाळी राणीबागच्या खालच्या बाजूला असलेल्या
पाटणकर रस्त्याने रोजचं जाणं येणं होतं...
गिरणगाव जीवंत असतानाची गोष्ट... राणीबागच्या सुरवातीला डाव्या कोप-यात छोटेखानी हिरवळीचे मैदान होते .... बरेच गिरणी कामगार सुटीच्या दिवशी तिथे गप्पा करत घोळक्याने...कधी ग्रामस्थ मंडळांच्या सभा तिथेच होत. गावावरुन या कामगारांना कोणी भेटायला आलं की त्याला पहिला राणीबाग दाखवायचा मग चौपाटी, गेटवे, म्युझियम, हॅंगिग गार्डन, बाबुलनाथ, मम्हादेवी अर्थात मुंबादेवी वगैरे. खिसा गरम असेल तर लालबागला सिनेमा....

खिसा गरम असेल तर लालबागला सिनेमा....
>>>
जयहिंद का? की भारतमाता? की दीपक की आणखी कुठले होते तेव्हा?

भारतमाता....
आणि बहुतेक धार्मिक सिनेमे पहात....जसे गोरा कुंभार वगैरे....
गिरणगावात ६ वर्ष होतो तिथल्या चालीरीती ब-यापैकी ज्ञात आहेत. बैठकीच्या गाळ्यातली भजनं, बारशाच्या कार्यक्रमाला भारुडं, गणपती , नवरात्रात सक्रिय सहभाग असायचा...

भारतमातामध्ये मी एकदाच लहानपणी लक्ष्या आणि महेशचा एक पिक्चर पाहिलेला.
मला वाटते अगदी साध्या लाकडी खुर्च्या वगैरे होत्या. नेमके आठवत नाही पण आताच्या थिएटर तुलनेत फारच साधे होते. पण पब्लिक माहोल होती..

>>..की ते आता पुन्हा पुढचा प्लान कधी विचारत आहेत.<<
कुठे साइनप करायचं ते सांग; मी सुद्धा येईन राणीबाग बघायला यावर्षी मुंबईत आल्यावर...

अरे बाबा, मायग्रेटोरी (एंप्टी नेस्टर्स) बर्ड्स हिवाळ्यातंच उष्ण (ट्रॉपिकल) प्रदेशात येतात..

गटगं नको, मी प्रायवेट माणुस आहे...