पाककृती, फोटो वरून पदार्थ ओळखा (किंवा उलटे पण चालेल)

Submitted by ढंपस टंपू on 5 May, 2023 - 01:19

चला खेळ खेळूयात.

  • कोडे घालणार्‍याने एखादी पाककृती द्यायची. त्यावरून इतरांनी त्याचे नाव ओळखायचे
  • कोडे घालताना ते सोपे, अवघड कसेही चालेल.
  • लवकर सापडू नये म्हणून साहीत्य दिले नाही तरी चालेल.
  • साहीत्यातल्या काही जिनसांची नावे कोड्यातून किंवा समानार्थी शब्दातून दिले तरी चालेल.
  • कल्पकतेला लिमिट नाही.
  • पाककृती ऐवजी साहीत्य सुद्धा देऊ शकता.
  • फोटो वरून पदार्थ ओळखायला सुद्धा सांगू शकता.
  • एक सारखे दिसणारे अनेक पदार्थ असतील तर कोडे घालणार्याचे उत्तर अंतिम असेल.
  • कोडे घालणार्याने उत्तर द्यावे.

चला, सुरूवात करूयात.

प्रत्येक कोड्याला नंबर टाकावा.
पहिले कोडे सुटले कि दुसरे द्या.
जर पहिले कोडे बराच काळ सुटत नसेल आणि कोडेकर्ता फरार असेल तर बहुमताने पुढे चाल घ्यावी.
शक्यतो देशी / माहितीच्या रेसिपीज असू द्याव्यात. (इतरही चालतील. पण ओळखू येण्यासारख्या असाव्यात)
नवीनच शोधून काढलेल्या रेसिपीज देताना त्या काही महीन्यांपूर्वी कुठे न कुठे प्रसिद्ध झालेल्या असाव्यात.

कोडे क्रमांक १ द्यायच्या आधीच इथे कोडे आले पण. Lol
त्यामुळे ते क्रमांक दोन होईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोलकढी आणि बटाटा साबुदाणा पापड

बिलकुल अचूक !

गेला विकेंड दिवसातून दहा वेळा चहा प्यावे तसे सोलकढी पिणे होत होते.

आशू ओके
चहा दहा वेळा होते खरे तर. सोलकढी चार वेळा कपकप भर प्यायलो म्हणून चहाशी तुलना केली. अगदीच जास्त प्रमाणात नाही प्यायलो. पण सारखी ती चव थोडी थोडी जीभेवर रेंगाळावी असे वाटत होते Happy

अवांतर - वरची पोस्ट टाकताना सकाळचे पावणेदहा वाजलेत आणि माझी दिवसातली तिसरी चहा चालू आहे. चौथी साडेअकराच्या सुमारास कामातून ब्रेक घेईन तसे.

Pages