पाककृती, फोटो वरून पदार्थ ओळखा (किंवा उलटे पण चालेल)

Submitted by ढंपस टंपू on 5 May, 2023 - 01:19

चला खेळ खेळूयात.

  • कोडे घालणार्‍याने एखादी पाककृती द्यायची. त्यावरून इतरांनी त्याचे नाव ओळखायचे
  • कोडे घालताना ते सोपे, अवघड कसेही चालेल.
  • लवकर सापडू नये म्हणून साहीत्य दिले नाही तरी चालेल.
  • साहीत्यातल्या काही जिनसांची नावे कोड्यातून किंवा समानार्थी शब्दातून दिले तरी चालेल.
  • कल्पकतेला लिमिट नाही.
  • पाककृती ऐवजी साहीत्य सुद्धा देऊ शकता.
  • फोटो वरून पदार्थ ओळखायला सुद्धा सांगू शकता.
  • एक सारखे दिसणारे अनेक पदार्थ असतील तर कोडे घालणार्याचे उत्तर अंतिम असेल.
  • कोडे घालणार्याने उत्तर द्यावे.

चला, सुरूवात करूयात.

प्रत्येक कोड्याला नंबर टाकावा.
पहिले कोडे सुटले कि दुसरे द्या.
जर पहिले कोडे बराच काळ सुटत नसेल आणि कोडेकर्ता फरार असेल तर बहुमताने पुढे चाल घ्यावी.
शक्यतो देशी / माहितीच्या रेसिपीज असू द्याव्यात. (इतरही चालतील. पण ओळखू येण्यासारख्या असाव्यात)
नवीनच शोधून काढलेल्या रेसिपीज देताना त्या काही महीन्यांपूर्वी कुठे न कुठे प्रसिद्ध झालेल्या असाव्यात.

कोडे क्रमांक १ द्यायच्या आधीच इथे कोडे आले पण. Lol
त्यामुळे ते क्रमांक दोन होईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडे क्रमांक २ फोटोवरून पदार्थ ओळखा
( हे कोडे देत असतानाच दुसरे (म्हणजे पहिले कोडे) आले सुद्धा. त्यामुळे आता याचा क्रमांक दुसरा. Happy
Picture1.jpg

दोन्ही गोड पदार्थ दिसतात
पहिले पुडींग आहे का?
दुसरा लच्छा पराठा सारखे पण गोड लूक असलेला पदार्थ वाटतोय..

>>पुण्यातले लिहील्यावर आणखी सुप्रसिद्ध लिहायची
शास्त्र असतं ते!

धागा अडकला असेल तर अजुन उलगडतो.... पास्ता, लझानियाच्या जवळपास जाणारी डिश आहे

फ्रेंच ट्यान .
गुगलवर सापडलं. नाहीतर खायचं महत्वाचं काम करण्याच्या प्रेशरखाली नाव सुद्धा विचारायचं राहून जातं.

कैरीचे बारीक तुकडे आहेत. तेलाचा function at() { [native code] }वंग आहे.
लोणचेच ना ?
क्रमांक टाका ओ. ढंपस लक्ष दा कि.

Pages