पाककृती, फोटो वरून पदार्थ ओळखा (किंवा उलटे पण चालेल)

Submitted by ढंपस टंपू on 5 May, 2023 - 01:19

चला खेळ खेळूयात.

  • कोडे घालणार्‍याने एखादी पाककृती द्यायची. त्यावरून इतरांनी त्याचे नाव ओळखायचे
  • कोडे घालताना ते सोपे, अवघड कसेही चालेल.
  • लवकर सापडू नये म्हणून साहीत्य दिले नाही तरी चालेल.
  • साहीत्यातल्या काही जिनसांची नावे कोड्यातून किंवा समानार्थी शब्दातून दिले तरी चालेल.
  • कल्पकतेला लिमिट नाही.
  • पाककृती ऐवजी साहीत्य सुद्धा देऊ शकता.
  • फोटो वरून पदार्थ ओळखायला सुद्धा सांगू शकता.
  • एक सारखे दिसणारे अनेक पदार्थ असतील तर कोडे घालणार्याचे उत्तर अंतिम असेल.
  • कोडे घालणार्याने उत्तर द्यावे.

चला, सुरूवात करूयात.

प्रत्येक कोड्याला नंबर टाकावा.
पहिले कोडे सुटले कि दुसरे द्या.
जर पहिले कोडे बराच काळ सुटत नसेल आणि कोडेकर्ता फरार असेल तर बहुमताने पुढे चाल घ्यावी.
शक्यतो देशी / माहितीच्या रेसिपीज असू द्याव्यात. (इतरही चालतील. पण ओळखू येण्यासारख्या असाव्यात)
नवीनच शोधून काढलेल्या रेसिपीज देताना त्या काही महीन्यांपूर्वी कुठे न कुठे प्रसिद्ध झालेल्या असाव्यात.

कोडे क्रमांक १ द्यायच्या आधीच इथे कोडे आले पण. Lol
त्यामुळे ते क्रमांक दोन होईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Shorma

Burritos

कोन पिझ्झा.
प्रतिध्वनी आल्याने बुरिटोज बरोबर असावे.

ह्म्मम.... कोन पिझ्झा बरोबर आहे Happy

आमच्या सिन्हगडरोडवर काही वर्षापूर्वी ह्याचे आउटलेट निघाले होते खाऊगल्लीत..... सध्या कुठे दिसत नाही!!

मुंबईत आहे कोनी पिझ्झा. कुल्हड पिझ्झा पण सुरू झालेय.
आता पास्ता पण मिळतो.

मिसळ पण येईल काही दिवसात.
चुलीवरचे आईस्क्रीम नवले ब्रीज जवळ बोर्ड पाहिला होता कोविडच्या आधी. इतक्यात गेलो नाही तिकडे.

वे

Pages