मराठी बालसाहित्य युट्युब चॅनेल सुरु झाले आहे

Submitted by विनिता.झक्कास on 8 February, 2023 - 01:13

नमस्कार माबोकर्स,

सुचेतसची वाटचाल धीमे धीमे सुरु आहे. तुम्हा सर्वाचा सपोर्ट वेळोवेळी मिळाला आहे, त्याबद्दल धन्यवाद __/\__

सुचेतसने लहान मुलांसाठी बालसाहीत्य युट्युब चॅनेल सुरु केले आहे. आत्ता सुरुवात आहे. एक एक व्हिडिओ येत जाईल.
आपल्या मुलांना नक्की दाखवा ही विनंती Happy
चॅनेल लिंक - किलबिल गाणी गोष्टी

https://www.youtube.com/channel/UCLbZeEmMmdY2TaaQ9GmkO7Q

धन्यवाद Happy

Group content visibility: 
Use group defaults

अरे वाह अभिनंदन
चेक करतो नंतर
गरजेची गोष्ट आहे सध्या Happy

सर्वाचे मनःपुर्वक धन्यवाद __/\__

एस आर डी , ते लहान मुलान्चे चॅनेल आहे. अजुन सूर पकडतेय. काय मनोरन्जन हवे आहे तिथे ?? मला कळले नाही.

हलत्या चित्ररूप गोष्टी म्हणजे चांगला चित्रकार लागेल. हल्ली शहरीकरणामुळे कुत्रा,मांजर,कावळा,चिमणी हेच प्राणी मुलांना दिसतात. त्यांच्या सोप्या गोष्टी टाकता येतील. गावातली मुले अधिक प्राणी पाहतात. शिवाय बाजार असतो. शहरांत फक्त डिपार्टमेंटल स्टोअर्स.

प्रवासाची साधने - सायकल,ओटो,कार,बस,होड्या ,विमानं यांच्या गमतीजमती असतील.
भाजी,फळं,दूध हे कसं कुठे होतं व ते आपल्या घरी कसं येतं ते चित्रगोष्टींतून दाखवायचं तर कार्टुनिस्ट हवा. म्हणजे तुम्हालाच व्हावं लागेल. विकत घेणे परवडणारे नाही.

एस आर डी, मी आधीच सांगितले तसे ही सुरुवात आहे. एक एक गोष्ट येईलच. माझी टीम आहेच. पण सर्व एका दिवसात तर होणार नाही ना! बघत रहा. तुम्हाला अपेक्षा आहे ते सर्व होईलच .. सुचनेबद्दल धन्यवाद Happy

विनिता, एक सुचवते, पटतं का बघा.

गोष्टी सांगताना त्यातून भाषेचाही संस्कार होतात हे लक्षात घेऊन "बनवणे" ऐवजी एखादी वस्तू/ पदार्थ "करतात" असं म्हणता येईल. "बनवणे" चा खरा अर्थ "बनेलपणा करणे" किंवा "फसवणूक करणे" असा होतो.
"माझी मदत कर" हे चुकीचं असून "मला मदत कर" असं आहे.

चुकीचे शब्दप्रयोग हे केवळ हिंदीतून जशास तसं भाषांतर केल्यामुळे रुळले आहेत. लहानपणापासून जर योग्य शब्द कानावर पडले तर फरक पडेल.

>>>>गोष्टी सांगताना त्यातून भाषेचाही संस्कार होतात हे लक्षात घेऊन "बनवणे" ऐवजी एखादी वस्तू/ पदार्थ "करतात" असं म्हणता येईल. "बनवणे" चा खरा अर्थ "बनेलपणा करणे" किंवा "फसवणूक करणे" असा होतो>>>>

बनवणे चा शब्दप्रयोग...मराठी विश्वकोश पुढील लिंक अनुच्छेद एक ...
https://vishwakosh.marathi.gov.in/32360/

सर्वाना धन्यवाद __/\__

प्रज्ञा, खरे तर मराठीचे खराब रुप पाहुनच हे चॅनेल सुरु केले आहे. मुलांना चांगली मराठी कशी होती, आहे ते कळणे महत्वाचे आहेच. माझ्याकडुन मी प्रयत्न करतेच आहे. सुचनेबद्दल धन्यवाद Happy