'तबर'चा राजनय

Submitted by पराग१२२६३ on 31 July, 2021 - 02:33

भारत आणि रशिया यांच्यातील घनिष्ट संरक्षण संबंधांचे एक प्रतीक असलेली ‘भा. नौ. पो. तबर’ (आयएनएस तबर) ही युद्धनौका नुकतीच रशियन नौदल दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाली होती. त्या सोहळ्याच्या निमित्ताने रशियाच्या सदिच्छा भेटीवर असलेल्या ‘तबर’ने 22-26 जुलैदरम्यान सेंट पीटर्सबर्गमध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर 28-29 जुलैला ‘तबर’ने दोन्ही देशांच्या नौदलांदरम्यान होणाऱ्या ‘इंद्र’ युद्धसरावातही भाग घेतला.

रशियन नौदल दिनाच्या या सोहळ्याच्या सुरुवातीला नाविक परंपरेनुसार सजवलेल्या ‘तबर’ आणि इतर युद्धनौका-पाणबुड्या बंदरापासून दूर फिनलंडच्या आखातात उभ्या होत्या. त्या युद्धनौका आणि पाणबुड्यांचे रशियन फेडरेशनचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी यांच्यासाठी नेमलेल्या रशियन नौदलातील विशेष छोट्या नौकेतून निरीक्षण केले.

या संपूर्ण सोहळ्यामध्ये मान्यवरांच्या कक्षात भारताचे नौदलप्रमुख ॲडमिरल करमबीर सिंह हेसुद्धा उपस्थित होते. ‘तबर’वर तैनात असलेल्या बँडपथकाने संध्याकाळी झालेल्या सिटी परेडमध्ये भाग घेतला.

22 जुलै रोजी सेंट पीटर्सबर्गमध्ये पोहचल्यावर नौदलांच्या परंपरेनुसार यजमान देशाच्या नौदलाच्या खास समारंभासाठीच्या बँडपथकाच्या वादनाने ‘तबर’चे स्वागत केले गेले. रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या नौदलप्रमुख ॲडमिरल करमबीर सिंह यांनीही ‘तबर’ला भेट दिली.

माझ्या या लेखाची लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2021/07/blog-post_31.html?m=1

Group content visibility: 
Public - accessible to all site users