वेज मोमोज - चटणी

Submitted by 'सिद्धि' on 25 April, 2020 - 11:32

IMG_20200411_154859.jpgमोमोज चटणीसाठी साहित्य व कृती :
१ टिस्पुन साखर, थोडे मिठ, १ टिस्पुन लिंबूरस, २ टिस्पुन तेल.
२ टोमॅटो आणि ४ सुक्या लाल मिरच्या हे दोन्ही थोडे पाणी घालुन कुकरला १ शिट्टी काढुन शिजवुन घ्या. टोमॅटो वरची साल काढुन, टोमॅटोमिरची, २-३ लसुन पाकळ्या आणि तेवढेच आद्रक एकत्र मिस्करला वाटुन घ्या.
- गरम तेलामध्ये आद्रक-लसुन, टोमॅटो-मिरची मिश्रण, साखर, मिठ, लिंबूरस सर्व पाच मिनिट शिजवा.
चटणी तयार आहे.

कव्हरसाठी साहित्य व कृती :
१ कप मैदा किवा गव्हाचे पीठ घ्यावे. त्यात थोडे मिठ आणि दोन चमचे तेल टाकुन पाण्याने घट्ट भिजवुन घ्यावे.
अर्धा तास झाकुन ठेवा. आपण पोळ्या करण्यासाठी जे कणिक मळुन फ्रिजला ठेवतो ते देखिल इथे वापरता येते.

सारणासाठी साहित्य व कृती:
शिमला मिरची, गाजर , पत्ताकोबी , कांदा हिरवी पात व सफेद भाग या प्रत्येकी भाज्या १ छोटी वाटी धुवून घ्याव्या. यामध्ये तुम्ही पनीर, स्विटकॉर्न यासारख्या बर्‍याच भाज्या वापरु शकता.
अदरक-लसुन व हिरवी मिरची याची १ मोठा चमचा पेस्ट किवा हे सर्व थोडे जाडसर कुटुन घेतले तरिही चालेल.
२ टी स्पून तेल, सोया सॉस १ चमचा, १/२ चमचा मिरेपूड व मीठ चवीनुसार.
- गरम तेलामध्ये अदरक-लसुन व हिरवी मिरची याची पेस्ट घालुन, वरिल सर्व भाज्या घालुन पाचच मिनिट शिजवा. मग यात मिरेपूड व मिठ घालुन दोनच मिनिटे शिजवुन भाजी थंड करायला ठेवा. याला जास्त शिजवुन खिमा करायचा नाही.

1586594628804.jpgपण भिजवलेल्या कणकेची लहान पुरी लाटुन त्यात १ चमचा किवा अंदाजे तयार भाजी भरून मोदकाचा आकार द्यावा. आपल्या आवडीप्रमाने वेगवेगळे आकार देता येतात. भाजी जेवढी जास्त भरणार तेवढे हे मोमोज छान रुचकर लागतात. आता या मोमोजना, उकडीच्या मोदकाप्रमाणे कुकरमध्ये १०-१५ मिनिट वाफवुन घ्या. (यावेळी कुकरची शिट्टी बाजुला काढुन ठेवा.)

1586594754897.jpg

चमचमीत मोमोज खायला तयार आहेत.
IMG_20200411_155023.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करा! अजून अवघड पदार्थ करा, छान छान फोटो टाका.
कुणी ताक करा, समोसे करा, मोमोज करा...
आणि छळ मांडा.
मानसिक छळाचा दावा ठोकणार आहे मी आता....
Proud

पण कातिल झालंय प्रकरण! Happy

आता बदलून दिसतंय,

पण मी वाचनारच नाही. झाला तितका छळ पुरे Proud

मोमोज मस्त उमो सारखे दिसत आहेत. उरक फार आहे याला म्हणून हिम्मत होत नाही.
अज्ञातवासी अहो ताक करण्यात काय कठीण आहे Happy

@ अज्ञातवासी Lol Lol Lol
सद्ध्या फोटो बघुन पोट भरा, लॉकडाऊन नंतर एकदा दावत ठेवु घरी. तुम्हाला विथ फॅमीली विशेष-आग्रहाचे निमंत्रण.

थोड एडीट केल म्हणुन बदलुन दिसत आहे.

@ चंपा - धन्यवाद.

अज्ञातवासी अहो ताक करण्यात काय कठीण आहे Happy

नवीन Submitted by चंपा on 25 April, 2020 - 21:16
>>>>
एकच कठीण आहे.
घरी दही नाही, आणि जवळपास दुकानही नाही. Proud

त्या दुसऱ्या माकाचू धाग्यावर कोणीतरी लिंबू पिळून दही लावलंय त्यांना विचारा. झाला प्रयोग यशस्वी तर मिळेलही दही आणि मग ताक.

सिद्धी मस्त.. छान दिसातायेत मोमोज..

आणि रेसिपी लिखाणपण मस्त लिहलं आहेस..एकदा ट्राय करून बघायला हरकत नाही पण एकट्यासाठी इतकं सामान वापरणं परवडणार नाही...लाॅकडाऊन नंतर नक्की करून बघेल...

लॉकडाऊन नंतर करुन बघणार आणि खाणार.खायला घालणार. आत्ता काही नवीन करायला गेले तर घरातली हेड शेफ उगाच चिडचिड करेल.. Happy

@ चंपा - एक कप मैद्याचे माझे १५-१६ मोमोज होतात.
तुम्ही वापरत असलेला कप किती मोठा आहे यावर अवलंबून आहे हे. आणि मोमोजची पारी शक्य तेवढी पातळ लाटून घ्यायची मग जास्त मोमोज होतात, आणि चांगले लागतात.
नाहीतर जेव्हा आवरण जाडसर होते तेव्हा खाताना पिठ-पिठ जास्त, भाजी कमी असे होते.

@ अजय एकट्यासाठी करायचे असतील तर, सगळ्या भाज्या एकच मोठी वाटी घेऊन, बाहेरील आवरणासाठी फक्त अर्धा पेला मैदा वापर, बाकी चटणी घरी करण्या ऐवजी घरी शेजवान सॉस तयार असेल तर त्या बरोबर सर्व करू शकतो.

अजय, उर्मिला, मन्या, च्रप्स - धन्यवाद !

सोपी आणि सुंदर रेसिपी. जेव्हा साहित्य असेल तेव्हा मोमोज करेन पण ती चटणी मात्र आधी करेन… मला खूप।आवडते मोमोजची चटणी

सिद्धी फोटो यम्म यम्म आहेत एकदम.
पण हे प्रकरण करायला झेपणारं नाही, सो माझा पास.

<<त्या दुसऱ्या माकाचू धाग्यावर कोणीतरी लिंबू पिळून दही लावलंय>>
मीच ती. प्रयोग यशस्वी झाला आहे. माकाचू वर पण पोस्ट केलीय.

आवडली रेसिपी.
तांदळाच् पिठाचेही मोमोज करता येतील ना ?

साधना, किट्टु२१ , अनघा अ कुलकर्णी, निलाक्षी - धन्यवाद.

अनघा अ कुलकर्णी - तांदळाच् पिठाचेही मोमोज करता येतात. उलट फारच मस्त होतात. पण आधीच मोमोज करायचे म्हणजे पुर्वतयारी खुप, आणि तांदळाच् पिठ केणवण्या पासुन ते मोदकाला आकार देण्यामध्ये फारच जास्त खटपट करावी लागते. पण लागतात अप्रतिम.
उशीरा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व. खुप दिवसाने इकडे आले.