Submitted by स्वाती२ on 23 April, 2020 - 06:44
लालू ने काढलेल्या माकाचु धाग्यावर २००० + प्रतिसाद झाले आहेत, तेव्हा स्वयंपाक करताना होण्यार्या छोट्या मोठ्या चुका सुधारण्यासाठी, झालेले घोळ निस्तरण्यासाठी माकाचु - २ सुरु करत आहे.
संदर्भासाठी वरीजनल धाग्याचा दुवा - माझं काय चुकलं?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो गं, मी पाहिले खुप
हो गं, मी पाहिले खुप वेळापासून प्रयत्न करते, माझ्या इथे 3च options distayet, upload, thumbnails and delete, insert नाहीए.
Are you trying from phone or
Are you trying from phone or pc ? Try the other and see
फोटो साइझ लहान आहे ना ?
नाहीतर admin यांना विचार... काय करणार
मोबाईल वरून करतेय, app वरून
मोबाईल वरून करतेय, app वरून
हो फोटो साईज लहान आहे, हो
हो फोटो साईज लहान आहे, हो विचारेन, उद्या परत प्रयत्न करते.
थँक्स.
मी app वापरत नाही गं ...
मी app वापरत नाही गं ... प्रयत्न करत रहा तुला शुभेच्छा
हो ना, एनीवेज, थँक्स मी
हो ना, एनीवेज, थँक्स मी चिण्मयी ,
थँक्स BLACKCAT.
(No subject)
साईटवरून केलं, जमलं की.
साईटवरून केलं, जमलं की.
अरे वा
अरे वा
साईटवरून केलं, जमलं की. >>>
साईटवरून केलं, जमलं की. >>> तेच सांगायला आले होते. App वरुन नाही जमत, साईटवरुन करा. असो. जमलं हे छान झालं. चला, आता उद्यापासून छान छान रेसिपीज् आणि फोटू येऊदेत बरं.
मी पहिल्यांदा बनवलेला आणि
मी पहिल्यांदा बनवलेला आणि फसलेला केक.
नवर्याच्या वाढदिवसाला अगदी हौसेने केला होता.
चांगला दिसतोय की
चांगला दिसतोय की
मधला भाग फक्त खाता येणार नाही.
मस्त बदाबदा चॉकलेट सॉस मध्ये बुचकळून छान बाऊल मध्ये चोको लावा म्हणून द्यायचा
कानोकान खबर लागणार नाही केक बिघडल्याची.
हा कुस्करून त्यात चाॅकलेट
हा कुस्करून त्यात चाॅकलेट साॅस आणि रम इसेन्स असला तर घालून झकास रम बाॅल्स बनवा. किंवा केकचे तुकडे, व्हॅनीला आईस्क्रीम, जेली, कस्टर्ड, ड्रायफ्रूट्स वगैरेचा मारा करून "बर्थडे ब्लास्ट ट्रीट" वगैरे झोल नावानं खपवा.
मी बिस्किटे आणि चॉकलेटस
मी बिस्किटे आणि चॉकलेटस वापरून सजवला आणि केला वाढदिवस साजरा.
मायबोलींच्या सुग्रणींकडून
मायबोलींच्या सुग्रणींकडून कडून मदत आणि सल्ला पाहिजे. आज वडा सांबार करायचा बेत होता. उडीद डाळ रात्रभर भिजवून, वाटून तयार होती. पण थोडसे पीठ पातळ झाल्यामुळे मी वेळेवर त्यात काही चमचे तांदळाचे पीठ घातले आणि परत एकत्र करून वडे तळू लागले वडे सुरुवातीला छान होत होते, अगदी क्रिस्पी. नंतर दुसऱ्या घाण्यापासून काय झाले माहित नाही. वडे अगदी जोरात फुटायला लागले आणि अक्षरशः इकडे तिकडे उडू लागले नशिबाने कोणाला काही इजा झाली नाही. हे सर्व वेळेवर घातलेल्या तांदळाच्या पिठाने झाले असावे का? कृपया सल्ला द्या. धन्यवाद.
5-6 तास डाळ भिजवावी व लगेच
5-6 तास डाळ भिजवावी व लगेच वडे करायला घ्यावे. त्यात मावेल इतकी कणिक व मीठ घालून पुर्या (कचौड़ी) करता येतील.
मी बनवलेला वेज पुलाव/बिर्याणी
मी बनवलेला वेज पुलाव/बिर्याणी नेहमी थोडी कोरडी होते.
मी दमवर शिजवते.बाकीच्यांना नाही समजत पण मला वाटतं.
काय चूकत असावं?
(No subject)
तेल/तूप कमी पडत असावं का?
तेल/तूप कमी पडत असावं का?
तेल तूप कमी पडतंय का?
तेल तूप कमी पडतंय का?
तांदूळ पाण्यात उकळतांना वेळ कमी घेतला जातो आहे का?
मसाला शिजवतांना पाणी कमी होतंय/ पडतंय का?
एक उपाय करून पाहा - तांदूळ उकळत्या पाण्यातून काढल्यावर (बाकी भाज्या/मांस/मसाले इ. सोबत) नंतर दम देतांना झाकणाला कणकेनी सील करण्यापेक्षा - झाकणाला एक कापड ओलं करून पिळून मग बांधायचं अन हे डँप झाकण वापरून दम द्यायचा. जास्त चांगला इफेक्ट येतो.
तांदूळ पाण्यात उकळतांना वेळ
तांदूळ पाण्यात उकळतांना वेळ कमी घेतला जातो आहे का?
मसाला शिजवतांना पाणी कमी होतंय/ पडतंय का?
बहुतेक असे होत असावे.
वर सांगितलेले बघेन करून.
mrunali.samad , फोटो छान
mrunali.samad , फोटो छान दिसतोय की !
मी केलेला पुलाव मला आवडतच
मी केलेला पुलाव मला आवडतच नाही, दूसर्यांनी बनवलेला आवडतो.
अन्जली च्या रेसिपिने करुन बघा
अन्जली च्या रेसिपिने करुन बघा! जमेल हवि तशी
https://www.maayboli.com/node/16224
हो आताच पाहिली रेसिपी, करून
हो आताच पाहिली रेसिपी, करून बघेन.
थँक्स प्राजक्ता.
मृणाली माझी पण दम बिर्याणी
मृणाली माझी पण दम बिर्याणी आधी अशीच कोरडी व्हायची .. मग एकदा रणवीर ब्रार च्या रेसिपी मध्ये बघितले त्याने सगळे लेअर लावून झाल्यावर ..वरून थोडे दूध टाकले.. मी हि तसेच करते .. आता मस्त होते माझी दम बिर्याणी..
अच्छा,मग अर्धा किलो तांदूळ
अच्छा,मग अर्धा किलो तांदूळ असेल तर साधारण किती दुध घालायचं?
माझी चिकन/मटण बिर्याणी छान
माझी चिकन/मटण बिर्याणी छान होते.
वेज फक्त मनासारखी होत नाही, पुढच्या वेळी करते वेगवेगळ्या ट्रायल्स.
Mrunali तुम्ही वरून चांगलं
Mrunali तुम्ही वरून चांगलं डावभर तूपही सोडा त्यावर. चकचकीत दिसायला हवी.
मृणाली रणवीर ब्रार ..व्हेज दम
मृणाली रणवीर ब्रार ..व्हेज दम बिर्याणी रेसिपी बघ.. सगळे नीट समजावून सांगतो तो..मी माझ्या अंदाजाने दूध घातले..
Pages