तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऐसा लगता है, रात के हथेली पर, ताल पे जब ये जिन्दगानी चली, पन्छी नदिया पवन के झोके हे चारही गाणी रिपीट मोड वर ऐकतेय.

अमित त्रिवेदीने गायलेलं "नयना दा क्या कसूर" अंधाधुंद मधलं.
राझी मधलं अर्जित सिंगचं राझी.
लव्ह यु जिंदगी मधलं "तू ही हैं"
बर्फी मधलं रेखा भारद्वाजचं "फिर ले आया दिल"
तमाशा मधील "अगर तुम साथ हो", "हीर तो बडी" आणि "सफरनामा"
रॉकस्टार मधलं "कुन फाया" आणि "शहर में"
दिल्ली ६ मधलं "दिल्ली ६", आणि "अरझियां"
लुटेरा मधलं "सवार लू"
उडता पंजाब मधलं "उडता पंजाब", "चिटा वे"
विरे दि वेडिंग मधलं "तरिफा"

रिपीट मोडवर असं नाही पण एखादं गाणं अचानक मनात येतं हे ऐकूया तसं आज 'सपने मे मिलती है ओ कुडी मेरी' सत्या मधलं ऐकावंस वाटलं.

आता हे 'काय ऐकताय' मधे पण टाकायला हवंय का Proud

दणदणाटी म्युझिक माझ्या रिपीट लिस्टवर अभावानेच येतं . बाकी आपला सगळा कारभार आरामात, रमतगमत असल्यामुळे सगळी शांत चालीची गाणी अगदी महिनोन्महिने ऐकू शकतो. मोजक्या वाद्यांचा एखादा सुरेख साउंडट्रॅक असेल, तर सोने पे सुहागा.

साऊंडट्रॅक -
१) हॅन्स झिमर चे जवळपास सगळेच - No time for caution (सगळ्यात वरचा क्रमांक, गेल्या वर्षभरापासून! उतरेल असं वाटत नाही. ) , Time , A way of Life , Flight
२) Unna Mattina - एका फ्रेंच सिनेमाचा साऊंड ट्रॅक
३) Define Dancing - "Wall-E" मधली एक सुंदर ट्यून

हल्ली नव्या मल्याळी गाण्यातसुद्धा एखादी नितांतसुंदर धून सापडते, तेव्हा हरवलेली वाट सापडल्यासारखा आनंद होतो. त्यात वरच्या क्रमाने काही नावं घ्यायची म्हटल्यावर neelakaasham, ee shishirakaalam नाहीतर ee mizhikalin माझं ऑल टाइम फेव्हरेट.

हिंदींत सध्या नेहा कक्करचं ओ हमसफर, जिया (गुंडे सिनेमातलं गाणं ), तेरा फितूर, झिरो मधलं जब तक जहाँ में यावरच भागवतोय.

मराठीत मला हवी तशी गाणी शोधणं, विशेषतः नव्या सिनेमात, जरा मुश्कीलच वाटत होतं. पण देवाची कृपा म्हणून त्याने अजय अतुल सारखी रत्नें पैदा केली. त्याव्यतिरिक्त नीलकंठ मास्तर मधलं अधीर मन झाले, मुंबई पुणे मुंबई मधलं कधी तू , सुन्या सुन्या, मानिनी मधलं 'तू निरागस चंद्रमा' मधून मधून डोकावतात.

आत्तापुरतं इतकंच.

देवाची कृपा म्हणून त्याने अजय अतुल सारखी रत्नें पैदा केली. त्याव्यतिरिक्त नीलकंठ मास्तर मधलं अधीर मन झाले,
>>>> अधीर मन अजय अतुलचे च आहे ना

अधीर मन झाले खूप वेळा ऐकते, कंटाळा नाही येत.श्रेया घोशाल अ‍ॅट हर बेस्ट! नव्या आशिकी मधलं सुन रहा है ना तू - हेही श्रेया घोषाल .
ऐ दिल है मुष्किल मधलं रांझण दे यार बुल्लेया खूप वेळा ऐकले जाते, संगितापेक्षा शब्दांसाठी.

ऐ दिल है मुष्किल मधलं रांझण दे यार बुल्लेया खूप वेळा ऐकले जाते, संगितापेक्षा शब्दांसाठी.>> सेम हियर! गाणं आणि lyrics दोन्ही intense आहेत.

ऐ दिल है मुष्किल मधलं रांझण दे यार बुल्लेया खूप वेळा ऐकले जाते, संगितापेक्षा शब्दांसाठी.>> +११११
यातली टायटल सॉंग, चण्णा मेरेया पण आवडते, ही गाणी + हमारी अधुरी कहाणी ची सगळी गाणी खूप आवडतात. पूर्वी रिपीट मोडवर ऐकायचे ☺️ आता वेळ असेल तर ऐकते नहीतर नाही.

गेल्या दोन दिवसांत रिपीट मोडवर ऐकलेली गाणी

तेरे नाम - सिम्बा
सपना जहाँ दस्तक न दे - brothers (???)
तू ही तू हर जगह - किक (मेल फिमेल दोन्ही)
&
करोगे याद ही गझल

गेल्या वर्षी मी नवीन गाणीच फारशी ऐकली नाहीत असं वाटतंय. तुम्ही लोक गाणी कुठे शोधता? माझ्याकडे फक्त गाना ऍप आहे पण त्यात तीच तीच गाणी असतात.

राझी बघितला होता त्यातलं मुड के ना देखो दिलबरो खूपच आवडतं व ते एक रिपिटवर ऐकत असे. विशेषतः त्या कथेच्या context मध्ये फार आवडलेलं गाणं.
काशिनाथ घाणेकर बघितला तेव्हा त्यातील इंद्रधनू, लाल्या, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, गोमू संगतीने ही गाणी अनेकदा ऐकली. त्यातच एक "सुख कातरवेळी" गाणं फार सुरेख आहे. ते चित्रपटात पूर्ण दाखवलेलं नाही पण यूट्यूबने विडियो सजेशन दिलं त्यात बेला शेंडेचा विडियो आहे.

मेड इन इंडिया लगदी है
हाय रेटेड गबरु
बम डीगी बम बम

शिवाय, कोक स्टुडीयोचे यु ट्युबवर असलेले बरेचशे फ्युजन. आत्ता हे सुरु आहे
फतेह अली खान ज्युनियर : https://www.youtube.com/watch?v=kw4tT7SCmaY

बाप रे मी जी गाणी बऱ्याचदा ऐकते +पहाते, ती इथल्या सगळ्या गाण्यांच्या तुलनेने १८५७ च्या काळातील आहेत,तरी पण शेअर करायचा मोह होतोय,
१.(आत्ता लग्गेच आठवले ) -जाने क्या बात है.. २ दो नयना एक कहानी ३ तुम्हे हो ना हो,मुझको तो ४ रिमझिम गिरे सावन,५ ये इष्क हाये .

मला एखादं गाणं आवडलं की कंटाळा येईपर्यंत तेच ऐकते, मला छान शब्द आणि अर्थाची गाणी जास्त आवडतात. तुम्हे दिल्लगी भूल जानी पडेगी आवडलं होतं खूप दिवस आता ते गाणं उतरलंय.. सध्या चोगडा तारा आवडलय ..

हे अरेबिक गाणे माबोकराना आवडेल. मुलगी आणि ( तिची आइही Wink ) फारच गोड आहेत. मध्य पूर्वेतला टिपिकल रिदम आणि ४०-५० अरब नाचताना खूपच गम्मत वाटते. चुकवू नये. मुलीचे नाव हाला अल तुर्क आहे...
https://www.youtube.com/watch?v=Pzx6XTSGCXM&list=RDPzx6XTSGCXM&start_rad...

Feruza Jumaniyozova ... Yalla habibi
उजबेकिस्तान च्या या पॉप सिन्गरच्या गाण्याचा रिदम विलक्शण आहे आणि तो या बेली डान्सरानी छान कॅरी केला आहे... या अरबी गाण्याण्चा रिदम वेस्टर्न बीट्स पेक्शा एकदम वेगळा असतो. आपल्या अफगाण जलेबी या गाण्यानेही हे लक्षात येइल....
https://www.youtube.com/watch?v=oAhjbrmTSWk&list=RDoAhjbrmTSWk&start_rad...

आता अलिकडे येउ या...
अख्तर चनल जाहरी आणि कोमल रिझवी याण्चे बलोच सॉन्ग . बलुचिस्तनच्या या लोकगीताचा अर्थ आहे बलुचिस्तान किती ग्रेट आहे सांगणारा. आपल्या महाराष्ट्र गीतासारखे. याचा रिदमही विलक्षण आहे.अख्तर जाहरी हा मातीतला कलावंत आहे. कोमल रिजवी गाते आणि दिसतेही अति सुंदर Wink . एका भारत भेटीत तिने काढलेल्या उद्गारामुळे झिया की परवेझ मुशर्फ तिच्यावर जाम भडकले होते. दाना पे दाना नंतर दमादम मस्त कलंदरही इम्प्रोवाइज केले आहे....

https://www.youtube.com/watch?v=u3F7kcLrGvA

Rachid Taha was an Algerian singer and activist based in France described as "sonically adventurous". His music was influenced by many different styles including rock, electronic, punk and raï.
बांधून ठेवणारा रिदम....
https://www.youtube.com/watch?v=DuPhCmmfKiE

तुमसेही दिन होता है - जब वी मेट
अगर तुम साथ हो - तमाशा
( All time favourite) Happy

आज जाने की जिद ना करो - फरिदा खानुम
ए अजनबी - दिल से
कुन फाया - राॅकस्टार

अगदी रिपीट मोड नसला तरी बहुतांश वेळेस हीच गाणी ऐकली जातात Happy

मन तळ्यात मन मळ्यात - शैलेश गायका संदीप खरे (संगित)
इकतारा - वेक अप सिद..
मेरे सासो में बसा है तेरा ईक नाम- उदीत
नही सामने - हरीहरन,सुखविंदर
बायलांदो - एनरिके (स्पॅनिश)
जिया जले - बेरकली मिट रेहमान
डु यू नो - एनरिके
झेहनसीब - हसी तो फसी
कान्ट टेक माय आईस ऑफ - ओवरटोन ग्रुप वर्जीन..

अजुन बरीच आहेत. ..

Pages