ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज...

Submitted by cool_vaidehi on 28 March, 2009 - 05:50

ShriSwamiSamarth.jpg

''सबसे बडा गुरू.. गुरूसे बडा गुरू का ध्यास..
और उससे बडे श्री स्वामी समर्थ महाराज...''

इ.स.1457 च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. व त्यानंतर शैल यात्रेचे साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली.ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले.एके दिवशी उध्दव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्‍हाड निसटली.व ती वारूळावर पडली. ही स्वामी महाराजांची लीलाच की त्या उध्दवाचे निमित्य साधून त्यांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्‍हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उध्दवासमोर एक आजानूबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज...

आपल्या हातून ह्या महापुरू्षाला जखम झाली ह्या विचाराने उध्दवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उध्दवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरावर प्रयाण केले.गंगातीरावर भ्रमण करता करता ते कोलकत्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर , मोहळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले.भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळया वेगळया पध्दतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.

इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट प्रवेश केला.व तेथल्या बावीस
वर्षांच्या वास्तव्यात सर्व विश्वाला दैदिप्यमान असे तीर्थक्षेत्र अक्कलकोट करून जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. आणि इसवी सन 1878 मध्ये स्वामींनी अनेकांना ्कार्यरत करून त्यांचा एक आविश्कार संपविला असे भासवले.परंतू प्रत्यक्षात स्वामी महाराज आज 2009 मध्ये देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळ पर्यंत करीत राहतील.

श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या.

अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचा योगक्षेम चालविण्यासोबतच ''भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.'' असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रगटदिन...पुढील सर्व आयुष्य त्यांच्याच चरणी कार्यरत होत जावे हीच आजच्या मंगलदिनी स्वामीचरणी प्रार्थना...

''अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.''

'' अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय जय स्वामी समर्थ ''

1190210228_shree-swami-samartha-of-akkalkot.jpg

.....................................................
संबंधित लेख आजच्या श्री स्वामींच्या प्रगटदिनाचे औचित्य साधून लिहिला आहे.. पण हा लेख नेमका कोणत्या कॅटेगरीत येतो हे न समजल्यामुळे मी तो ललित मध्ये टाकीत आहे...
........ वरील लेखात काही चुकले असल्यास माझ्या बालबुद्धीचा आवाका लक्षात घेऊन माफ करावे व माझ्या चुका मला दाखवून द्याव्यात ही नम्र विनंती...

....वैदेही...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

''अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.''

वैदेही मनःपुर्वक धन्यवाद. या कारणे तुझ्या हातून माऊलींची सेवा घडतेय, छान वाटलं. मी सोलापूरचा असल्याने घरी गेलो की एकदा का होइना अक्कलकोटला जावुन माऊलींचे दर्शन घेवुन येतोच. आज तूझ्यामुळे इथेच दर्शन झाले. धन्यवाद.

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

'भिउ नकोस!! मी तुझ्या पाठीशी आहे !! ', हम गया नही, जींदा है..
अनेकवेळेला स्वामींच्या या वाक्यानी मला धीर दिलेला आहे,आणि पदोपदी हेच जाणवुन देत आहेत कि ते सदैव भक्तांच्या मागे राहुन कायम त्यांचे रक्षण करीत आहेत..

वैदेही, खरोखर मनापासुन धन्यवाद..! सर्व स्वामी भक्तासाठी स्वामींच्या प्रकटदिनाचा योग साधुन, एवढा छान लेख लिहिल्याबद्दल आभारी आहे.

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

माऊलींचा भक्त परीवार माबो वर पाहून खरंच आनंद झाला...
माऊली खरंच आपल्या पाठीशी सतत असतात.... मला पण हा अनुभव आहे... Happy

हा लेख माऊलींनीच लिहून घेतला माझ्याकडून....
................................
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा...
राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा... Sad
कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो.... Lol

अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय

मला भक्तीची ओढ सद्गुरुंच्या याच रुपाने लावली Happy

************
द्रवरुप हेलियमच्या निर्मितीतून घातलेला 'क्रायोजेनिक्स्'चा पाया व 'सुपरकंडक्टिव्हिटी' या संशोधनातून भौतिकशास्त्राला दिलेल्या मोलाच्या योगदानासाठी - हेक ओन्न - नोबेल (१९१३)

वैदेही तो शेवटी जो फोटो लावलायस ना स्वामींचा तो मला मेल करशील का ग?? मी खुप दिवसांपासुन शोधतेय.. बाकी लेख स्वामींसारखाच छान....
-----------------------------------------------------
जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते.

वैदेही,
खुप छान लेख लिहीला आहेस!
"श्री स्वामी समर्थ महाराज की जय.''

खरच सुंदर झाला आहे लेख.....
"श्री स्वामी समर्थ"

श्री स्वामी समर्थ Happy

.........................
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा...
राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा... Sad
कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो.... Lol

श्री स्वामी समर्थ जय जय स्वमी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ जय स्वमी समर्थ.
ह्या बी बी वर कोणि रेगुलर्ली लिहित नाही का? अजून कुठ्ला दुसरा बी बी आहे का जो जास्त active आहे? ( स्वामी समर्थान्चा )

''अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.''

हम गया नही, जींदा है..

---------------------------------------------------
तात्या.
---------------------------------------------------

मंगळवेढे येथे असतांना श्री स्वामीमहाराजांनी माझ्या खापरपणजोबांना (वडीलांचे आजोबा) मंगळवेढे सोडून नागपूरला जायला सांगितले. कारण खापरपणजोबांचे आईवडील खापरपणजोबांच्या लहानपणीच वारले होते व ते ज्या नातेवाईकांकडे रहात होते तिथे त्यांना खूप त्रास होत होता. म्हणून माझे खापरपणजोबा नागपूरला आले. पुढे पणजोबा सिव्हिल इंजिनियर झाले, बक्कळ इस्टेट जमवली, अगदी साठ सत्तर वर्षे, माझ्या वेळपर्यंत चैन चालली होती. श्री स्वामी महाराजांची कृपा!

आता भारताशी संबंध पाSर सुटला, नागपूरशीहि, पण मोठ्या भावाच्या घरी श्री स्वामी महाराजांचा फोटो आहे पूजेत.

छान लेख.... निराली, नवीन पोस्ट टाकून या लेखाला वर आणल्याबद्दल धन्यवाद.... त्यामुळे लगेच दिसला नवीन लेखनामध्ये..

!!!श्रीस्वामी समर्थ!!!

॥ ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ॥
हो ना @ मनकवडा इथेच रोज पहिली पोस्ट टाकायची अस ठरवलय. ईथे हितगुज सेक्शन मधे अजून दोन बी बी दिसले स्वामी समर्थान्चे ते इथे लिन्क होत नाहित का? ते इथे आणाय्चे असतील तर कस करायचे?

@झक्की.... मोठ्या भावाच्या देवघराचा फोटो पहायला खुप आवडेल.

श्री स्वामी समर्थ!

आपल्या लेखाने खूप माहिती मिळाली. मला अनुभव आलेले आहेत. स्वामी त्यांचे नुसते नांव घेतले तरी प्रश्न सोडवतात असे वाटते.

खूप खूप आभार आपले!

-'बेफिकीर'!

मला अनुभव आलेले आहेत हे म्हणणे दुराभिमानी आहे. म्हणून मी दुरुस्ती करतो की मला अनुभव आलेले नसून ती त्यांचीच लीला आहे की मला असे वाटत राहते की मला अनुभव येतात.

-'बेफिकीर'!

मामी, माझाही दंडवत सांग गं Happy अक्कलकोटचं नाव काढलं तरी स्वामीचरित्रसारामृतातील घटना, स्थानं डोळ्यासमोर उभी रहातात.

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ॥

मजा आहे @ मामी
मला अजून एक वाक्य आवडत ते " अशक्य ही शक्य करतील स्वामी"
कुठलीही गोश्ट होणार नाही किन्व्हा जमणार नाही अस वाटल कि हे वाक्य आठवून खूप धीर येतो. ही आरती पण फार सुन्दर आहे. सगळ्यान्नी ऐकली असेलच तरी वीकेन्ड ला टाकायचा प्रयत्न करते. ह्यची सीडी नेहमीच गाडीत असते त्यामुळे सकाळी पहिली गोश्ट कानावर पडते ती हीच.
मग अस वाटत की स्वामी म्हण्ताएत कि तु पाऊल टाक पुढे न घाबरता. मी आहे पाठीशी.

मनात शन्का आलि हुरहुर जाणवली
प्रश्ना उभे राहिले
कि नामस्मरण करायचा कि मन एकदम हलका होता
दरसालि एकदा अक्कलकोट गाणगापुर जाउन डॊक टॆकल कि बास
मनास जि उभारि मिलते खरच
स्वामि समर्थ महाराज कि जय

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ॥

स्वामी समर्थ ह्यन्ना भजी खायला खुप आवडायची अस कुठे तरी वाचण्यात आल , बरोबर आहे का?

Pages