ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज...

Submitted by cool_vaidehi on 28 March, 2009 - 05:50

ShriSwamiSamarth.jpg

''सबसे बडा गुरू.. गुरूसे बडा गुरू का ध्यास..
और उससे बडे श्री स्वामी समर्थ महाराज...''

इ.स.1457 च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. व त्यानंतर शैल यात्रेचे साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली.ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले.एके दिवशी उध्दव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्‍हाड निसटली.व ती वारूळावर पडली. ही स्वामी महाराजांची लीलाच की त्या उध्दवाचे निमित्य साधून त्यांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्‍हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उध्दवासमोर एक आजानूबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज...

आपल्या हातून ह्या महापुरू्षाला जखम झाली ह्या विचाराने उध्दवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उध्दवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरावर प्रयाण केले.गंगातीरावर भ्रमण करता करता ते कोलकत्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर , मोहळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले.भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळया वेगळया पध्दतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.

इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट प्रवेश केला.व तेथल्या बावीस
वर्षांच्या वास्तव्यात सर्व विश्वाला दैदिप्यमान असे तीर्थक्षेत्र अक्कलकोट करून जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. आणि इसवी सन 1878 मध्ये स्वामींनी अनेकांना ्कार्यरत करून त्यांचा एक आविश्कार संपविला असे भासवले.परंतू प्रत्यक्षात स्वामी महाराज आज 2009 मध्ये देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळ पर्यंत करीत राहतील.

श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या.

अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचा योगक्षेम चालविण्यासोबतच ''भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.'' असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रगटदिन...पुढील सर्व आयुष्य त्यांच्याच चरणी कार्यरत होत जावे हीच आजच्या मंगलदिनी स्वामीचरणी प्रार्थना...

''अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.''

'' अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय जय स्वामी समर्थ ''

1190210228_shree-swami-samartha-of-akkalkot.jpg

.....................................................
संबंधित लेख आजच्या श्री स्वामींच्या प्रगटदिनाचे औचित्य साधून लिहिला आहे.. पण हा लेख नेमका कोणत्या कॅटेगरीत येतो हे न समजल्यामुळे मी तो ललित मध्ये टाकीत आहे...
........ वरील लेखात काही चुकले असल्यास माझ्या बालबुद्धीचा आवाका लक्षात घेऊन माफ करावे व माझ्या चुका मला दाखवून द्याव्यात ही नम्र विनंती...

....वैदेही...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पहिलीदुसरीत असताना गेलोय अक्कलकोट अन गाणगापूरला!
नन्तर कधी जमले नाहीये, पण जायची इच्छा तर आहेच आहे Happy जरुर जाईन Happy

''भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.''
खरचं किती ताकत आहे ह्या शब्दांमध्ये , अगदी आपल्या मित्राने जरी हे शब्द उच्चारले तरी किती तरी धीर मिळतो आपल्याला.
मी ही भारतात गेलो की जमेल तसं जात असतो अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला.

काही दिवसांपूर्वीचा अगदी ताजा अनुभव आहे. मी आणि माझी बायको आम्ही सातार्‍याला निघालो होतो बहिणीकडे. रिझर्वेशन नसल्यामुळे लाल डब्बा पकडावा लागला. गाडी बरीच हातघाईला आल्यासारखी वाटत होती. लोनावळा ओलांडल्यावर मध्येच एका ठिकाणी भजन करत निघालेली माऊलींची पालखी दिसली. (एका टेंपोत सवार होते सगळे) आमचा ड्रायव्हर बहुदा माऊलींचा भक्त असावा, त्याने क्षणभर गाडी थांबवली आणि प्रवाशांची परवानगी घेवुन दर्शनाला म्हणुन खाली उतरला. त्याच्याबरोबर आम्ही बरेचसे जण खाली उतरलो (जेम तेम दहा-बारा जण बसमध्ये बसुन होते) आम्ही खाली उतरलो आणि पाचच मिनीटात गाडीच्या समोरच्या भागातून धुर निघायला लागला, पुढच्याच क्षणी इंजीनाने पेट घेतला.....
हा योगायोगही असु शकेल पण माऊलींची पालखी दिसलीच नसती तर .....?

VK11.jpg

श्री सदगुरू स्वामी समर्थ महाराज की जय Happy

बाप्रे विशाल, योगायोग किंवा इतर जे काही असेल ते, पण बस पूर्ण भरलेली असताना आणि वेगाने जात असताना हा प्रसंग ओढवला असता तर?????

मी जाऊन आले अक्कलकोट आणि तुळजापूरला. मी मुळात फारशी भाविक नाहीये पण देवावर, स्वामींवर श्रद्धा आहे. मला दोन्ही ठिकाणी जे घाईगर्दीत देवदर्शन करावे लागलं, आजूबाजूला देवाच्या नावाखाली चालणारा पुजार्‍यांचा आरडाओरडा, ती देवाचे फोटो, माळा वगैरे विकणारी दुकानं, अस्वच्छता या सगळ्यामुळे यात काही अर्थ नाही असंच वाटायला लागलं.

देवाशी कनेक्ट होणे म्हणजे काय तर अंतर्मुख होणे ते इथे काही जमू शकले नाही.

॥ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

मला पण तिथे गेलं कि असाचं फील येतो @ मामी. लहान पणी तर फारचं गिल्टी फीलींग यायचं , पण त्या गर्दी मुळे तिथुन कधी एकदा बाहेर जातोयं असं व्ह्यायचं. आता असं वाटतं कि ते तर आपल्या बरोबरचं असतात त्यामुळे त्यान्ची उपासना हेच आपलं अक्क्ल्कोट.

"भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" या वाक्यातच केवढातरी आधार वाटतो.....
पुढचे सर्व आयुष्य त्यान्च्या चरणी सेवा करण्यातच जावे हीच मनोकामना.....

!! श्री स्वामी समर्थ !!

>>>>> आजूबाजूला देवाच्या नावाखाली चालणारा पुजार्‍यांचा आरडाओरडा, ती देवाचे फोटो, माळा वगैरे विकणारी दुकानं, अस्वच्छता या सगळ्यामुळे यात काही अर्थ नाही असंच वाटायला लागलं. <<<<
हे नजरेआड करुन (अर्थात "ते इतर" व मी [कसा] वेगळा, यातिल मनात्/बुद्धित दृगोच्चर होणारा महाघातक अहंभाव नाहिसा करुन) निर्विकल्प मनाने दर्शन घेऊ शकत नसलो तर त्या तेथिल दर्शनालाच नव्हे, तर तिथे काय नि आत्ता इथे काय, स्वामिन्ची वा कुणाही दैवताची आठवण काढण्यात देखिल अर्थ नाही असे मला वाटते. असो. देव करो, अन कुठल्याही दर्शनावेळेस, मजवर अशी वेळ न येवो ही प्रार्थना.

थोडस्स खट्याळ भाषेत सान्गायच झाल तर अस म्हणता येईल की , मी उभा तर आहे देवाच्या मूर्तिपुढे/समाधीपुढे, पण त्याच्याशी एकतानता साधायच्या ऐवजी, मनाच्या कन्गोर्‍यातील बराचसा भाग देवळाबाहेर काढलेल्या चप्पला चोरीला जाणार नाहीत ना या शन्केने भरलेला! बाह्य जग कस भलंबुर आहे याची (नस्ती) उठाठेव करणारा. मी असाच होतो पूर्वी, त्यामुळे देवळात जायचो नाही, नन्तर नन्तर थोड थोड समजायला लागल्यावर हल्ली कुठल्याही देवळात जाऊन मनोभावे पाया पडू शकतो.

देवा सान्गु सुखदु:ख, देव निवारील भुक.....
जाऊ देवाचिया द्वारा, घेऊ तेथेची विसावा.....
या गाण्यातील बोलान्प्रमाणे, बहुतेकजण देवाकडे जातात, पण सान्गताना केवळ दु:खेच सान्गत बसतात. सुखाचा प्रसन्ग मात्र मुद्दामहून देवाला जाऊन सान्गितला असे बहुधा होत नाही. याच गाण्यातुन मला जेव्हा हे कळले, अन माझे मीच तपासले, तेव्हा मी वाईटाबरोबर, काय काय चान्गले घडले ते ही सान्गू लागलो.

निराली
स्वामींना भजी, कड्बोळि आणि बेसनाचे लाडु आवडायचे. मी असं वाचलयं कि त्यांना मांजराचा फार राग येई.

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ॥

मला १ फोटो अपलोड करायचा होता मी प्रतिसाद्च्या खाली दिलेल्या
मजकूरात image किंवा link द्या.
मधुन स्वामिंचा फोटो अपलोड केला पण का झाला नाहि.

हे नजरेआड करुन (अर्थात "ते इतर" व मी [कसा] वेगळा, यातिल मनात्/बुद्धित दृगोच्चर होणारा महाघातक अहंभाव नाहिसा करुन) निर्विकल्प मनाने दर्शन घेऊ शकत नसलो तर त्या तेथिल दर्शनालाच नव्हे, तर तिथे काय नि आत्ता इथे काय, स्वामिन्ची वा कुणाही दैवताची आठवण काढण्यात देखिल अर्थ नाही असे मला वाटते. असो. देव करो, अन कुठल्याही दर्शनावेळेस, मजवर अशी वेळ न येवो ही प्रार्थना.

>>>> लिंबूटिंबू, अगदी मान्य. मी केवळ स्वार्थापुरती देवाची भक्त असते. जेव्हा काही मानसिक आधार हवा असेल तेव्हाच. Happy

>>> मी केवळ स्वार्थापुरती देवाची भक्त असते
मामी, हे "समजणे/उमगणे" व त्याप्रमाणे मान्य करता येणे वा स्वतःशीच कबुल करता येणे हीच मुळी महत्वाची पहिली पायरी झाली.
इथुन पुढे मग पुढील पायर्‍या ओघाओघानेच चढत जाता येते. थोडा वेळ लागतो, कारण आपण संसारी माणसे, चूलबोळक्यात आपले आख्खे विश्व सामावलेले! पण हे लक्षण निश्चितच पॉझिटीव्ह आहे असे मला वाटते Happy

माझं गाणगापुर आणि अक्कलकोटं दर्शन राहिलय.. Sad माझे आजोबा (आईचे बाबा) गाणगापुर क्षेत्री पुजारी होते गेले कित्येक वर्षे. आता त्यांच्या नावाने एक खोली बांधायची आहे तिथे असे कळविले आहे. बघुया तिथे जाण्याचा कधी योग येतो ते.. Happy

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ!!..
नामस्मरणातही खुप शक्ती आहे..मनाला शांत करणारी, आश्वासक अन सगळा भार सोपवुन निश्चिंत व्हावी अशी..
श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सदगुरु स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,सदगुरु स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!

स्वामींचा तारक मंत्र रोज म्हंटला तर मन निश्चिंत होत व प्रसन्न वाटत.

|| महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ||
मी नुकतीच अक्कल्कोट ला जाऊन आले. अज्जिबात गर्दी न्हवती. पण खुप बदलयं . आत फोटो काढायला
परवानगी नाही. औदुम्बरा भोवती कुम्पण आहे तिथे कट्ट्यावर बसता येत नाहि.
पण खुप छान वाटलं
कुणाला पळसदरी च्य मठा बद्दल काही माहीती आहे का? पुण्या हून कसं जायचं? तिथे राहायची सोयं आहे का? तिथला फोन नंबर कुणाला माहीती आहे का?

कुणाला पळसदरी च्य मठा बद्दल काही माहीती आहे का? पुण्या हून कसं जायचं? तिथे राहायची सोयं आहे का? तिथला फोन नंबर कुणाला माहीती आहे का?>>>
पळसदरी? का कर्ला? मी कार्ल्याला गेले तेव्हा गेले होते. मस्त प्रसन्न मुर्ती आहे तेथे स्वामींची.
लोणावळ्याच्या जवळ आहे तो मठ.

पळसदरी हेच नाव आहे ग मोना. कात्रज ला उतरून आत थोडं चालत जायच एव्ढीच जुजबी माहीति मिळाली. गूगल करून शोधाय्चा प्रयत्न केला पण काही माहीती मिळाली नाही. त्या मठात फोन नम्बर पण नाहीये. Exchange vaalyanna phone kela tar tyanna pan kahi mahiti nahi.

अग हे तर पळसदरी स्टेशन जवळ दिसतेय. स्टेशन च्या पुढे १ धरण आहे. त्याच्या जवळच आहे हा मठ. मॅप वर -
click on up arrow. u will get palasdari station. i guess this is walkable distance from station. i have visted that dam it's near to station.

|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ||

हो ग मोना मी हीच साइट पाहिली होती गूगल केल्या वर. पण पहिल्यान्दाच जाणार म्हणुन काही तिथला फोन नम्बर वगेरे काही मिळेल का हे पहायच होत किन्व्हा कोणी जाऊन आलेले असले तर.

http://thedabbaexpress.blogspot.com/2009/12/shri-swami-samarth.html

ही पण एक लिन्क मिळाली होती. पण त्यात मठ किति वाजता उघड्तो वगेरे काही माहिती न्हवती.

पळसदरी स्वामी समर्थ मठ पत्ता
पळसदरी हे खोपोली मार्गावरील स्टेशन असून ते कर्जतच्या पुढचे स्टेशन आहे .
पळसदरी स्टेशन पासून धरणाजाव्ळून चालत १० ते १५ मिनिटात मठात पोहचता येते .
कर्जत वरून रिक्षाने किंवा बसने १५ मिनिटात मठात जाता येते .
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पासून खोपोली किंवा कर्जत पर्यंत लोकलने प्रवास करता येईल
येथील ध्यान मंदिरात बसून जप / ध्यान करण्याचा अनुभव शब्दातीत आहे , तो सर्वांनी जरूर घ्यावा .
// श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ //

ज्योति

ज्योती तु गेलियेस का त्या मठात? मला काही तिथे जायला जमलं नाही.
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ||

Pages