ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज...

Submitted by cool_vaidehi on 28 March, 2009 - 05:50

ShriSwamiSamarth.jpg

''सबसे बडा गुरू.. गुरूसे बडा गुरू का ध्यास..
और उससे बडे श्री स्वामी समर्थ महाराज...''

इ.स.1457 च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. व त्यानंतर शैल यात्रेचे साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली.ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले.एके दिवशी उध्दव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्‍हाड निसटली.व ती वारूळावर पडली. ही स्वामी महाराजांची लीलाच की त्या उध्दवाचे निमित्य साधून त्यांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्‍हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उध्दवासमोर एक आजानूबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज...

आपल्या हातून ह्या महापुरू्षाला जखम झाली ह्या विचाराने उध्दवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उध्दवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरावर प्रयाण केले.गंगातीरावर भ्रमण करता करता ते कोलकत्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर , मोहळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले.भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळया वेगळया पध्दतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.

इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट प्रवेश केला.व तेथल्या बावीस
वर्षांच्या वास्तव्यात सर्व विश्वाला दैदिप्यमान असे तीर्थक्षेत्र अक्कलकोट करून जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. आणि इसवी सन 1878 मध्ये स्वामींनी अनेकांना ्कार्यरत करून त्यांचा एक आविश्कार संपविला असे भासवले.परंतू प्रत्यक्षात स्वामी महाराज आज 2009 मध्ये देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळ पर्यंत करीत राहतील.

श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या.

अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचा योगक्षेम चालविण्यासोबतच ''भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.'' असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रगटदिन...पुढील सर्व आयुष्य त्यांच्याच चरणी कार्यरत होत जावे हीच आजच्या मंगलदिनी स्वामीचरणी प्रार्थना...

''अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.''

'' अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त जय जय स्वामी समर्थ ''

1190210228_shree-swami-samartha-of-akkalkot.jpg

.....................................................
संबंधित लेख आजच्या श्री स्वामींच्या प्रगटदिनाचे औचित्य साधून लिहिला आहे.. पण हा लेख नेमका कोणत्या कॅटेगरीत येतो हे न समजल्यामुळे मी तो ललित मध्ये टाकीत आहे...
........ वरील लेखात काही चुकले असल्यास माझ्या बालबुद्धीचा आवाका लक्षात घेऊन माफ करावे व माझ्या चुका मला दाखवून द्याव्यात ही नम्र विनंती...

....वैदेही...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वामी समर्थांची मूर्ति आठवावी | त्यांचे पायी दृढ श्रध्दा ठेवावी | आणी आपली भावना असावी | मनोभावें ऐसी कीं || ४३ ||

पाठीशीं आहेत अक्कलकोट स्वामी | उगीच कशास भ्यावे मी | काहींच पडणार नाही कमी | समर्थांच्या दासासी || ४४ ||

भाग्यवान ते जे लागले भजनी | वादविवाद केले पंडितांनी | मग एकमुखानें सर्वांनी | मान्य केली थोर योग्यता || ४५ ||

वेदांताचा अर्थ लाविला | पंडितांचा ताठा जिरविला | भाविक भक्तांना दिधला | धीर अनेक संकटी || ४६ ||

स्वामी तुमचे चरित्र आगळें | अतर्क्य अलौकिक जगावेगळे | त्यांत प्रेमाचे सागर सांठले | धन्य धन्य ज्यांना उमजलें ते || ४७ ||

बाळप्पा चोळप्पादि सर्वांनी | लहान मोठ्या अधिकार्‍यांनी | गरीबांपासून श्रीमंतांनी | सेवा केली यथाशक्ती
|| ४८ ||

जे जे तुमच्या भजनीं लागले | त्यांचे त्यांचे कल्याण झालें | हवें हवें ते सारें मिळाले | श्री समर्थ कृपेनें
|| ४९ ||

पुढे संपल्या लीला संपले खेळ | ताटातुटीची आली वेळ | स्वामी म्हणजे परब्रम्ह्य केवळ | परब्रह्म्यांत मिळालें || ५० ||

शके अठराशें बहुधान्यनाम संवत्संरी | चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवारी | पुण्य घटिका तिसर्‍या प्रहरी | स्वामी गेले निजधामा || ५१ ||

गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातही साधारण असाच प्रसंग आहे. सांप्रत काळ चांगला नाही , आता क्रांती करण्यापेक्षा नामस्मरनात वेळ घालवावा, नंतर योग्य संधी मिळेल, असे वासुदेव ब. फडकेना अक्कलकोट स्वामी ( म्हणजे गजानन महाराज का? ), नृसिंहस्वामी, श्री बाळकोबा महाराज ( म्हणजे कोण?) , श्री माणिकपभू ( म्हणजे कोण?) यानी सांगितले होते, नंतर ते गोंदवल्याला आले. तिथेही त्याना हेच उत्तर मिळाले....

फडके दत्तभक्त होते. त्यानी गुरुचरित्राची रोजच्या वाच्गनासाठी स्वतःच्या हस्ताक्षरात प्रत केली होती. दत्तनामाचा ते रोज ५००० वेळा जप करत.

( संदर्भ.. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय, के वि बेलसरे)

मला सुद्धा गजानन महाराज म्हणजे नेमके कुठले हे कळलं न्हवतं. काळ वेळ सगळ्याचं गोष्टीं करता बघायला लागतो असं दिसतयं.

बोलता बोलता आला अंतकाळ | प्रकृतीत झाली चलबिचल | क्षणात पापण्या झाल्या अचल | निजानंदी झाले
निमग्न || ५२ ||

वचनपूर्तींसाठी निर्णयानंतर | पांचवा दिवस शनिवार | स्वामी प्रगटले निलेगांवाबाहेर | दिलें दर्शन भाऊसाहेबांसी || ५३ ||

ऐसा यती दत्त दिगंबर | संपवूनी आपूला अवतार | निजधामा गेला निरंतर | भक्त झाले पोरके || ५४ ||

बातमी जेव्हा सर्वत्र पसरली | जनता शोकाकुल झाली | सर्व भक्तमंडळी हळहळली | अन्नपाणीही सुचेना
|| ५५ ||

गावोगांवीची भक्तमंडळी | अक्कलकोटी गोळा झाली | समर्थांची समाधी पाहिली | आपल्या साश्रू नयनांनी

|| ५६ ||

चवथा अवतार संपला | तरीही चैतन्यरुपें तिथेच राहिला | अक्कलकोट पुण्यभूमीला | क्षेत्रत्वा प्राप्त जाहलें
|| ५७ ||

माफ करा पण काय चाल्लय हे सगळ? मला काहिच झेपत नाहिये. तुम्हा लोकान्चि श्रद्धा कि अन्द्धश्रद्धा बघुन डोळे फिर्ताहेत. स्वामि समर्थ, साई बाबा (नवे आणि जुने.. जुनेपण पायाखालुन पाणि वगैरे काडायचे), आनिरुद्ध बाबा ई. स्वत्ताला देव समजणारे वा मानुन घेणारे सगळेच भोण्दु वाटतात.
come on guys, ithe takleli story aaj kunala patel ka? mala tari nahi patat.
ज्यांना पटते त्यांच्या निरागसतेची कीव करावीशी वाटते. मला व्यक्तीश्या कोणा बाबाने वा देवाने कधी साक्षात्कार दिल्याचे आठवत नाही. त्यामुळे त्यांना मानाने झेपत नाही.
तुमच्या श्रद्धेचा मान आहे पण हे फोटो काय, स्टोरी काय, मंत्र काय, जप काय सगळं अंधश्रद्धा वाटते.

स्वामी समर्थ तर आजपण प्रचिती देतात. झोल, तुमचि श्रध्दाच नाही तर इकडे कशाला लिहुन वेळ घालवत आहात ?
आपल्याकडे सगळयांनी जप, नामस्मरणाचे महत्व सांगितले आहे. देवाच्या साठी ह्या गोष्टी चमत्कार नसतात, आपल्या सामान्य माणसांसाठी चमत्कार वाटतात.

अजूनही जे येती समाधीदर्शना | त्यांच्या व्याधी आणी विवंचना | संकटे आणी दु:खे नाना | स्वामी दूर करतात || ५८ ||

याचे असती असंख्य दाखले | अनेकांनी अनुभवले | म्हणूनी महाराजांची पाऊले | आपणही वंदूंया || ५९ ||

नम्र होउनी त्यांचे चरणीं | कळकळने करुंया विनवणी | स्वामींना यावी करुणा म्हणूनी | प्रार्थना त्यांना करुंया || ६० ||

जयजय दत्ता अवधूता | अक्कलकोट स्वामी समर्था | सदगुरु दिगंबरा भगवंता | दया करी गा मजवरी
|| ६१ ||

अनेकांच्या संकटी आला धावून | आता माझी प्रार्थना ऐकून | समर्थराया देई दर्शन | दूर लोटु नको मला
|| ६२ ||

व्यवहारी मी जगतो जीवन | अनेक पापें घडती हातून | तव नामाचें होते विस्मरण | क्षमा याची असावी
|| ६३ ||

सदगुरुराया कृपा करावी | तुमची सेवा नित्य घडावी | ऐसी बुध्दी मजला द्यावी | पापे सर्व पळावी || ६४ ||

सुखाचें व्हावे जीवन ऐहिक | धनदौलत मिळावी, मिळावे पुत्रपौत्रसुख | गृहसौख्य आणी वाहनसुख |
अंती सदगति लाभावी || ६५ ||

तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा | म्हणुनी याचना करतों देवा | उदार मनाने वर द्यावा | आणी तथास्तु म्हणावे
|| ६६ ||

सद् गुरु/ सद् गति लिहिताना द चा पाय मोडुन एकत्र शब्द कसा लिहायचा?
a.h केलं कि होतं पण पुढे " ग" लिहिला कि द आणी ग एकत्र होतात.

तुमची होतां कृपा पूर्ण | जीवन माझें होईल धन्य | म्हणुनी आलों तव पायी शरण | दत्तराया दयाघना
|| ६७ ||

मी एक मानव सामान्य | तुमची सेवा नित्य घडावी म्हणून | या पोथीचें करितों वाचन | दान द्या तुमच्या कृपेचे || ६८ ||

वेडीवाकुडी माझी सेवा | स्वीकारावी स्वामी देवा | वरदहस्त नित्य मस्तकीं ठेवा | हीच अंती विनंती || ६९ ||

शके अठराशे नव्याण्ण्व वर्षी | चैत्रमासीं शुक्लपक्षी | शुभ रामनवमी दिवशी || पोथी पूर्ण झाली ही || ७० ||

स्वामींचे चित्र ठेऊनी पुढ्यांत | किंवा स्वामींच्या एखाद्या मठांत | बसुनी ही पोथी वाचावी मनांत |
इच्छा सफल होईल || ७१ ||

माणिकप्रभू , साई शिरडीश्वर | आणी अक्कलकोट्चे दिगंबर | एकाच तत्वाचे तीन अविष्कार | भेद त्यांत नसे मुळी || ७२ ||

>>> दोनेक वर्षा पुर्वी रमेश देव यान्चा वासुदेव बळवंत फडके हा च्रित्र्पट पाहीला त्यात आद्यक्रांतीकार वासुदेव बळवंत फडके हे गजानन महाराजा पाशी आशिर्वाद घेण्यासाठी जातात तेव्हां महाराज वासुदेव बळवंत फडके यासं हाकलून देतात असे दाखवले होते ह्याचे कारण कोणी सान्गू शकेल काय ?

श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात हा प्रसंग वर्णिलेला आहे. आपल्या सशस्त्र क्रांतीला परमेश्वराचे अधिष्ठान असावे व सत्पुरूषांचे आशीर्वाद मिळावेत या हेतूने वासुदेव बळवंत फडके हे एक तलवार घेऊन स्वामी समर्थ महाराजांच्या (श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज) दर्शनाला जातात. श्री स्वामी समर्थ महाराजांनी (स्वामी समर्थ महाराज व गजानन महाराज वेगळे) ती तलवार आपल्या हातात देऊन आशिर्वाद दिला तर आपली क्रांती यशस्वी होईल असे त्यांना वाटत होते. त्यांची क्रांती यशस्वी होणार नाही हे स्वामींना अंतर्ज्ञानाने माहित असते. त्यामुळे त्यांनी काही न बोलता एका सेवेकर्‍याला हाक मारून ती तलवार झाडावर नेऊन ठेवण्यास सांगितले. वा. ब. फडक्यांची क्रांती यशस्वी होणार नाही हे त्यांनी यातून सूचित केले. बराच वेळ बसून सुध्दा स्वामी समर्थ महाराज काहीच बोलत नाहीत हे पाहून फडके निराश झाले व तशीच तलवार घेऊन परत आले.

श्री गोंदवलेकर महाराजांनी देखील "अजून क्रांतीला योग्य वेळ आलेली नाही" असा फडक्यांना इशारा दिला होता.

>>> गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातही साधारण असाच प्रसंग आहे. सांप्रत काळ चांगला नाही , आता क्रांती करण्यापेक्षा नामस्मरनात वेळ घालवावा, नंतर योग्य संधी मिळेल, असे वासुदेव ब. फडकेना अक्कलकोट स्वामी ( म्हणजे गजानन महाराज का? ), नृसिंहस्वामी, श्री बाळकोबा महाराज ( म्हणजे कोण?) , श्री माणिकपभू ( म्हणजे कोण?) यानी सांगितले होते, नंतर ते गोंदवल्याला आले. तिथेही त्याना हेच उत्तर मिळाले....

अक्कलकोट स्वामी व गजानन महाराज हे वेगळे आहेत. माणिकप्रभू हे देखील श्री दत्ताचे अवतार मानले जातात. कर्नाटकातील हुमणाबाद येथे त्यांचे वास्तव्य होते. श्रीपाद श्रीवल्लभ (यांच्या पादुका औंदुबरला आहेत), श्री नरसिंह सरस्वती (यांच्या पादुका गाणगापूरला व नृसिंहवाडीला आहेत), माणिकप्रभू (हुमणाबाद) व स्वामी समर्थ महाराज (अक्कलकोट) हे सर्वजण श्रीदत्ताचे अवतार मानले जातात. माणिकप्रभू व श्री गोंदवलेकर महाराजांची देखील भेट झाली होती.

वर उल्लेख केलेले श्री बाळकोबा महाराज नसून ते काळबोवा महाराज या नावाने ओळखले जात. ते पुण्यात होते. त्यांनी देखील वा. ब. फडक्यांना क्रांतीसंदर्भात सावधनतेचा इशारा दिला होता. यांचा श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात २-३ ठिकाणी उल्लेख आहे.

एकाची करितां भक्ती | तिघांनाही पावते ती | ऐसी ठेऊनी आपली वृत्ती | पोथी नित्य वाचावी || ७३ ||

या पोथीचे करितां नित्य पठण | प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न | करतील सर्व मनोरथ पूर्ण |
सत्य सत्य वाचा ही || ७४ ||

ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थापर्णमस्तु || शुभं भवतु || ॐ शांति:शांति:शांति: || (ओवी संख्या ७४ )

मिलिंदमाधवकृत

|| " श्री अक्कलकोटस्वामी स्तोत्र ---माहात्म्य सम्पूर्ण " ||

@मास्तुरे चांगली माहिती

@अश्विनी के , स्तोत्राच्या बाफ वर कसं पोस्ट करू हे सगळं ? का तूच करतेस? Happy म्हणजे जर काही चुका झाल्या असतील तर त्या सुधा तुला बरोबर करता येतील ?

अगं तू एवढी मेहनत घेतली आहेस तर तूच तुझ्या नावाने पोस्ट कर Happy दुसरी खिडकी उघडून त्यात इथलं एका खाली एक कॉपी पेस्ट करत जा. सगळं पेस्ट करुन झालं की एकदा तपासून बघ आणि ते सगळं स्तोत्रांच्या बाफवर आणून सबमिट कर. नक्की जमेल. नाही जमलं तर मी ते एकत्र करुन तुझ्या विपूत पाठवते, तू तिकडे कॉपी पेस्ट कर.

काय बी कळलं न्हाई.

१. वर उल्लेख केलेले अक्कलकोट स्वामी म्हणजे स्वामी समर्थ ना? म्हणजे फडके हे या स्वामी समर्थाना भेटले होते की काय?

२. श्री गजानान महाराज शेगाव आणि श्री साईबाबा ( ओरिजिनल Happy ) हे स्वामी समर्थांचे शिष्य ना? या दोघाना स्वामी समर्थानी दिक्षा दिली होती ना? त्यांचा काळ कितीतरी जुना आहे ना? मग हे सगळे गोंदवलेकर महाराजाना समकालीन कसे असतील? आणि या सगळ्याना फडके कसे भेटले? स्वामी समर्थही दत्तचेच अवतार, माणिकप्रभूअही दत्ताचेच अवतार आणि हे सगळेच्व्ह अवतार समकालीन कसे? आणि आज मात्र एकही अवतार नाही... देवाचे अवतार इतक्या रँडमली कसे काय होतात बुवा?

*** मानसपूजा ***

जय जय स्वामी समर्थ |

नमो स्वामीराज दत्तावतारम् | श्री विष्णू ब्रह्म शिवशक्तीरुपम् |
ब्रह्मस्वरुपाय करुणाकराय | स्वामी समर्थाय नमोस्तुते |

स्वामी दत्तात्रय हे कृपाळा | मला ध्यानमुर्ती दिसू येई डोळा |
कुठे माय माझी म्हणे बाल जैसा | समर्था तुम्हाविण हो जीव कैसा |

स्वामी समर्था तुम्ही स्मर्तुगामी | हृदयासनी बसा प्रार्थितो मी |
पूजेचे यथासांग साहित्य केले | मखरात स्वामी गुरु बैसविले |

>>> १. वर उल्लेख केलेले अक्कलकोट स्वामी म्हणजे स्वामी समर्थ ना? म्हणजे फडके हे या स्वामी समर्थाना भेटले होते की काय?

होय. वासुदेव बळवंत फडके हे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला १८७० च्या आसपास गेले होते.

>>> २. श्री गजानान महाराज शेगाव आणि श्री साईबाबा ( ओरिजिनल ) हे स्वामी समर्थांचे शिष्य ना?
या दोघाना स्वामी समर्थानी दिक्षा दिली होती ना?

नाही. या दोघांचे गुरू कोणालाही माहिती नाहीत.

>>>> त्यांचा काळ कितीतरी जुना आहे ना? मग हे सगळे गोंदवलेकर महाराजाना समकालीन कसे असतील? आणि या सगळ्याना फडके कसे भेटले?

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज १८७८ साली समाधिस्थ झाले. श्री गजानन महाराज १९१० साली, श्री साईबाबा १९१८ साली व श्री गोंदवलेकर महाराज १९१३ साली समाधिस्थ झाले. श्री गोंदवलेकर महाराजांचा जन्म १८४५ साली झाला. वयाच्या १२ व्या वर्षी १८५७ साली त्यांनी गुरूशोधार्थ घर सोडून सर्व भारतभर भ्रमंती केली. आपल्या भ्रमंतीत त्यांची अनेक सत्पुरूषांची भेट झाली होती. त्यात श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज, आळंदीचे नृसिंह सरस्वती महाराज, स्वामी रामकृष्ण परमहंस (विवेकानंदांचे गुरू), सटाण्याचे देव मामलेदार, श्री माणिक प्रभू इं. चा समावेश होता.

वा. ब. फडक्यांनी १८७१ मध्ये इंग्रजांविरूध्द सशस्त्र बंड केले व त्यांचा मृत्यु १८७५ मध्ये एडनच्या तुरूंगात झाला.

वरील उल्लेख केलेले सर्वजण १९ व्या शतकाच्या उत्तराधार्त व २० शतकाच्या सुरवातीला कार्यरत होते. त्यामुळेच ते साधारणपणे समकालीन समजले जातात.

श्री गजानान महाराज शेगाव आणि श्री साईबाबा ( ओरिजिनल ) हे स्वामी समर्थांचे शिष्य ना?
या दोघाना स्वामी समर्थानी दिक्षा दिली होती ना?

स्वामी समर्थ या दोघाना गुरुसमान होते. . म्हणून तर गजानन महाराज गेले तेंव्हा साईबाबाना फार दु:ख झाले असा उल्लेख आहे. त्यांच्या अनेक शिष्यांचा संभाळ नंतर साईनी केला.. ( म्हणे. ) कुठे वाचले मला आथवत नाही, पण बहुतेकस्गोंदवलेकरांच्या बेल्सरीनी लिहिलेल्य चरित्रातच असावे. ( कारण मी दुसरे काही वाचले नाही सध्या.) Happy

महाशक्ती जेथे उभ्या ठाकताती | जिथे सर्व सिध्दी पदी लोळताती |
असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ | परब्रम्ह्य साक्षात गुरुदेव दत्त |

सुवर्णताटी महारत्न ज्योती | ओवाळूनी अक्षता लाऊ मोती |
शुभारंभ ऐसा करुनी पुजेला | चरणावरी ठेऊ या मस्तकाला |

हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा | तुझी पाद्यपुजा करी बाळ तुझा |
प्रणिपात साष्टांग शरणागताचा | तुम्हा वाहिला भार या जीवनाचा |

Pages