मिनिमलिस्ट जीवनशैली भाग १, भाग २

Submitted by स्मिता द on 1 March, 2017 - 03:20

मिनिमलिस्ट जीवनशैली

मिनिमलिस्ट जीवनशैली म्हणजे काय ? थबकायला होत ना शब्दाशी. मलाही असेच झाले . मिनिमलिस्ट म्हणजे काय असेल..जरा शोध घेतला..लोकमतला येणारे शर्मिला फडक्यांचे लेख वाचले जरा जरा उलगडत गेले.मिनीमलिस्ट म्हणजे कमीत कमी. कमीत कमी कशांत? तर सगळ्याच बाबतीत कमीत कमी. आपल्या गरजांच्या बाबतीत ही कमीत कमी. आता अन्न, वस्त्र , निवारा या आपल्या प्राथमिक गरजा आहे. हे तर आपण अगदी लहानपणा पासून शिकलो . कलायला लागले तसे अनुभवलेही. कमीत कमी वापरात गरजेपुरते जमवत जगणे म्हणजे मिनिमिलिस्ट . पण गंमत म्हणजे या गरजा आपण खुप वाढवलेल्या आहेत. त्यापाठी मानसिक स्वास्थ तर घालवलेच आहे आणि मानसिक स्वास्थ हा शारीरिक स्वास्थ्याचा पाया. हेच आपण विसरलो आहोत. जन्मभर धावत धावत आपल्याला अधिक काही मिळवायचा हव्यास असतो. आणि त्या हव्यासापायी आपण खरंच सुख आणि आनंद मिळवतो का. चार घटका थांबून यावर चिंतन केलं तर मला वाटत नव्व्दटक्के उत्तर नकारार्थी ये ईल. मला स्वतः: कितीसा आनंद मिळाला आणि किती त्रास झाला याचे उत्तर स्वतःला त्रास जास्ती झाला असेच ये ईल. इथे त्रास हा शब्द मी दोहो बाबत वापरते. प्रत्येक गोष्ट करताना फक्त एक प्रश्न मनाला विचारला “खरंच गरज आहे का? अगदी मनापासून दिलेले उत्तरे होकार्थी पेक्षा नकारार्थी जास्त येतील.

मिनिमिलझम ची व्याख्या ही काही एकमेव किंवा एकच असणार नाही फक्त मिनिमिझम चौकटीचे सूत्र मात्र एक असेल गरजेपुरते आणि कमीत कमीहेच सूत्र आपण आता आपल्या अन्न वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांवर लावून पाहू, अन्न हे किती साधेसे उदाहरण..अन्नासाठी दाही दिशा फिरवीशी जगदिशा म्हणतो आपण खरच. पण इतकी गरज आहे का दाही दिशा फिरायची. उत्तम अन्न ताजे सकस आणि आपल्या आरोग्यासाठी सभोतालासाठी कुठले अन्न हवे ? कुठले नको? त्याचे आरोग्यावर होणारे चांगले किंवा वाईट परिणाम याचा विचार आपण केलाय का ?

मिनेमिलिस्ट जीवनशैली- अन्न

आता मिनेमिलिस्ट जीवनशैलीमध्ये अन्न कमी खा , डाएट करा असा अर्थ होतच नाही.आपल्या शरीरारोग्याला आवश्यक अन्न कुठले . याचा विचार व्हायला हवा. जिभेचे चोचले म्हणून खाल्लेले अन्न वेगळे आणि जगण्यासाठी खाल्ल्लेले अन्न वेगळे . हा निश्चित फरक आहेच दोहोतही. आपली पारंपरिक जीवनशैली , अन्न विषयक अतिशय सुंदर आणि आरोग्यपुर्ण होती असेच म्हणावे लागेल.
आज एकविसाव्या शतकात आपण सगळेच खाद्य पदार्थ खातो इटालियन मेक्सिकन थाई ..खातो म्हणजे तो आपल्या प्रतिष्ठेचा भाग केलाय आपण. पण खरंच आपल्या हवामानाला , जीवनशैलीला ते पोषक आणि अवश्य आहे का याचा जरा थबकून विचार करायला हवा आपण राहतो महाराष्ट्रात. आपले हवामान कसे आहे. आपल्या इथे आपल्या हवामानाला योग्य अशीच पिके येतात. आणि तीच आपल्या आरोग्यासाठीही उपयुक्त असतात. हा साधा सरळ विचार जरी केला आणि अमलात आणला तर आरोग्याची चतु:सुत्री आपल्याला सापडेल
.काय पिकते आपल्या हवामानात तर तांदूळ, आंबेमोहर , इंद्रायणी, जिरे साळ काळभात वैगरे अनेक जाती महाराष्ट्रात आहेत.
ज्वारी, बाजरी, आणि अजून एक पीक आता काळाच्या पडद्याआड झाले मी वाचले होते त्या बद्दल मिलेट. ही धान्ये
पालेभाज्या आंबा, जांभूळ, बोरे, सीताफळ, चिक्कू, अंजीर, करवंदे, फणस इ नेक फळे जी आपल्या मातीत सहज येतात आपल्या हवामानात टिकतात.
या सगळ्या अन्नधान्याचा समावेश आपल्या आहारात केला तर ते उपयुक्तच ठरेल ना? बरेच रोग आपण आपल्या आहारा विहाराच्या चुकीच्या सवयीने मागे लागून घेतले आहेत. ते कमी होतील हे निश्चित .
शुद्ध गायीचे तूप, करडई, शेंगदाणा अशी तेल बियांपासुन मिळणारी तेले. जी आपल्या भूमीत पिकतात. त्याचा शोध घ्यायला हवा. तेल पण मशीन मध्ये न करता घाणीवर केले असेल तर उत्तमच.
धान्ये पण पॉलिश न करता, हातसडीची वापरायला हवीत.
डाळी, कडधान्ये जी महाराष्ट्रातून अता नामशेष होते चालली आहे, कडधान्याला बाजारपेठ नाही म्हणुन शेतकरीही कडधान्याचे उत्पादन घेत नाही.
असे रासायनिक प्रक्रिये विरहित. साधे आपल्या जवळपास पिकणारे अन्न्धान्य आपण खाल्ले तर कित्येक आरोग्याचा तक्रारी दूर होतील

हा भाग झाला अन्न्धान्ये निवडीबद्दल. दुसरा आपल्या मिलिमनिस्ट जीवनशैली बाबत करायचा झाला तर हे अन्न सेव किती करायचे तर आपल्या गरजेपुरते. अगदी मूठभर अन्नाची खरे तर आपल्याला गरज असते. आपण आवडीपोटी गरजेपेक्षा जास्त अन्न सेवन करतो हे निश्चित. ते ही केवळ आवड म्हणून फास्ट फूड, आणि हौस म्हणून रेडी टू इट अन्न पदार्थ. मोठेपणा मिरवायला म्हणुन परदेशी पदार्थ हे त्यात ओघाने आलेच. लोकसत्ता मध्ये आले होते तीन शुभ्र शत्रू मीठ, साखर आणि मैदा. ह्याचे अतिरिक्त सेवन हे आपल्या आरोग्यासाठी शत्रू सारखे ठरत असेल तर निश्चित आपण ते शक्य असेल तिथे टाळायला हवे. मीठ चवी साठी गरजेचे असतेच ते पण चवीपुरतेच असावे. मैदा तर पुर्णपणे वर्ज्य करू शकतोच आपण. साखरेला गूळ हा पर्याय होऊ शकतो. ह्या अगदी वर वर सहज दिसणाऱ्या गोष्टी. यातील जाणकार, तज्ज्ञ यात भर घालूच शकतील आणि त्यांचे ज्ञान आपल्याला निश्चितच फायदेशीर आणि मार्गदर्शक ठरेल.

ही झाली अन्न विषयक गरजेवर अगदी वरवर चर्चा. आपण अजून वस्त्र आणि निवार या बाबीबद्दल ही बघू.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कावेरि..धन्स Happy वाच नक्की आणि वाचू नको तर तुला काही भर घालाविशी वाटते का बघ त्यात...कारण ' सावध ऐक पुढल्या हाका' अशी गरज आहे भविष्यासाठी अशा विचारसरणीची.

खूपच छान आहे लेख.... Happy

आणि अन्नाबद्दल्,अजुन एक सान्गावस वाटत ते म्हनजे....गरजेपुरतच खाण(काही लोकान्ना भरपेट जेवणाची सवय असते...कमीत कमी रात्रि तरी आपण हे करू शकतो)...

२)वस्राबद्दल तर खुप काही लिहिता येइल म्हणा...नन्तर लिहिते

छान लेख.
थोडक्यात आजी सांगत होती तसे. ..

धन्यवाद कावेरि, सपना..:)
.सपना अगदी बरोबर आजी सांगत होती तसेच..माझ्या मैत्रिणीला डॉक्टरांनी सांगीतले तिच्या" मी काय खावे आणि कधी खावे" या प्रश्नावर " तुमची आ़ई काय खात होती. तिची दिनचर्या कशी होती आणि खाण कसे होते? विचारा तिला आणि तसे करण्याचा प्रयत्न करा .

सपना..नाही फक्त खाणे पिणे नाही तर प्रत्येक बाबतीत एक चौकट " कमीत कमी किंवा गरजे इतकेच"
तेव्हा सगळ्या आता आपल्या मुलभुत गरजा मधील अन्न या गरजे बद्दल आपण बोललो अ़़जून वस्त्रे आहेत , निवारा आहे..अ़जून बरेच काही .."गरजा" या लेबल खाली येणारे सगळे पण ते अनावश्यक सदरात मोडणारे नको..:) हीच तर मिनिमलिस्ट जीवनशैली असे आपण म्हणूया.

मिनिमलिस्ट जीवनशैली!
आताशा खुपदा डोक्यात घोळणारा विषय. पण ये मोह मोहके धागे.
मी खरंच खुप आनंदी राहीन जर अशी जीवन्शैली आचरता आली तर.

मंजूताई, सस्मित..:) धन्स
मंजूताई, खरच खुप सोप एक वाक्यात सांगीतल तुम्ही.

सस्मित, हो असे आचरण जाणीवपूर्वकच करायला हवे..नाहीतर आपल्याला अवघड्च आहे..ते मोह मोहके धागे ..:)

छान, सहमत. अनावश्यक गरजा आपण एकूणच या पिढीने वाढवल्या आहेत हे मी नेहमी भेटेल त्याला सुनावत असतो.

असो, आता पुढच्या भागात कमीत कमी वस्त्रं का.. या बाबत आजची पिढी फॉर्वर्ड आहे Happy

लेखातील विचार मनाला खुप भावतात, प्रश्न फक्त आचरण्यात आणण्याचा आहे. मी फक्त एकाच विषयाबद्दल लिहिणार आहे. मिनिमिलिस्ट होतांना , पुस्तकांचे काय ? कारण पुस्तके वाचण्याचा मला छंद आहे. जगातील उत्तमोत्तम पुस्तके आपल्याला वाचावयास मिळावी असे कोणत्याही पुस्तक-प्रेमी ( वाटल्यास ' पुस्तक-किडा ' म्हणा हवेतर ! ) वाचकास वाटतेच. त्यातही ज्यांच्याकडे दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह असतो, त्यात वाढ व्हावी असेच वाटत असते. आता तर आंतर जालावर सुध्दा भरपूर ई-पुस्तके उपलब्ध आहेत. जर मिनिमिलिस्ट व्हायचे तर आपल्याजवळचा पुस्तक-संग्रह सुध्दा कमीत कमी व्हावयास हवा का ? एकवेळ मी टी व्ही च्या विविध चॅनेल्सची संख्या सहज कमी करू शकेन,
( करमणुकीच्या ऐवजी फक्त निखळ ज्ञान वाढविणारे चॅनेल्स ठेवीन ) भरमसाठ वाढलेल्या सिनेमा/ नाटकांच्या दरांमुळे ते ही पहाणे कमी झालेच आहे, आहारात सुध्दा " जगण्यापुरते " खाणे करता येईल, पण ज्ञान मिळविण्याच्या बाबतीत हे शक्य होणार नाही असे मला वाटते. अत्याधुनिक विज्ञानाचे मला ज्ञान असावे असे कोणास वाटणार नाही ?
त्याबाबतीत काय करता येईल हे सुचवावे.

जयंत, माझ्यामते पुस्तकांचा खाजगी संग्रह कमी करता येईल. अशी पुस्तके ज्यांचा वापर संदर्भाकरिता अथवा इतर कारणास्तव वारंवार करायचा आहे ती याला अपवाद मानता येतील. दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह जर इतरांच्या कामी सुद्ध येत असेल तर तो ही चालावा. ग्रंथालयाचा वापर वाढवावा अशे मिनिमलिस्ट जीवनशैलीत अपेक्षीत असावे.

I think use of Internet / social networking sites like maayboli wouldn't be a minimalist way of life.

एका विडिओ मधे पाहिले होते... जर मिनिमिलिस्ट जगणे ट्राय करायचे असेल तर... घरातले सगळे सामान एका खोलीत ठेवा आणि जेवढे अगदि आवश्यक आहे तेवढेच बाहेर काढा.

घरातील जी वस्तू गेल्या 6 महिने वर्षात वापरली नाही ती माळ्यावर,
आणि माळ्यावरची जि वस्तू 6 महिने वर्षात वापरली नाही ती घराबाहेर,

असे केल्याने गोष्टी बऱ्यापैकी कमी होतात

सिम्बा तुम्ही सुचवलेला उपाय चांगला आहे. 'मिनिमालिस्ट वॊर्डरॉब ' ह्या संकल्पने गेल्या वर्षी पासून विचार करणे सुरु आहे . आधी ५ जणांचे कपडे एका लोखंडी कपाटात मावायचे आता फ्लो अर टू सिलिंग वॊर्डरॉब हि कमी पडतो . खरंच इतक्या कपड्यांची गरज असते का ? गुगल बाबा ना प्रश्न विचारला तर खालील इमेज सापडली
minimalist.jpg

मी 'बघुया ट्राय करुन कसं आहे, सुट होतंय का' असं म्हणुन भारंभार साधे, महागडे, कधी आयुर्वेदिक म्हणुन, कधी हर्बल चांगलं म्हणुन, कधी हा ब्रॅण्ड चांगला आहे म्हणुन. कधी कुणी कलीग कुठलंतरी प्रॉडक्ट विकतेय म्हणून, आपल्या अद्भुत स्किनला काहीही वेगळं सुट होत नाही हे माहित असुनही खरेदी करुन ४-५ दिवस वापरुन धुळ खात पडणारे ब्युटी प्रॉडक्ट्स खरेदी करायचं बंद केलं. आजपासुन. आतापासुन.

धन्यवाद सगळ्यांचे....:)
jayantshimpi>>> प्रश्न खरच आचरणात आणण्याचा आहेच. दुसरा मुद्दा तुम्ही मांडलेला पुस्तकांचा. तो प्रश्न खरेतर माझ्या पुढेही आहेच कारण पुस्तके म्हणजे जीव की प्राण. पण मला वाटते की काही पुस्तके वाचून झाली आहेत. ती संदर्भसाठी उपयोगी जास्त लागणार नाहीत ती जवळच्या एखाद्या वाचनालयाला द्यावीत. तिथे त्यांचा उपयोग वाचकांना .आता तुमचा प्रश्न ज्ञान मिळवणे या साठी आपण वाचतो हे नक्की. काही निखळ मनोरंजनासाठी किंवा काही ज्ञानार्जना साठी हवे असतात. निखळ मनोरंजनाची पुस्तके वाचनालयाला द्यावीत. आणि ह्या दुर्मिळ पुस्तकांचे मात्र आपण जतन करावे . आणि आता श्क्यतो इ पुस्तके वाचावीत किंवा ती जमवावीत. माझी तर गंमत अशी आहे की. मला अनेक महत्वाचे वर्तमानपत्रातील , मासिकातील संदर्भ , तो माझ्या कामाचा भाग होतो ते सगळे मी जपून ठेवलेत ते मला कधीही आठवतात आणि सापडावे लागतात. ते आता कसे कमी करावे हा यक्षप्रश्न आहे. मला त्याचे डिजीटायझेशन करावे लागेल
माझ्या पुढे.पुस्तके मात्र फक्त संदर्भसाथीची, आणि दुर्मिळ जपणर . बाकी नाही म्हणजे हे झाले माझे मत अजून कोणी त्यावर चांगला प्रकाश टाकू शकतील. मानव यांनीही तसेच सुचवले आहे.
राजमी, अव्यक्त मी, स्निग्धा ..अगदी सहमत आपलयाशी..:)
सिम्बा, ऋन्मेऽऽष ..अगदी बरोबर
सस्मित ..:) प्रयत्न करायला हवा

पुनश्च सगळ्यांचे आभार . Happy

आपण पुन्हा सनातन जीवनशैलीकडे वाटचाल करतोय. आचार्य विनोबा भावे यांचे विचार मध्यंतरी कुणीतरी फेसबुकवर लिहीले होते. त्याआधी डॉ. अभय बंग यांचे विचार ऐकले, वाचले होते. गुजरातेतले एक संशोधक आहेत, त्यांच्याकडे कैक वर्षांपासून फ्रीज , टीव्ही वगैरे नाही. बरं आहे एक प्रकारे... पर्यावरणाचा -हास तरी थांबेल.

सगळ्या भौतिक वस्तूंचा उपभोग घेऊनही पाश्चिमात्य देशात पर्यावरणाची जाणीव आपल्यापेक्षा अधिक आहे.. त्यामुळे कमी वापरल्यावरच पर्यावरण संतुलित रहाते हे पटत नाही,

आपले पर्यावरण ढासळले कारण मागच्या ( काही पिढ्यानी उदंड लेकुरे काढल्याने ) काही वर्षात वाढलेला भूभार ... त्यानी त्याबबतीत मिनिमिस्ट अ‍ॅप्रोच ठेवला असता तर आज घरटी एका फ्रीज अन मिक्सरने पर्यावरण ढासळले नसते.

आयुष्यभर अंगवळणी पडलेल्या सवयी अधिकाधिक रित्या कमी करत नेण्याच्या हव्यासापोटी येणारा ताण आपल्याला खरंच सुख किंवा आनंद देणार का याचं चिंतन करून मगच निर्णय घ्या.
संतुलित (बॅलन्स्ड) जगणं महत्वाचं

सगळ्या भौतिक वस्तूंचा उपभोग घेऊनही पाश्चिमात्य देशात पर्यावरणाची जाणीव आपल्यापेक्षा अधिक आहे >>> Rofl

बाकी चालू द्या Wink

Pages