६९ वर्षांनंतर भारत-पाकिस्तान?

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 August, 2016 - 13:43

What a day ....69 yrs back both India and Pakistan got independence

Indians have become CEOs of Google, Microsoft, Pepsico, Jaguar, Land Rover and

Pakistani have become heads of Taliban, Al-Qaeda, Jammat U Dawa, Hijbul Mujahideen

What a contrast......
Adding a line to this joke ...

India reached Mars and

Pakistan still trying to enter India

आज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून असा काहीसा मेसेज माझ्या मोबाईलवर येऊन पोहोचला. पाकिस्तानशी तुलना करत स्वताला भारी समजणे हे मुळातच एक गंडलेले लॉजिक आहे. पण आज ईतक्या वर्षांनी जेव्हा दोन्ही देशांना, किंबहुना एकाच देशाच्या दोन तुकड्यांना एकाचवेळी स्वातंत्र्य मिळाले असताना, त्या आधारे आज कोण कुठे पोहोचला आहे ही तुलना होणे स्वाभाविकच आहे. आणि यात मग काही गैर नाही.

पण खरेच या मेसेजमध्ये आहे तसे, किंबहुना प्रत्येक भारतीयाला वाटते तसे, पाकिस्तान हा एक दहशतवादी, अशांतता नांदत असलेला, गरीब, कर्जबाजारी, स्वताच्या देशात एक सुई सुद्धा बनवू न शकणारा देश आहे का? भारताशी तुलना करता भारत म्हणजे जन्नत आणि पाकिस्तान म्हणजे जहन्नुम, भारत म्हणजे नंदनवन आणि पाकिस्तान म्हणजे कबरीस्तान असे काही आहे का? की आपल्याला पाकिस्तान म्हणजे एक दहशतवादी देश एवढीच त्याची ओळख असल्याने आणि तो आपला पारंपारीक शत्रू असल्याने त्याबद्दल वाईटसाईटच आपल्या कानावर पडत असल्याने आणि ते तसे ऐकणेच आपल्याला गोड वाटत असल्याने आपले जनरल नॉलेज तेवढ्या पुरतेच सिमीत आहे.

मुळात मला स्वत:लाही या दोन देशांची तुलना करता यावी ईतकी माहिती नाही. किंबहुना भारताच्याच कानाकोपरयातील परीस्थिती पुर्णता ठाऊक नाही. तरीही मी देखील कालपर्यंत बिनधास्त वरील मेसेज सारखी धाडसी विधाने करायचो.

मग मध्यंतरी हॅपीनेस ईंडेक्स नावाचा एक प्रकार वाचनात आला. मायबोलीवर त्यावर धागाही काढलेला. त्यात लिविंग स्टॅण्डर्डच्या आधारे प्रत्येक देशातील लोकांचा हॅपीनेस ईंडेक्स ठरवला गेला होता. त्यात पाकिस्तान 92 क्रमांकावर होता तर आपण 118 व्या क्रमांकावर. पचवायला जड असा धक्का होता. लागलीच माझे देशभक्त मन तो काहीतरी बकवास सर्वे असणार असा निष्कर्श काढून मोकळा झाला. पण डोक्यात विचार रेंगाळत राहिला.

त्यानंतर मग मायबोलीवरच एका धाग्यावर पाकिस्तान संदर्भात चर्चा चालू असताना कोणीतरी असाच उल्लेख केला की आज एवढ्या वर्षांनी आपण कुठे पोहोचलो आणि ते कुठे राहिले. पण त्यांना हे कुठल्या निकषावर आणि कुठल्या माहितीच्या / अभ्यासाच्या आधारावर म्हणत आहात हे सांगता आले नाही. तो धागा भरकटू नये म्हणून तिथेच तो विषय सोडला. वाढवला नाही. पण कुठेतरी नवीन धाग्यावर हा विषय घ्यायचा हे ठरवूनच. तर वरचा मेसेज वाचताच पुन्हा हेच आठवले.

एकेकाळी भारतापेक्षा उत्कृष्ठ क्रिकेट खेळणारा आणि विश्वचषक वगळता भारतीय संघाला खडे चारणारा हा देश एकापेक्षा एक सरस क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज तयार करू शकतो, (अगदी आजही**) तर ईतर क्षेत्रात हा खरेच दहशतवाद वा ईतर कुठल्या राजकीय अराजकीय कारणांमुळे भारताच्या मागे आहे का? कारण जर आज जगभरात पाकिस्तानी अभियंते डॉक्टर ऊच्चशिक्षित पसरले आहेत तर शिक्षणाची नक्कीच तिथे दूरावस्था नाही. मग असा एखादा देश अविकसित किंवा मागास कसा असू शकतो..

असो, प्रत्येक जण यात जाणकार असेल असे नाही. पण आपल्या माहितीच्या आधारे प्रत्येकाने ईथे आपले मत जरूर मांडा. कदाचित त्या निमित्ताने आपलेही (आपल्या देशाचेही) आत्मपरीक्षण होईल.

सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !!

** पाकिस्तानने आज (14 ऑगस्ट) स्वातण्त्र्यदिनाच्या मुहुर्तावर त्यांच्यावर आणि आपल्यावर राज्य करणारया गोरया ईंग्रजांना त्यांनीच शिकवलेल्या क्रिकेट या खेळात कसोटी सामन्यात त्यांच्याच घरच्या मैदानात 10 विकेटने खडे चारले.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देशाचे स्वतंत्र,नंतर झालेले विभाजन .
ह्या वर चर्चा करण्याची कुवत खरे तर आताच्या आयटी सेल मध्ये बिलकुल नाही.
हे मुद्दे उचलणारे आयटी सेल वाले च आहेत.
विभाजन का झले.
विभाजन झाले त्याचा फायदा च झाला .
काँग्रेस नी देशाला योग्य मार्गाने घेवून जावून योग्य ठिकाणी पोचवले आहे.
म्हणून तर आज सरकारी खर्च कंपन्या विकून चालला आहे.
अन्न धान्य उत्पादन देशात पुरेसे आहे.. घरा घरात वीज,आहे,पाणी आहे, .
बँकांचे जाळे आहे.
तीन युध्य भारताने जिंकली आहेत.
शिक्षण ,उच्च,,प्रधमिक सर्व आहे.
Medical collages आहेत.
ह्या मधील एक पण काम bjp किंवा मोदी नी केले नाही.
उगाच काहीच सहभाग नसणाऱ्या विषयावर ज्ञान पाजलू नका.
त्या पेक्षा ram मंदिर.
आणि स्वतः गाई न पाळता कसायला विकणाऱ्या लोकांनी .
गौ संरक्षण ह्या वर थापा मारू नयेत.

<< तस्लिमाच्या लेखात लिबरल्स नी असे करावे, तसे करावे वगैरे सूचना आहेत. fair enough पण दुसर्‍या बाजूला मॉब लिंचिंग करू नका, लव्ह जिहाद चा नावाने बागुलबुवा फिरवू नका, बलात्कार्‍यांचे सत्कार करू नका, हिजाब वाल्या शाळकरी मुलींना हेरॅस करू नका, मिशनरी लोकांना जाळून मारू नका, अशा काहीच सूचना नाहीत. ज्या दिवशी ती या विषयावर बोलू लागेल त्या दिवशी ती आवडायचे बंद होईल आणी तिची राणा
अयूब होईल.
त्या लेखात >>

------- निरुत्तर करणारा प्रतिसाद आहे.

गुजरात मधे बलात्कार्‍यांना सोडण्याचे कारण ते " संस्कारी ब्राह्मण " होते असे त्या review पॅनेलवर काम करणार्‍या दोन भाजपा पैकी एका सदस्याचे मत आहे.
https://www.hindustantimes.com/india-news/now-bjp-mla-says-bilkis-bano-s...

संजिव भट (कोण हे?) यांच्यावर संस्कार झाले नव्हते म्हणून ते खोट्या आरोपाखाली, आणि ३० वर्षे जून्या केस मधे, अजूनही तुरुंगात डांबलेले आहेत. किती छळ.

बलात्कारी मोकाट सुटतात, त्यांचे हार तुरे देत सत्कार होतात.... आणि कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी खोट्या आरोपाखाली तुरुंगांत शिक्षा भोगत आहे. यालाच गुजरात मॉडेल म्हणायचे.

२०२४ निवडणूकीची पुर्व तयारी म्हणून, पाक मधे खोलवर (अर्थात घरमे घुसके स्टाईल), सर्जिकल स्ट्राईक कधी ? लोक सर्व पापे विसरतील ( गुजरात मधे बलात्कार्‍यांना सोडल्या पासून महागाई, कमालीची बेरोजगारी... ) अशी धुळफेक करणारी कृती कुठली असेल ?

भारतात निवडणूका म्हणजे पाकने धास्ती घेतलेली बरी.

सराईत गुन्हेगाराला निवडणुका / धार्मिक सण आले की तडीपार किंवा आत टकातात ना ?
अगदी तशीच ट्रीटमेंट द्यायच्या लायकीचे पाकडे आहेत !
तशी इमेज त्यांनीच बनवून घेतली आहे त्या कथित पिवळ्या पुस्तकाच्या शपथा घेवून ! घेवून !!
शिवाय नियाडणुकांच्या निमित्ताने का होईना पाकडे ठोकून निघतात आणि पुढील चार पाच वर्ष आतेरीकी हल्ला करत नाही .
भारतीय जनतेला अजून काय पाहिजे ?

भाजप विरोधी सगळ्या मतदारांनी सबसिडी / रेशन वरील फुकट धान्य टाळणे , देशाच्या आर्थिक भरभराटीत स्वतःचे योगदान दिले , सार्वजानिक संपत्तीची हानी केली नाही , धार्मिक शाळेत मुलं शिकवण्या ऐवजी सरकारी शाळेत शिकवण्याची मानसिकता / आर्थिक परिस्थिती वाढली की पुढील निवडणुका आल्या की हे सरकार चीन्याना देखील ठोकून काढील ! Happy
हाये काय त्यात ?
सध्या बहुसंख्य जनतेला पाकडे ठोकले की बरं वाटतंय हे सर्वात महत्त्वाचे !

तस्लिमा नसरिनचा लेख आवडलाच.

माझ्यापुरते बोलायचे झाले तर समान नागरी कायद्याला समर्थनच आहे, ट्रिपल तलाक बेकायदेशीर केला हे चांगलेच आहे. पण भारतात RW मुस्लिमद्वेष कडवा आहे. त्यामुळे अनेकदा (माझ्यासारखी) लिबरल मंडळी जास्तच डिफेन्स मोड मध्ये जातात. तसे होते आहे का हे वेळोवेळी आमच्यासारख्या लोकांनी तपासायला हवे.

कॉमीजी,
ट्रिपल तलाक सुप्रीम कोर्टाने रद्द् केल्यावर लिबरल लोकांना दु:ख झाले असे विधान तिच्या लेखात आहे. हे विधान मान्य आहे ?
लिबरल लोकांना सल्ले देताना दुसर्‍या बाजूला एकही सल्ला देऊ नये हे खटकले नाही ?

ट्रिपल तलाक सुप्रीम कोर्टाने रद्द् केल्यावर लिबरल लोकांना दु:ख झाले असे विधान तिच्या लेखात आहे. हे विधान मान्य आहे ?
>>>> सरसकट म्हणून मान्य नाही. आणि, त्रिपल तलाक रद्द झाल्यावर, post facto समर्थन करण्याशिवाय फारसा पर्याय नव्हता. पण जर ट्रीपल तलाक रद्द करण्यापूर्वी लिबरल लोकं ट्रिपल तलाक रद्द करण्याची मागणी करत असतील तर ती एक तर खूप जोराने होत नव्हती किंवा होत असली तर लोकांपर्यंत पोहोचत नव्हती.

>>>लिबरल लोकांना सल्ले देताना दुसर्‍या बाजूला एकही सल्ला देऊ नये हे खटकले नाही ?
बरोबर. तस्लिमा बाईसुद्धा एकप्रकारे त्या जे लिबरल लोकांविरुद्ध बोलतात तेच करतात. त्यांचे जास्तीत जास्त बोलणे हे एका विषयावर फोकस्ड असते. पण, प्रत्येक ठिकाणी "दुसरी बाजू" दाखवायला हवीच असे मला वाटत नाही. तस्लिमा बाईंनी जर मुस्लिम स्त्रियांच्या हक्कांचे उल्लंघन दाखवणे हे आपले काम ठरवले असेल तर त्यांनी लगेच "दुसरी बाजू" दाखवणे बंधनकारक नाही.
बाकी ट्विटर वर अधूनमधून हिंदुत्व वैगरे वर टीका करतात त्या. म्हणजे त्या काही फार राईट मुस्लिम द्वेषाचे समर्थन करत नाहीत.

कॉमी ,+११११११११

तस्लिमा नसरीन नी मुस्लिम स्रियांचे कुप्रथा मुळे होणारे हाल स्वतः अनुभवलय , मग साहजिकच ती मुस्लिम स्रीया बद्दलच बोलणार ना ?
तिच्या कडून हिंदू समाजातील होणाऱ्या स्रीयांच्या हालअपेष्टा ( असतील तर ) बद्दल लेख येण्याची वाट कशी काय बघू शकता ?
तस्लिमा ने हिंदू समाजातील महिलांच्या बद्दल लिहिले तरच तिने मुस्लिम महिला बद्दल लिहिलेल्या लेखाला वजन प्राप्त होईल का ?
भांड लपवून ताक मागायला जाणे सोडा आता ....

मी झाकीर नाईक यांच्या सभेत गेलो व हिंदु धर्मातील जातीभेदाबद्दल बोलू लागलो तर माझे स्वागतच होईल. त्यांना माझे भाषण 'आवडेल'.

माझी what aboutry १००% मान्य !
पण फक्त हिंदू धर्मावर टीका करणाऱ्या लीब्रलची ताकाची भांडी भरून द्यायला आवडते !

याने दफन केलेल्या लहान मुली ते वयस्कर ४८ महिलांना सुखाने मरू देखील दिले नाही !
शिवाय तेही दिवसभर पन्नास वेळा देवाचे नाव घेवून .....
डिलीट .

जगभरात पाकिस्तानी अभियंते डॉक्टर ऊच्चशिक्षित पसरले आहेत तर शिक्षणाची नक्कीच तिथे दूरावस्था नाही. >> त्यान्पैकी बरेच जण परदेशात ऊच्चशिक्षण घेतलेले असतात.

मुळात आपण का आपल्या देशाची पाकिस्तान शी तुलना करत आहे.
आपण उगवती महासत्ता आहे ना?
विश्र्वगुरू काय म्हणतात ते तरी ऐका.
आपल्या हुशार अर्थमंत्री काय सांगत असतात त्याच्या कडे लक्ष ध्या.
तिसरी की chothi जगातील अर्थ व्यवस्था आहे आपली.
भिकेचे डोहाळे लागणे.
ही म्हण इथे योग्य आहे

त्यांचे सोडा .
भारताची आज ची अर्थ व्यवस्था,भारतावर असलेले कर्ज,थकीत कर्ज, भ्रष्ट कारभार, महागाई , प्रचंड टॅक्स जनतेकडून वसूल केले जातात.
ह्या विषयात .
भारतात .
ना भक्त बोलत,ना बटिक मीडिया बोलत,ना सरकार बोलत .
आणि हे पाकिस्तान ची अवस्था कशी आहे हे सांगतात.
त्यांची अवस्था धार्मिक उन्माद मुळे तशी झाली आहे.
आणि bjp आणि त्यांचे चेले भारतात धार्मिक उन्माद निर्माण करत आहेत.
Double ढोलकी ह्यालाच म्हणतात

आर्थिक विषयावर भारतात .
सरकार,बटिक मीडिया,भक्त चर्चा करत नाहीत.
हिंदू कसे धोक्यात आहेत,लव्ह जिहाद ह्या वर च चर्चा करतात.
पण पाकिस्तान च विषय असेल तर आर्थिक विषयावर करतात त्यांस चागले माहीत आहे .

पाकिस्तानच्या विषयावर धागा आहे हो , किमान एव्हढे तरी समजून घेत जा !<<<< धागा भारत पाकिस्तान दोन्ही वर आहे. तेव्हा ६९ वर्षानंतर भारतातील परिस्थिती बद्दल ही लिहा.

धागा पाकिस्तानवर आहे म्हणजे ट्विटर वरच्या ट्रोल्सनी पोस्ट केलेल्या अन्व्हेरिफाईड व्हिडिओज ना मोकळे रान आहे असा अर्थ नाही.

. तेव्हा ६९ वर्षानंतर भारतातील परिस्थिती बद्दल ही लिहा. >>>>>>>
भारतात पिठासाठी कोणीही ट्रक लुटत नाही , हा भारत आणि पाकिस्तान मधील मुख्य फरक आहे .
फाळणी करून येथील लोकांचे उज्वल भविष्य घडविण्यात
मदत करणाऱ्या महात्मा गांधी , जनसंघ , जीना आणि काँग्रेसच्या ७० वर्षांच्या राजवटीला मनापासून धन्यवाद !
पाकिस्तानशी बरोबरी करणारे इतर कोणतेही मुद्दे शिल्लकच नाही .

धागा वाचला नाही.वराचे व्हिडियो पाहून वाईट वाटले.अन्नासाठी माणसांवर ही पाळी यावी याचे एक माणूस म्हणून वाईट वाटते.

भारतात पिठासाठी कोणीही ट्रक लुटत नाही , ....,.. भ्रम आहे.जिथे फुकट तिथे आम्ही कुटुंबासकट !

https://twitter.com/pakistan_untold/status/1640279172072476673?s=19
पाकिस्तानचा माजी गृहमंत्रीच तेथील सामान्य लोकांना उपाशी रहा पण हिंदू द्वेष / भारत द्वेष सोडू नका सांगत असेल तर अवघडच आहे .
जमलंच तर सेम व्हिडिओ फक्त जूबेर नेच verified केलेला सापडला तर टाकतो .

तेच तर आम्ही पण सांगत आहे.
भारतात निवडणुका प्रचारात पाकिस्तान ची उदाहरणे सत्ताधारी पक्ष च देत असतो.
भारताची पाकिस्तान शी तुलना सत्ताधारी पक्ष च करत असतो.

भारतात पिठासाठी कोणीही ट्रक लुटत नाही , हा भारत आणि पाकिस्तान मधील मुख्य फरक आहे . >> नाही नाही. भारतीय फक्त अतिशय अदबीने काश्मीरी सफरचंदांचे ट्रक लुटतात तेही पंजाब सारख्या तुलनेने मानी राज्यात जिथे ऊपाशी राहतील पण भीक मागणार नाहीत की चोरी करणार नाहीत.
https://www.youtube.com/watch?v=xjisyXBZ87Q

Pakistan पासून आपण एक धडा मात्र घेतला पाहिजे.
सरकार हे निधर्मी च असले पाहिजे.
धर्म आणि सत्ता ह्या वेगळ्याच पाहिजेत.
पाकिस्तान जेव्हा वेगळा झाला तेव्हा त्याची स्थिती अनेक वर्ष भारता पेक्षा उत्तम होती..
अत्यंत सुपीक जमीन पाकिस्तान ला गेली आहे.
पण भारत द्वेष आणि धार्मिक उन्माद ह्या मुळे त्या देशाची ही अवस्था झाली आहे.
सोमालिया वरची पण डॉक्युमेंट्री यू ट्यूब ला बघितली..
काय भीषण स्थिती आहे तिथे..तरी हिंसाचार लोक सोडत नाहीत.
भारताने त्या पासून सावध व्हावे.
धार्मिक द्वेष,हिंसाचार,भ्रष्ट prashasan, भ्रष्ट नेते ह्यांना ह्या देशात स्थान नको.
त्याचे उदत्ती करणं नको

खायला अन्न नाही तरी त्यांना भारताची बरबादी पाहिजे असते ,
फक्त पि ओ के सोडून !
आणीबाणीचा काळ वगळता भारतातील मजबूत लोकशाही साठी काँगेस ला श्रेय द्यावेच लागेल .
पी ओ के मधील लोकांना मात्र भारतात यायची इच्छा आहे , पण ती ओझी उरावर घेवून अखंड भारतचे स्वप्न भाजप ने पुढे रेटले की भाजप्याना हकालण्यास मी सुद्धा मदत करीन.

कॉमी ,
पाकिस्तानी लोकांचे ( भारता बद्दल म्हणतोय मी हिंदू बद्दल नाही ) चांगल्या विचारांचे व्हिडिओ असतील तर (?) ते टाका , आम्ही आनंदाने बघू ,कदाचित आमचे पाकिस्तानी लोकांबद्दल चे विचार बदलतील .

म्हणून या बाबत जावेद अख्तर श्रेष्ठ निघाले , पाकिस्तान मध्ये जाऊन त्यांना आरसा दाखवून आले .

Pages