शृंगार १३

Submitted by अनाहुत on 9 May, 2016 - 07:55

दुस-याला काही शिकवणे किंवा तसा प्रयत्न करणे म्हणजे स्वतः दोनदा शिकणे अस म्हणतात . याचाच प्रत्यय यायला लागला होता . मलाही आता त्या सामाजिक कोप-याची गरज भासू लागली होती . याची सुरूवात सोसायटीमधून करायच ठरवल . ज्यांची थोडीफार तोंडओळख होती त्यांना जाता-येता स्माईल द्यायला सुरूवात केली . हळूहळू त्याला प्रतिउत्तरही मिळू लागल . ज्या लोकांशी थोडस बोलत होतो त्यांच्याशी संवाद थोडा वाढवला . सुरूवातीला बोलायला काही विषयच नाही सुचायचा पण अगदी जनरल टॉपिक पासून सुरूवात करून मग हळूहळू टॉपिक मिळू लागले . जितके वाटतात तितके लोक रूक्ष अबोल नसतात . फक्त एका स्टार्टरची गरज असते त्यांना . छान वाटत होत फार काही न करता आता तणावातून आणखी मुक्त झाल्यासारख वाटत होत .

ऑफिसमधली कामही लवकर आवरत होती . विशेष म्हणजे बॉसही आजकाल फार काही बोलत नव्हता . त्यामुळ तो कुठतरी हरवल्यासारखा किंवा चुकल्यासारखा वाटत होता . मधेतर ' शांत का ? ' अस विचारायची हुक्की आली होती . पण मोठ्या कष्टाने त्यापासून स्वतःला रोखल .

बाकी सगळ छान चालल होत पण मंजू सोबत नव्हती आणि तिने फोन करायलाही मनाई केली आहे याच दुःख होत . मधे तिला एक-दोनदा फोनही केला होता पण ती काही फारशी बोलली नव्हती पण ओरडलीही नव्हती त्यामुळ प्रगती होती . आशा होती ती लवकरच परत येईल .

बिल्डर आणि friends चांगलेच मित्र बनले होते . मधून अधून त्यांच्यासोबत बसत होतो . गप्पा चांगल्या रंगायच्या . Smoking चा आग्रह प्रेमाने नाकारायचो पण होणा-या passive smoking च काय हा प्रश्न होताच . त्यामुळे यांच्यासोबत जरा limited च रहायचो . पण त्यांनी जाम मनावर घेतल होत . मला माझ्या ड्रेसिंग ( नॉन ) सेन्सवर बरच बोलल जायच . आणि कितीही नाही म्हणता म्हणता मला किमान एक ड्रेसतरी त्यांच्या स्टाईलमधे शिवून घ्यावा अशी गळ घातली.मग मीही तयार झालो . एक्सप्रेस चार्जसोबत एक्सप्रेस स्पीडने कपडे तयार झाले . ते सुरूवातीला मला जरा जास्तच टाईट वाटले पण नंतर छान वाटले . Comfortable होते . मला आता अस वाटू लागल की इतके दिवस मी काय old जनरेशची स्टाईल वापरत होतो की काय ? पण अगदीच तसही नव्हत इतके दिवस केलेल्या वर्कआऊटमुळे फिटनेस आणि measurements मधे थोडा फरक झाला होता तोही याला कारणीभूत ठरला होता . आता फिटनेसच्या थोड पुढ जाऊन काही प्रमाणात muscle gain चा विचार होता . फार नाही पण थोडातरी , नाहीतर यात जितक कराल तितक थोडच वाटत . सो फार मोहात न पडता थोडा muscle gain च नक्की केल . पूर्वी वेळ नाही मिळायचा आणि आता वेळ जात नव्हता म्हणून हे सगळ चालल होत .
================================

" कशी आहेस ? "

" मी ठीक आहे . "

" काय मग विचार करून झाला का तुझा ? "

" नाही अजून . "

" अग जितका विचार करशील तितका गुंता वाढतच जाइल . या उपचारांनी तुला फायदाच होईल . याला उशीर न केलेला बरा . "

" ठीक आहे मी सांगते तुम्हाला . "

परत तेच किती विचार करणार होती काय माहीत ?
घरात बसूसच वाटायच नाही . म्हणून थोडा वेळ टेरेसवर जाण्याचा विचार केला . घरातल्यापेक्षा इथ थोड बर वाटत . थोडा वेळ फिरलो तेव्हढ्यात राधिका आली .

" काय ग जेवली का ? "

" हो जेवले मी . तुमच झाल जेवण ? "

" हो झाल . "

" तुम्ही आज माझ्या आधी आला इथे . "

" हो घरात ठीक वाटत नव्हत म्हणून आलो ."

" मलाही घरात फारस थांबाव अस नाही वाटत . "

" अग एवढ काय मनावर घ्यायच parentsच . "

" तस नाही आहे सारखे रागावतात बाबा . आणि आईसुद्धा फार तणतण करते . त्यामुळे घरात थांबूच नये अस वाटत . "

" एक सांगू तुम्हाला राग नाही ना येणार ? "

" नाही . बोल तू . "

" मी नेहमी येते ना टेरेसवर तेव्हा ब-याच वेळा तुमच्या घरासमोरून जाताना तुमच्या वाईफचा आरडा-ओरडा ऐकू यायचा . त्याच ओरडत रहायच्या आणि तुम्ही त्यांना समजावत असायचा . नेहमी अगदी नेहमी असच ऐकल आहे . त्यामुळे तुम्ही मला माझ्यासारखेच वाटता friend . तुम्ही किती शांतपणे reply करण्याचा प्रयत्न करता पण त्या ऐकायच्याच नाहीत . मलाही शांत रहायला आवडत पण मला पण घरी खूप ओरडन सहन कराव लागत . आपण शांत आहोत म्हणून अस आहे का ? "

याच काय उत्तर देणार होतो मी ? काही अंशी खर होत हे . मीही कधी असा विचार केला नव्हता पण मलाही आता अस वाटू लागल होत की आपण प्रत्येक बाबतीत शांत राहतो समंजसपणा दाखवतो यामुळे लोक आपल्याला गृहीत धरतात आणि म्हणूनच हे अस ऐकून घ्याव लागत आणि ऐकूनही काही फायदा होतच नाही . शेवटी चूक बरोबर काहीही असो समोरच्याचच मान्य कराव लागत . खरच हाच प्रॉब्लेम आहे , आता स्वतःचा मुद्दा बरोबर असल्यास तो लाऊन धरायलाच हवा .

" काय झाल कुठे हरवला तुम्ही ? मी बोलते आहे ते तुम्हाला पटल आहे ना friend ? "

" तु असा विचार करू नको . ते तुझे parents आहेत . तू जोपर्यंत मोठी होत नाही स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाहीस तोपर्यंत दुसरा पर्याय नाही . आणि त्यांना विनाकारण सहन कराते आहेस अस वाटून घेऊ नकोस . त्यांच तुझ्या आयुष्यातील स्थान मान्य कर आणि असा विचार कर they need you तु आता त्यांची मदत नाही करू शकत पण काही दिवसांनी नक्की करू शकशील . "

" काय म्हणत होता तुम्ही पायावर उभ रहायच ? हे काय हे माझे पाय आणि मी माझ्याच पायावर उभी आहे . "

" म्हणूनच म्हटल मोठी झालीस की कळेल . "

" just kidding , I got that . आणि हो I am grown up now . "

...क्रमशः
भाग १ http://www.maayboli.com/node/55229
भाग २ http://www.maayboli.com/node/55239
भाग ३ http://www.maayboli.com/node/55264
भाग ४ http://www.maayboli.com/node/55293
भाग ५ http://www.maayboli.com/node/55354
भाग ६ http://www.maayboli.com/node/55545
भाग ७ http://www.maayboli.com/node/55591
भाग ८ http://www.maayboli.com/node/58057
भाग ९ http://www.maayboli.com/node/58315
भाग १० http://www.maayboli.com/node/58327
भाग ११ http://www.maayboli.com/node/58339
भाग १२ http://www.maayboli.com/node/58350

Group content visibility: 
Public - accessible to all site users

...