सत्तर व ऐंशीच्या दशकातील जीवनशैली

Submitted by स्मिता द on 24 February, 2016 - 04:33

साधारणत: सत्तरीच्या आणि ऐंशीच्या दशकात जन्मलेल्या माझ्या सारख्या लोकाना आज मागे वळून पहाताना खरेच जाणवते की वाह ! वो दिन भी क्या दिन थे. एकुणातच समाजजीवन संथ अन खुप छान घडी दार होते. फारसे तरंग न उठणारे. शांत. कदाचित माझ्या सारख्या मध्यमवर्गीय आणि निमशहरी भागातील लोकाना तसे जाणवत होते की सगळ्यानाच हा प्रश्न मला राहुन राहून पडतो. नव्वदीच्या जागतिकीकरणामुळे झालेले हे बदल अतिशय झपाट्याने एखादा झंझावात यावा तसे समाजभर पसरले. पण आजचे पुन्हा गो टु रुटस ही जीवनशैली नव्याने उभारताना पाहून मनात असे वाटते हो ते त्या शांत चौकटीतले चौकट भर मनापासून जगणे होईल शक्य? की आमच्या वेळी असे होते हाच सूर मुलांसमोर आळवत बसावे लागेल. पण मनात कुठेतरी मुलांना पण ते जग उलगडून दाखवावे असे वाटते. ते शांत , संथ जगणे, आणि समाधानाने रहाणे म्हणजे काय हे कळावे असे वाटते. अर्थात हे अनुभव फक्त माझे एकटीचे होते की त्या काळातील सगळ्यांचेच हे आपण इथे गप्पा मारुन उजळून काढूया . जमल तर पुन्हा नव्याने तो भवताल तसा करुया. अगदी तसा नाही पण त्यातील चांगले चांगले मोती निवडुन छानसा हार तर गुंफता येईल...कदाचित त्या काळातले जीवन जगता येईल हा आशावाद मनात पालवेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण याना पाहिलेत का? >>> Lol व्यत्यय पण!

फिल्म्स डिव्हिजनच्या स्विम्मी वगैरे पण छान होत्या.

बहुधा रविवारी साप्ताहिकी लागायची. तो तर सगळ्यात फेवरेट्ट कार्यक्रम होता Happy एकूणच रविवार सकाळचे कार्यक्रम आवडायचे. कार्टून्स लागायच्या Happy

स्विम्मी म्हणजे छोटे छोटे मासे एकत्र येतात ती ना, आणि लाल कलरचा छोटा मासा डोळा होतो आणि त्याचा मोठा मासा होतो. मस्त एकीचं बळ दाखवायची ती. साप्ताहीकी आणि भक्ती बर्वे समीकरण होतं.

मराठी चनल्च्या सुरवातीला अभन्ग लागायचे, उदा: विट्ठल नामाचा रे टाहो (सुरेश वाडकर) - त्याचं नाव काय होतं बरं???

उर्वरीत भाग बातम्यांनंतर , व्यत्यय , विशेष सुचना - अस्ले हाताने लिहिलेले फलक दाखवायचे

आणि ते!! संध्याकाळी TV लागायच्या अगोदर अर्धा तास एक स्थिर चित्र लाऊन ठेवलेले असायचे, ज्यात मद्ये एक मोठा पंखा आणि चार कोपऱ्यात चार छोटे exhaust fan सारखे दिसणारे चित्र असायचे. आणि कूंsssss असा सतत आवाज येत असायचा. माझ्या माहितीप्रमाणे ते टीव्हीचे पिक्चर सेटिंग करण्याकरिता मेकेनिकला उपयोगी असायचे. कोणाकडे आहे का ते चित्र? इथे टाकले तर पुन्हा पहायला आवडेल.

समूहगान हा एक अत्यंत विनोदी कार्यक्रम पण असे. त्यात एकसारखे कुर्ते घातलेले बाप्ये आणि एकसारख्या साड्या नेसलेल्या बाया स्टेजवर उभे करवून त्यांना जयोस्तुते सारखी गाणी गायला लावायचे.

{{{ आणि ते!! संध्याकाळी TV लागायच्या अगोदर अर्धा तास एक स्थिर चित्र लाऊन ठेवलेले असायचे, ज्यात मद्ये एक मोठा पंखा आणि चार कोपऱ्यात चार छोटे exhaust fan सारखे दिसणारे चित्र असायचे. आणि कूंsssss असा सतत आवाज येत असायचा. माझ्या माहितीप्रमाणे ते टीव्हीचे पिक्चर सेटिंग करण्याकरिता मेकेनिकला उपयोगी असायचे. कोणाकडे आहे का ते चित्र? इथे टाकले तर पुन्हा पहायला आवडेल. }}}

पॅटर्न जनरेटर नावाचे एक उपकरण असा डिस्प्ले टीवीवर दाखविते. जुने सी आर ट्यूबवाले टीवी दुरुस्त करणार्‍या कारागिरांकडे ते असत.

इथे पाहा:-

https://www.google.co.in/search?q=television+pattern+generator&biw=1366&...

तुम्हाला हवे ते चित्र इथे सहज दिसेल.

{{{समूहगान हा एक अत्यंत विनोदी कार्यक्रम पण असे. त्यात एकसारखे कुर्ते घातलेले बाप्ये आणि एकसारख्या साड्या नेसलेल्या बाया स्टेजवर उभे करवून त्यांना जयोस्तुते सारखी गाणी गायला लावायचे. }}}

बदामी रंगाचे कुर्ते आणि पांढरे पायजमे घातलेले मख्ख चेहर्‍याचे लोक जेव्हा "आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान" म्हणत तेव्हा ते फारच हास्यास्पद वाटे.

रेडियो नं भावविश्व समृद्ध केलं...

मी मिडिल शाळेत असतांना आमच्या इथल्या महाराष्ट्र मंडळातील गणेशोत्सवात पहिल्यांदा चित्रा मोडक यांचं शास्त्रीय गायन ऐकलं...मी पूर्ण ऐकलेली ती पहिली बैठक. त्यातील ‘नंद के छैला धीट लंगरुवा...’ ही मालकौंस ची बंदिश मनांत कायम घर करुन गेली...

तात्पर्य काय...इथून शास्त्रीय संगीताची गोडी लागली...

या काळांत इथे बिलासपूर ला मनोरंजनाचं साधन म्हणजे चित्रपटगृह व रेडियो होते...शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम गणपती उत्सवांत होत असत...

तर घरी रेडियो होता...

वडील रेलवेत होते.

सकाळी सहा वाजता नागपूर नभोवाणी केंद्रावरुन येणारया भावगीतांनी सकाळ व्हायची...

क्षणभर उघड नयन देवा...चरणी तुझिया मज देई वास हरी...अमृताहूनि गोड नाम तुझे देवा...माणिक वर्मांच्या या गाण्यांसोबत लता दीदी, सुमन कल्याणपूर सोबतच इतर कलाकारांच्या भावगीते एेकतांना मज्जा यायची...

वडील सकाळी 7 ला ऑफिस साठी निघायचे...नागपुर नंतर रायपुर नभोवाणी केंद्र वरील भक्तिगीते...7 ला संस्कृत च्या बातम्या...पर्यंत ते निघून गेलेले असत...

नंतर आम्ही रेडियोचे कान पिळायला मोकळे...

मग सव्वा सात वाजता आल इंडिया रेडियो उर्दू सर्विस, साडे सात ला रेडियो सीलोन वरील भूले बिसरे गीत...यात शेवटचं गाणं कुंदनलाल सैगलचं...(इथेच तलत महमूद भेटला आणि मनांत कायम घर करुन गेला)...नंतर वििवध भारती, साडे आठ ला परत रायपुर वरुन शास्त्रीय गायन या कार्यक्रमांत यात केजी गिंडे, कुमार गंधर्व, मालिनी राजुरकर, उस्ताद अमीर खान सारख्या मातब्बर कलाकार ऐकायला मिळाले...

सव्वा नऊ वाजता रायपुर वर मधुवंती या कार्यक्रमांत लाइट क्लासिकल, गैर फिल्मी गजल, गीत भरपूर एेकलं...यात ठुमरी-दादरा-चैती-कजरी यांचा समावेश होता...

दुपारी साडे बारा वाजता नागपूर नभोवाणी केंद्रा वर नाट्यगीते भरपूर ऐकली...वसंतराव आवडू लागले...कर हा करी धरिला शुभांगी...हे पाच मिनिटांचं गीत स्टेजवर नायक नायिकेचा हात हातां धरुन कसं म्हणत असेल हा प्रश्न पडायचा...

दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांवर निरनिराळया नभाेवाणी केंद्रांवरून पुन्हां रागदारी ऐकायला मिळे...नागपुर-रायपुर केंद्रावरुन वसंतरावांची रागदारी ऐकायला मिळाली...मारवा, मधुकौंस अक्षरश: कोळून प्यायलो होतो...माणिक वर्मांचा भटियार आणि नंतर येणारी ती ठुमरी-‘ अकेली मत जईयो राधे जमुना के तीर...’ वेड लावणारी होती...

मुख्य म्हणजे मी हिंदीभाषी क्षेत्रांत राहणारा असल्यामुळे मला या मराठी कलाकारांच्या उच्चाराचं कौतुक वाटायचं...

गान तपस्विनी किशोरी अमोणकरांचं एक भजन आहे-

‘म्हारो प्रणाम, बांके बिहारी जी,
म्हारो प्रणाम...’

रिकार्ड मधे किशोरी ताईंनी ‘जी’ शब्द उच्चारला आहे तो अप्रतिम आहे...हिंदीभाषिकांमधे देखील असा जी चा उच्चार ऐकला नाही...त्या मुळे हे भजन कायम आठवणीत घर करुन आहे...

साडे तीन ला परत विविध भारती वर शास्त्रीय संगीत असे...

रात्री दहा ते अकरा या दरम्यान निरनिराळया केंद्रांवरुन शास्त्रीय संगीत ऐकण्यांत मजा यायची...

शनिवारी शास्त्रीय संगीत का अखिल भारतीय कार्यक्रम तर पर्वणीच असे...यात बरेच कलाकार ऐकले.

मालिनी राजुरकरांचा मालकौंस आठवणीत घर करुन गेला-

‘नभ निकस गयो चंद्रमा...चांदनी चमक रही...’

विद्याधर व्यास होते एकदा तानसेन समारोह मधे. रेडियोवर रिकार्डिंग मधे त्यांचा शुद्ध कल्याण ऐकला...मजा आली...

नेमकं त्याच वर्षी आमच्या इथे गणपतीत त्यांचा कार्यक्रम झाला...त्यांत त्यांनी मिया मल्हार पासूून कार्यक्रम सुरू केला...मधेच दिवे गेले, पण त्यांचं गायन सुरूच होतं....मध्यंतरात आमचा एक मित्र त्यांना भेटला... तो तबला शिकत होता...त्याने सांगितलं मी रेडियो वर तुमचा मालगुजी ऐकला, खूप छान होता... शेवटी शेवटी मला झोप लागली...इंटर नंतर पंडितजींनी काय केलं असेल...त्यांनी मालगुजी मधे छोटा ख्याल, बडा ख्याल आणि तराणा ऐकवला...याच रागानंतर ते थोडा दम घेत होते इतक्यांत श्राेत्यांमधून कुणी तरी म्हणालं मालकौंस म्हणां...समाेर बोटावर माेजण्या इतके श्रोते होते...ते दचकले...विचारले कुणाला ऐकायचाय मालकौंस...! एका वृद्ध गृहस्थांनी हात वर केला...स्टेजवर पंंडितजी म्हणाले बरं, त्यांनी मालकौंस मधे छोटा ख्याल, बडा ख्याल आणि तराणा ऐकवला.

आज पन्नाशी च्या घरांत असतांना प्रकर्षाने जाणवतं की त्याकाळी रेडियो ने अश्याप्रकारे भावविश्व समृद्ध केलं...शास्त्रीय गायनाची गोडी लावली... म्हणूनच मैफिलीं मधे त्याचा पुरेपूर आस्वाद घेता आला...

तुम्हाला हवे ते चित्र इथे सहज दिसेल. >>> हो! हो! दिसले! पाहून नेत्र सुखावले. @ बिपीन चंद्र, आपले फार फार धन्यवाद.

@ रवींद्र, आपला शास्त्रीय संगीताचा अभ्यास पाहून अचंबित झालोय. आपण महान आहात.

आपण यांना पाहिलेत का? >>> हो! सगळेच टक लाऊन हा कार्यक्रम पहायचे.

आमची माती, आमची माणसंमद्ये मला वाटतं 'गप्पा गोष्टी' हा एक कार्यक्रम असायचा. सादरकर्त्याचं नाव आता आठवत नाही. काहीतरी भारदस्त नाव होतं, त्यांचं.

विविध भारतीला रात्री कार्यक्रमाची सांगता करताना जाई काजळची जाहीरात करायचे कित्येक वर्षे.
इस समय रात के ग्यारह बजे है.
हमारे आज के कार्यक्रम अब समाप्त होते है
रात को सोते समय ऑंख मे जाई काजल लगाइये.
शुभरात्री, शब्बा खैर!

तेव्हा आम्ही झोपेची वेळ झाली की, चला काजळ लावा / काजळवेळ झाली असे म्हणत असतो.

आणि दूरदर्शनवर,
आजचे आपले कार्यक्रम संपले.
आता आपली भेट उद्या संध्याकाळी ठीक सहा वाजता.
तोपर्यंत निरोप घेऊया.
जयहिंद! जय महाराष्ट्र!

गप्पागोष्टी : मानसिंग पवार.
रवी पटवर्धन, माया गुर्जर, राजा मयेकर, आणखीही होते. चेहरे आठवताहेत, नावं नाही. सुनील बर्वे याच कार्यक्रमात सर्वप्रथम दिसलेला.

निवेदिता जोशीपण होती गप्पागोष्टीमधे काही दिवस, गुजराथी सून होती.

आमच्याकडची सकाळ मुंबई ब आकाशवाणी केंद्राने व्ह्यायची आणि संध्याकाळ दूरदर्शनने.

Pages