कोत्या आणि कोषातल्या वाटांचा मोकळा कोलाज ........... हायवे

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

अंधा-र्या हायवे वर ऊजळणा-र्या ,आपलं माणुस दाखवणार्या पायवाटा......
वेगवेगळ्या आकारच्या गाड्या आणि त्यांचे चालक ... त्यातली विविध पार्श्वभुमीची माणसं. प्रत्येकाचे वेगळे विश्व वेगळ्या विवंचना, आणि सतत कशासाठी तरी पळायचा हव्यास.... ब्रेक लागतो तो ट्राफिक चा ..... मग अंधार, गैरसोयी ,गैरसमज, आणि प्रसंगिक अड्चणीतही माणसं आधी स्वता:ला कम्फ़र्टेबल करायला सुरवात करतात आणि हे करत असतानाच चढवलेले मुखवटे मोकळे होत जातात आणि तयार होतो या सगळ्या कोत्या आणि कोषातल्या वाटांचा मोकळा कोलाज हायवे ....

अर्थात हा कोलाज सुरवतीला थोडा सुट्टा वाटतो पण नंतर त्यातले रंग, तुकडे एकमेकात मिसळत जाता आणि हायवे बनत जातो...
उमेश कुलकर्णीचे संवाद नेमक्या बोलीभाषांचा आणि स्वभावाचा एकेक नमुना पकडतात. मग ते मुक्ताचे बेधडक ग्राम्य बोलणे,राजकिय कार्यकत्याचा दिखाऊपणा स्वता: भोवती आपण काही तरी आहोत आभास निर्माण करणे, सुनिल आणि वृशालीचे तुटक तरीहि एकमेकांना न दुखावण्याचे केविलवाणे प्रयत्न,आणि "मागच्या सीटवर" बसुन संसार ते परमार्थ सगळ्याच गोष्टी बेफीकीरीने घेणारे सामान्य जन,
सुशिक्षीत,उच्चभ्रु, मध्यम वर्गीय, अगदी निम्नवर्गीय अशा प्रत्येक स्तरातील ही सेल्फ़ी... आरसा जे जसं आहे तेच दाखवतो पण सेल्फ़ित मात्र स्वता:ला हवी असलेलीच प्रतीमा लोकांसमोर जाईल हाच आट्टाहास प्रत्येक जण करत राहातो.
खुप सारे कलाकार नव्याने चित्रपट सृष्टीत येत असतात पण काही रंगभुमीची देन असतात तर काही मालिकांमधुन चमकत इथे पोहोचतात पण आजही नागराज मंजुळें सारखा कलाकार नक्की कसा इथे पोहोचलाय हेच कळत नाही.. कमीत कमी संवाद केवळ देहबोलीतुन संपुर्ण भुमिकेला खलनायकी छ्टा देउन जातो. त्या आन्ध्रातल्या भाषेतला चकार शब्द ही न कळता हे काही तरी भलतच दिसतंय हे मनाला जाणवत राहते.
उमेश कुलकर्णी चा NRI हा सुरवातीला काही वेळा थोडा खटकतो मात्र शेवटच्या प्रसंगातील "कंन्सेट देउ नका" नंतरचा अभिनय सुंदर .....
( प्रिमियरला अगदी spot वाल्यापासुन ते युनिटला जेवण देणारे आणि निर्मात्यांपर्यंत सर्वांचे अगत्याचे उल्लेख खरोखरच आवडुन गेले.. कदाचित हा आरसा असेल सेल्फी नाही)
निपुण धर्माधिकारी हा नवीन चेहेरा आजच्या whatsup' genration चे प्रतिनिधत्व करतो..
मयुरेश खांडकेंचा चालक नीट्स
मुक्ता.. स्वच्छ नितळ पाणी ... जो रंग भुमिकेचा त्यातच सहज मिसळुन जाणारी... काही प्रसंगात चट्कन "जोगवाची" आठवण करुन देणारी

समजायला पचायला थोडासा जड आहे पण justified आहे... सध्याच्या कोटी कोटी collection सदरात कदाचित नाही बसणार पण मराठी चित्रपटाचे वेगळेपण दाखवणा-र्या चित्रपटांच्या यादीत हे नाव नक्की बरेच वरती असेल....

ता. क. मायबोलि माध्यम प्रायोजकांचे आभार अशा अधिकाधिक चित्रपटांचे प्रयोजकत्व करावे..
चिनुक्स ईंद्रा , जिप्सीचे सुद्धा

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

तुम्ही सर्वांनी केलेल्या सुंदर व्याख्येमुळे हा सिनेमा आवर्जून पाहावासा वाटतोय.

धन्यवाद!!

( प्रिमियरला अगदी spot वाल्यापासुन ते युनिटला जेवण देणारे आणि निर्मात्यांपर्यंत सर्वांचे अगत्याचे उल्लेख खरोखरच आवडुन गेले.. कदाचित हा आरसा असेल सेल्फी नाही)- हे विशेष आवडलं.. Happy

आवडलं परीक्षण घारुअण्णा . केंद्रवर्ती कल्पनेबरोबरच प्रत्येकाच्या अभिनयावर, व्यक्तिरेखेवर केलेलं भाष्य सुंदरच.

आजच आत्ताच बघितला पण अरुधन्ती आणि घारू अण्णा तुम्ही दोघांनी अतिशय सुंदर परीक्षण लिहिलंय आणि तुमच्या परीक्षणामुळेच सिनेमा जास्त चांगला समजला अस म्हणेन . उत्तम परीक्षण Happy

घारूअण्णा, मस्त परीक्षण. आवडलं.

मुक्ता.. स्वच्छ नितळ पाणी ... जो रंग भुमिकेचा त्यातच सहज मिसळुन जाणारी... काही प्रसंगात चट्कन "जोगवाची" आठवण करुन देणारी >>>>>>
उमेश कुलकर्णी चा NRI हा सुरवातीला काही वेळा थोडा खटकतो मात्र शेवटच्या प्रसंगातील "कंन्सेट देउ नका" नंतरचा अभिनय सुंदर .....>>>>>>>प्रचंड सहमत.