व्यभिचार .. राजाराणीच्या कथेतील !

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 April, 2015 - 13:03

व्यभिचार म्हणजे नक्की काय यावर इथे यन्न नंबर ऑफ टाईम्स चर्चा झाली असावी. पण तरीही बालमनाला पडलेले प्रश्न आजही कायम आहेत.

तीच ती आपल्या राजाराणीची कथा. जी कित्येक आयांनी आपल्या मुलांना मम्मम भरवताना सांगितली असावी.

आटपाट नगराचा एक राजा होता.

राजाला दोन राण्या होत्या.

एक आवडती, तर एक नावडती!

किमान दोन राण्या असल्याशिवाय राजाचे राजापण कसे सिद्ध होणार नाही!

कधी दोनाच्या जागी अनेक राण्या असायच्या, पण त्यातही एक पट्टराणी असायचीच.

तर ती पट्टराणी सर्वात आवडती का असायची हे बरेचदा कथेत सांगितलेले नसायचे.

पण जी सर्वात सुंदर असणार तीच पट्टराणी हे बालमनालाही समजू यायचे.

याउलट एका राणीचे दोन राजे होते अशी कथा मात्र कधी ऐकल्याचे आठवत नाही.

पण ते एक असो!

आपण सोयीसाठी एक राजा आणि त्याची आवडती, नावडती अश्या दोन राण्यांचीच कथा घेऊ.

तर, या राजाराणीच्या "त्रिकोणी" कुटुंबाची कथा लहानपणी आनंद देऊन गेली खरी,

तरी वयात येता येता काही प्रश्न मनात सोडून गेली.

जिथे आज एकापेक्षा अनेक जोडीदारांबरोबर एकाच वेळी संबंध ठेवणे हा व्यभिचार समजला जातो,

तिथे या राजा-राण्यांच्या कथेत व्यभिचारी कोण?

० राजा -- जो आपल्या राजा असण्याचा गैरफायदा उचलत एकाच वेळी दोन दोन राण्यांशी संबध ठेवतो.
० आवडती राणी -- जी आपल्या सौंदर्याच्या जिवावर नावडतीचा हक्क मारते.
० नावडती राणी -- जी राजाला आपण आवडत नाही हे माहीत असूनही त्याच्याशी संबंध जोडून राहते.
० आपण सारे -- जे एक राजा आणि दोन राण्यांच्या कथा अगदी लहान वयातच बालमनावर बिंबवतो.

स्त्री-पुरुष नात्यातील व्यभिचाराचा अर्थ कोणी ईथे उलगडून सांगेल का ...
की काही प्रश्न अनुत्तरीतच राहिलेले चांगले जे वेळ पडल्यास त्यांची उत्तरे आपल्या सोयीने शोधता येतात..

......!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कौतुक !
एया धाग्यात लिव्ह इन रिलेशनशिप, वन नाइट स्टँड, सेक्स बिफोर मॅरेज , वाईफ स्वॅफिंग हे सर्व टाळण्यात आलेलं आहे. हे सर्व एकेका शतकी धाग्यांचे स्वतंत्र विषय आहेत... !

आटपाट नगराच्या काळात दोन दोन लग्नं समाजमान्य होती..अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातही अनेक संस्थानिकांच्या दोन अथवा अधिक बायका होत्या..नंतर कायदे आले आणि हे सगळं बदललं. मग आत्ताचे निकष त्या गोष्टींना कसे लावता येतील? हाच निकष लावायचा तर मग दशरथ, पांडव, अगदी कृष्णसुद्धा व्यभिचारी ठरेल! त्यामुळे उगाचच काहीही धागे काढू नका.

राजा राणीच्या गोष्टीत व्यभिचारवगरे दिसायचो तुम्हास Light 1 आमि तर फक्त गोष्ट ऐकून मस्त झोपायचो.

बाळ रुन्मेश पण तुला आता काय फरक पडतो. राजा राणीच्या गोष्टी ऐकायचे तुझे वय गेले आता. (असावे असा अंदाज आहे) आणि तुझ्या भावी पोराबाळांना याच गोष्टी सांगितल्या पाहिजेत याचा अट्टाहास नाही.
तु पाहिजे तर सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी झालंच तर सलमानने त्याच्या ड्रायव्हरला कसे वाचवले इ.इ. परिकथा ऐकवू शकतोस. त्याही प्रचंड रोचक, सुरस आणि चमत्कारीक आहेत.

प्रत्येक पुरुषाने लग्नाबरोबरच. आणखी एक स्त्री व पुरुषही ठेवला पाहिजे. असे माझे मत आहे

तेच म्हणत होतो... मागच्या प्रतिसादात काही तरी राहीलं... आत्ता काऊंच्या प्रतिसादात लक्षात आलं Proud
सम विषम

आटपाट नगराच्या काळात दोन दोन लग्नं समाजमान्य होती..अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातही अनेक संस्थानिकांच्या दोन अथवा अधिक बायका होत्या..नंतर कायदे आले आणि हे सगळं बदललं. मग आत्ताचे निकष त्या गोष्टींना कसे लावता येतील?

#@₹%₹#()-₹@--";@-#-₹-#-

थोडक्यात आपल्यामते व्यभिचार कायद्याच्या निकषांनुसार ठरतो.

म्हणजे आज जे कायद्याने व्यभिचार ठरत असेल तेच जर उद्या कायदा बदलला तर त्याच क्षणापासून त्या प्रकरणाला व्यभिचार म्हणता येणार नाही.

उदाहरणार्थ दारू पिऊन गाडी चालवणे योग्य की अयोग्य? आज तसे कोणी करू नये म्हणून कायदा आहे, पण जेव्हा असा कायदा नव्हता तेव्हा ते गैरकृत्य नसावे. आणि त्याउपर आपण कौतुकाने त्याचे किस्सेही चघळणार. लहान मुलांना गोष्टीही सांगणार. अमुक तमुक कसे मस्त दारू पिऊन गाडी चालवायचे. मग पोराला पडणारे प्रश्न की दारू पिऊन गाडी चालवणे योग्य की अयोग्य हे सोडवणे आपला प्रश्न नाही.

असो,
थोडक्यात व्यभिचार व्यभिचार म्हणत ज्याची हवा केली जाते, तसेच व्यभिचाराचे समर्थन करणार्यावरही टिका केली जाते, तो व्यभिचार प्रत्यक्षात एक फुसका बार आहे. समाजमान्यता मिळाली की तो व्यभिचार राहत नाही.

काही चुकत असेल तर कर्रेक्ट करा Happy

अरे पण तुला का एवढा इन्टरेस्ट? ऑ!

कुठल्याही विषयावर धागे विणतो. उद्या लहान मुली भातुकलीच का खेळतात, आट्यापाट्या का नाही या विषयावर पण धागा काढेल.:खोखो:

सोडा की आता ...७० च्या वर घाणेरडे धागे काढून अजून चालूच आहे. काही प्रॉब्लेम आहे का की हे विषय चघळल्याशिवाय राहवत नाही. हिरोइन्स, गर्लफ्रेंड, व्यभिचार, अश्लीलता, आक्षेपार्ह दृष्ये फारच बाई विंट्रेस्ट तुम्हाला टॅबू गोष्टीत.

थोडक्यात व्यभिचार व्यभिचार म्हणत ज्याची हवा केली जाते, तसेच व्यभिचाराचे समर्थन करणार्यावरही टिका केली जाते, तो व्यभिचार प्रत्यक्षात एक फुसका बार आहे. समाजमान्यता मिळाली की तो व्यभिचार राहत नाही. ----------- बरं मग करून टाका की तुम्ही पण एखादा. मायबोलीकर कश्याला मनाई करतील. किंवा करू की नको पोल काढता का ? समर्थ्न आणि समाजमान्यता ही मिळवूनच टाका एकदाची.

काय पण लोक असतात एकेक...

>>> कुठल्याही विषयावर धागे विणतो. उद्या लहान मुली भातुकलीच का खेळतात, आट्यापाट्या का नाही या विषयावर पण धागा काढेल <<<<
रश्मी, धागा काढण्याबद्दल काही नाही.... पण उद्या भातुकलीच्या खेळात मुलेमुली "खोटे खोटे नवराबायको बनले", अन त्यातही यास व्यभिचार दिसू लागला म्हणून आट्यापाट्या खेळा म्हणाला, तर मात्र परिस्थिती अवघड बनलेली असेल, असे नै वाटत? Proud

ऋन्मेऽऽष, लेख (किंवा विचार) आवडला.
राजा आणि आवडती , नावडती राणी यांची कथा अगदी खट़कणारी आहे.
पूर्वी `एम आर कॉफी ' ची `डबल मजा' वाली अ‍ॅड सुद्धा अशीच डोक्यात जाणारी होती.

कुठलाही पुर्वाभ्यास न करता, सूचला विषय की पाड धागा ही स्वतःचीच परंपरा अबाधित राखल्याबद्दल धागालेखकाचे अभिनंदन.

आता गोष्टीतला काळ व आजच्या काळाची तूलना

तेव्हा भारतात राजेशाही होती, आजही अनेक देशांत राजेशाही आहे; पण तरीही आज आपल्या देशात राजेशाही / हुकूमशाही असणे नैतिकतेत बसत नाही. इतकेच काय एखाद्या लोकप्रतिनिधीने आपल्या वारसास लोकशाही मार्गाने निवडून आणून नेतेपदी बसविले तरी त्यावर घराणेशाहीचा आरोप होतो. कायद्याने तो चूकीचा वागत नसला तरीही त्यावर टीका होतेच.

पुर्वीच्या काळी वैद्यकीय सुविधांचा अभाव होता. त्यामुळे नैसर्गिक रीत्या स्त्री व पुरुष जन्मास येण्याचे प्रमाण सारखेच असले तरी गर्भधारणेपासून वयाच्या प्रत्येक टप्प्यात पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा अतिशय कमी होत जायची (कारण नैसर्गिक रीत्या कुठल्याही आजारास बळी पडून मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण पुरुष प्रकृतीत अधिक आहे.). आजच्या काळात वैद्यकीय सुविधेमुळे असे घडत नाही. तसेच पूर्वीच्या काळी पुरुष बाहेरची कामे करताना (जसे शेतात साप चावून, जंगलात जंगली श्वापदांमुळे, व्यापाराकरिता दूर गेलेले अन्य कुठल्या कारणाने) असे जास्त प्रमाणात मरण पावत. लढाईत मरणार्‍या पुरुषांची संख्या तर अफाट होती. स्त्रियांच्या अकाली मृत्यूचे एकमेव कारण म्हणजे बाळंतपण होते. तरीही या सर्व बेरीज / वजाबाकीचा परिणाम हा शेवटी स्त्रियांच्या तूलनेत पुरुषांची लोकसंख्या कमी असण्यात होत असे. त्याचप्रमाणे अनेक पुरुष जप तप आदी कारणांमुळे ब्रह्मचर्य पत्करीत. गुलामीची प्रथा असल्याने, गुलाम पुरुषही विवाह करीत नसत.

त्यामुळे अनेक पुरुष एकाहून अधिक विवाह करीत असतच. समाजातले वरच्या पदावरचे लोक यात पुढे होते, जसे की, राजे, सरदार, इत्यादी. राजकीय संबंध प्रस्थापित करण्याकरिता देखील विवाह होत. जसे की, पंडू राजाचा माद्री सोबतचा विवाह. वारस होत नसेल तर वैद्यकीय सुविधांच्या अभावी दुसरे लग्न हाच एक पर्याय उपलब्ध असे. घटस्फोट घेण्याची प्रथा नसल्याने एकाहून अधिक बायका सांभाळल्या जात.

एवढे असले तरी, एकाहून अधिक विवाह करणे हे कौतुकास्पद कधीच नव्हते. दशरथाला तीन राण्या होत्या परंतु आजही मुलांना गोष्ट सांगताना एकपत्नीव्रती रामाचा आदर्श ठेवण्याचीच शिकवण दिली जाते.

असो. एवढे विवेचन मी तुमच्यापुढे मांडले आता तुम्ही राम व्हायचे की, रामाचा बाप हा तुमचा स्वतःचा "माय चॉईस" आहे.

मस्तं धागा.
आवडला.
लहानपणीच्या गोष्टी/फेअरी टेल्स मुलांना सांगाव्या की नाही, की पॉलिटिकली करेक्ट करून सांगाव्या असा धागा पूर्वी माबोवर येऊन गेलाय.

त्याचा निष्कर्ष बहुतेक 'आपण लहानपणी या गोष्टी ऐकल्या तरी बिघडलो/दुखावलो/एक्स्ट्रिमिस्ट झालो नाही तर आपल्यापेक्षा स्मार्ट असलेली पुढची पिढीही होणार नाही' असा आहे.

व्यभिचार ही संकल्पनाच नैसर्गिक न असता सामाजिक आणि नैतिक असल्याने आजुबाजूच्या समाजमान्यतेनुसार ती बदलणार हे खरे आहे.

हा वैयक्तीक प्रश्न आहे, तसेच व्यभिचाराची डेफिनेशनही individually बदलते. लग्नानंतर काही वर्षांनी, एका पार्टनरला त्यांच्यात होणारा Sex बोअरिंग वाटत असेल, किंवा त्यांच्या Sex मधील नाविन्य संपलय आणि काहीतरी नवीन ट्राय करायचे आहे, असे वाटत असेल तर अर्थातच एकमेकांच्यामध्ये transparency ठेऊन ते बाहेर Sex करू शकतात. फक्त लग्न झालय म्हणून एकमेकांच्या सोबत कुढत आयुष्य काढण्याला(I am talking about sex life) काय अर्थ आहे? Happy

चेतनजी,
अभिनंदन
आपण एक खूपच सुरेख मुद्दा उचलला आहे.

पूर्वीच्या काळी पुरुषांची संख्या स्त्रियांच्या तुलनेत कमी असायचा मुद्दा.

याचाच अर्थ आजची आकडेवारी स्त्रियांची संख्या कमी दाखवत असल्यास, आज स्त्रियांना एकापेक्षा जास्त पुरुष पदरी बाळगायचा हक्क देण्यास हरकत नसावी. Happy

कोणी मला सांगू शकेल का व्यभिचारी कोणाला म्हणतात?

माझ्या अल्प ज्ञानामुळे मला वाटते की आजच्या आणि पुर्वीच्या समाजात व्यभिचारी त्यांना म्हणत जे विवाहबाह्य संबंध ठेवत. उदा: जो पुरूष आपल्या पत्नीव्यतिरिक्त इतर स्त्रीयांसोबत शारिरीक संबंध ठेवतो यात वेश्यागमन सुध्दा समाविष्ट आहे. त्या पुरूषाला व्यभिचारी पुरूष म्हणतात. आणि जी विवाहीता स्त्री आपल्या पतीव्यतिरिक्त इतर पुरूषांशी शारिरीक संबंध ठेवते तीला व्यभिचारी स्त्री असे म्हणतात.

जर गोष्टीतील राजा आणि त्याच्या दोन्ही राण्यांचे समाजमान्यतेप्रमाणे लग्न झालेले आहे तर त्यांना व्यभिचारी कसे म्हणू शकतो. त्यामुळे माझ्या मते मुळ धाग्यातच लॉजिक गंडलय.

बायका अनेक असल्या की संसार फाटके होतात हे बिन्डोक हिंदू लॉजिक आहे. राम , लक्ष्मण , मीराबैचा नवरा , माधवराव पेशवे हे एकेक बायका असुनही सुखी संसार करु शकले नाहीत.

अनेकानेक बायका / जनाना बाळगुन आमचे बाबरचाचा , जहांगिरचाचा , शहाजहानचाचा, अकबरचाचा , औरंग्याचाचा व इतर चाचे मात्र मस्त ऐषोआरामात दीर्घायुषी आयुष्य जगले आहेत.

लिंब्या , जरा या चाचालोकांच्या कुंडल्या मांड पाहू .

गोष्टी फार मनाला लावून घेवू नका ... तशी कुठली गोष्ट संस्कार करण्यासारखी आहे ते सांगा आधी .................
१) चिमणी कावळा , कावळ्याच घर वाहून जाते आणि चिमणी त्याला घरात घेत नाही .. तात्पर्य : दुसरयास मदत न करणे
२) म्हातारी आणि भोपळा : तात्पर्य : खोटे बोलून पसार होणे
३) ससा कासव शर्यत : ससा झोपलेला असताना गुपचूप पुढे निघून जाणे , तात्पर्य : चिटींग करणे
४) लाकूडतोड्या : तात्पर्य : झाडे तोडणे, एखादी वस्तू हरविली तर ती शोधण्याऐवजी देवाचा जप करणे (प्रत्यक्षात देव कधीही ती वस्तू आणून देणार नाही )
५) निळा कोल्हा, लबाड लांडगा, कावळा आणि रांजणातले पाणी,अलिबाबा आणि चाळीस चोर , विक्रम वेताळ अशा निव्वळ भाकडकथा ज्यांचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध असण्याची सूतराम शक्यता नाही.

आता या केवळ मनोरंजनासाठी खरडलेल्या गोष्टी धागे काढून बडवायची खरच गरज आहे का ???????

बाकी चालू द्या ... व्याभिचार वगैरे Rofl

काउ > Lol
आमचे बाबरचाचा , जहांगिरचाचा , शहाजहानचाचा, अकबरचाचा , औरंग्याचाचा व इतर चाचे मात्र मस्त ऐषोआरामात दीर्घायुषी आयुष्य जगले आहेत.> त्यांच्या बायका कसे आणि किती जगल्या ?

लोकहो,

राजाज्ञा पाळण्यासाठी विवाहबाह्य संबंध जरी आला तरी तो व्यभिचार धरला जात नसे. शिखंडी खरोखरंच पुरूष आहे की नाही हे तपासण्यासाठी त्याच्या सासऱ्याने काही 'वरिष्ठ स्त्रिया' त्याच्याकडे पाठवल्या होत्या.

shikhandi_verification.jpg

संदर्भ : उद्योगपर्व ५.२ (पीडीएफ पान क्रमांक २६६) - https://www.scribd.com/doc/19449377/%E0%A4%89%E0%A4%A6-%E0%A4%AF%E0%A5%8...

आ.न.,
-गा.पै.

संदर्भ : उद्योगपर्व ५.२ > ग्रंथप्रामाण्य मानण्यापेक्षा विवेकबुद्धी मानली पाहिजे या बाबतीत.

गांधींचे ब्रम्हचर्याचे विवादास्पद प्रयोग हा व्यभिचार होता का?

व्यभिचार ह्याचा अर्थ स्वतःहून ठेवलेले विवाह्बाह्य शरीरसंबंध. राजाराणीच्या गोष्टीमध्ये तिघेही विवाहित आहेत त्यामुळे त्याला व्यभिचार म्हणता येणार नाही. पण राजाराणीची गोष्ट पुरुषप्रधान संस्कृतीचे द्योतक आहे. राजा दोन किंवा अधिक राण्यांशी लग्न करू शकतो, नावडत्या राणीवर अत्याचार करू शकतो. नावडत्या राणीने मात्र राजाला सोडून न देता सतत आपण त्याला आवडावे अशी खटपट करत रहायची!!!

माझ्या अल्प ज्ञानामुळे मला वाटते की आजच्या आणि पुर्वीच्या समाजात व्यभिचारी त्यांना म्हणत जे विवाहबाह्य संबंध ठेवत. उदा: जो पुरूष आपल्या पत्नीव्यतिरिक्त इतर स्त्रीयांसोबत शारिरीक संबंध ठेवतो यात वेश्यागमन सुध्दा समाविष्ट आहे. त्या पुरूषाला व्यभिचारी पुरूष म्हणतात. आणि जी विवाहीता स्त्री आपल्या पतीव्यतिरिक्त इतर पुरूषांशी शारिरीक संबंध ठेवते तीला व्यभिचारी स्त्री असे म्हणतात.

जर गोष्टीतील राजा आणि त्याच्या दोन्ही राण्यांचे समाजमान्यतेप्रमाणे लग्न झालेले आहे तर त्यांना व्यभिचारी कसे म्हणू शकतो. त्यामुळे माझ्या मते मुळ धाग्यातच लॉजिक गंडलय.>> +१

मलाही हेच माहित आहे.

एका राणीचे दोन राजे होते अशी कथा मात्र कधी ऐकल्याचे आठवत नाही.>>
आम्हाला समाजशास्त्र विषयात काही आदिवासी जमातींच्या संपूर्ण जीवनशैलीचा एक पेपर होता. त्या जमातीचे नक्की नाव आठवत नाही आता.(खुप वर्षे झाली तरीही संदर्भ मिळाला तर देईनच) पण त्यांच्यात बहुपतीत्वाची प्रथा होती. स्त्रीला एकापेक्षा अधिक लग्न करण्याचा अधिकार होता. आणि हे त्यांच्या समाजाला मान्य होते.
विवाहाशिवाय इतर पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवल्यास तो गुन्हा (व्यभिचार) मानून देहदंडाची शिक्षा दिली जात असे.

एका राणीचे दोन राजे होते अशी कथा मात्र कधी ऐकल्याचे आठवत नाही>>> द्रोपदी आणि ५ पांडव???

बाकी धागा Lol

Pages