द सिक्रेट- नवीन अंधश्रद्धा ?

Submitted by बावरा मन on 2 December, 2014 - 05:30

अंधश्रद्धा या सर्व समाजांमध्ये कमी अधिक प्रमाणात आढळतात . म्हणजे भारत हा साप -हत्ती चा आणि मागासलेला देश आहे असे मानणाऱ्या युरोपिअन देशांमध्ये आणि अमेरिकेमध्ये पण अंधश्रद्धा भरभरून आढळतात . भारतात भानामती आणि अंगात येणे वैगेरे प्रकार होत असतील तर गोऱ्या लोकांमध्ये उडत्या तबकड्या , परग्रहवासी आणि dooms day वैगेरे विज्ञानाचा मुलांमा दिलेल्या अंधश्रद्धा जोरात आहेत . याचा एक दणकून पुरावा म्हणजे २१ नोव्हे . २०१२ च्या निमित्ताने उडालेला धुरळा . जग आता नष्ट होणार म्हणून अनेक लोकांची पळापळ सुरु झाली होती . शेवटी नासा ला मध्ये पडून हे धादांत खोटे आहे असे निवेदन द्यावे लागले होते . तरी पण तो दिवस उलटे पर्यंत अनेक लोकांनी आपले 'जिझस ' पाण्यात बुडवून ठेवले होते . तर सांगायचा मुद्दा हा कि खरच अंधश्रद्धा या बाबतीत खरच 'काळ -गोर ' (No pun intended ) करता येत नाही .

मला 'द सिक्रेट ' या प्रकरणाचा शोध 'चित्रलेखा ' मासिक वाचताना लागला . चित्रलेखाने चक्क या विषयावर कवर स्टोरी केली होती . काय आहे हे प्रकरण ? Rhonda Byrne या लेखिकेने हे पुस्तक लिहिले आहे . याच विषयावर एक फिल्म पण आहे . तू नळी वर तिचा काही भाग उपलब्ध आहे . तर या पुस्तकात Rhonda ने एक नियम मांडला . 'The Law of Attraction ' (आकर्षणाचा नियम ?). Rhonda च्या मते हा नियम फ़क़्त काही ठराविक लोकांनाच माहित होता . यात मोठमोठे महाराजे , कलाकार , सेनानी आणि मानवी इतिहासाला वळण देणार्या व्यक्तींचा समावेश होता . पण Rhonda च्या मते हा मानवी जीवनाला वेगळे वळण देणारा आणि मानवाच्या सगळ्या आशा आंकाक्षा पूर्ण करणारा नियम तिला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे म्हणून तिने हे पुस्तक लिहिले होते . हा The Law of Attraction 'असे सांगतो कि माणूस हा सकारात्मक विचारांच्या मदतीने आपल्याला पाहिजे ते म्हणजे भरपूर संपत्ती , प्रेम , सुदृढ तब्येत वैगेरे मिळवू शकतो . वर वर तर हे विधान /नियम निरुपद्रवी आणि खर वाटू शकत . पण ग्यानबाची मेख अशी आहे कि या नियमाला पूर्ण पुस्तकात वैज्ञानिक नियमांचं अधिष्ठान देण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे . त्यासाठी Placebo Effect च्या मागचे कार्यकारण भाव आणि Quantum Physics चे नियम याचे दाखले देण्यात आले आहेत . म्हणजे एका साध्या नियमाला तो एक त्रिकालाबाधित नियम आहे असे सिद्ध करण्याचा खटाटोप . म्हणजे या पुस्तकात वजन कसे कमी करावे किंवा घातक रोगांपासून The Law of Attraction ' वापरून मुक्ती कशी मिळवावी यावर वेगळे प्रकरण आहे . त्यावर अनेक तज्ञांनी टीका केली . म्हणजे सकारात्मक विचार करणे हि चांगली गोष्ट आहे पण दुर्धर रोगाच्या शेवटच्या टप्प्यात असणारा माणूस The Law of Attraction ' वापरून बरा होऊ शकतो का ? अनेक वैज्ञानिक आणि Medical Experts नी हे पुस्तक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईक याना खोटी आशा लावते अशी टीका केली आहे .

साहजिकच या पुस्तकावर आणि The Law of Attraction ' वर टीकेची राळ उडाली . अनेक लोकांनी यावर टीका केली आहे कि या नियमावर विसंबून राहणारे आणि प्रत्येक समस्येवर 'Instant Solution ' शोधू पाहणारे लोक आपल्या आयुष्यातील समस्येच्या root cause पर्यंत जाण्याच टाळतात आणि हे त्यांच्यासाठी धोकादायक आहे .आता या पुस्तकातल्या Quantum Physics च्या दाखल्या बद्दल Rhonda Byrne ने विज्ञान या विषयाचा कधी अभ्यास पण केला नव्हता . तरी पण तिच्या दाव्यानुसार The Law of Attraction ' वापरून अतिशय क्लिष्ट अशा Quantum Physics चे नियम समजून घेतले . तिच्या या दाव्यावर सडकून टीका होणारच होती आणि तशी ती झाली देखील .

शिवाय आपल्यासोबत घडणारया सर्व वाईट घटना आपणच नकारात्मक विचार करून आपल्याकडे आकर्षित करून घेतो हा The Law of Attraction चा व्यत्यास पण तितकाच धोकादायक . म्हणजे दिल्ली बलात्कार प्रकरणातील बलात्कारित मुलीने नकारात्मक विचार करून तो बलात्कार ओढवून घेतला होता का ? किंवा लातूर मध्ये झालेल्या भूकंपात मरण पावलेल्या किंवा सर्वस्व गमावलेल्या लोकांनी हा भूकंप नकारात्मक विचार करून घडवून आणला होता का ? साहजिकच victim असणाऱ्याला दोषीच्या पिंजर्यात हा नियम उभा करतो .

पाश्चात्य लोकांकडून आलेलं सगळ भारी अस मानून चालणार्या आपल्याकडे पण या पुस्तकाचा खप चिक्कार वाढला आहे . माझे काही मित्र पण यात आले . ते कायम आम्ही सध्या किती आनंदी आहोत आणि सकारात्मक आहोत हे दाखवत असतात आणि कुठलाही प्रश्न शेयर करायला गेल कि Think Positive ' चा डोक्यात जाणारा सल्ला देतात . इतकेच नाही तर आम्ही द सिक्रेट वाचल आहे हे status of symbol समजणाऱ्या लोकांचा संप्रदाय आपल्याकडे पण मोठ्या प्रमाणावर वाढला आहे . अनेक बापू -महाराज -साध्वी यांचे संप्रदाय कमी होते कि काय म्हणून यात या नवीन cult ची भर . आता तर The Law of Attraction चे दाखले अनेक महाराज लोक पण आपल्या प्रवचनात द्यायला लागले आहेत . हा नियम वापरून प्रबोधन करणार्या Motivational Speakers चे तांडे पण तैयार झाले आहेत . हो आणि ते Speakers आपल्या प्रबोधनासाठी भरभक्कम फी आकारतात . The Law of Attraction वापरून पैसे
कमवत नाहीत . यालाच विरोधाभास म्हणतात कि काय ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या अनुभवानंतर मी असेच निराशेने ग्रासलेल्या माझ्या काही मित्रांना हे पुस्तक गिफ्ट म्हणून दिले. त्यातल्या काहींनी अगदी असेच जेम्स बोंड सारखे ४ पेज वाचून ठेवून दिले. खरतर ते पुस्तकच जवळ जवळ ३०-३५ पेजेस नंतर खर्या रूपाने चालू होतं पण आपल्याकडे त्यासाठी निदान तेवढं पेशन्स लागतं. आणि यातून किती चांगलं मिळणार माहिती नाही पण वाईट काही होणार नाही किमान इतका विश्वास … तर असो ज्यांनी सोडलं ते जाऊ दे पण माझ्या काही मित्रांनी ते वाचलं आणि नंतर आम्ही जाणीवपूर्वक त्यांच्या आयुष्यावर प्रयोग केले. जसे आमचा एक भाई वयाच्या ४५ व्या वर्षी आजारपण अन गरिबीने पुरता खचला होता यापुढे आयुष्यात कधीही काही चांगले घडू शकत नाही असे मानून मरणाची तेवढी तो वाट बघत होता. पहिले सहा महिने त्याच्या मागे लागून मला त्याच्याकडून काही प्रयोग करवून घ्यावे लागले. त्याला विश्वास पटला आणि गरिबीने पुरता खंगलेला आमचा तो भाई आज खूप चांगले आयुष्य व्यतीत करतो आहे आता अलीकडेच त्याने चार चाकी गाडी घेतलीय हा सगळा बदल फक्त दोन वर्षात.

माझ्या मते हे पुस्तक तुम्ही स्टार्ट टू एंड नुसते गम्मत म्हणून जरी वाचून काढले तरी तुमच्या विचारांत कमालीचा बदल होतो. नकारात्मक बाबींपासून आपण दूर होऊ लागतो मग साकारात्माक्तेपासून होणारे फायदे मिळो न मिळो निदान नाकारात्माक्तेपासून उद्भवणारे मानसिक आणि काहीवेळेला प्रासंगिक त्रासापासून आपण वाचले जातो.

तिसरी आणि महत्वाची गोष्ट :- माझ्या मते पूर्ण पुस्तक वाचता वाचता कळत नकळत हा फोर्मुला तुमच्यात का भिनला तर आयुष्य पालटायला पुरे आहे. पण ते वाचायलाही नशीब लागत. (जसे इथेच कित्तेकांनी कबुल केलंय हातात पुस्तक येऊनही त्यांनी ते निव्वळ कंटाळा म्हणुन टाकून दिलं) नशीब त्या अर्थी नाही (नाहीतर तुटून पडतील सगळे पुन्हा अंधश्रद्धा म्हणून Proud ) म्हणजे तशी बुद्धी सुचायला लागते या अर्थी. मला वाटत जितक्या कमी वयात मुलांनी हे पुस्तक वाचलं तितक्या कमी वयापासून ते त्यांच्या आयुष्यात येणारे त्रास कमी करून सकारात्मक उद्देशांकडे यशस्वी होत मार्गक्रमण करू शकतात.
माझी मुलगी सध्या ५ महिन्यांची आहे पण माझ्याकडे मी तिच्यासाठी आतापासून 'The Secret' चे सगळे पार्टस कलेक्ट करून ठेवले आहे. ज्या वर्षी तिला वाचनातून मिळणाऱ्या चांगल्या गोष्टी घेण्याची समज येईल विचार करण्याची समज येईल त्या वर्षी मी तिला ते वाचायला देणार आहे. माझ्या सारखे आयुष्याचे २६ वर्ष तिने चाचपडत काढू नये निदान विचारांची दिशा कमी वयापासून योग्य दिशेने वापरावी हि त्यामागची प्रामाणिक इच्छा

ज्यांनी हे पुस्तक वाचले त्यावर विश्वास ठेवला आणि त्यातील गोष्टींचा अवलंब करत (अवलंब करणे महत्वाचे मित्रांनो … नाहीतर वाचूनही हसून टाळता येतेच) कळत नकळत फोर्मुला वापरात आणला. वापरता वापरता तो त्यांच्या अंगात भिनला सवयीचा अन पर्यायाने स्वभावाचा भाग झाला अश्यांना कधीतरी बसून त्यांना आलेल्या अनुभवांबद्दल अनुभूतींबद्दल विचारून बघा… हे सिक्रेट खरय कि निव्वळ अंधश्रद्धा ते सांगतील तुम्हाला त्यांचे सिक्रेटच्या आधीचे गेलेले आयुष्य आणि आताचे म्हणजे सिक्रेट वाचल्या नंतर वापरल्या नंतरचे आयुष्य कसे चमत्कारिकपणे बदलले. तेव्हाच विश्वास बसेल तुम्हाला.

न वाचता तर्क लावणारे लाखभर भेटतात आणि त्यावर मणभर बोलणारे करोडो. अनुभव घेतलेले त्यातून खरच सुखी झालेले मुठभर असतील पण ते अनुभवाचे अन सत्याचे बोल असतात हे नाकारून चालणार नाही.

एक मैत्रीण म्हणून (मैत्रीण नसेल समजायचे तर) वेलविशर समजून सल्ला ऐकून बघा सगळेच 'हाथ कंगना को आरसी क्या?' अशी एक म्हण आहे हिंदीत. वाचाच पुस्तक स्वतः अनुभव घ्या. तुमचं काहीच वाया जाणार नाहीये यातून झालंच तर काहीतरी चांगलंच होईल हा विश्वास मी देते. वाचाच एकदा

मयी,

तुम्ही म्हणता ते तथ्य असावे कदाचित. माझ्या एका मित्राने हे पुस्तक आणि Parable of Pipeline नावाचे अजून एक पुस्तक वाचून चांगली नौकरी सोडून बिझनेस मध्ये गेला.

आज भरपूर बिझनेस सुरु आहे असे म्हणतोय. कालावधी २ वर्ष.

माझ्यामागे पण लागलाय तो … वाच म्हणून. मी आत्तापर्यंत Parable कसबस संपवलय.
पण बहुतेक, आता सिरीअसली घ्याव अस वाटायला लागलाय … का कुणास ठाऊक!

तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद …
वाचून झाले की टंकतो …

२BHK flat ,चार चा़की म्हणजे सुखी का? जिवनाचा उद्देश हाच असावा का?

२BHK flat ,चार चा़की पैसेवाले आत्महत्या करुन जिव का देतात?.
अंधश्रद्धा वाढवायच्या पोस्ट टाकू नयेत.

२BHK flat ,चार चा़की म्हणजे सुखी का? जिवनाचा उद्देश हाच असावा का? >> या जगात बिल गेट्स हा एकमेव सुखी व्यक्ती आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

२BHK flat ,चार चा़की म्हणजे सुखी का? जिवनाचा उद्देश हाच असावा का?

>>

तुमच्या सुखी जीवनाची काय कथा मग?

२BHK flat ,चार चा़की पैसेवाले आत्महत्या करुन जिव का देतात?
>>

विरोधी : गरीब शेतकरी का जीव देतात?

जसे आमचा एक भाई वयाच्या ४५ व्या वर्षी आजारपण अन गरिबीने पुरता खचला होता यापुढे आयुष्यात कधीही काही चांगले घडू शकत नाही असे मानून मरणाची तेवढी तो वाट बघत होता. पहिले सहा महिने त्याच्या मागे लागून मला त्याच्याकडून काही प्रयोग करवून घ्यावे लागले. त्याला विश्वास पटला आणि गरिबीने पुरता खंगलेला आमचा तो भाई आज खूप चांगले आयुष्य व्यतीत करतो आहे आता अलीकडेच त्याने चार चाकी गाडी घेतलीय हा सगळा बदल फक्त दोन वर्षात. >>>>>

हे सगळे अंधश्रद्धा वाढवणारे वाटले.बाकी पुस्तक वाचलेल नाही वाचायची गरज वाटत नाही त्यामुळे पुस्तकांवर बंदी आणुन त्याचा खप वाढ्वायची इच्छा नाही.:)

अरेरेरे …. अहो अंधश्रद्धा मानायला का ते धार्मिक आध्यात्मिक पुस्तक आहे का?? त्यात काय बळी द्यायला सांगताहेत का ?? कि तुमच्याकडून जमणार नाही अस काही अतार्किक अतात्त्विक करायला सांगितलंय ?? बुवा माताने लिहिलेलं पुस्तक नाहीये ते लाल किताब वगैरे पण नाहीये . भारतात लिहिलेल सुद्धा नाहीये । आजपर्यंत अक्ख्या जगात फ़ेमस झालेलं फस्ट नंबरच बेस्टसेलर पुस्तक आहे ते. त्याची खप बघा. जगातले सगळेच लोकं मूर्ख आहेत का?? आपणच सगळ्या गोष्टींना बिना ताडता तर्क लावणारे शहाणे का? काहीही काय बोलताय … पुस्तक हातातही न घेता कशाला एवढे तर्क वितर्क … वाचून या मग बोलूया आपण यावर. उगाच विरोधाला विरोध करू नका हो… तुम्ही न मी राजकारणी नाहीयोत. एका चांगल्या पुस्तकाबद्दल सांगून मी तुमच्या चांगल्याच सांगतेय समजून घ्यायचं सोडून उगाच माहिती नसलेल्या गोष्टीवर वाद का घालायचा?

२BHK flat ,चार चा़की म्हणजे सुखी का? >>>>>>>> पुस्तक वाचून घर कारच मिळते असं म्हणलंय का हो मी? ती ज्याची त्याची मागणी असू शकते. तुम्हाला हवंय ते मिळवता येते किंवा मिळवायला एक फोर्मुला मदत करतो अस म्हणलय ना? घेतलेला flat हे माझं स्वप्न होतं … तुमचं काही वेगळं असू शकतं ते मिळवून मला आनंद झाला तुम्हाला कुठल्या वेगळ्या गोष्टीतून मिळेल मी यासाठी प्रयत्न केले तुम्ही तुमचं सुख मिळवायला करा. प्रत्येकाची मागणी प्रत्येकाची गरज वेगवेगळी असू शकते ना … आणि घर हि गरज नाहीये का??

मी माझं उदाहरण सांगितलंय जेमतेम शिक्षण पूर्ण करत असतांना आपलं असं घर असावं हे स्वप्न उराशी बाळगलं होतं आणि सिक्रेट वाचल्यावर मी ते कुणाच्याही मदतीशिवाय कमीवयात स्वभरवश्यावर पूर्ण केलं…FLAT घेतला हे महत्वाच नाहीये हो. स्वप्न सत्यात उतरवलं हे महत्वाचं. स्वप्न काहीही असू शकतं मटेरीअल कडे बघू नका… आत काय आहे ते बघा. त्यात मी लिहिलंय ना आज मी आयुष्याच्या अनेकबाबतीत हा फोर्मुला use करते. सगळ्याचं उदाहरण देत बसू शकत नाही ना म्हणून घराचं उदाहरण दिलं

वणदेवी … तुमच्या नावातच देवी आहे त्यामुळे मी दिलेलं उदाहरण तुम्ही लगेच अंधश्रधेच्या चष्म्यातून का पाहिलं ते लगेच लक्षात आलं माझ्या तुम्हाला माझा प्रणाम.

आणखी एक :- हे पुस्तक वाचल्यापासून निगेटिव लोकांपासून आणि तसल्या विचारांपासून मी जाणीवपूर्वक दूर राहते. एका चांगल्या पुस्तकांवर चांगली हेल्दी चर्चा झाली असती तर मज्जा आली असती. काय फोर्मुला आहे ??कसा वापरतात?? त्या मागे तर्क काय?? तो कसा खरा ठरतो ? त्याच्या वापराची पद्धत काय ?? खरतर अशी छान चर्चा करता आली असती … पण खर सांगू … आपल्याला काहीतरी चांगलं मिळवून घेण्यापेक्षा एकमेकांवर शिंतोडे उडवण्यावर, वाद घालण्यावर, एखादा शब्द एखादे वाक्य पकडून पुढच्याला कैचीत घेऊन शाब्दिक मार करून मज्जा बघण्यात जास्त आनंद मिळतो. आपल्याला नेमकं काय हवंय हे आपलच आपल्याला स्पष्ट नसेल तर या जगात आपल्यासाठी कुणीच काही करू शकत नाही…

या धाग्यावर हि माझी शेवटची प्रतिक्रिया. तुम्हाला नकारात्मक चर्चा आवडत असेल तर तुम्हाला तेच मिळत राहणार सो तुम्ही चालू द्या

मयी, >> काय फोर्मुला आहे ??कसा वापरतात?? त्या मागे तर्क काय?? तो कसा खरा ठरतो ? त्याच्या वापराची पद्धत काय ??>> याबाबत आपले विवेचन ऐकायला आवडेल.

त्यातल्या काहींनी अगदी असेच जेम्स बोंड सारखे ४ पेज वाचून ठेवून दिले.

ओ ते प्लीज बॉन्ड, बाँड का ही ही करा, बोंड सोडुन ते कपाशीचं बोंड असल्यासारखं वाटतंहो !

ओ ते प्लीज बॉन्ड, बाँड का ही ही करा, बोंड सोडुन ते कपाशीचं बोंड असल्यासारखं वाटतंहो >>> Rofl Rofl

धन्यवाद बॉन्डजी वातावरण हलकं केल्याबद्दल

धन्यवाद मित्रांनो. मलाही सांगायला काहीच हरकत नाही पण इथे पुन्हा एक लांब पोस्त टाकणे म्हणजे काही मारक्या शिंगाचे अंगावर ओढवून घेणे आहे असे वाटते. खरच भीती वाटते हल्ली. काहीतरी चांगले करायला जायचे आणि मानसिक त्रास ओढवून घ्यायला नको वाटत. खरतर ह्याच कारणाने मी माबो वर मागल्या काही महिन्यांपासून फक्त वाचायला म्हणून येते. ज्या धाग्यांवर टोकाचे वाद भांडण सुरु असतात मी तिथे वाचायलाही थांबत नाही लगेच यु-टर्न घेते. लिखाण तर मी अगदीच कमी केलंय. आपण काहीतरी उत्साहाने बोलायला सांगायला ज्ञान मिळवून घ्यायला यावे आणि एक अक्खा गट तलवारी उपसून रपारप शाब्दिक मार करून आपला उत्साह, चांगला उद्देश, आणि आनंद सगळ्यांचाच चुरा करायला टपून बसले असतात. त्रास होतो या सगळ्यांचा … असो

ज्यांना खरच जाणून घ्यायचय. आणि हे जाणून घेण्याबाबत, वापरण्याबाबत ज्यांच्या मनात सकारात्मक भावना आहेत. प्रयोगात्मक प्रयत्न करायला जे तयार आहेत त्यांनी विपुत त्यांचा ईमेल आयडी सोडावा. मी त्या सर्वांना मला कळालंय तशी या पुस्तकाची समरी लिहून पाठवेन.

मयी >> अनुमोदन..
मस्त आहे पुस्तक आणि फिल्म दोन्ही छान आहे..
इथं अंधश्रद्धा अस बघुन आणि प्रतिसाद वाचुनच लिहिणे नको म्हटले होते..पुस्तक बर्‍याच अंशी पटलय..
थोतांड अस काही दिलेल नाहीए त्याच्यात..पद्धतशीर सांगितलय..
इंग्रजी, हिंदी, मराठी तीनही भाषात उपलब्ध आहे..
अभिनेता जिम कॅरी सुद्धा छान बोलला यावर त्याला महर्षी युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट, फेअरफिल्ड, आयोवा ने हॉनररी डॉक्टरेट प्रदान केली त्या समारंभात..
फिल्म वरचेवर बघत असते मी..
कुठल्याही गोष्टीत ऐकीव माहितीवर स्वतःचे विचार व्यक्त करण्यापेक्षा वाचुन समजुन उमजुन मग बोलायला काय प्रॉब्लेम आहे..never prejudge about anything..

Pages