मनमोहन सिंग यांना जपानचा राष्ट्रीय पुरस्कार

Submitted by भरत. on 3 November, 2014 - 23:49

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना जपानचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. : Grand Cordon of the Order of the Paulownia Flowers
भारत-जपान मैत्रीसंबंध वृद्धिंगत करण्यासाठी गेल्या पस्तीस वर्षांत केलेल्या कार्यासाठी डॉ. सिंग यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. असा सन्मान दिला जाणारे ते पहिलेच भारतीय आहेत.

जपानमध्येच डॉ. सिंग यांना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. Economic Research Institute for ASEAN and East Asia (ERIA), Jakarta, Indonesia) यांच्याकडून दिल्या जाणार्‍या दुसर्‍या ASIA COSMOPOLITAN AWARDS च्या Grand Prize साठीही डॉ. सिंग यांची निवड झाली आहे. पूर्व-आशियाई समूहांत शांतता,स्थैर्य व विकासासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची नोंद हा पुरस्कार घेत

या दोन्ही पुरस्कारांसाठी डॉ. मनमोहन सिंग यांचे अभिनंदन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग ह्यांचे अभिनंदन !!
ह्याही धाग्यावर तोच तो फालतूपणा सुरु झालाच शेवटी..
इब्लिसांदीही इग्नोर मारायचं सोडून आगीत तल घातलच!

<< ह्याही धाग्यावर तोच तो फालतूपणा सुरु झालाच शेवटी.. >> इथले अभिप्राय वाचून
पुरस्काराबाबत जपानी फेरविचार करण्याची शक्यता नसल्याने याची फार काळजी करण्याचं कारण नसावं ! Wink

बेफिकीर, अल्पना, रीया, अश्विनी के, कोकणस्थ, रश्मी..,

माझे मुद्दे स्पष्ट करून सांगतो.

१. पुरस्काराचं औचित्य :
काही लोक पुरस्काराच्या पलीकडले असतात. उदाहरणं द्यायची झाली तर लतादीदी, मेजर ध्यानचंद ही नावं चटकन डोळ्यासमोर आली. मनमोहन सिंग हे अर्थक्षेत्रातलं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. शिवाय ते भारताचे माजी पंतप्रधानही आहेत.

म्हणूनच पुरस्काराची योग्यता मनमोहनसिंगांच्या तोडीची आहे का, असा प्रश्न उपस्थित होणं नैसर्गिक आहे. मनमोहन सिंगांच्या पार्श्वभूमीवर पुरस्काराचं औचित्य तपासून पाहायला पाहिजे. प्रस्तुत प्रसंगात ते योग्य असावे असा अंदाज आहे. मनमोहन सिंगांचं योगदान कळल्यास जनतेस अधिक चांगल्या रीतीने प्रशंसन (अप्रिसियेशन) करता येईल.

२. घटनेतील निर्बंध :
पूर्वीही असे वाद झाले आहेत. मोरारजी देसाई यांना निशाणे पाकिस्तान हा पुरस्कार प्रदान झाला होता तेव्हाही अशाच प्रकारची चर्चा झाल्याचं अंधुकसं आठवतं. जपान हा पाकप्रमाणे शत्रूराष्ट्र नाही याची जाणीव आहे. आपल्या घटनेतल्या कलम १८ (२) नुसार भारतीय नागरिकास परराष्ट्राची बिरुदे स्वीकारण्यास मनाई आहे.

उपरोक्त जपानी पुरस्कार हा बिरुदासम आहे का? चर्चा व्हावी. तसेच याबाबत भारत शासनाकडून पारदर्शक धोरण जाहीर होणे अपेक्षित आहे.

आपला नम्र,
-गामा पैलवान

मोरारजी देसाई यांना निशाणे पाकिस्तान हा पुरस्कार प्रदान झाला होता तेव्हाही
<<
पाकिस्तान हे आमच्या भारताचे शत्रू राष्ट्र आहे पहिलवान. २ वेळा युद्ध अन तिसर्‍यान्दा कारगील खेळलोय त्यांच्यासोबत आम्ही. (ब्रिटिशही आमच्या भारताचे शत्रूच होते, अन गांधींजींनी ब्रिटिशांविरोधी लढा दिला होता. रिमेंबर? भारत. इंग्लंड? इत्यादी??) त्यामुळे निशाने पाकिस्तान मिळाल्यावर अशी चर्चा एक्स्पेक्टेड आहे.

जपान आमच्या भारताचा शत्रू कधीपासून झाला? (इथून पुढे अड्ड्यावर लिवलंय)

भारतीय मिडीयाने याबाबतीच काहीच बातमी दिली नाही आणि टिव्ही वर पण काही दाखवली नाही
मनमोहन साहेबांनी ड्रम वाजवायला हवे होते तरच विकलेली मिडीयाने लक्ष दिले असते

भारतीय मिडीयाने याबाबतीच काहीच बातमी दिली नाही आणि टिव्ही वर पण काही दाखवली नाही
मनमोहन साहेबांनी ड्रम वाजवायला हवे होते तरच विकलेली मिडीयाने लक्ष दिले असते.

>>>>>>......
साधा व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज नाही फिरला.

पण याचमुळे जास्त कौतुक वाटतेय हे ही तितकेच खरे !

मनमोहनसिंग हे भारताच्या आजवरच्या इतिहासात होऊन गेलेले सर्वश्रेष्ठ पंतप्रधान होते ह्यात मला तरी शंकाच नाही. उत्तम, ओघवते वक्तृत्व, भारताच्या जनतेशी थेट आणि वरचेवर संवाद करण्याची एक विलक्षण हातोटी ह्यामुळे त्यांचे प्रत्येक भाषण पूर्ण देश अगदी उत्सुकतेने ऐकत असे. गेल्या पंधरा वर्षातील लाल किल्ल्यावरून केलेली भाषणे पाहिली तर प्रत्येक भाषण सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावे इतके मौलिक. प्रत्येक भाषणात काहीतरी नवीन सांगण्याचा प्रयत्न असे. प्रत्येक १५ ऑगस्टला आपले थोर पंतप्रधान काय बोलणार याविषयी प्रत्येक देशवासियाला उत्सुकता असायची.
तसेच १५ वर्षात आपल्या कारभाराला भ्रष्टाचाराचे गालबोट लागणार नाही ह्याकरता त्यांनी डोळ्यात तेल घालून घेतलेली खबरदारी ही वाखाणण्यासारखीच! सत्ता गेली तरी पर्वा नाही पण स्वाभिमानाचा कणा ताठ राहिल असे धोरण प्रत्येक पंतप्रधानाने अनुकरण करावे असेच होते.
अशा थोराच्या कार्याला जनतेने मे महिन्यात लोकसभेच्या निकालाद्वारे नव्याने पावती दिली आहे ह्यातच त्यांची थोरवी दिसते. ४४ सिटांची भक्कम कमाई ही कुठल्याही पक्षाला हेवा वाटावी अशी नेत्रदीपक होती हे कुणीही मान्य करेल.
कमळाच्या सुगंधाने दूर असणारे भ्रमरही आकृष्ट होतात म्हणतात. ह्या महात्म्याच्या कर्तृत्वाचा परिमळ साता समुद्रापार जावा आणि त्या दूरस्थ देशानेही ह्या विभूतीचा गौरव करावा ह्या आश्चर्य ते काय?
जगद हिताय जायन्ते मानवा: के अपि भूतले हे सुभाषित रचताना त्या कवीला मनमोहनसिंगच दिसत होते का असे मला राहून राहून वाटते.

लोकहो,

श्री. इब्लिस म्हणतात की :

>> त्यामुळे निशाने पाकिस्तान मिळाल्यावर अशी चर्चा एक्स्पेक्टेड आहे.

परराष्ट्रांच्या बाबतीत औचित्याचा मुद्दा ग्राह्य आहेच.पाकच्या बाबतीत जास्त तीव्रतेने लागू पडतो.

आ.न.,
-गा.पै.

हे वाचल्यावर मनमोहन सिंग यांना मिळणार असलेल्या या पुरस्काराबद्दलच्या सग्गळ्या शंकाकुशंका विरून जाव्यात.

पहिल्या पानावरच्या "त्यांच्या योगदानाबद्दल व्यक्तिश: मला काहीच माहीत नाही." पासून तिसर्‍या पानावर "काही लोक पुरस्काराच्या पलीकडले असतात. उदाहरणं द्यायची झाली तर लतादीदी, मेजर ध्यानचंद ही नावं चटकन डोळ्यासमोर आली. मनमोहन सिंग हे अर्थक्षेत्रातलं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. शिवाय ते भारताचे माजी पंतप्रधानही आहेत." पर्यंतचे परिवर्तन पाहताना पैलवान र्‍हिदमिक जिम्नॅस्टिक्स करीत असल्याचे चलचित्र डोळ्यांसमोर आले.

शेंडेनक्षत्रांना स्वप्नातही मनमोहन सिंगच दिसायचे त्यामुळे ते पंधरा वर्षे पंतप्रधान असल्याचे व लाल किल्ल्यावरून भाषणे ठोकीत असल्याचे दिसले.
बाकी लाल किल्ल्यावरच्या भाषणाबद्दल बोलायचे तर मंगलमोहिमेची घोषणा मनमोहन सिंग यांनी लाल किल्ल्यावरूनच केली होती. पुढे काय झाले ते सांगायला नकोच.
त्यांच्या वक्तृत्वाबद्दल बोलायचे तर , असेच दुसरे एक उग्गाच राष्ट्राध्यक्ष झालेले नेते , बराक ओबामा का कायसे त्यांचे नाव, म्हणाले होते “I can tell you that here at G20, when the prime minister speaks, people listen,” he said, adding it was because of his deep knowledge of economic issues, the nuances of India’s rise as a world power and its commitment towards global peace and prosperity."

मनमोहन सिंग पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावर ओबामांनी त्यांना I will miss you असे लिहिले होते. दोघेही एकाच माळेचे मणी न् काय!

मयेकर, +१.

बोलण्यात कण्टेण्ट अन मुद्दे असतील, तर हळू आवाजात बोलूनही लोक कान देऊन ऐकतात, इतरांना स्टेजवर थापेबाजी करतांना नौटंकी करावी लागते, हे बरोबर आहे.

<< अशा थोराच्या कार्याला जनतेने मे महिन्यात लोकसभेच्या निकालाद्वारे नव्याने पावती दिली आहे ह्यातच त्यांची थोरवी दिसते. ४४ सिटांची भक्कम कमाई ही कुठल्याही पक्षाला हेवा वाटावी अशी नेत्रदीपक होती हे कुणीही मान्य करेल. >> मला वाटतं लोकशाहीत एखाद्या पक्षाचा/नेत्याचा एखाद्या निवडणूकीत पराभव होणं म्हणजे त्या पक्षाच्या/ नेत्याच्या एकंदर गुणवत्तेवरच जनतेने काट मारला असाच अर्थ निघतो असं नाही. त्या त्या विशिष्ठ वेळीं कोणत्या प्रकारचं नेतृत्व देशाला हवं असतं एवढंच निवडणूकीतून दिसून येतं. दुसर्‍या महायुद्धांत आपल्या देशालाच नव्हे तर सर्व मित्रराष्ट्राना प्रभावी व ऐतिहासिक नेतृत्व देणार्‍या चर्चिलना व त्यांच्या पक्षाला युद्ध संपतांच इंग्लंडने साफ नाकारलं, चर्चिलच्या गुणवत्तेबद्दल, कर्तृत्वाबद्दल प्रचंड आदर व कृतज्ञता असूनही ! आणिबाणीनंतर इंदिराजीनाही देशाने नाकारलंच होतं.

मनमोहन सिंगना 'आदर्श पंतप्रधान' म्हणून जपानने पुरस्कार दिला असता तर त्याविरोधातला उपरोध कदाचित रास्त ठरला असता. पण दोन देशातल्या मैत्रीसाठी त्यानी केलेल्या प्रयत्नासाठी व सिंग यांच्या अर्थशास्त्रातील अधिकाराबद्दल व कामाबद्दल दिलेल्या पुरस्कारांचं भारतात अभिमानपूर्वक स्वागतच होणं उचित, असं मला वाटतं.

मनमोहन सिंग यांचे अभिनंदन. Happy

आंतरराष्ट्रिय पातळीवर भारतीय पोहचले ह्याचा अभिमान नेहमीच असतो.

इथल्या काही चर्चेने अभिनंदनाच्या बीबीलाही गालबोट लावल्य पण. Sad
पक्षीय अभिनिवेश सोडुन एक साधा भारतीय म्हणुन विचार करता ही खुप मोठी अचिव्हमेन्ट आहे अस वाटत नाही का?

बा द वे, पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार निशाने पाकिस्तान की निशाने इम्तियाज?

बोलण्यात कण्टेण्ट अन मुद्दे असतील, तर हळू आवाजात बोलूनही लोक कान देऊन ऐकतात, इतरांना स्टेजवर थापेबाजी करतांना नौटंकी करावी लागते, हे बरोबर आहे.
<<
<<
या लोकांनी, वेगळा धागा काढुन 'मनमोहन' यांच्या अभिनंदनाची कितीही नाटके केली, तरी मोदींशी तुलना अथवा त्यांच्यावर आगपाखड केल्याशिवाय यांना कुणाचेही अभिनंदन करताच येत नाही. मोदींवर आगपाखड करणे हाच यांच्या धाग्याचा मुख्य उद्देश असतो.

विदुषकी तुलना चुकिची करत आहे मु़ळात तुमच्यासारख्यांना गोष्ट पचवणे जड जात आहे हेच प्रतिसादावरुन दिसुन येत आहे. ड्रम वाजवणे वेगळे आणि भरीव कामगिरी करणे वेगळे असते. जपानवाले बहुतेक आयडीयाचे नेटवर्क वापरतात नो उल्लु बनाविंग Biggrin

शेंडनक्षत्र यांनी जे लिहिले ते श्री महेश यांना दिसले नाही Angry आता नाही अ‍ॅडमिनचा धावा केला. ? किती दुटप्पी आहे महेश

आँ? वर शेंडेनक्षत्रांनी लिहिलंय ते काय आहे मग? फुले उधळलीत की अग्निफुले?
<<
<<
शेंडेनक्षत्रांनी जे लिहलय त्यात चुक काय आहे?

मनमोहनसिंग हे भारताच्या आजवरच्या इतिहासात होऊन गेलेले सर्वश्रेष्ठ पंतप्रधान होते ह्यात मला तरी शंकाच नाही.
<<
यावर तुमचे मत काय आहे. ते नव्हते का सर्वश्रेष्ठ पंतप्रधान?

मनमोहन सिंग पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावर ओबामांनी त्यांना I will miss you असे लिहिले होते<<<

ह्या धाग्याशी ओबामाही मनमोहनसिंगांना मिस करतात ह्या गोष्टीचा संबंध नसावा. दोघांमधील वैयक्तीक बाबी येथे नोंदवून काय मिळवले?

I will miss you <<<

हा मुद्दा येथे निदान धागाकर्त्याने आणायला नको होता. आता आणलेला आहे तरः

कधीही जनतेचे धड बहुमत नसलेला नेता, ज्या देशाच्या शत्रूंना खुलेआम सहाय्य करून त्या देशाला जेरीस आणता येईल अश्या देशाचा नेता, ज्या देशाने पाकिस्तानच्या कुरापती अनेकवेळा निदर्शनास आणूनही ज्याच्या कमकुवत व्यक्तिमत्वाचा फायदा घेऊन काहीही करावे लागत नाही असा नेता जर पायउतार झाला तर कोणीही राष्ट्रप्रमुख त्याला मिस करेल. विशेषतः, सुस्पष्ट बहुमत पाठीशी असलेला, धडाकेबाजपणे परराष्ट्र व्यवहारात मुसंड्या मारणारा, कणखर अशी प्रतिमा असलेला नवा नेता आलेला असला तर!

हा धागा 'जपान ह्या देशाने मनमोहन सिंगांचा एक सहृदय व्यक्ती म्हणून केलेला गौरव' ह्या विषयापुरता मर्यादीत ठेवणे ना काँग्रेसविरोधकांना जमले ना काँग्रेस पाठीराख्यांना! बाकी युक्तीवाद कितीही स्मार्ट असले तरी ते धाग्यापासून भरकटलेले असून वैयक्तीक खुन्नशीकडे वळले हे नाकारता येत नाही.

निषेध!

नेत्याच्या बाह्य प्रतिमेवर आणि बोलण्यावर आणि हो ड्रामेबाजीवर परराष्ट्रधोरण चालत असतं तर जग फार सोपं असतं. चीन आणि पाकिस्तान दोघांशी गळाभेट घेतल्याच्या झळा सीमांवर अजूनही धगधगताहेत.

तसंच दोन राष्ट्रांच्या संबंधात पाकिस्तान हा एकच मुद्दा नसतो.
आंतरराष्ट्रीय राजकारणात मनमोहन सिंग यांची काय पत होती हे या पुरस्काराने अधोरेखित झाले. ते आणखी स्पष्ट करणारे ओबामांचे निरोपाचे पत्र होते.

<< धडाकेबाजपणे परराष्ट्र व्यवहारात मुसंड्या मारणारा, कणखर अशी प्रतिमा असलेला नवा नेता आलेला असला तर! >> "With boldness and vision, during your ten years in office, you challenged our two nations to deepen our defence ties, engage in civil nuclear commerce, expand trade, and collaborate on clean energy technology while working through our differences," Barack Obama wrote to Dr Singh.

Pages