इडली-डोश्याचे ओले तयार बॅटर

Submitted by हर्ट on 3 November, 2014 - 01:30

इतर ठिकाणी माहिती नाही पण पुण्यात खूपशा ठिकाणी इडली डोशाचे तयार सारण मिळते. मी एक दोनदा विकत आणले. पण, इडलीचा वास नासका येत होता आणि उरलेले पिठ परत वापरता आले नाही. नक्की कुठे हे पिठ चांगले मिळते?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवडण्यापेक्षाही विकतच्या पीठात वापरलेला सोडा, कमी वापरलेली उडीद डाळ आणि न आंबवलेलं असणं हे जास्त माह्त्त्वाचे कारण आहे. (किमान माझ्यासाठीतरी)

मला बाहेरचे पीठ वापरताना पीठापेक्षा पाणी कुठले वापरले असेल याची काळजी जास्त असते>>>>+१
एकदा दादरला सर्वोदयमधे तो माणूस डोशाचे पीठ तयार करत होता आणि जवळचा प्लॅस्टिकचा मग उचलून पाणी ओतले त्यात. अगदी कसेसेच झाले. तेव्हापासून असे तयार पीठ कधीच नाही घेतले.

एकदा दादरला सर्वोदयमधे तो माणूस डोशाचे पीठ तयार करत होता आणि जवळचा प्लॅस्टिकचा मग उचलून पाणी ओतले त्यात. अगदी कसेसेच झाले. तेव्हापासून असे तयार पीठ कधीच नाही घेतले. >> मी पण एकदाच सर्वोदयमधे पीठ घेतले होते, पण अजिबात नाही आव्डले.

मला बाहेरचे पीठ वापरताना पीठापेक्षा पाणी कुठले वापरले असेल याची काळजी जास्त असते> मला ही. म्हणून घरी वाटलेलेच पीठ सर्वात बेस्ट.

आमच्या बसस्टॉपपाशी एक ईडली पिठाचा ग्राईंडर आहे. तिथे एक किलो तांदूळात पाव कि. उ. डा अश्या प्रमाणात घालतात. डाळ व तां. फालतु व खाण्यासाठी योग्य नसलेल्या प्लॅस्टीकच्या बादलीत ठेवतात व प्लॅ. तपेलीने उघड्यावरच असलेले पाणी वाटताना थोडे थोडे घालतात. ग्राईंडरला चेन बांधून तो रस्त्यावरच प्लॅस्टीकच्या कागदाने किंवा वृत्तपत्राने जेमतेम झाकलेला असतो. सकाळी प्लॅ. कागद दूर करून वाटणाला सुरुवात. भांडे महिन्यात एकदा तरी धुतात की नाही ते समजत नाही. हाय्येस्ट रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट देणारे दोन उद्योग म्हणजे पाणीपुरी/चाट स्टॉल व इडलीचे वाटलेले पिठ. त्यामुळे प्रत्येक दुकानाच्या बाहेर जिथे कुठे कोपर्‍यात जागा मिळेल तिथे सुरु होतात.

नन्दिनी, सोडा आणी पाणी ( कुठले असेल देव जाणे) ह्याला तर महत्व आहेच पण याच पैशात घरी स्वच्छ आणी पोटभर खाऊनही उरते. आम्ही विकतचे आणले नव्हते. पण शेजारच्यानी उत्साहाने आणले आणी तिघान्साठी १८ च इडल्या झाल्यामुळे आम्हाला ते कळले. उलट मी घेतलेल्या प्रमाणात ( ६ वाट्या तान्दुळ+ अडिच वाटी उडिद डाळ+ मेथी बीया चहाचा चमचाभर ) ३५ इडल्या झाल्या आणी त्यातले उरले पण. चक्क ५ डोसे झाले त्यात. ( बारीक वाटले होते)

मी मुद्दाम जास्त पीठ करते, म्हणजे दुसर्‍या दिवशीची नाश्त्याची सोय होते.

रश्मी, तू मेरेको बताती? Proud मागच्या पानावर वाचलं नाहीस का? आमच्याकडे आठवड्यातून पाच वेळा दाक्षिणात्य नाश्ता असतो. रोज विकतचं पीठ आणून चालायचेच नाही.

मी तीन दिवसांचे पीठ एकदम करते. एकावेळेला चार वाट्या तांदूळ आणि त्याप्रमाणात डाळ. वेट ग्राईंडर असल्यानं पीठ वाटायचा काही त्रास होत नाही.

बाहेरून आणलेलं इडलीच्या पीठाच्या प्रतीविषयी जे प्रश्न पडतात तसेच प्रश्न विकतचे पॅकबंद मसाले लोणची, पापड, आमसुलं, भाज्या, पालेभाज्या यांविषयी तुम्हाला पडतात का? ते प्रश्न निकालात कसे काढता तुम्ही?

हायला विसरलेच की.:फिदी: अग उत्साहाच्या भरात लिहुन टाकले,,मग मागे जाऊन तुझी पोस्ट वाचल्यावर लक्षात आले.:स्मित:

मंजूडी,
लोणची, मसाले वगैरे शक्यतो घरी केलेलेच असतात. बाहेरचे आणले तर प्रमाणित असल्याचा शिक्का असलेले. बटाटा, पोहा पापड शक्यतो घरचे किंवा खात्रीच्या विक्रेत्यांकडून. उडदाचे पापड नाईलाज म्हणून लिज्जतचे. आमसुले खात्रीच्या विक्रेत्यांकडून. भाज्या, पालेभाज्या ताज्या असतील तर थोड्यावेळ पाण्यात विनेगर घालून त्यात टाकायच्या आणि मग धुवायच्या. फ्रोजन असतील तर प्रश्नच नाही.

बी,
आई वृद्ध आहे म्हणून सुचना. शक्यतो कामाला येणार्‍या बाईंनाच एक्स्ट्रा पैसे देवून शनिवार/रविवारी इडली/डोसा पीठ करुन घ्यायचे. तसेही भाचीला कॉलेज असले तरी ती देखील थोडा वेळ काढू शकतेच की. डाळ तांदूळ धुवून भिजत घालायला ५-७ मिनिटे पुरेशी आहेत. रात्री झोपताना भिजत घातले तर बाई सकाळी वाटून देतील. दिवसभर तापमान जास्त असल्याने पीठ आंबवायलाही बरे पडते. इडली रवा वापरल्या फक्त डाळ भिजवून वाटणे एवढेच करावे लागेल. वेट ग्राइंडर असेल तर काम खूपच सोपे होते. पण नसला तरी काही फार अडत नाही. माझ्याकडे साधा ऑस्टरचा अमेरिकन ब्लेंडर आहे तरी ५-७ मिनिटे भिजवायला आणि १५ मिनिटे ग्राईंड करायला यापेक्षा जास्त काही करावे लागत नाही. नवरा/मुलगा देखील आपापले व्याप सांभाळून करु शकतात.

तयार पीठापेक्शा घरचेच बरे आमच्याकडे तरी, एकेकाळी १०० च्या खाली इड्ल्या बनत नसत घरी. अगदि शेजार्यांचे एक ताट त्यांच्याकडे भरुन व त्यांची मुले आमच्यातच संडेला खाउन जायची .मिक्सर दोन तास सतत डाळतांदुळ वाटण करायचा दुसरया दिवशी परत नारळ चटनी साठी १/२ तास.

पण आताही जास्तच लागतात इडल्या तरी बाजारात तयार इडली रवा तांदळाचा मिळतो त्याने अर्धे काम कमी होते, तो धुवुन पुर्ण निथळुन त्यात फक्त उडदाची डाळ वाटुन मीठ घालुन रात्रभर गॅसजवळच्या उबदार जागेत ठेवले तर थंडीतही मस्त फुलून येतं पीठ आणि इडल्याही एकदम स्पंजी आणि हलक्या होतात(फक्त डाळ वाटतानाच पाणी घाला .पीठ ,भिजवलेल्या रव्याने कन्सिस्टंसी व्यवस्थित होते). (४माणसांच साधारण प्रमाण -१ वाटी डाळीला अडिच वाटी इडली रवा चवीनुसार मीठ, आमचा घरचा चमचा १/२ चमचा त्यामुळे चव बघुन ,डाळ ४तास भिजवुन मग वाटा )याप्रमाणानेही जास्तच होतात इडल्या Happy

पण हल्ली याच रव्याच्या जास्त करतो.याच पीठाचा उताप्पा पण छान होतो कांदा,टोमॅटो,मिर्ची घालुन .पातळ डोसा होत नाही कारण रवा जरा नेहमीच्या रव्यापेक्षा जाड असतो.
अगदिच लगेच हवे पीठ तर इंस्टंट पाकीटे मिळतातपण त्यात सायट्रिक अ‍ॅसिड (लिंबुफुल)असते. वर त्यात दही किंवा पाणी घालावे लागते.ते बनवलेल्या पीठासारखे होत नाहीत चवीलातरी. आणि वर क्वांटिटीपण कमी Happy त्यामुळे नाही आवडत.

बाहेरचे बॅटर अजिबात वापरू नये. घरीच रवा, डाळ वगैरे भिजवून, आंबवून ताजी इडली, डोसा करावा. इतकंच काय पण बाहेरचे इडली, डोसे (मंदिरातले वगैरे) खाऊही नये. शेवटी घरच्या ताज्या, सकस अन्नाची चव बाहेरच्या पदार्थाला येतच नाही.

झटपट इडली हवी असेल तर MTR चे कोरडे पीठ मिळते. दही आणि पाणी घालून १० मी. ठेवायचे आणि इडल्या लावायच्या. मस्त होतात इडल्या. दोसे बेक्कार होतात. कुठलं काय वापरलंय चिंता नको. पुणे/ सिंगापूरला पण मिळत असेल.
सायो, आईच्या हाताची राहिलं. Proud

आमच्याकडे अम्मा'ज इडली नावाने फ्रोझन इडल्या मिळतात. जगात भारी इडल्या आहेत त्या! डोश्याचे पीठ देखील सुंदर मिळते इथल्या इंग्रोमध्ये..
मला ते पीठ आंबवणं वाटणं याचा कंटाळा आहे व त्याहीपेक्शा वर लिहिलेले ऑप्शन जबरी सोयीचे आहेत.

घरीच पीठ वाटणे हेच बेष्ट असे सर्वानुमते ठरले असल्यामुळे इथेच विचारते.
१. इथे कोणी WET GRINDER वापरता का? असल्यास कुठला . आकार छोटा असलेला कुठला?
२. मी इडली रवा वापरते पण तो बारीक वाटला जात नाही. त्यामुळे डोसे निट होत नाहीत. इडली रवा नको असेल तर तांदूळ कोणता घ्यावा ?
३. ह्या विकतच्या पीठ प्रकरणामुळे इडली, डोसा , आप्पे ला लागणारी वेगवेगळे प्रमाण विसरायला झालाय. जरा सगळ्यांची वेगवेगळी प्रमाणे सांगा

मृणाल, मी वापरते वेट ग्राईंडर. प्रीतीचा आहे. आकारानं लहान आहे त्यामुळे धुवायला सोपा आहे.

२. मी इडली रवा वापरत नाही. त्याऐवजी तांदूळ भिजत घालते. इडलीसाठी इडलीराईस आणि डोशासाठी डोसाराईस आसा आमच्याकडे मिळतो. शक्यतो उकडा, जाडा, भात फळफळीत होणारा तांदूळ वापरावा. त्याने इडली डोसा हलके होतात. शक्यतो बासमती सोनामासूरी सारखे तांदूळ वापरू नयेत (अर्थात पसंद अपनी अपनी).

३. इडली: ३ वाटी तांदूळ १ वाटी डाळ. वाटताना मूठभर शिजवलेला भात
डोसा: २ वाटी तांदूळ १ वाटी डाळ. वाटताना चमचाभर भिजवलेल्या मेथ्या किंवा अर्धीवाटी पोहे
आप्पे: वरचे सेम प्रमाण. पण वाटताना कन्सिन्स्टन्सी डोशापेक्षा घट्ट ठेवायची.

तुमच्यापैकी कुणी हळदीच्या, आंब्याच्या, केळीच्या, फणसाच्या पानामधे इडल्या केलेल्या आहेत का? मी सुचवेल की एकदा तरी करुन बघा. इट टेस्ट ऑलटुगेदर बेटर दॅन युझुअल.

हॉटेलसारखे पातळ आणि क्रिस्पी डोसे होण्यासाठी टीप्स द्या बरं कुणीतरी....

मी तवा गॅसपासून दूर करुन थंड पाणी शिंपडते, मग जरासे तेल लावून डोसा घालते आणि उलट्या वाटीने फिरवते, पातळ होइपर्यंत, पण खूप क्रिस्पी नाही होत. काय करावे?

तेलकट धिरडी प्रकार आवडत नाही. माझ्याकडे दही देखील नीट विरजत नाही. पुर्वी हे सर्व यथासांग नीट नेटक व्हायच. हल्ली साडेसातिमुळे हेही जमेनास झाल आहे. मला माझे चकीत व्हायला होते की काही स्किल्स ह्या नष्ट होत नाहीत. स्वैपाक एक! >

याला अंधश्रध्दा म्हणतात नीट केले की सगळे नीटच होते

मृणाल १: Elgi Ultra company's dura wet grinder पण छान आहे. मी नुकताच घेतला आहे. पण माझ्या साबांकडे अनेक वर्षे आहे.

माझ्याकडेही वेट ग्राईंडर आहे. नवा कोरा ६ हजार पर्यंत मिळत होता. सहज म्हणुन फ्लिकर्/ओएलेक्सवर पाहिले आणि तिथे २००० ला खुप चांगला मिळाला. अर्थात आधी वर्षभर वापरलेला आहे पण व्यवस्थित चालतो, अजिबात खराब झालेला नाहीय त्यामुळे मला काय फरक पडला नाही. माझ्याकडे १५-३० दिवसांत एकदा वापरला जातो आणि त्यासाठी ६००० पेक्षा २००० देणे बरे वाटले.

मला बाहेरचे पीठ वापरताना पीठापेक्षा पाणी कुठले वापरले असेल याची काळजी जास्त असते>>>>> पाण्याची जर इतकी काळजी असेल तर तुम्ही हॉटेल मधे इडली, डोसा, उत्तपा खात नाही का?

हॉटेलसारखे पातळ आणि क्रिस्पी डोसे होण्यासाठी टीप्स द्या बरं कुणीतरी....

मलाही असेच दोश्याचे पीठ हवे होते ज्याच्यातून हॉटेलसारखे क्रिस्पी डोसे होतील. वर आईने लिहिलंय त्या वेट ग्राईंडर मधून खरच तसेच दोसे होतात घरच्याघरी. त्याच्या आत असलेल्या दगडान्मुलेच ती चव येते. घरी मिक्सर मध्ये ती मजा नाही.

बाहेरून १-२ दा आयडी ( http://idspecial.com/ ) कडून आणलेले पीठ. तेही छान होते.

अहो टोचा तिकडे दृष्टी आड सृष्टी करावे लागते हो.:अरेरे: बाहेरगावी गेल्यावर काय पर्याय असु शकतो? आणी चूकुन माकुन तुम्ही गेलेच समजा साऊथ मध्ये भटकायला, तर तिथे जाताना आपण घरी बनवलेले थालिपीठ, पुर्‍या नेणार की तिथली चव बघणार? कोकणात गेल्यावर मासे खाणार, तिथे जाताना इथुन तर हुमण आणी तुकडी नेऊ शकत नाही ना.:स्मित:

Pages