एक लग्नसमारंभ - हटके

Submitted by स्वीट टॉकर on 2 November, 2014 - 05:22

दोन वर्षापूर्वी आमच्या मुलीचं (कॅप्टन पुनव गोडबोलेचं) लग्न झालं. तेव्हां समारंभ करण्याऐवजी आम्ही ती सगळी रक्कम एका फौंडेशनला दिली जे गेली तीस वर्ष अनाथ मुली आणि निराधार वृद्धांना निवारा आणि शिक्षण देताहेत.

साधारण वर्षभरानंतर फौंडेशनचा कुठलासा कार्यक्रम होता जिकडे बरेच influential लोक येणार होते. तिथे मी त्यांना काही motivational सांगावं असं फौंडेशनच्या संचालकांनी सुचवलं. Lecture देणारी भाषणं रटाळ आणि कंटाळवाणी होतात असं माझं मत पण इलाज नव्हता.

माझी बोलायची वेळ आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सगळ्यांना भुका लागल्या होत्या, चिडचिड झाली होती, स्वर चढले होते. आता माझं तयार केलेलं भाषण ठोकणं म्हणजे मूर्खपणाच झाला असता. विनोदी, हलकं फुलकं आणि मुख्य म्हणजे अगदी short करणंच योग्य होतं.

विनातयारीची भाषणं बहुदा तोंडघाशी पडतात. पण हे बर्‍यापैकी जमलं. ते सॉभाग्यवतींनी मोबाइलवर विडियो रेकॉर्ड केलं. ते youtube वर टाकलं. त्याची लिंक देत आहे. सुरवातीचं एक मिनिट कट झालं आहे. क्षमस्व.

(ती actually लिंक बनलेली नाही. खालील लाइन कॉपी करून ब्राऊजरवर 'पेस्ट' करावी लागेल. लिंक कशी बनवायची हे कोणाला माहीत असल्यास कृपया मला सांगा.)

http://www.youtube.com/watch?v=UNnBTWQaWRQ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम विचार!

तुमच्या प्रोफाईल मध्ये कार्यक्षेत्र मरीन इंजिनिरिंग असे लिहिले आहे. तेव्हा त्याबद्दलचेही तुमचे अनुभव वाचायला आवडतील.

चांगला पायंडा. व्हिडिओही पाहिला तुमचे भाषण आवडले. एवढे चांगले कार्य करूनसुद्धा बोलण्यात, देहबोलीत त्याचा कसलाही बडेजाव न आणता, उलट नर्मविनोदानी ढंगाने त्याला दूरच ठेवत मस्त बोलला आहात.

फार छान उपक्रम.............अभिनन्दन!

आपल्या कौतुकास्पद निर्णयाला अत्यावश्यक असलेली साथ देणार्‍या आपल्या कन्येचं व जांवईबापूंचंही [ अर्थात, दोन्ही कुटूंबांचही ] मनःपूर्वक अभिनंदन !
[ आपल्याला लग्नाच्या 'डेकोरेटर्स', 'कॅटरर्स' यांच्याकडून धमक्या आल्या नाहीत का ? कदाचित, सोबतची 'क्लीप' प्रसारित झाल्याने आतां येतीलही ! Wink ]

फार छान उपक्रम.............अभिनन्दन!

भाऊ, मार्मिक Biggrin
प्रसाद गोडबोले, अनुकरणीय निर्णय.
अवांतर: अजुन एक प्रगो आहेत इथे. त्यांचाच लेख आहे असे वाटले आधी. क्लिप बघितल्यावर उलगडा झाला. ते प्रगो लहान आहेत.

सर्वजण,

कौतुक केल्याबद्दल धन्यवाद.

भाऊ, तुम्ही स्वतः चित्र काढता असं दिसतंय. वंडरफुल कला आहे.

स्वाती२ - बोटीवरचे अनुभव टाकण्याची इच्छा आहे. पण लिहायला खूपच वेळ लागतो.

प्रसाद गोडबोले नावाचे आधीच एक सभासद आहेत. गोंधळ नक्कीच होणार. मी उद्यापासून 'स्वीटॉकर' हे नाव वापरणार आहे.

फारच छान. तुमच्या मुलीच आणि जावयाच कौतुक वाट्लं. स्वतःच्या संसारासोबत किती आयुष्य उभारण्यात हातभार लावला. मनापासून अभिनंदन!

छान उपक्रम.............अभिनन्दन!

मस्तच Happy

युट्युबवर व्हिडिओ दिसतो त्याखाली 'Share' पर्याय आहे. त्यावर क्लिक केलं की लिंक मिळते. ही लिंक तुमच्या व्हिडिओची http://youtu.be/UNnBTWQaWRQ

तिथेच Embed असा पर्याय पण आहे. त्यावर क्लिक केल्यास एंबेडेड व्हिडिओ देण्यासाठी कोड मिळतो. हा तुमच्या व्हिडिओचा कोड- <iframe width="420" height="315" src="//www.youtube.com/embed/UNnBTWQaWRQ" frameborder="0" allowfullscreen></iframe>

माझ्या माहितीप्रमाणे इथे मायबोलीवर एखाद्या धाग्यावर व्हिडिओ एंबेड करायचा झाल्यास कोड अ‍ॅडमिनना पाठवून करवून घ्यावा लागतो.

खूप म्हंजे खूपच आवडले तुमचे विचार आणी पटले सुद्धा!! असे मनात आलेले ,हटके विचार प्रत्यक्षात उतरवताना

पुष्कळशा अडचणी आल्या असतील ना ?.. लोकं काय म्हणतील या उगाचच पडणार्‍या प्रश्नाला तुम्ही खूप छान पद्धतीने सोडवलंय आणी यात मनःपूर्वक साथ देणार्‍या तुमच्या कुटुंबियांचं ही खूप कौतुक वाटलं..
वाह!! खूपच छान.

तृप्ती , तू दिलेल्या लिंक बद्दल तुझे विशेष आभार Happy

तृप्ती - थँक्स. मात्र मला एम्बेड याचा अर्थ आणि उपयोग दोनीही माहीत नाही. सांगू शकाल का?

सुजा - आत्ता पुण्यातले अनुभव टाकले आहेत. (अंधार्‍या रात्रीतली लिफ्ट). दोन आठवड्यात बोटीवरचे येतील.

वर्षू नील - चांगल्या हटके विचारांचं असं असतं : जर एखाद्याला ते पसंत पडले नाहीत तर ती व्यक्ती आपला मित्र असण्याच्या लायकीची नाही असं समजायचं की झालं. प्रत्यक्षात मात्र अशी वेळ येतच नाही. सगळेच खूप open minded झाले आहेत.

एम्बेड याचा अर्थ आणि उपयोग >>> तुम्हाला एखाद्या वेब पेजवर युट्युब लिंक नुसती लिंक न देता युट्युबची खिडकी द्यायची असेल तर एंबेड हा पर्याय वापरता येतो. युट्युब खिडकी दिल्यास त्याच खिडकीत व्हिडिओ बघण्याची सोय होते.

मस्त.. लग्नातल्या हौशी, गमतीजमती बाजुला सारुन हा निर्णय घेणे तसे सोपे नाही. तुम्हा सर्वांचे अभिनंदन.
भाषण पण चांगले झाले की. तुमचे भाषण संपल्यावर कोणीतरी बोलायला सुरुवात केली, तो भाग फार मजेशीर झालाय. (शब्द उलटसुलट झाल्यामुळे). Happy

आवड्ल! वरती त्या foundation च नाव पण लिहा म्हणजे अजुन कुणाला अस करावस वाटल तर चान्गलच आहे की!...

व्हिडीओ नाही बघता आला, ऑफिसमधे बॅन आहे.
पण विषय्/उपक्रम छान.
थोडे इथेच लिहाना भाषण कसे झाले/काय बोललात ते.

प्राजक्ता,
जनसेवा फाउंडेशन. (नाव एकदम cliche. पण काम अफाट.) मला क्वचितच तिथे जायला वेळ मिळतो पण जेव्हां जातो तेव्हां अगदी खुजं असल्यासारखं वाटतं. तिथल्या मुली अनाथ म्हणायच्या खर्‍या, पण तिथे प्रत्येकी ला तीस भावंडं, दहा मावशा आणि चाळीस आजीआजोबा आहेत. एकदम आनंदी वातावरण! आणि तिथून बाहेर पडतात त्या आपल्या पायावर उभं राहायचं ट्रेनिंग घेऊनच.
मी नाव लिहिलं नाही याचं कारण असं की अशी उत्तम काम करणार्‍या संस्था खूप आहेत. ज्याला द्यायची इच्छा आहे त्यांना सहज सापडतात. देणारेच कमी.

लिंबुटिंबु,
मी विडियो मायबोलीवर टाकला आहे तो तुम्ही मित्रमंडळींनी कौतुक करावं म्हणून नव्हे तर मनोरंजक भाषणासाठी. तेच आधी इथे लिहिलं तर विडियोची मजा जाईल.

Pages