निवडणूका निकालांचा 'अगंभीर' धागा

Submitted by बेफ़िकीर on 13 May, 2014 - 10:36

मतदान संपल्याक्षणी सगळ्या वाहिन्यांवर एक्झिट पोल चा धुमाकूळ सुरू झाला आहे. सर्वच वाहिन्या भाजपच्या जागांची संभाव्य संख्या २४९ पासून ३४० पर्यंत असेल असे दाखवत आहेत. १६ मे २०१४ पर्यंत थांबण्याचा संयम कोणाकडेही नाही. लाडवांची कंत्राटे आधीच दिली गेलेली असून लक्षावधी लाडू वळण्यात येत असल्याचे चित्रण एका वाहिनीवर आत्ताच दाखवले. काँग्रेसच्या आघाडीला दिडशेच्या आसपास जागा येतील असे दाखवत आहेत. विश्लेषण, चर्चा, वाद, भांडणे सुरू होत आहेत. मोदी सरकार आल्याचा जयघोष चाललेला आहे.

प्रत्यक्षात काही तिसरेच झाले तर? शेअर बाजाराचे काय? लाडवांचे काय? (काँग्रेसकडून लाडवांना शेकडा भाव तितकाच मिळेल का जितका भाजपने कबूल केला होता?)

ह्या धाग्यावर कृपा करून गंभीर लिहू नयेत. फक्त वैयक्तीक चिखलफेक होऊ नये. मात्र धमाल येईल असे प्रतिसाद द्यावेत. प्रतिसाद वाचून हसू आले पाहिजे, आसूरी आनंद मिळू नये कोणालाही!

कदाचित मोदी सरकार येईल, कदाचित नाही, कदाचित त्रिशंकू लटकेगिरी होईल! पण आपण आपले डोके कशाला फिरवून घ्यायचे? मजा लुटा! एक्झिट पोलमध्ये काय दाखवत आहेत ते लिहा, प्रत्यक्ष रिझल्ट्स लिहा, आपली मते लिहा! फक्त सदस्यत्व स्थगित होऊ देऊ नका.

जय लोकशाही!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोदी पंप्र झाल्यास येथिल एडिसनमधे एक रेस्टॉरंट फुकट जेवण देणार!! त्वरा करा , जागा राखून ठेवा,
किंवा भारतीय पद्धतीप्रमाणे रांगा तोडून, पैसे चारून खुशाल आत शिरा!
निवडून कुणिहि आले तरी आपण काही बदलत नाही!
बॉम्बे स्पाईस असे नाव आहे, एडिसन, न्यू जर्सी.

मोदी पंप्र झाल्यास येथिल एडिसनमधे एक रेस्टॉरंट फुकट जेवण देणार!! त्वरा करा , जागा राखून ठेवा,>>>>>> अमेरिकेने मोदीना व्हिसा दिला तर

आताच एक बातमी वाचली. कि मंत्रीपदासाठी देखिल मारामारी सुरु झाली म्हणुन. रेफ. http://maharashtratimes.indiatimes.com/nation/fight-over-ministry-in-bjp...

चला आता खुप काही फरक नसेल पुढच्या ५ वर्षासाठी Wink कुणीही येवो.

लाडु कुठल्या रंगाचे असतील?? म्हणजे केशरीच असतील की त्यावर हिरवा पिस्ता पण (नावालाच!) लावलेला असेल?? अडवाणींचं तोंड लाडवांणी गोड होईल कां??

http://zeenews.india.com/marathi/news/general-elections-2014/narendra-mo...

मोदींच्या सरकारमध्ये मला मंत्रिपद - रामदास आठवले

मंत्रीपद मिळ्यानंतर आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं साहित्य त्यांच्या बंगल्यातून बाहेर काढू,- रामदास आठवले

-------- Biggrin

खर तर मुक्ताफळ मधे मोडते परंतु हा धागा अगंभीर असल्याने ज्या नेत्याला कधीच गंभीरपणे घेत नाही अश्या नेत्याने प्रचंड गंभीरपणाचा आव आणत गंभीर वाक्य बोलल्याने मी स्वतः त्याची दखल घेउन गंभीर पणे इथे आपणास देत आहे अपेक्षा आहे की आपण गंभीर होउन वाचावे

रच्याकने आज गौतम गंभीर ची मॅच फार गंभीर आहे

रामदास आठवले यांनी सक्कळी सक्काळी काय प्राशन केले कोणास ठाऊक, ओबामा ओबामा अस्स कैतरी बोलत होते. ते म्हणे सातत्याने ओबामांच्या संपर्कात आहेत. Rofl

आप ला २८० जागा मिळाअल्या तर ?????????????????<<<

१. केजरीवाल भाजी मंडईतून सरकार चालवतील.

२. त्यांना तेथेही मारहाण होईल.

३. २०१४ च्या नोव्हेंबरमध्ये ते राजीनामा देतील.

४. २०१५ च्या जानेवारीत राहुल गांधी पंप्र होतील.

निवडणूक निकालाच्या सर्व शक्यता व त्या प्रत्येक शक्यतेवर आधारलेली पक्की व्यूहरचना याचं स्पष्ट चित्र फक्त एकाच महासंगणकावर जय्यत तयार असावं - त्याचं नांव आहे,मा. शरदराव पवार ! Wink

  • ते सी-सॉ वालं चित्र भारी वाटल मला, एका पारड्यात अमरींदर सिन्ग तर दुसर्यात (करुण चेहर्याचे) अरुण जेटली.
  • आपचे कार्यकर्ते खुपच नॉन-ग्लॅमरस दिसतात. त्यांना काही जास्त माहीती ही नसते. काहीही बरळतात.
  • एका फोटोत मोदी अन त्याच्या बाजुला लाडू असा काहीतरी विचित्र वाटत होत, की एक लाडू मोदीं नी गट्ट्म केला आहे.

हापूस, अवश्य!

बंडू -

>>>आपचे कार्यकर्ते खुपच नॉन-ग्लॅमरस दिसतात. त्यांना काही जास्त माहीती ही नसते. काहीही बरळतात<<<

Lol

धन्यवाद बेफिकीर. ही पहा:

टग्यामहाराज बारामतीकर

धरणात पाण्याचे
अंमळ दुर्भिक्ष्य
अंत करु पाही
मुतोनिया

भगिनीस याच्या
मतदान करा
अन्यथा पाण्याला
बूच मारी

विरोध करती
नतद्रष्ट काही
टग्या महाराजां
दृष्ट लागे

पिऊन 'सोडला'
अवघा समुद्र
ठेविली का नावे
अगस्त्याला?

अगस्त्य अवतार
बारामतीचा टग्या
वंदावेच त्याला
पुन्हा पुन्हा

टग्यामागे उभा
जाणता राजा
आणि त्याची प्रजा
"शुभेच्छुक"

शाई पुसोनिया
मतदान करा
द्विगुणित करा
आनंदही

असे जरी राजा
कृषी कारभारी
बांधतो श्रीमंत
लव असा

रामराया पुढे
हनुमान उभा
तैसेच ठाकले
हे ते दोघे

बोले तैसा चाले
जयांची ही कीर्ती
तयांना वंदावे
पुन्हा पुन्हा

मनसेमुळे फायदा झालेला घटक कोणता हाच आता प्रश्न आहे - स्वतः मनसेही नाही बहुधा) >>>

राज ठाकरे ह्या माणसाला व्ययक्तीक लेव्हल ला तरी प्रचंड फायदा झाला आहे.

शाई पुसण्याचा चान्सच नाहीये.
१७ लामतदान केलं.
अजून मार्क जैसे थे.
जस्ट नखाच्या ग्रोथ प्रमाणे ०.५ एमेम पुढे आलाय.

बेफिकीरजी,

बाकी लाडू तेवढे मोतीचूर असायला हवे होते हो....
म्हणजे सरकार कुणाचंही येवो पण दिग्या काकांच्या लग्नात वाटता आले असते की !!
पण डिंकाचे लाडू म्हणजे......
बाळंतपणापर्यंत टिकतील का?

आमच्या इथे रसाच्या गु-हाळात दोन मुले वाद घालत होती मोदी की गांधी, व मोदीवादी तमीळ मुलगा सारखा "मोडी आयेगा, देक तू" असे जोरजोरात बोलत होता

मोदी / मोडी आले तर इनकम टॅक्स मोडीत निघणार का?

आज व्हॉ. अ‍ॅ. वर आलेला मेसेज

१६ मेचा दिवस BJP साठी सोनियाचा
आणि Congress साठी मोदी (डी) त निघण्याचा ठरेल काय?

Pages